लाडकी बहीण योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
महाराष्ट्र सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. या योजनेमुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी संपाचा इशारा दिला होता. अखेर सरकारने सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन दिल्याने बँक कर्मचाऱ्यांनी 16 नोव्हेंबर रोजीचा संप मागे घेतला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने दिलेल्या निवेदनात सांगितले की, जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा प्राथमिकतेने देण्याचे निर्देश दिले जातील.
महिन्याला 12500 रुपये गुंतवून मिळवा तब्बल 40,68,209 रुपये
पीपीएफ स्कीममध्ये महिन्याला 12,500 रुपये गुंतवून 15 वर्षांत 41 लाख रुपये मिळवण्याची संधी आहे. या योजनेत वार्षिक 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. 7.1% व्याज दरावर 15 वर्षांच्या कालावधीत, 22,50,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 18,18,209 रुपये व्याज मिळेल. यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी एकूण 40,68,209 रुपये मिळतील. पीपीएफ स्कीम आर्थिक स्थिरतेसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.
काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश
कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांचे पती चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यामुळे त्या नाराज होत्या. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जयश्री जाधव यांची शिवसेनेत घरवापसी झाली आहे आणि महिलांसाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे.
उद्या पुन्हा भीडणार भारत- पाकिस्तान
भारत- पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हटली की साऱ्या जगातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा त्याकडे खिळून राहतात. उद्या 1 नोव्हेंबरला भारत- पाकिस्तान क्रिकेट मॅच रंगणार आहे. हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत हा सामना होत असून, अवघ्या 5-5 ओव्हरचा हा समना असणार आहे. एका संघात फक्त सहा खेळाडू असतील. भारतीय संघात कर्णधार रॉबिन उथप्पा, केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, भरत चिपली, श्रीवत्स गोस्वामी, स्टुअर्ट बिन्नी यांचा सहभाग आहे.
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घरसण
सर्वत्र दिवाळीचा धुमधडाका सुरू आहे. अशातच सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांकरीता दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात जवळपास 150 रुपयांची घसरण झाली आहे. सराफा बाजाराज आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 79 हजार 800 रुपये असा आहे. तर एक किलो चांदीचा दर 97 हजार 300 रुपये असा आहे.
सोलापूर: आता सोनिया गांधी यांना भेटणार
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून माकपला जागा सोडावी म्हणून आता सोनिया गांधी यांना भेटणार
असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिली. तसेच चार तारखेपर्यंत ही जागा सोडून घेण्यास प्रयत्न करणार असून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत 31 जागा आल्या म्हणून हवेत जाऊ नये व महाराष्ट्राचा हरियाणा करू नका असे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर काँग्रेसने माकपला उमेदवारी न सोडल्यास पाच नोव्हेंबर रोजी लोकसभा निवडणुकी वेळी काय ठरले होते याचा बॉम्बस्फोट करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पॉवरग्रीड कार्पोरेशन; 802 जागा
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 802 जागांसाठी ही भरती होत आहे. डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रीकल व सिव्हिल), ज्युनिअर ऑफिसर (एचआर/एफअँडए), असिस्टेंट ट्रेनी या पदांचा यात समावेश आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबर आहे. शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. www.powergrid.in
1 नोव्हेंबरपासून लागू होणारे नवे नियम
- रेल्वे प्रशासी आता प्रवासी 60 दिवस अगोदर तिकीट आरक्षित करू शकतील, जे पूर्वी 120 दिवस होते. - भारतीय रिझर्व्ह बँकेने डोमॅस्टिक मनी ट्रान्सफरच्या नियमांत बदल केला आहे. ज्यामुळे ग्राहकांचे फसवणुकीपासून संरक्षण वाढेल.
- गॅस सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. - गॅस सिलिंडरासोबतच ATF-CNG च्या दरातही दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल केला जातो. - क्रेडिट कार्ड युजर्ससाठी 50 हजारांपेक्षा कमी युटिलिटी बिलांवर कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. - म्युच्युअल फंडाच्या इन्ससाईडर ट्रेडिंगच्या नियमांत बदल होणार आहेत.
सोलापूर: मतदारांना मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत द्या
सोलापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हयातील खाजगी कंपन्या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल किंवा इतर आस्थापना इत्यादीना सुचना देण्यात येत आहे कि, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित अस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आहे.
सोलापूर: प्रणिती शिंदे काँग्रेसच्या स्टार प्रचारक
काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर स्टार प्रचारक म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. प्रणिती शिंदे या विधानसभा निवडणूक कालावधी रॅली, सभा आदींद्वारे काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार करणार आहेत.
दिवाळी खुशखबर! सरकारी नोकरीच्या 0229 जागा, पगार 25,500 पासून
भरती श्रेणी: समाज कल्याण विभाग महाराष्ट्र
·पदाचे नाव : गृहपाल, लघुलेखक, टंकलेखक, व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वीं / 12वी / पदवीधर व इतर
व्यावसायिक पात्रता
पगार : 25,500 ते 81,100 रुपये महिना अर्ज पद्धती : ऑनलाईन
वयोमर्यादा : 18- 43 वर्षे पदे : 0229
अर्जाची शेवटची तारीख- 11 नोव्हेंबर 2024 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र अधिक माहितीसाठी नोटीफिकेशन-
https://drive.google.com/file/d /1VqC8fmNtowj9]96GsEfQhzayYG3Nvtsk /view?pli=1