पाचवी, आठवी वार्षिक परीक्षा पास न झाल्यास पुढच्या वर्गात मिळणार नाही प्रवेश ! If you do not pass the fifth and eighth annual examination, you will not get admission to the next class!
आता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षा पास होणे बंधनकारक असणार आहे का ते जाणून घेऊया .
नमस्कार
मित्रांनो माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ताची शैक्षणिक मोठी बातमी
म्हणजेच पास न झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही
पुढच्या वर्गात प्रवेश. शिक्षण
हक्क कायद्यानुसार आतापर्यंत पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न
करण्याची मुभा होती. परंतु नवीन शैक्षणिक कायद्यानुसार काही बदल करण्यात आलेले
दिसून आले ते बदल नेमके कोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो
राज्यात शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा करण्यात आली असून शालेय
शिक्षणात पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आलेली आहे तसेच पाचवी
किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास नंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण
झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे.
शालेय
शिक्षण विभागाचे प्राधान सचिव रणजीत सिंग देवल यांनी यासंदर्भातील राजपत्र
प्रसिद्ध केलेले आहे शिक्षणा हक्क कायदा 2011 तील तरतुदीनुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण
सर्वकश मूल्यमापन करण्यात येते त्यात आता पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा घेण्याचा
निर्णय सुद्धा या राजपत्रानुसार पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वयाने रूप
वर्गात प्रवेश दिला जाईल मात्र सहावी ते आठवी वर्गात वयानुरूप प्रवेश देताना
पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार
आहे.
■ नेमकी
कोणती सुधारणा केलेली आहे?
शिक्षण
हक्क कायद्याच्या सुधारणेनुसार विद्यार्थी पाचवी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास
त्याला पाचवीच्या वर्गात प्रवेश दिला जाईल.
महाराष्ट्र
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून एस सी ई आर टी पाचवी आणि आठवीच्या
वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार
असल्याचे या सुधारणेमध्ये सांगितले जाते.
■ विद्यार्थी
पास न झाल्यास पुढे काय?
एखादा
विद्यार्थी जर परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्या विद्यार्थ्याला अतिरिक्त
पूरक मार्गदर्शन करण्यात येईल दरम्यान वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून
दोन महिन्यात त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल.
मात्र
संबंधित विद्यार्थी पुनर्पित ही अनुत्तीर्ण झाल्यास त्यात त्याला पुन्हा पाचवी
किंवा आठवीच्या वर्गात ठेवले जाईल प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही
विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही असे या नवीन शिक्षण हक्क कायद्यात
सांगितले आहे.