87 मतदारसंघात लागणार 2 EVM मशीन
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात रंगात आली आहे. राज्यात प्रमुख पक्षांमधील बंडखोरी आणि अपक्षांची गर्दी आणि इतर लहान पक्षांमुळं यंदा उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळं जिथं जास्त उमेदवार आहेत, तिथं निवडणुक आयोगाला एकापेक्षा अधिक ईव्हीएमची व्यवस्था करावी लागणार आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 87 मतदारसंघात जास्त उमेदवार असल्यानं दोन ईव्हीएम मशीन लागणार आहेत.
पोस्टल बॅलट म्हणजे नक्की काय?
राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पण मतदानाची पोस्टल बॅल्ट पद्धत कशी असते माहितीये? चला जाणून घेऊ.या एका प्रकारच्या मतपत्रिका असतात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, मेलचा वापर करुन मतदानाचा अधिकार बजावता येतो. केंद्रीय दलांमध्ये असणारे सरकारी कर्मचारी, लष्करातील सैनिक, परदेशामधील दूतावासात काम करणारे सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा काही ठरावीक लोकांना अशा प्रकारे मतदान करण्याचा अधिकार देण्यात येतो.
महिलांकडे असणार 426 मतदान केंद्रांचे नियंत्रण..
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापन करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 45 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये 33, गोंदिया 32 आणि सोलापूर 29, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली , हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे पदार्थाचे करा सेवन..
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही खाद्यपदार्थ अत्यंत फायदेशीर ठरतात. हळद, ज्यात असलेल्या क्युरक्युमिनमुळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेले फळे, जसे की संत्रे, आंबे आणि द्राक्षे, इम्यून सिस्टीमला बूस्ट करतात. ड्रायफ्रूट्समध्ये असलेले झिंक प्रतिकारशक्तीला बळकट करतात. आवळ्याचा रस शरीरातील विषारी पदार्थ दूर करण्यास मदत करतो आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो. याव्यतिरिक्त, पालेभाज्या, विशेषतः पालक आणि मेथी, लोह आणि अँटीऑक्सिडेंट्ससाठी उत्तम स्रोत आहेत.
'लाडकी बहीण योजना' बंद होणार...का ?
मध्य प्रदेशात भाजप सरकारने लागू केलेली "लाडकी बहीण योजना" बंद करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा महंमद यांनी केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेवडीसंबंधीच्या टिपण्णीवरून सवाल केला, "काँग्रेसच्या कल्याणकारी योजनांना मोदी रेवडी म्हणतात, पण भाजप सरकार 'लाडकी बहीण' योजनेतून रेवडी का वाटत आहे?" असे तीव्र प्रश्न डॉ. शमा यांनी उपस्थित केले. काँग्रेसने ही योजना सुरू केली होती, असेही ते म्हणाले
सोलापूर: मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी द्या..
सोलापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील खाजगी कंपन्या मधील आस्थापना, सर्व दुकाने किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल इत्यादींना सूचना देण्यात येत आहे की, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी. मतदाना विषयक काही तक्रारी असल्यास 0217-2728401 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त तथा नोडल अधिकारी लेबर वॉटर्स सोलापूर यांनी केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना..
महाराष्ट्र सरकारने 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना' सुरू केली आहे. या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही मिळणार आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे, तसेच 14 जिल्ह्यांतील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया, उपचार, विमा संरक्षण आणि आरोग्य शिबिरे दिली जात आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: jeevandayee.gov.in.
2 लाख 50 हजार तरुणांना मिळणार नोकऱ्या..
मुकेश अंबानी यांनी आंध्र प्रदेशमध्ये 500 कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्रे उभारण्यासाठी 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या प्रकल्पावर पुढील 5 वर्षांत काम करणार आहे. ऊर्जा क्षेत्रात अंबानींच्या या गुंतवणुकीमुळे 2 लाख 50 हजार तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. ही गुंतवणूक रिलायन्सची ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे.प्रकल्पाचा उद्देश स्वच्छ ऊर्जा निर्माण करणे आणि पर्यावरणीय संरक्षण वाढवणे आहे.
कांद्याचे भाव कडाडले..
कांद्याच्या भावाने मोठी झेप घेतली आहे. अनेक ठिकाणी कांद्याची किंमत 80 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. रिपोर्टनुसार, काही शहरांमध्ये कांद्याचे भाव काही दिवसात जवळपास ₹40/किलोने वाढले आहेत. दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये कांद्याचे भाव वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.
उमेदवारांना निवडणुक चिन्ह कसे दिले जातात?
निवडणूक चिन्ह हे मान्यताप्राप्त तसंच नोंदणीकृत पक्षांना किंवा अपक्ष उमेदवारांना देण्यात येणारं एक प्रमाणित चिन्ह असते. निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 या कायद्यांतर्गत निवडणूक आयोगाद्वारे राजकीय पक्षांना तसंच अपक्ष उमेदवारांना दिली जातात. निवडणूक चिन्हांचे राखीव चिन्हं आणि मुक्त चिन्हं असे दोन प्रकार पडतात. राखीव चिन्हे म्हणजे जी एखाद्या पक्षासाठी राखीव असतात, तर मुक्त चिन्हं म्हणजे जी नोंदणीकृत पण मान्यता न मिळालेल्या पक्षांना तसंच अपक्ष उमेदवारांना दिली जातात. जेव्हा उमेदवार अर्ज भरतो, तेव्हा त्याला निवडणूक आयोगाच्या मुक्त चिन्हांच्या यादीतून तीन चिन्हांची निवड करावी लागते. त्यानुसार निवडणूक आयोगाद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर एक चिन्ह त्या उमेदवाराला दिलं जातं.