Fiverr

Showing posts with label Job Interview Questions. Show all posts
Showing posts with label Job Interview Questions. Show all posts

Monday, June 19, 2023

Job Interview Questions

 Job interview Questions|मुलाखतीसाठी जात आहेत तर या प्रश्नांची नक्कीच करा तयारी?

मित्रांनो 2023 मध्ये आज आज पर्यंत झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर कोणत्याही परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर दुसरी स्टेप येत असते ती म्हणजे इंटरव्यू आणि हा आपल्या करिअर मधलासर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
Job- Interview -Questions

                                                        Job Interview Questions

*मुलाखतीला जाण्यापूर्वीची तयारी:

मित्रांनो तुम्ही मुलाखतीला जात असताना काही महत्त्वाच्या तयारी करायला  लागतात समजा आपली मुलाखत यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी पूर्वतयारी करणे अत्यंत गरजेचे असते. मुलाखतीची पूर्वतयारी केल्यामुळेआत्मविश्वास ते रसिक प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळते.मुलाखतीमध्ये तुमचे संपूर्ण नाव, जन्मस्थळ, आवडीनिवडी, शैक्षणिक व कुटुंबीय माहिती, पुरस्कार, लेखन, वाचन,वैचारिक भूमिकाइत्यादी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची तयारी करावी लागते. त्यापलीकडे मुलाखत घेणाऱ्याला विषय,उद्दिष्टे याचा अभ्यास मुलाखत घेणाऱ्याला करावा लागत असतो.
मुलाखती मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीची प्रश्नावली.  पूर्व तयारी मध्ये विषयाला समर्पक अशी प्रश्नावली असणे खूप गरजेचे असते.मुलाखतीमध्ये मुलाखतीचे माध्यम कोणते असावे याचा सुद्धा खूप विचार केले जाते. मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांची मुलाखत पूर्वीची भेट निश्चितच भेट मुलाखत यशस्वी करण्यात सहाय्यभूत ठरते.

👉आजवर झालेल्या मुलाखतीमध्ये वारंवार विचारले गेलेले प्रश्न कळले तर या वर्षात यापुढे मुलाखत देणाऱ्यांनी ती उपयोगी पडतीलच. म्हणूनच तर हमखास यशाची खात्री देणारे हे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.
मुलाखतीसाठी आवश्यक असणारी प्रश्नावली खालील प्रमाणे..

1) या कंपनीत तुम्हाला का काम करायचे आहे?

: मित्रांनो संबंधित कंपनीचे उत्पादन सेवा ध्येय इतिहास व कार्य संस्कृती याची आधीच माहिती मिळवून जवळ असणे गरजेचे आहे त्यात आपण आपल्याला कुठे पाहतो हे सांगता आले पाहिजे.
2)तुमची ध्येय नेमकी काय आहेत?
: मित्रांनो ही नोकरी व्यवसाय आपण का निवडलेला आहे,आपल्याला काय व्हायचे आहे जागतिक स्पर्धेत आपण आपल्याला कुठे जायचे आहे,याबाबत अत्यंत सावधपणे सांगणे.
3) तुमच्या मते यशाची व्याख्या काय?
: तुम्ही तुमच्या यशाची व्याख्या सांगताना ज्या कंपनीत नोकरी करणार आहात त्या कंपनी बद्दल थोडीफार माहिती सांगणे. तसेच त्या कंपनीला पुढे नेण्यात आपण किती यशस्वी ठरतोयाबद्दल सांगणे. आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या उत्तरांमध्ये त्या कंपनीचे नाव घेतले असेल तर उत्तमच.

4) पुढील येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता?

: मित्रांनो करिअरचे ध्येय कसे ठरवले आहे हे तुमच्या महत्त्वकांक्षाच्या कंपनीला कितपत फायदा होईल ह्या उद्देशाने या प्रश्न विचारलेला असतो याच्या उत्तरात तुम्ही तुमचे ध्येय, तुमचे स्वप्न, तुमची उद्दिष्टे  प्रोजेक्ट बाबत तुम्ही सांगू शकता.
5) एखाद्या अवघड स्थितीवर तुम्ही कशी मात केली आहे?
: मित्रांनो तुम्ही प्रचंड दबाव खाली उत्तम काम करू शकता का हे मुलाखत घेणाऱ्या जाणून घ्यायचे असते म्हणून असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याचे उत्तर तुम्हाला योग्य त्या पद्धतीने द्यायचे असते.

6) तुमची बलस्थाने कोणती आहेत?

: मित्रांनो ग्रुपचे नेतृत्व करणे कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जाण्याची तयारी ठेवणे, त्यावर तोडगा काढण्याचे कौशल्य असणे अशा विविध कौशल्य याची उदाहरणे ही देता आली पाहिजेत.
7) तुमच्या मध्ये युनिक काय आहे?
: तुम्ही इतर उमेदवारापेक्षा अधिक योग्य कसे आहात हे जर तुम्हाला पटवून देण्याची संधी मिळत असेल तर प्रत्येक काही खास गुण असतातच ते लक्षात घेऊन व ते लक्षात ठेवावेत व या प्रश्नाचा आत्मविश्वासाने उत्तर देणे आणि आपले नाणे खणखणीत आहे हे सांगता आले पाहिजे.

8) आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी?

: मुलाखत दाताने विचारले असेल तर कौशल्य गुण शिक्षण कार्य संस्कृतीसाठीची गुणवत्ता असल्यास अनुभव सांगता येईल या सर्वांचा कंपनीच्या भरभराटीसाठी कसा उपयोग करून घेता येईल हे ठणकावून तुम्हाला सांगता आले पाहिजे मग पहा नोकरी पक्की झालीच म्हणून समजा.

       

अशा प्रकारच्या विविध माहिती आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच देत राहू.
माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा धन्यवाद!🙏

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...