मतदान महत्वाचे का आहे?
लोकशाही समाजात मतदान हा मूलभूत अधिकार आहे, हे नागरिकांना त्यांच्या देशाचे आणि समुदायाचे भविष्य घडवून, निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यास अनुमती देते. मतदानाद्वारे, जनता निवडून आलेल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरू शकतात, धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात आणि त्यांचा आवाज ऐकला जाईल' याची खात्री करू शकतात. शिवाय, मतदान लोकशाही प्रक्रियेची वैधता आणि अखंडता टिकवून ठेवण्यास मदत करते, सत्तेचे केंद्रीकरण रोखते आणि प्रतिनिधित्व आणि समानतेला प्रोत्साहन देते. मतदानाचा हक्क बजावणे हे नागरी कर्तव्य आहे आणि मुक्त आणि न्याय्य समाजात जगण्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे.
मतदानाचा इतिहास: प्राचीन काळातील मतदान
मतदानाचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू होतो तो असा - प्राचीन ग्रीस: मतदानाची सुरुवात प्राचीन ग्रीसमध्ये झाली, विशेषतः अथेन्समध्ये. इथे नागरिकांची सभा (अगोरा) होती, ज्यामध्ये नागरिक त्यांच्या प्रतिनिधींची निवड करीत. मात्र, या प्रक्रियेतील मतदान फक्त पुरुष नागरिकांपर्यंत मर्यादित होते. रोमन साम्राज्य: रोमन साम्राज्यात, मतदानाची प्रक्रिया अधिक जटिल झाली. येथे नागरिकांना त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जात होत्या. मात्र, त्यामुळे देखील सर्व व्यक्तींना मतदानाचा हक्क नव्हता.
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य व हक्क..
येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करून मी माझे राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहे. तुम्ही सर्वांनीही आवर्जून मतदान करा. कारण मतदान करणे हा आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि हक्क आहे. तो आपण बजावलाच पाहिजे, असे आवाहन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. निडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे.
भारतातील सर्वाधिक शिकलेला नेता आहे "एक मराठी माणूस"
महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले आणि वयाच्या २६ व्या वर्षी ते देशातील सर्वात तरुण आमदार बनलेले श्रीकांत जिचकर भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता आहेत. यांना भारतातील सर्वात शिकलेले व्यक्ती म्हणून ओळखले जाते. 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी परीक्षा दिल्या. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले. श्रीकांत जिचकर हे 25 वर्षांचे असतानाच त्यांच्याकडे 14 पोर्टफोलिओ होते. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती.
महाराष्ट्रातील 1962 ते 2024 पर्यंतचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ..
1. यशवंतराव चव्हाण ( कराड उत्तर) 1 में 1960 ते 20 नोव्हेंबर 1962 (2 वर्षे, 203 दिवस)
2. मारोतराव कन्नमवार ( साओली ) 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 (1 वर्ष, 4 दिवस)
3. बाळासाहेब सावंत (चिपळूण ) 25 नोव्हेंबर 1963 ते 5 डिसेंबर 1963 (10 दिवस)
4. वसंतराव नाईक ( पुसद ) 5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967 (11 वर्षे, 78 दिवस)
5. शंकरराव चव्हाण ( भोकर ) 21 फेब्रुवारी 1975 ते 17 में 1977 (2 वर्षे, 85 दिवस)
6. वसंतराव दादा पाटील ( सांगली ) 17 में 1977 ते 18 जुलै 1978 (1 वर्ष, 62 दिवस)
7. शरद पवार ( बारामती ) 18 जुलै 1978 तक 17 फेब्रुवारी 1980 (1 वर्ष, 214 दिवस)
8. अब्दुल रहमान अंतुले ( श्रीवर्धन ) 9 जून 1980 ते 21 जानेवारी 1982 (1 वर्ष, 226 दिवस)
9. बाबासाहेब भोसले ( नेहरूनगर ) 21 जानेवारी 1982 ते 2 फेब्रुवारी 1983 (1 वर्ष, 12 दिवस)
10. वसंतराव दादा पाटील ( सांगली ) 2 फेब्रुवारी 1983 ते 3 जून 1985 (2 वर्षे, 121 दिवस)
11. शिवाजीराव निलंगेकर ( निलंगा ) 3 जून 1985 ते 12 मार्च 1986 (0 वर्ष, 282 दिवस)
12. शंकरराव चव्हाण ( धर्माबाद ) 12 मार्च 1986 ते 26 जून 1988 (2 वर्षे, 106 दिवस)
13. शरद पवार ( बारामती ) 26 जून 1988 ते 4 मार्च 1990 (2 वर्षे, 364 दिवस)
14. सुधाकरराव नाईक ( पुसद ) 25 जून 1991 ते 6 मार्च 1993 (1 वर्ष, 254 दिवस)
15. मनोहर जोशी ( दादर ) 14 मार्च 1995 ते 30 जानेवारी 1999 (3 वर्षे, 324 दिवस)
16. नारायण राणे ( मालवण ) 1 फेब्रुवारी 1999 ते 18 ऑक्टोबर 1999 (259 दिवस)
17. विलासराव देशमुख ( लातूर शहर ) 18 ऑक्टोबर 1999 ते 17 जानेवारी 2003 (3 वर्षे, 92 दिवस)
18. सुशीलकुमार शिंदे ( सोलापूर दक्षिण ) 18 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 (1 वर्ष, 288 दिवस) 19. विलासराव देशमुख ( लातूर शहर ) 1 नोव्हेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008 (4 वर्षे, 37 दिवस)
20. अशोक चव्हाण ( भोकर) 8 डिसेंबर 2008 ते 7 नोव्हेंबर 2009 (1 वर्ष, 338 दिवस)
21. पृथ्वीराज चव्हाण ( कराड) 11 नोव्हेंबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014 (3 वर्षे, 321 दिवस)
22. देवेंद्र फडणवीस ( नैऋत्य नागपूर ) 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 (5 वर्षे, 12 दिवस)
23. उद्धव ठाकरे ( वर्ली ) 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022 (2 वर्षे, 214 दिवस)
24. एकनाथ शिंदे ( कोपरी-पाचपाखाडी ) 30 जून 2022 ते आजतागायत (2 वर्षे, 129 दिवस)
टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये भरती...
टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये 775 जागांसाठी भरती सदर्न कमांडमधील देशभरातील 13 टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये दि. 4 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान भरती आयोजित केली जाणार आहे. पात्रता : सोल्जर (जनरल ड्यूटी) 10 वी सरासरी किमान 45 गुण (प्रत्येक विषयात किमान 33 गुण). वयोमर्यादा : भरतीच्या दिनांकास 18-42 वर्षे. उमेदवारांनी भरतीसाठी येताना मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या साक्षांकीत केलेल्या प्रतींचे दोन संच तसेच २० पासपोर्ट आकाराचे फोटोग्राफ घेवून हजर रहावयाचे आहे.
उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर
मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार सभा, कॉर्नर बैठका, रॅली यासह सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापर केला जात आहे. सर्व पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांकडून वेळोवेळी आपल्या सोशल मीडिया हँडलवर विविध पोस्ट करून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीत उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यावर भर देत आहेत. कारण आजघडीला बहुतांश जनता ही सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.