SIP: नवीन गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
जर तुम्हाला बचत करताना कमाईही करायची असेल, तर SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दररोज फक्त 167 रुपये आणि महिन्याला 5000 रुपये बचत करून, तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीतून 5 कोटी रुपयांचे मालक होऊ शकता. यासाठी योग्य म्युच्युअल फंड निवडणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तुम्ही 50:30:20 नियम पाळला तर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. यामध्ये, 50% रक्कम गरजेवर खर्च, 30% वैयक्तिक खर्च आणि 20% बचतीसाठी ठेवावी.
संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, 9 डिसेंबरपासून परीक्षा सुरू
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी या परीक्षा 1 डिसेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान होणार होत्या. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा आता 9 डिसेंबरपासून सुरू होतील. परीक्षार्थींनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी.
85 लाखांच्या होम लोनवर 40 लाखांची बचत कशी कराल?
गृहकर्जाच्या वाढत्या व्याजदरांसह, प्रीपेमेंट हा आर्थिक बचतीसाठी प्रभावी उपाय ठरू शकतो. 85 लाखांच्या कर्जावर 10% प्रीपेमेंट केल्यास, 40.23 लाख रुपये बचत होऊ शकतात आणि 65 ईएमआय हप्ते कमी होतात. यासाठी प्रीपेमेंटचा फायदा समजून घेऊन योग्य नियोजन करा. तज्ज्ञ सल्ल्याने ही प्रक्रिया अधिक फायदेशीर होऊ शकते.
आयटी आरमध्ये विदेशी मालमत्तेची माहिती न दिल्यास 10 लाखांचा दंड
प्राप्तिकर विभाग म्हणजेच इनकम टॅक्स विभागाने एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता परदेशात असलेली मालमत्ता किंवा आयकर रिटर्न (ITR) मध्ये कमावलेले उत्पन्न उघड न केल्यास ₹10 लाख दंड आकारला जाऊ शकतो. करदात्यांना त्यांचे उत्पन्न 'करपात्र मर्यादेपेक्षा कमी' असले तरीही आयटीआरमध्ये परदेशी मालमत्ता किंवा परकीय स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती भरणे बंधनकारक असेल.
आता पदवी अभ्यासक्रम तीन वर्षाऐवजी लवकरही पूर्ण करू शकणार
UGC ने 2025-26 पासून लवचिक शैक्षणिक धोरण लागू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे विद्यार्थी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तीन किंवा तीन वर्षांचा अभ्यासक्रम अडीच वर्षांत पूर्ण करू शकतील. याशिवाय, विद्यार्थ्यांना वैयक्तिक गरजेनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळही दिला जाईल. शिक्षण थांबवून पुन्हा सुरू करण्याचा पर्याय, कार्य अनुभवाचा समावेश, आणि बहुशाखीय अभ्यासक्रमाच्या संधींसह हे धोरण NEP 2020 च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
दहावी-बारावीचा अभ्यासक्रम 15 टक्क्यांनी कमी
सीबीएसईने दहावी-बारावीचा अभ्यासक्रम 15 टक्क्यांनी कमी केला असून परीक्षा पद्धतीत बदल केले आहेत. 2025 च्या पॅटर्ननुसार, 40 टक्के गुण अंतर्गत मूल्यांकनासाठी आणि 60 टक्के गुण अंतिम परीक्षेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना विषय सखोल समजण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होतील, तर डेटशीट डिसेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी दोन टर्म परीक्षांचे मॉडेल लागू करण्यासाठी तयारी सुरू असून, अधिक वारंवार मूल्यांकन शक्य होणार आहे.