दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाची घोषणा केली आहे. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी 2024 ते 18 मार्च 20252024 दरम्यान तर दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 20252024 पर्यंत होणार आहे. दहावीची परीक्षा मराठीच्या पेपरने सुरू होईल, तर बारावीची पहिली परीक्षा इंग्रजीची असेल. नऊ विभागीय मंडळांमध्ये परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांना वेळापत्रक mahahsscboard.in वरून डाउनलोड करता येईल.
सोलापूर जिल्ह्यात विधानसभेसाठी सरासरी 65. 41 टक्के मतदान
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी एकूण 65.41 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जिल्ह्यात एकूण 38 लाख 48 हजार 869 मतदार असून आज सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत 25 लाख 17 हजार 374 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मतदानाची एकूण सरासरी 65.41% झालेली आहे. तर अंतिम आकडेवारी आज गुरुवारी दुपारी 4 वाजेपर्यंत कळविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. एक्झिट पोलनुसार महायुतीला सत्ता मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीही काँटे की टक्कर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निकालानंतर 26 नोव्हेंबरपूर्वी नवीन सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावर चर्चा सुरू केली असून सत्तास्थापनेसाठी राजकीय पक्षांना अवघे दोन दिवस आहेत. भाजप मुख्यालयातही या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अदानी उद्योग समूहाच्या मालकीच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स गडगडले
आज भारतीय शेअर बाजारात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालय आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने गौतम अदानी आणि इतर अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे अदानी उद्योग समूहाच्या
मालकीच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. अदानी उद्योग समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स साधारणतः 10 ते 20 टक्क्यांनी घसरले आहेत, ज्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठा घसरणीचा दबाव निर्माण झाला आहे.
सोलापूर: मतदान केंद्रांवर होते सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष!
लावली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे नियोजन भवन येथील सभागृहात लावलेल्या मोठ्या स्क्रिनवरून त्या केंद्रांवरील मतदारांच्या रांगा, अडचणी व मतदान सुरळीत होत असल्याची पाहणी करत आहेत.
सोलापूरः शिराळमध्ये बिबट्यासदृश प्राणी
माढा तालुक्यातील शिराळ (मा) येथील वस्तीवर राहणाऱ्या शेतकरी सतीश टोणपे यांच्या घरासमोरील अंगणात बांधलेल्या दोन शेळ्यांसह एका लहान पिलावर बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला करून ठार मारले. ही घटना गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. यादरम्यान घरातून आपल्या आईबरोबर लघुशंकेला उठलेल्या १३ वर्षीय एका मुलीवरदेखील त्याने धाव घेतली, पण सोबत असणाऱ्या आईने आरडाओरड केल्यानंतर तो पळून गेल्याने ती त्यातून वाचली आहे. पण या घटनेत तिलाही त्या प्राण्याचा नख लागल्याचे समोर आले आहे
सोलापूर: हजर न राहिल्याने शिक्षकावर गुन्हा
विधानसभा निवडणुकीत कर्तव्याच्या ठिकाणी हजर न राहता शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शीतील सुलाखे हायस्कूलचे सहशिक्षक यांच्या विरुद्ध सांगोला पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सोमनाथ सदाशिव साळुंखे (रा. कुंभार गल्ली, सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वैभव भास्कर कदम (रा. बेलेश्वर नाका, सुलाखे हायस्कूल, बार्शी, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे सहलोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ चे कलम १३४ प्रमाणे दखलपात्र गुन्हा केला आहे.
यंदा महाराष्ट्रात 30 वर्षांचा विक्रम मोडीत
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी 65.02% मतदान झाले, जे 30 वर्षांतील सर्वाधिक आहे. 1995 मध्ये 71.69% मतदान झाले होते, ज्यावेळी शिवसेने-भाजप युतीने सत्ता स्थापन केली. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढल्याचा फायदा महायुतीला होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात एकूण 9.69 कोटी मतदार असून, यामध्ये 5 कोटी पुरुष आणि 4.69 कोटी महिला मतदार आहेत.
No comments:
Post a Comment