Fiverr

Showing posts with label Marathi Actor beat cancer 2023. Show all posts
Showing posts with label Marathi Actor beat cancer 2023. Show all posts

Thursday, August 10, 2023

Marathi Actor beat cancer 2023 : या मराठमोळ्या नेत्यांनी केली कॅन्सर सारख्या भयंकर आजारावर मात


Marathi Actor beat cancer  : या मराठमोळ्या नेत्यांनी केली कॅन्सर सारख्या भयंकर आजारावर मात

Marathi Actor beat cancer  : या मराठमोळ्या अभिनेत्यांनी केली कॅन्सर सारख्या भयंकर आजारावर मात


नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण सकारात्मक ऊर्जेचा  वापर करून कशा पद्धतीने मृत्यूवरही विजय मिळवता येते गोष्ट आहे एका अशा मराठी  अभिनेत्याची ज्यांनी बिकट परिस्थितीत ही स्वतःला सावरून न डगमगता न घाबरता कॅन्सर(cancer) सारख्या भयंकर आजारावर मात केले  आणि आज आनंदाने पुढील आयुष्य मनमोकळेपणाने जगत आहे आणि त्या अभिनेत्याचे नाव शरद पोंक्षे असे आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याना आलेले अनुभव बद्दल थोडीशी माहिती.


अभिनेते शरद पोंक्षे आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या परखड विचारांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराशी सामना करून त्यावर मात केली. नुकतंच  एका रियलटी शो मध्ये पोंक्षे यांनी आपल्या कॅन्सरच्या लढाईबद्दल सांगितलं.
कशाप्रकारे शरद पोंक्षे यांनी या जीवघेण्या आजाराबरोबरची लढाई जिंकली वाचा.


Marathi Actor beat cancer  : या मराठमोळ्या नेत्यांनी केली कॅन्सर सारख्या भयंकर आजारावर मात


शरद पोंक्षे म्हणाले की, “कुठलंही संकट असो, शारिरीक, मानसिक किंवा आर्थिक हे पहिलं स्वीकारायला शिका. आपण स्वीकारत नाही, स्वीकारायलाच खूप वेळ घेतो. मग त्याच्यामध्ये मार्ग सापडायला अजून पुढे वेळ जातो. मी दुसऱ्या दिवशी स्वीकारलं, मला कॅन्सर झालाय. डॉक्टरांनी सांगितलं, ५० टक्के जगणार ५० टक्के मरणार. जर काही चमत्कार झाला तरच जगणार. सामान्य माणूस आहे. त्यामुळे पायाखालची जमीन सरकली. अरे बापरे ही काय भानगड झाली? हा एक रात्र विचार केला. पण दुसऱ्या दिवशी स्वीकारलं. डॉक्टर म्हणाले चलो, लढते है अभी. आता काय-काय करायचं आहे ते सांगा. माझा आध्यात्मावर विश्वास आहे. त्यामुळे घरात गेल्यावर आध्यात्मिक काय-काय करू शकतो? आयुर्वेदात काय-काय उपचार आहेत? हे सगळं शोधायला सुरुवात केली. मैदानात उतरलो आहे, तर आता लढायचं आहे. लढण्यापूर्वी पहिले शस्त्र काय-काय आहेत? मग घोड्यावर बसून लढायला जायचं आहे? की बाईकवर बसून जायचं आहे? रणगाड्यात बसून जायचं आहे की कसं? माझ्याकडे उपलब्ध काय-काय आहे? तर माझ्याकडे एवढे-एवढे पैसे आहेत हे पाहून बॉम्बे हॉस्पिटलला गेलो. सुई, उपचार तेच असतात. उगाच ते दाखवायला असतं की, इंग्लंडला जाऊन मी उपचार घेतले. त्याची काही गरज नाहीये. कुठल्याही जगातील इतर देशात जायची गरज नाहीये. भारतामध्ये मुंबई शहरात जगातील सर्वोत्तम उपचार मिळतात. जगातील सर्वोत्तम डॉक्टर, इंजिनिअर आपल्या देशात आहेत


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

पुढे पोंक्षे म्हणाले की, “हे सगळं झाल्यावर पहिला वेळ कशात जातो? तर मलाच का झालं? मी कोणाच काय वाकडं केलं? हा स्वतःबद्दलचा खूप मोठा गैरसमज आहे. प्रत्येकाला असं वाटतं असतं की, मी कोणाचं काय वाकडं केलं नाही. मी कोणाशी काही वाईट वागलो नाही. खूप वाईट आणि घाणेरडे वागले असतात. अनेकाच कळत-नकळत खूप वाटोल केलेलं असतं. पण मात्र स्वतःला सांगत असतो की, मी कधी कोणाचं वाईट केलेलं नाही. मग माझ्याच वाट्याला का आलं? हे माझे भोग आहेत. कधीतरी मी कोणाशी वाईट वागलो असेल. कुणाला तरी दुखावलं असेल. त्या सगळ्याचे परिणाम आता माझे मला आलेले आहेत. म्हणून शिक्षा भोगून संपवू या, हे स्वीकारा.


“खरी लढाई माणूस मैदानात जिंकत नाही, तर स्ट्रॅटेजीमध्ये जिंकतो. लढायला उतरण्याच्या आधीची रात्र असते ना. काय करायचं आहे? कशा पद्धतीने लढायची आहे? समोरचा शत्रू कोण आहे? शिवाजी महाराजांकडे काय होतं? ५ लाख औरंजेबाच्या सैन्यासमोर ५-१० हजार सैन्य घेऊन ते लढायचे. जिंकायचे का? तर स्ट्रॅटेजी. स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या बुद्धीमत्तेवर विश्वास, स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास म्हणूनच त्याच्यातून ते बाहेर आले ना. एकदम समोरासमोर गेलो तर आपण नाही जिंकू शकणार. मग बिळातून बाहेर याचं आणि लढायचं. यातून गनिमी कावा निर्माण झाला. परिस्थितीतून मार्ग काढला. बाजीराव पेशवे का नाही एकही लढाई हरले? हरू शकले असते समोरासमोर लढले असते पण नाही. लढाई लढायच्या अगोदरची स्ट्रॅटेजी ठरवणं फार महत्त्वाचं आहे,” अशी उदाहरण देत शरद पोक्षें यांनी पुढे आपल्या कॅन्सरच्या लढाईबद्दल सांगितलं.

“आता माझी लढाई कोणाशी आहे, कॅन्सरीबरोबर आहे. तो बरा न होणारा आहे. पण त्याला मी बरा करतो. शरीरात आणि आयुष्यात बदल काय-काय होऊ शकतात. तर मग आर्थिक गणित बिघडणार आहे. पुढील वर्षभर मी एकही रुपया कमवणार नाहीये. घरात कोणी कमवणार नाहीये. आर्थिक परिस्थितीत काय-काय करावं लागेल. इकडे काय करावं लागेल तिकडे काय करावं लागेल, अशा सगळ्या लढायांचा विचार केला गेला. पाच-सहा दिवस घेतले आणि मग उभा राहिलो. बॉम्बे हॉस्पिटलच्या इथे टॅक्सीतून उतरलो अन् म्हंटलं चलो. गेलो १० मजल्यावर लाव ऑक्सिजन म्हंटलं, झालं. म्हणून मी कॅन्सरची लढाई जिंकलो. जर सेनापती उभा राहिला ना मग प्रत्येकजण त्याच्यासाठी लढायला उभा राहतो. तशी माझी बायको. मनापासून जे काही आध्यात्मिक आहे, ते माझ्यासाठी करायला लागली. माझी मुलं बापासाठी जे काही करू शकता, ते करायला तयार झाली. माझ्या आईने अथर्वशीर्ष मंत्र उपचार सुरू केले. मग तुळस आण, कडुलिंबाचा पाला आण, ते सगळं मिक्स करू रोज सकाळ-संध्याकाळ द्यायला सुरू केलं.”

पुढे शरद पोंक्षे म्हणाले की, “मग केस गेले. विचित्र केस झाले. माझे एवढे सुंदर, घनदाट आणि मस्त केस होते. पण आता ते गेले परत तर कधी येणार नाहीत. मग काय करायचं? याच्यावर मार्ग काढू या म्हंटलं. दोन-चार विग मेकर्सना विचारलं, ते पण काही व्यवस्थित सांगेना. आलेले थोडेफार काही केस आहेत, ते पण नीट होईना. मग मुलगा म्हणाला, बाबा अंधेरीला हेअर रिन्यूएशनचा चांगला स्टुडिओ आहे, तिथे जाऊन बघू या. मग तिथे गेलो. ते बांगलादेशी मुलगी चालवते. ती म्हणाली, मी करून देते. तिनं मला हा विग बनवला. हा विग आहे, हे मला सांगायला काही लाज वाटत नाही. त्यात लपवायच काय? खोटं वागायचंच नाही. काही गरजच नाही.” 


Marathi Actor beat cancer 2023  : या मराठमोळ्या नेत्यांनी केली कॅन्सर सारख्या भयंकर आजारावर मात


अशा प्रकारच्या सकारात्मक विचाराने या अभिनेत्याने मृत्यूवरही विजय मिळवला.
सांगायचा तात्पर्य एवढाच आहे की, आपल्याला अनेक अडचणी असतात, आणि प्रत्येकाच्या अडचणी या वेगवेगळ्या असतात या अडचणींवर काहींना उपाय सापडते तर काहींना  यावर काहीच इलाज नसते.त्यामुळे मित्रांनो,खचून न जाता, हरवून न जाता  सकारात्मक विचाराने तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील


Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...