Fiverr

Showing posts with label secret study tips. Show all posts
Showing posts with label secret study tips. Show all posts

Thursday, August 3, 2023

Secret Study Tips : मुलांना अभ्यासाची गोडी लावायचं असेल तर करा हे ६ सोपे उपाय


secret study tips


Study tips : मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे ६ सोपे उपाय


तुमची मुले यामुळे होतील हुशार, मन लावून करतील अभ्यास..

नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या या ब्लॉगमध्येvisual learner study tips  तसेच आपल्या मुलांना अभ्यासाची गोडी  कश्या पद्धतीने आपण लावू शकतो त्याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत.  यामध्ये  मी तुम्हाला  secret study tips, Study tipsसांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही आपल्या मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करू शकाल.
पालकांची आपल्या पाल्याबद्दल काही खास तक्रार नसते. फक्त एकच तक्रार असते, ती म्हणजे आमचा मुलगा/मुलगी वेळेवर अभ्यास करत नाही. ही तक्रार प्रत्येक आई - वडील करत असतात. मुलं फार चंचल मनाची असतात. काही मुलं न सांगता अभ्यासाला बसतात, तर काहींच्या मागे लगावं लागतं. मुलांचे अभ्यासात मन न लागणे यामागे अनेक कारणे असू शकतात.
सध्याची मुलं मोबाईल, गेम्स, इंटरनेट या सगळ्यात व्यस्त झाले आहेत. अशावेळी प्रत्येक आईवडिलांना एकच प्रश्न सतावत असतो, की आपल्या मुलाला अभ्यासाची गोडी कशी लावावी? यासंदर्भात, गेटवे ऑफ हीलिंग सायकोथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चांदनी तुगनाईत यांनी मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी, याबाबतीत काही टिप्स शेअर केले आहेत(6 effective ways to help your child learn faster).

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

संतुलित आहार

secret study tips
मुलांच्या आहारात काही बदल करून आपण त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करू शकतो. मानसिक विकासाच्या कमतरतेमुळे देखील मुलांचे लक्ष अभ्यासात लागू शकत नाही. त्यामुळे आहारतज्ज्ञांची मदत घेऊन मुलांना खास संतुलित आहार द्या.

मुलांचा ताण कमी करा

Secret Study Tips



मुलांच्या जीवनात अभ्यास, मित्र, किंवा खेळ इत्यादींबाबत तणाव असू शकतो. आपल्यासाठी हा ताण खूपच लहान असला तरी, त्यांच्यासाठी मोठा असू शकतो. त्यामुळे ते जर चिंतीत असतील, तर त्यांचा ताण समजू घ्या, व त्यांचे लक्ष दुसरीकडे केंद्रित करायला मदत करा.

मुलांना मारू नका


मुलाने अभ्यासात काही चूक केली असेल तर, त्याला ओरडू किंवा मारू नका. त्यांना त्यांची चूक समजावून सांगा. मुलांना सतत मारलं तर, त्यांच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो.मुलांनी जरी चूक केली असेल तंत्रात समजूत काढून योग्य ते मार्गदर्शन करा . चांगले आणि वाईट गोष्टी ची माहिती करून देणे हे पालकाचे परम कर्त्यव्य आहे 

मुलांची झोप पूर्ण होते की नाही पाहा


Secret Study Tips
अनेकदा मुलांची झोप पूर्ण होत नसल्यामुळे त्यांची चिडचिड होते. त्याचं अभ्यासात मन लागत नाही. ज्यामुळे ते अभ्यास करताना टाळाटाळ करतात.हे मुख्य कारण बनू शकतो त्यामुळे मुलांना ८ ते १० तासांची झोप मिळायला हवी. शाळा - क्लास यात मुलं गुंतून जातात, त्यामुळे शरीरालाही आराम हवाच. शिवाय झोप पूर्ण झाल्यामुळे त्यांचा अभ्यासातला रस आणखी वाढू शकतो.


मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा 


Secret Study Tips

मुलांशी संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. काही वेळेला मुलं त्यांच्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी इतरांसोबत शेअर करत नाहीत. ज्यामुळे त्यांना स्ट्रेस येतो. अशा स्थितीत त्यांच्यासोबत नियमित चर्चा करा, संवाद साधा. यामुळे ते आपल्याला नियमित सगळ्या गोष्टी न घाबरता शेअर करतील.

टाईम टेबल तयार करा



Secret Study Tips
मुलांना वेळेचं महत्व पटवून द्या, त्यांना अभ्यासात मदत करा. यासह दिनचर्य तयार करा, व हे दिनचर्य एका टाईम टेबलवर लिहून ठेवा. मुलं हे टाईम टेबल रोज फॉलो करतील याची खात्री करा. यामुळे त्यांना शिस्तही लागेल. व वेळेवर अभ्यासही पूर्ण करतील. 


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

माहिती आवडल्यास नक्की शेयर करा 🠞







Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...