बाबो ..! 3 वर्षांत 1 लाखांचे झाले 33 लाख
लाडकी बहीण योजना- डिसेंबरचा हप्ता, तारीख जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना गुडन्यूज दिली. 20 तारखेला निवडणूक संपताच डिसेंबरचे पैसे जमा होणार, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली. त्यांची कुर्ल्यात पहिली सभा झाली. तेथे ते बोलत होते. यावेळी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर हल्लाबोल केला.
दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 च्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर आहे, तर विलंब शुल्कासह अर्ज 30 नोव्हेंबरपर्यंत भरण्यात येतील. विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा प्रमुखांमार्फत 'www.mahahsscboard.in' या संकेतस्थळावर भरायचे आहेत. शाळांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरून 4 डिसेंबरपर्यंत पावतीसह विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे सादर करणे आवश्यक आहे.
भारत WTC फायनलमध्ये पोहोचला नाही तर ...
जर भारत WTC 2023-25 च्या अंतिम फेरीत पोहोचला नाही, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह वरिष्ठ भारतीय खेळाडूंना टप्प्याटप्प्याने संघातून वगळले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या दारुण पराभवानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात चर्चा होऊ शकते.
सोलापूर दक्षिण मधून दिलीप माने यांची माघार
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले माजी आमदार दिलीप माने यांनी आज निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आता या मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवारअमर पाटील व धर्मराज काडादी यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल असे चित्र आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस होता.
सोलापूर: शहर मध्य मधून 19 उमेदवारांची माघार
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या 39 पैकी 19 उमेदवारांनी माघार घेतली. अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये शिवसेना सोडून स्वराज्य पक्षात गेलेले मनीष काळजे, काँग्रेसचे माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे आदी उमेदवारांचा समावेश आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र कोठे, फारूक शाब्दी, नरसय्या आडम यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
निवडणूक अर्ज मागे घेण्याची वेळ संपली
निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे काही बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत, तर काहींनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थितीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांना डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारांच्या या गडबडीमुळे दोन्ही गटांना संभाव्य आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
सोलापूरः उध्दव -राज एकाच दिवशी सोलापुरात
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होईल. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी सर्वच पक्षांमधून बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळते. उमेदवारांचा प्रचारार्थ राजकीय नेत्यांच्या तोफाही धडाडणार आहेत. सोलापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोलापुरात एकाच दिवशी येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापूर: काँग्रेसचे 50 कार्यकर्ते भाजपमध्ये
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख हे गाव भेट दौऱ्यावर असून या दौऱ्याअंतर्गत ते पाकणी येथे गेले असता त्यांच्या उपस्थितीत 50 हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये सोनुपत येलगुंडे, सूर्यकांत येलगुंडे, विश्वनाथ येलगुंडे, संजय सुरवसकर, राजेंद्र सुरवसकर, बालाजी शिंदे, बालाजी येलगुंडे, केशव सुरवसकर, केशव पारेकर, बापू खांडेकर, विजय खांडेकर, अजित सुरवसकर, कृष्णा साठे, राहुल शिंदे, निलेश येलगुंडे, ज्ञानेश्वर सुरवसकर आदींचा समावेश आहे.
सोलापूर: 11 मतदारसंघातून 184 उमेदवार निवडणूक लढविणार
सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत 334 उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरले होते. दिनांक 4 नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत 150 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून 184 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. तरी जिल्हयातील सर्व मतदारांनी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानामध्ये आपला सहभाग नोंदविण्यायचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 विविध जागांसाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहे. पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेतील पदवीधारक. वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट). अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी
विभागाची अधिकृत वेबसाइट पाहा. https://cdn.digialm .com/EForms/configuredHtml/32726/88956 /Index.html, https://drive.google.com/file/d /18Avvqe3qQageUtiQmkCSpwT7oDh4irEV /view