Fiverr

Showing posts with label Mahatma Phule Jan aarogya Yojana. Show all posts
Showing posts with label Mahatma Phule Jan aarogya Yojana. Show all posts

Sunday, July 16, 2023

Mahatma Phule Jan aarogya yojana: पाच लाखापर्यंत उपचार मोफत


Mahatma -Phule -Jan- aarogya- Yojana

 Mahatma Phule Jan aarogya Yojana: महात्मा फुले जनआरोग्य योजना

दवाखान्याचा टेन्शन विसरा म्हटलं, पाच लाखापर्यंत उपचार मोफत


मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले या जन आरोग्य योजना सर्व शिधापत्रिका धारकांसाठी लाभदायक ठरत आहे या योजनेत राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे राज्य सरकारने या योजनेनुसार आता पाच लाखापर्यंत उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र त्याबाबतचा शासन निर्णय अध्याय प्रसिद्ध झालेला असल्याने पूर्वीच्या नियमाप्रमाणे दीड ते तीन लाखापर्यंत उपचार मोफत मिळत आहेत.

* काय आहे महात्मा जन आरोग्य योजना?

आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोफत उपचारासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता आता संपूर्ण जिल्ह्यात ही योजना लागू आहे या योजनेचा लाभ आता कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड असलेले नागरिक घेऊ शकतात.

* कोणत्याही रेशन कार्ड ला धारकाला मिळणार लाभ:

मित्रांनो महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ यापूर्वी फक्त केसरी किंवा अत्यंत शिधापत्रिका धारकांना मिळत होता पण आता कोणत्याही शिधापत्रिका धारकांना याचा लाभ होणार आहे याचा मोठा फायदा आता ग्रामीण भागातील लोकांना मिळणार आहे.
* प्रत्येक कुटुंबाला पाच लाखापर्यंत ची मदत मिळणार:
आयुष्यमान भारत पंतप्रधान योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रतिवर्षी पाच लाख रुपये आहेत त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला पाच लाखापर्यंत उपचार मोफत  महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दीड ते तीन लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो.


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

* घोषणा झालेली आहे पण शासन निर्णय झालाच नाही

मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत उपचार मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे पण मात्र त्याबाबत शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध झालेले नाही त्यामुळे जिल्ह्यात पाच लाखापर्यंतच्या मोफत उपचाराची अद्याप अंमलबजावणी करण्यास सुरू झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

*महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब लोकांच्या उपचाराची जबाबदारी राज्य सरकारने घेण्याचे ठरवले आहे.त्याबरोबरच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांची आर्थिक मदत खूपच कमकुवत आहे, अशा गरीब लोकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया प्रत्यारोपण थेरपीसारख्या महागड्या आरोग्य सेवा दिल्या जातात. या सर्व आजारांसाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojana Eligibility (पात्रता निकष)

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना साठी अधिकृतरित्या पात्रता निकष जारी केले आहेत, या योजनेमध्ये ज्यांना सामील व्हायचे आहे त्यांना खालील पात्रता अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना पात्रता निकष पुढीलप्रमाणे.

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
  • अर्जदाराचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे.
  • नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असले शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
  • कुटुंबात दोन पेक्षा अधिक अपत्य असू नयेत.
  • महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील गरीब नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अमच्या आणखी लेख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇

Mahatma Phule Jan Arogya Yojana Documents (कागदपत्रे)

  • आरोग्य प्रमाणपत्र
  • 3 पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • वयाचा दाखला
  • उत्त्पन्न प्रमाणपत्र
  • शहरात राहणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्याजवळील सरकारी रुग्णालयात तपासणी करून घ्यावी लागणार आहे.
  • गावातील उमेदवारांना शासकीय आरोग्य शिबिरात जाऊन आपल्या आजाराची तपासणी करून घ्यावी लागणार आहे.
  • यानंतर अर्जदाराला आपल्या आजाराच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी लागेल.
  • आजाराची पुष्टी झाल्यानंतर आजाराचा तपशील आणि खर्चाचा तपशील आरोग्य मित्राकडून नोंदविला जाईल.


Mahatma Phule Jan aarogya Yojana



Mahatma Phule Jan aarogya Yojana



Mahatma Phule Jan Arogya Yojana Disease List (आजार यादी)

शस्त्रक्रिया आणि आजार यादी हि एकाच ठिकाणी दिलेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf (Surgery list, disease list)

कान, नाक, घसा शस्त्रक्रियाकर्करोग शस्त्रक्रिया
वैद्यकीय कर्करोग उपचार, रेडीओथेरपी कर्करोगत्वचा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस, जोखिमी देखभालनेत्ररोग शस्त्रक्रिया
स्त्री रोग व प्रसूतिशास्त्रअस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
पोट व जठार शस्त्रक्रियाकार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
बालरोग शस्त्रक्रियाप्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया
मज्जातंतू विकृती शास्त्रजनरल मेडिसिन
बालरोग वैद्यकीय व्यवस्थापनहृदयरोग
नेफ्रोलोजीन्युरोलोजी
पल्मोनोलोजीचर्मरोग चिकित्सा
रोमेटोलोजीइंडोक्रायनोलोजी
मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजीइंटरवेन्शनल रेडीओलोजी


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.





Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...