Fiverr

Showing posts with label What is Sore eyes flu. Show all posts
Showing posts with label What is Sore eyes flu. Show all posts

Monday, August 7, 2023

Sore eyes meaning2023: डोळे येणे' म्‍हणजे काय ? आणि त्‍यावरील उपाय


sore eyes meaning: डोळे येणे' म्‍हणजे काय ? आणि त्‍यावरील उपाय

Sore eyes meaning: डोळे येणे' म्‍हणजे काय

आणि त्‍यावरील उपाय

नमस्कार मित्रानो,गेल्या काही दिवसापासून  तुम्ही एकलाच असाल कि डोळे लाल(Sore eyes flu) किंवा Burning eyes flu च्या  बातम्या नक्कीच वाचला असाल हा आजार नेमका काय आहे आणि तो कसा होतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.   

सध्‍या अनेक भागांमध्‍ये डोळे eyes flu येण्‍याच्‍या साथीने डोके वर काढले आहे. त्‍याचा संसर्ग झपाट्याने होत आहे. सर्व वयोगटांतील व्‍यक्‍ती प्रामुख्‍याने मुले या आजाराने त्रस्‍त आहेत. 'डोळे येणे' म्‍हणजे नक्‍की काय ?what is sore eyes flu

Sore eyes flu

ते कशामुळे होते ? त्‍याची लक्षणे कोणती ? त्‍यासाठी कोणती उपाययोजना करता येते ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आज आपण करून घेऊया आणि आजारासंबंधी सगळे सजग होऊया.

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

१.  What is Sore eyes flu? डोळे येणे म्‍हणजे 

काय ?

डोळे येणे, हा एक डोळ्‍यांचा संसर्गजन्‍य आजार आहे. यामध्‍ये डोळ्‍यातून चिकट स्राव येऊन डोळे लाल होतात.

 

२. शास्‍त्रीय भाषेमध्‍ये या आजाराला काय म्‍हणतात ?

या आजाराला 'कन्‍जक्‍टिवायटिस' (conjunctivitis) किंवा 'रेड आईज्' (red eyes) अथवा 'सोर आईज्' (sore eyes) असे म्‍हणतात. हा आजार सामान्‍यतः 'बॅक्‍टेरियल' (जीवाणू) किंवा 'व्‍हायरल' (संसर्ग) असतो; पण सध्‍या साथीच्‍या स्‍वरूपातील हा आजार 'व्‍हायरल' स्‍वरूपाचा आहे, जो 'अ‍ॅडेनोव्‍हायरस' (Adenovirus) या विषाणूमुळे होतो.

३. Which  is sore eyes symptoms या 

आजाराची लक्षणे कोणती ?


sore eyes meaning: डोळे येणे' म्‍हणजे काय ? आणि त्‍यावरील उपाय


सर्वप्रथम डोळा लाल होऊन डोळ्‍यातून चिकट स्‍वरूपाचे पाणी येते. त्‍यानंतर पापण्‍यांना सूज येऊन पापण्‍या विशेषतः सकाळी एकमेकांना चिकटतात. एकूणच डोळ्‍यांमध्‍ये अस्‍वस्‍थता निर्माण होते. स्राव अधिक असल्‍यास क्‍वचित् प्रसंगी भुरकट

दिसू शकते.

४. Which  is sore eyes other symptoms या 

आजाराची इतर लक्षणे कोणती ?

या विषाणूमुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, क्‍वचित् प्रसंगी ताप येऊ शकतो.

५. हा आजार कशामुळे पसरतो ?

sore eyes meaning: डोळे येणे' म्‍हणजे काय ? आणि त्‍यावरील उपाय
हा आजार संसर्गजन्‍य असल्‍यामुळे पटापट एका व्‍यक्‍तीकडून दुसर्‍या व्‍यक्‍तीकडे पसरतो. डोळे आलेल्‍या व्‍यक्‍तीने स्‍वतःच्‍या डोळ्‍यांना स्‍पर्श करून, तसेच त्‍या हाताने दुसर्‍या वस्‍तूंना स्‍पर्श केला असता आणि दुसर्‍या व्‍यक्‍तीने त्‍या वस्‍तूला स्‍पर्श करून तसाच हात डोळ्‍यांना लावल्‍यास हा आजार त्‍या दुसर्‍या व्‍यक्‍तीस होतो. उदाहरणार्थ डोळे आलेल्‍या व्‍यक्‍तीचा रुमाल, पेन, टॉवेल, चमचा, गॉगल्‍स इत्‍यादी वस्‍तू वापरल्‍यास हा आजार बळावतो.

६. डोळे आलेल्‍या रुग्‍णांनी कोणती काळजी घ्‍यावी ?

1. डोळे आल्‍याचे लक्षात आल्‍यास सर्वप्रथम शक्‍य झाल्‍यास स्‍वतः वेगळे रहावे (आयसोलेट करावे).

2. डोळ्‍यांना स्‍पर्श करू नये आणि डोळे चोळू नयेत.

3. डोळे पुसण्‍यासाठी 'टिश्‍यू पेपर'चा वापर करावा.

4. वैद्यकीय सल्‍ल्‍यानेच उपचार चालू करावेत. स्‍वतः मनाने औषधांच्‍या दुकानांमधून कोणतेही 'ड्रॉप' विकत घेऊन ते घालू नयेत.उ. हलका ताजा आहार घ्‍यावा.

5. वारंवार हात धुवत रहाणे.

6. आपल्‍या वस्‍तू दुसर्‍यांना देऊ नका.

7. लहान मुलांमध्‍ये या आजाराचे प्रमाण अधिक असल्‍याने डोळे आलेल्‍या मुलांना शाळेत पाठवू नये.

8. वाटीत गरम पाणी घेऊन त्‍यात कापसाचा बोळा भिजवून त्‍याने डोळ्‍यांच्‍या पापण्‍यांना बाहेरून हलकासा शेक द्यावा.औ. प्रखर प्रकाशापासून संरक्षण होण्‍यासाठी काळा गॉगल वापरावा.

७. डोळा येऊ नये म्‍हणून निरोगी व्‍यक्‍तीने कोणती 

काळजी घ्‍यावी ?

डोळ्‍यांना उगीचच हात लावू नये किंवा डोळे चोळू नये. आजारी माणसाच्‍या संपर्कात आल्‍यास ठराविक अंतराने हात धुवावेत किंवा सॅनिटायझरचा यथायोग्‍य वापर करावा. बाधित व्‍यक्‍तीच्‍या वस्‍तू वापरू नये.

८. हा आजार कितपत गंभीर आहे ?

sore eyes meaning: डोळे येणे' म्‍हणजे काय ? आणि त्‍यावरील उपाय


हा आजार बिलकुल गंभीर नाही; परंतु योग्‍य काळजी न घेतल्‍यास किंवा दुर्लक्ष केल्‍यास, तसेच औषध उपचार न केल्‍यास या आजाराचे उपद्रव निर्माण होतात आणि मग हा आजार गंभीर स्‍वरूपात निर्माण होतो. यथायोग्‍य उपचार घेतल्‍यास हा आजार साधारणतः ३ ते ७ दिवसांमध्‍ये पूर्ण बरा होतो.

या प्रकारे योग्‍य काळजी घेतल्‍यास डोळ्‍यांच्‍या या समस्‍येवर आपण मात करू शकतो. वैद्यकीय सल्‍ल्‍याने पोटातून ठराविक आयुर्वेदाची औषधे घेतल्‍यास हा आजार बरे होण्‍यास साहाय्‍य होते.


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.


 माहिती आवडल्यास नक्की शेअर करा ➡️➡️➡️➡️➡️


Oath Ceremony at Wankhede Stadium on Monday 25th

  25 तारखेला सोमवारी वानखेडे स्टेडियमला शपथविधी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हॅट्रिक केली आहे. भाजपला पुन्हा...