या सहा कामांसाठी जून महिना महत्त्वाचा ठरणार आहे कसा ते जाणून घेऊया👇👇👇👇👇
ही
कामे लवकर उरकून घ्या नाहीतर होईल पंचाईत:
नव्या
चालू आर्थिक वर्षात अनेक बदल झाले आहेत. पैसे संदर्भात सुद्धा काही कामांसाठी
मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहेत अन्यथा
लोकांची पंचायत होण्याची शक्यता आहे. शिवाय आर्थिक फटकाही बसू शकतो पॅन कार्ड आणि
आधार क्रमांक जोडण्यासाठी ची मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या
मुदतीमध्ये दोन्ही क्रमांक कर तात्यांनी जोडून घेणे अत्यावश्यक आहे शिवाय अशा एकूण
सहा वित्तीय बाबतीची मुदत जून मध्ये संपणार आहेत तर ते कोणत्या आहेत हे आपण जाणून
घेणार आहोत.
1) पॅन
कार्ड आधार कार्ड जोडणी कोणासाठी आवश्यक आहे?:
ज्या
लाभार्थींना एक जुलै 2017 पूर्वी पॅन
कार्ड क्रमांक दिला गेला होता तसेच जे आधार क्रमांक मिळवण्यासाठी पात्र आहेत अशा
सर्वांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी करणे आवश्यक आहे त्याची अंतिम मुदत 30
जून 2023 पर्यंतचे असणार आहे. 2)
वाढीव ईपीएस पेन्शन मुदत:
वाढीव
ईपीएस पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 पर्यंतची असणार
आहे आधीही मुदत तीन मार्चपर्यंत ची होती तथापि ही पी ए ओ सदस्यांच्या मागणी नंतर
ती त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
3) बँक
एफडी:
इंडियन
बँकेच्या आय एन डी सुपर 400 डेज स्पेशल एफडी ची मुदत 30 जून 2023 पर्यंत ची आहे
यातील व्याजदर सामान्यांसाठी 7.25% तर ज्येष्ठांसाठी 7.75 टक्के आणि अति
ज्येष्ठांसाठी
8.00%
असणार आहे. 4)एसबीआय
अमृतकलश:
एसबीआय
ने अमृत कलश किरकोळ ठेव योजना पुनर्जीवित केलेली असून या योजनेची चारशे दिवसांची
मुदत 30 जून 2023 रोजी संपणार आहे यात सामान्यांसाठी सात पण दहा टक्के आणि जेष्ठान
साठी 7.60% व्याजदर असणार आहे. 5)
आधार कार्ड अद्यावतीकरण:
आधार
कार्ड वरील आपला वैयक्तिक माहिती मोफत अद्यावत करून घेण्यासाठी 15 मार्च ते 14 जून
2023 या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आधार पोर्टलची सेवा मोफत
आहे आधार केंद्रावर मात्र त्यासाठी पन्नास रुपये शुल्क असणार आहे.