Pik Vima Yojana 2023
फक्त एक रुपयात मिळणार Pik Vima जाणून घ्या...
■या पाच प्रकारच्या नुकसानीला मिळणार कवच..
मित्रांनो नमस्कार माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष
स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक रुपया भरून Pik Vima Yojana लागू करण्याचे आदेश पाच प्रकारच्या
नुकसानीला या सर्व समावेशक पीक विमा योजनेचे कवच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे
शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करण्याचे सांगितले जात
आहे. जाणून घेऊया कोणत्या प्रकारच्या नुकसान भरपाई वर पिक विमा मिळणार आहे.
■कोणत्या प्रकारच्या नुकसानीला मिळणार भरपाई?
1)नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणार काढणी
पश्चात नुकसान झाल्यास मिळेल भरपाई.
2) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या
नुकसान.
3) पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत
नैसर्गिक आग, विज कोसळणे,गारपीटहोणे,वादळ चक्रीवादळ, पूर,परिसर जलमय होणे
भूस्खलन,दुष्काळ पावसातील खंड,कीड व रोग या बाबीमुळे
उत्पन्नात होणारी घट याची भरपाई मिळेल.
4) हंगाम सुरू असताना प्रतिकूल हवामान ते मुळे
झालेल्या नुकसान.
5) प्रतिकूल हवामान यामुळे पिकांची पेरणी किंवा
लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसानीचे तुम्हाला भरपाई मिळू शकते.
■योजनेची अंमलबजावणी कोण करणार?
मित्रांनो केंद्र सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी
भरावयाच्या विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2% रब्बी हंगामासाठी 1.5% टक्के
तसेच दोन्ही मधील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा आहे
राज्य सरकारच्या नवीन पिक विमा योजनेत शेतकरी खिशाचा भार देखील राज्य सरकार उचलणार
आहे योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संपूर्ण राज्य कृषी आयुक्तांची असणार आहे.
■पिक विमाचा राज्य अर्थसंकल्पनेत घोषणा..
मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना एक रुपयात
पिक विमा योजना लागू करण्याची घोषणा केली होती कृषी विभागाने या संदर्भात
शुक्रवारी काढलेल्या आदेशामुळे त्या गोष्टीची अंमलबजावणी झालेली आहे.
आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे खरीप व रब्बी अशा दोन्ही
हंगामात होणाऱ्या नुकसानीची भरपाई या योजनेमधून मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
■योजनेची मुख्य उद्दिष्ठ कोणती ?
*नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावा.
*शेतकऱ्यांना बाजारातील नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करणे.
*फळपिकांच नुकसान झाल्यास शेतकरी परिणामी हातबल व निराश होतो, अशा कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी फळपिक विमा योजना मोलाचं काम करते.
*शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या काही प्रमाणात आर्थिक मदत
मिळावी हा फळपिक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.