बँकांची मोठी घोषणा, सर्वात स्वस्त होम लोन
बँक ऑफ बडोदा 8.40% व्याजदराने झिरो प्रोसेसिंग फीवर होम लोन आणि 8.95% कार लोन देत आहे, तर पर्सनल लोन 10.80% दराने उपलब्ध आहे. त्याचबरोबर फिक्स्ड डिपॉझिटवर 7.30%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.80% व्याजदर देत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रही 8.35% व्याजदराने झिरो प्रोसेसिंग फीवर होम लोन आणि 8.70% दराने कार लोन देत आहे. दिवाळीमुळे बँका होमलोन मिळणार आहे.
सोलापूर: दिलीप माने आज उमेदवारी अर्ज भरणार
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने हे काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आज मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. होटगी रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी 9 वाजता रॅली काढ़त ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन दिलीप माने यांच्याकडून करण्यात आले आहे.
सोलापूर: शहर मध्य मधून चेतन नरोटे यांना काँग्रेसची उमेदवारी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्या खासदार झाल्यानंतर या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष साजरा केला. नरोटे हे आज मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सोलापुरात शिंदे सेनेला जबर धक्का
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला जबर धक्का बसला आहे. पुणे येथे युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या उपस्थितीत सोलापुरातील शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनिष काळजे, शहर प्रमुख मनोज शेजवाल व उमेश गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे. सोलापुरात भाजपने उमेदवारी देताना शिंदे सेनेला डावलले असल्याचा आरोप यावेळी या सर्वांनी केला. तसेच या निवडणुकीत सोलापूर मध्य मधून मनीष काळजे, शहर उत्तर मधून अमोल शिंदे, दक्षिणमधून उमेश गायकवाड हे आज आपली उमेदवारी दाखल करणार आहेत.
फडणवीस यांनी केला केंद्रात जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चेबाबत खुलासा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चेबाबत त्यांनी खुलासा केला आहे. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, दिल्लीच्या पत्रकारांकडे बातम्या नसल्यास या प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. भाजपमध्ये निर्णय व्यक्ती नव्हे, तर पार्लमेंट्री बोर्ड घेतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे केंद्रात त्यांच्या संभाव्य भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
भारतामध्ये सुमारे 400 हून अधिक प्रमुख नद्या
भारतामध्ये सुमारे 400 हून अधिक प्रमुख नद्या आहेत, ज्यात गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, सिंधू, गोदावरी, कृष्णा, आणि नर्मदा या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. ह्या नद्या देशातील विविध प्रदेशांतून वाहत जातात आणि त्यांच्या उपनद्यांच्या सहकार्याने शेती, जलसिंचन, वीज निर्मिती आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत आहेत. भारतीय नद्यांच्या तीन मुख्य प्रणाली आहेतः गंगा नदी प्रणाली, सिंधु नदी प्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली, ज्यामुळे या विविध प्रदेशांमध्ये जलस्रोतांचे मोठे जाळे तयार झाले आहे.
29 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता
29 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे कृषी आणि हवामानाच्या दृष्टीने येथील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या पावसाचा प्रभाव लक्षात घेऊन पिकांची काळजी घेतली पाहिजे, विशेषतः अशा स्थितीत जेथे हंगामी पिके पाण्याच्या ताणाखाली असतात किंवा पिकांच्या पाण्याच्या आवश्यकतांवर परिणाम होऊ शकतो.
मनसेने शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव ठेवला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली असून मुलगा अमित ठाकरे यांना थेट रिंगणात उतरवले आहे. अमित यांना दादर-माहिममध्ये शिवसेना नेते सदा सरवणकरांशी लढावे लागणार आहे. दरम्यान, मनसेने शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे, ज्यामध्ये वरळी, शिवडी, माहिम, अंधेरी, जोगेश्वरी आदी मतदारसंघांत मनसेला बिनविरोध विजय मिळवून द्यावा, अशी मागणी आहे. महायुतीने लोकसभेत मनसेला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करावी, अशी अपेक्षा असून अशातच अमित ठाकरे यांच्यासमोर निवडणुकीचे मोठे आव्हान आहे.