Fiverr

Showing posts with label Most Important School Records. Show all posts
Showing posts with label Most Important School Records. Show all posts

Sunday, June 25, 2023

School Records

 

Most Important School Record

Very Important School Recordसर्व शिक्षकांना माहिती असावे शालेय रेकॉर्ड...
 

शालेय अभिलेख हे फाईल्स अँड रजिस्टर्स स्वरूपात असतात

शालेय व्यवस्थापनात मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील अभिलेख यांना महत्त्वाचे स्थान आहे.

शासकीय यंत्रणेने ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार व निर्देशानुसार अभिलेखे ठेवल्यास कार्यात एकसूत्रता व सुसंगतपणा येऊन ते कामाच्या दृष्टीने सोयीचे होते.

शालेय दप्तरांना बंदिस्त कपाटात ठेवून अनुक्रमानुसार व विद्यार्थी,पालक,शिक्षक व शासन अशा वर्गीकरणानुसार ठेवल्यास नोंदीच्या वेळी ते आपल्याला सोयीस्कर होते.

शालेय अभिलेखे अथवा नोंद पत्रके यावरून शाळेची सद्यस्थिती आपल्याला समजते शैक्षणिक कार्याची माहिती मिळते

मुख्याध्यापकांच्या कार्यालयात कोणकोणते अभिलेखे असावेत व काही रजिस्टर कायमस्वरूपी ठेवावे लागतात अशा रजिस्टर यांना प्रमाणित करणे गरजेचे असते.


                                                 प्रमाणपत्र

 

प्रमाणित करण्यात येते की सदरहू रजिस्टर मध्ये पान क्रमांक-1 ते .....इतकी पृष्ठे आहेत.

 

                                                                                        मुख्याध्यापक 

 

                                                                                   स्वाक्षरी व शिक्का

 

    

 

मुख्याध्यापक कार्यालयामध्ये कोण कोणते रजिस्टर असणे आवश्यक आहे त्यांचा आपण क्रमानुसार आढावा घेणार आहोत.


1) जनरल रजिस्टर-1 हे शाळेचे अतिशय महत्त्वाचे व मूळ रेकॉर्ड आहे. अर्थात तो आपल्या शाळेचा आत्मा आहे. यात नोंदविलेली माहिती सर्व ठिकाणी ग्राह्य धरली जाते. शाळेत प्रवेश घेतल्यापासून तों विद्यार्थी दाखला घेऊन जाईपर्यंत सर्व नोंदी असतात जनरल रजिस्टरमध्ये झालेल्या नोंदीत शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांच्या लेखी परवानगीशिवाय बदल करू नये. एखादी चूक किंवा खाडाखोड झाल्यास मुख्याध्यापकाने स्वाक्षरी करून ती दुरुस्त करून घ्यावी.

 

2)विद्यार्थी हजेरी नमुना- विद्यार्थी हजेरी पत्रकात विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती त्यामध्ये रजिस्टर नंबर विद्यार्थ्याचे नाव,आईचे नाव, जन्मतारीख, जात, प्रवेश दिनांक,लिहिलेले असते विद्यार्थी हजेरी पूर्ण झाल्यानंतर महिनाअखेरीस विद्यार्थी उपस्थितीची टक्केवारी काढावी रजिस्टरमध्ये असणार्‍या सर्व नोंदी आपण पूर्ण करायच्या आहेत.

 

3) शिक्षक हजेरी नमुना नं-3 शिक्षकाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद या पत्रकात घेतली जाते. सदर पत्रकात शिक्षकांनी उपस्थित झाल्याची नोंद नोंदवून निळ्या किंवा काळ्या पेनने स्वाक्षरी करावी दुपार सत्रात दुपारी स्वाक्षरी करावी. उपस्थिती पत्रकामध्ये रजा व सुट्याच्या नोंदीव्यतिरिक्त लाल शाईचा वापर करण्यात येऊ नये सर्व नोंदी महिनाअखेरीस पूर्ण कराव्यात

 

4) डेड स्टॉक रजिस्टर नमुना नं-यामध्ये टेबल,खुर्च्या,टीव्ही,संगणक इत्यादीची माहिती नोंद यामध्ये करावयाची आहे.

रजिस्टरमधून एखादा नग आपण कमी केला तर हुजूर हुकूम नंबर व तारीख ज्यावेळेस आपण काही साहित्य निर्लेखित करत असतो त्या वेळेस आपण ती माहिती संबंधित कार्यालयाकडे पाठवतो व ती मंजुरी मिळतेत्यावेळेस ती तारीख त्या ठिकाणी लिहायची असते.

 

5) पुस्तके नकाशे व तक्ते रजिस्टर नं-5 नमुना नंबर चारमध्ये लागू असलेल्या सूचना येथेही लागू आहेत.मासिक पुस्तकाचे सर्व हक्क मिळून एक पुस्तक समजावे यावर्षाखेरीस त्याची नोंद करायची रजिस्टरमधून केल्यास हुजूर हुकूम नंबर तारीख व शेरा

 

6) स्थावर मालमत्ता रजिस्टर-शालेय संपत्ती विषयक हे अतिशय महत्त्वाचे रजिस्टर आहे. यामध्ये शाळेची इमारत जागेचा दस्ताऐवज याची नोंद या रजिस्टरमध्ये केली जाते.शाळेची जागा नमुना नंबर-(अ) खोल्या संख्या किचन शेड शालेय शौचालय इत्यादी स्थावर मालमत्तेची नोंद यात घेण्यात यावी.

 

7)शालेय माहिती संगणकीकरण प्रपत्र-बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावी अंमलबजावणी करण्या करता जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली यूडायस प्रपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. इ 1 ली ते 8 वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमांच्या व अभ्यासक्रमांच्या शाळांची माहिती संकलित करून ती माहिती गटशिक्षण अधिकारी कार्यालयात माहितीचे संगणकीकरण करून पाठविली जाते. मुख्याध्यापकांनी U-DISE पत्रकात दिलेल्या शाळेचा तपशील विद्यार्थ्यांची संख्या,अनुदान,भौतिक सुविधांची माहिती शैक्षणिक साधने, फर्निचर इत्यादीची माहिती प्राथमिक शिक्षण नियोजनात जिल्हा परिषद पत्रकाकरिता  महत्त्वाची आहे.

 

⏹  विकास आराखडा हां एक अभिलेखाचा प्रकार आहे. यामध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक उपक्रम, विविध योजनांची माहिती इत्यादीचा समावेश यात होतो. आपली शाळा समृद्ध होण्याच्या दृष्टीने ह्या आराखड्याचा उपयोग आपल्याला करून घेता येतो शालेय व्यवस्थापन समितीच्या विशेष बैठकीतद्वारे चर्चेद्वारे सदर आराखडा तयार करावयाचा असतो.या आराखड्यावर ती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांची स्वाक्षरी असणे महत्त्वाचे आहे.

 

8) नेमणूक बदली आदेश फाईल-यामध्ये शाळेत नव्याने नियुक्त झालेले शिक्षक किंवा शाळेतून बदली घेऊन गेलेले शिक्षक यांचे सर्व आदेश त्यांचा रूजू रिपोर्ट कार्यमुक्तीचा अहवाल ह्या फाइलमध्ये आपल्याला लावायचा आहे.

 

9) आवक-जावक रजिस्टर-

आवक बारनिशी-शालेय स्तरावर आलेल्या पत्रांच्या नोंदी आवक रजिस्टरमध्ये घेतल्या जातात.

 

 जावक बारनिशी-वरिष्ठ कार्यालयात व इतरत्र पाठविल्या जाणार्‍या पत्राची नोंद यात घेतली जाते. यांची नोंद करताना त्यांना क्रमांक दिनांक दिला जावा शाळेच्या नावाने आलेल्या बंद टपाल मुख्याध्यापकां व्यतिरिक्त कोणीही उघडू नये. आवक रजिस्टरमध्ये अनुक्रम नंबर दिनांक आवकाचा अनुक्रमांक नंबर ज्यांच्याकडून पेपर आले.  त्यांचे नाव त्याचा पत्ता आलेल्या पेपर मधील नंबर व दिनांक नमूद करावा.

 

10)  हालचाल रजिस्टर -हालचाल रजिस्टर शालेय वेळेत फक्त शाळेचा महत्त्वाच्या कामांसाठी किंवा शासकीय कामासाठी शाळे बाहेर जाताना हालचाल रजिस्टरमध्ये जाणार्‍याचे नाव दिनांक वेळ ठिकाण कामाचा तपशील इत्यादी ची नोंद करूनच शाळेबाहेर जावे. शाळेत परत आल्याचीसुद्धा नोंद करावी.

 

11) किरकोळ रजा व दीर्घ रजा नोंद वही- दीर्घ रजेच्या नोंदी वेळच्या वेळी पूर्ण कराव्यात त्याचा अहवाल तात्काळ वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात याव्या शैक्षणिक सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या दीर्घ रजेचा गोषवारा वरिष्ठ कार्यालयाला सादर करावा.

 

12) शेरेबुक अभिप्राय नोंदपुस्तिका-हे खूप महत्त्वाचे आहे अधिकारी व पदाधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या भेटीच्या संदर्भात अभिप्रायाचा नोंदी यात घेतल्या जातात अधिकारी व पदाधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र भेट रजिस्टर ठेवण्यात यावे. अभिप्रायाबाबत देण्यात आलेल्या सूचनाबाबत केलेल्या कार्यवाहीची नोंद त्यांची पूर्तता अहवालामध्ये घेण्यात यावी.

 

13) मुख्याध्यापक लॉगबुक-शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करून त्यासंबंधीचे अभिप्राय तसेच वर्गाच्या कामासंबंधी महत्त्वपूर्ण सुचना व मार्गदर्शन यांच्या नोंदी यामध्ये केलेल्या असतात. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान दोन शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करावे महिनाअखेरपर्यंत दोन शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करावे.

 

14)शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर- शैक्षणिक सत्रात दरवर्षी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याबाबतच्या नोंदी या रजिस्टरमध्ये ठेवले जातात

सर्व विद्यार्थ्यांच्या तपासणीबाबत इयत्ता निहाय वैयक्तिक कार्ड शाळेमध्ये ठेवली जातात. वैद्यकीय अधिकारी त्यांच्या सूचना या रजिस्टरमध्ये नोंदवतात. याप्रमाणे मुख्याध्यापकांनी कार्यवाही करावी.

 

15) शाळा व्यवस्थापन समिती रजिस्टर- शालेय व्यवस्थापन समितीच्या दरमहा घ्यावयाच्या सभांचे सविस्तर इतिवृत्त या रजिस्टरमध्ये नोंद ठेवली जाते.इतिवृत्त संपल्यानंतर शेवटी अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य, सचिव यांनी स्वाक्षऱ्या करून ते इतिवृत्त बंद करावे.

 

16) सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर- शिष्यवृत्ती प्राप्त दिनांक, वाटप दिनांक, यासारख्या महत्त्वाच्या नोंदी सदर रजिस्टरमध्ये घेण्यात याव्यात. 

 

17)शालेय पोषण आहार योजना-यामध्ये रजिस्टर इयत्ता-1 ते 56 ते 8 मधील नोंदी अचूक कराव्यात. शालेय पोषण आहाराचे मानधन वाटप फाईल्स स्वतंत्र करावी.या संदर्भात सर्व फाईल्सवर रजिस्टर आपल्या दप्तरी असाव्यात.

 

18)गणवेश वाटप रजिस्टर- यामध्ये विद्यार्थ्याचे नाव इयत्ता, जात, गणवेशचा प्रकार उदा-शर्ट,पॅन्ट एका गणवेशाची किंमत, प्राप्त रक्कम, खर्च,गणवेश मिळाल्याबद्दल स्वाक्षरी किंवा शेरा इत्यादी नोंदी घेण्यात याव्या.

 

19)पाठ्य पुस्तक वाटप रजिस्टर-अनुक्रम नंबर विद्यार्थ्याचे नाव पाठ्यपुस्तक विषयवार त्याचे वाटप, प्राप्त दिनांक,वाटपाचा दिनांक, विद्यार्थी पालक सही शेरा इत्यादी नोंदी घ्याव्यात.

 

20) विद्यार्थी लाभाच्या योजना वाटप रजिस्टर- 

लेखन साहित्य वाटप

उपस्थिती भत्ता वाटप 

अल्पसंख्यांक प्रोत्साहन भत्ता वाटप 

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटप रेजिस्टर इ  

गुणवत्ता शिष्यवृत्ती वाटप 

अस्वच्छ काम करणारा कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती 

अपंग शिष्यवृत्ती व इतर प्राप्त शिष्यवृत्त्या 

 

याकरिता प्रत्येक योजनांचे वाटप रजिस्टर ठेवायचे आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वस्तू वाटप झाल्यानंतर शेवटी गोषवारा तयार करून मुख्याध्यापकांनी सही करायची आहे.

 

21) शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर-शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी घेतलेल्या प्रशिक्षणांची  सविस्तर नोंद या मध्ये घ्यावयाची आहे. योग्य त्या प्रशिक्षणाची नोंद सेवापुस्तकामध्ये करावयाची आहे.

 

22) पटनोंदणी सर्वेक्षण रजिस्टर-सर्व शाळास्तरांवर दाखल पात्र विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्याकरीता गावस्तरावर सर्वेक्षण रजिस्टर तयार केले जाते. त्यामध्ये संपूर्ण गावातील लोकसंख्येची गणना करून स्त्री -पुरुष, साक्षर निरक्षर, जातसंवर्ग, व प्रवेशपात्र विद्यार्थी सर्वेक्षण रजिस्टरमध्ये नोंद करावी तसेच 6 ते 14 वयोगटातील शाळेत जाणारे व शाळाबाह्य विद्यार्थी यांचा गोषवारा काढण्यात यावा साधारण हे सर्वेक्षण डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात पूर्ण करावे. पुढील शैक्षणिक वर्षातील 1 जुलै रोजीचे वय निश्चित करून प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा गोषवारा काढावा व त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा.

 

 

23|)पालकभेट रजिस्टर-शाळेचे विद्यार्थी सलग 5 दिवसांपेक्षा गैरहजर असेल अशा विद्यार्थ्यांच्या शाळेतून नाव कमी न करता त्यांच्या पालकांना शिक्षकांनी भेटून  गैरहजरबाबतचे कारण यामध्ये नोंदवावे.नोंदवून झाल्यानंतर विद्यार्थ्याला नियमित शाळेत पाठविण्याबाबत सूचना करावयाची आहे.

 

24)गोपनीय अहवालात नोंद पोच रजिस्टर- शासकीय अधिकारी व  कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे बाबत शासन निर्णय क्रमांक CFR1210/प्र.क्र 46/2010 13 मंत्रालय मुंबई 400032 दि.1 नोव्हेंबर 2011 नुसार शैक्षणिक सत्र 2011-12 पासून शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल भरून संस्करण अधिकारी यांची स्वाक्षरीनंतर प्रत्येक कर्मचारी एक प्रत झेरॉक्स देने प्रतिवेदन अधिकारी यांचे कार्यालय ते रजिस्टर ठेवण्यात यावे  (30 जून पर्यंत )

 

25)शिक्षक सहविचार सभा-शालेय मंत्रिमंडळ सभा नोंदवही यामध्ये शालेय नियोजन शाळेतील विविध उपक्रमविषयक माहिती तसेच इतर विषय आपण या रजिस्टरमध्ये नोंदवावेत त्यांच्या सविस्तर नोंदी यामध्ये घेण्यात याव्यात सभेमध्ये झालेल्या चर्चेची सविस्तर नोंद यामध्ये घेतात.

 

26) माता पालक संघ- पालक शिक्षक संघ -सभा इतिवृत्त नोंदवही यामध्ये शालेय नियोजन व उपक्रम विषयाच्या नोंदी यामध्ये घेतात सभेमध्ये चर्चा झालेल्या विषयाच्या सविस्तर नोंदी घेतल्या जातात.

 

27)तंबाखूमुक्त शाळा रजिस्टर- 1 ते 11 निकषसंदर्भातील सविस्तर माहिती व फोटो यात असावेत.


28)ग्रंथालय पुस्तक देवघेव रजिस्टर- अ.क्र नंबर,विद्यार्थ्याचे नाव, इयता, पुस्तकाचे नाव, पुस्तक दिल्याचा दिनांक, पुस्तक मिळाल्याबद्दल सही,   पुस्तक घेतल्याबद्दल शिक्षकाची सही, व दिनांक यात नमूद करावी.


29)शैक्षणिक साहित्य देव घेव रजिस्टर-दैनंदिन अध्यापन करत असताना वापरात आणलेल्या शैक्षणिक साहित्याच्या नोंदी ठेवाव्यात.


30)इतर महत्त्वाचे रजिस्टर

· शैक्षणिक साहित्य नोंद रजिस्टर

· शैक्षणिक साहित्य देव घेव रजिस्टर

· परिपाठ सहशालेय उपक्रम रजिस्टर

· परिपाठ सहशालेय उपक्रम रजिस्टर, आकाशवाणी दूरदर्शन, आधुनिक तंत्राबाबत कार्यक्रम रजिस्टर

· ग्रंथालय नोंदवही

·शाळेला मिळालेल्या पारितोषिकांचे नोंद रजिस्टर

· प्रकरणीका नोंदवही विभागीय चौकशी लोकायुक्त प्रकरण इत्यादि

· न्यायालयीन पत्रव्यवहार नोंदवही

· पगारपत्रक फाईल

· आयकर विवरणपत्र व्यवसायकर फाईल

· शासकीय आदेश/ परिपत्रक फाईल

· वार्षिक तपासणी/ शाळा तपासणी अहवाल फाईल

· शिक्षक मुख्याध्यापक संचिका

 

 

विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे

 

•  जनरल रजिस्टर

पालकांचे प्रतिज्ञापत्र लेख रजिस्टर

विद्यार्थी हजारी

•  शाळा सोडल्याचे दाखले फाईल

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

•  उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर (पहिली ते चौथी)

अल्पसंख्यांक विद्यार्थी पालकांचा प्रोत्साहन भत्ता- (पाचवी ते सातवी)

•  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही

•  विद्यार्थी प्रगतीपत्रक

संचयी नोंदपत्रक (इ.1ते8)

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फाइल (1 ते 10 वी)

आदिवासी सुवर्णजयंती शिष्यवृत्ती (1 ते 10 वी)

•  आदिवासी विद्यावेतन वाटप रजिस्टर

गुणवत्ता शिष्यवृत्ती वाटप

•  सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटप

•  स्वच्छ कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती वाटप पहिली ते 10 वी

•  मुक्त गणवेश लेखन साहित्य वाटप रजिस्टर

•  पाठ्यपुस्तक स्वाध्याय पुस्तिका वाटप रजिस्टर

•  सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना रजिस्टर

•  शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्या पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी विद्यार्थी

विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर व शोध पत्रिका

अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

•  अहिल्यादेवी होळकर बस प्रवास योजना

विद्यार्थी उपस्थिती दैनिक गोषवारा रजिस्टर

अल्पसंख्यांक विद्यार्थी पटसंख्या रजिस्टर

शालेय मंत्रिमंडळ सभा नोंदवही

विद्यार्थी प्रगतीपत्रक

•  जिजामाता मोफत सायकल वाटप रजिस्टर आठवी ते 10 वी

 

मुख्याध्यापक व शिक्षकसंदर्भातील अभिलेख

•  शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजेरी

शैक्षणिक साहित्य नोंद रजिस्टर

•  ग्रंथालय पुस्तके देवघेव रजिस्टर

•  मुख्याध्यापक लॉगबुक

•  सूचना वही

•  शैक्षणिक साहित्य देव घेव रजिस्टर

•  शिक्षक रजा फाईल

शिक्षक व वैयक्तिक माहिती फाईल

शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर

•  पालकभेट रजिस्टर

•  आकाशवाणी दूरदर्शन आधुनिक तंत्राबाबत कार्यक्रम रजिस्टर

•  ग्रंथालय नोंदवही

•  लेट मस्टर नोंद वही

सेवापुस्तिका

गोपनीय अहवाल

•  खेळाच्या साहित्याची नोंद वही

•  माझी समृद्ध शाळा नोंद रजिस्टर

शाळेला मिळालेल्या पारितोषिकांचे नोंद रजिस्टर

•  शाळेला मिळालेल्या पारितोषिकांचे नोंद रजिस्टर

•  नियत कालिक वितरण पत्रकारची नोंदवही

•  नेमणूक बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्ती रुजू अहवाल रजिस्टर

•  प्रकरणीका नोंदवही विभागीय चौकशी लोकायुक्त प्रकरण इ.

•  न्यायालयीन पत्रव्यवहार नोंदवही

•  न्यायालयीन पत्रव्यवहार नोंदवही

•  भविष्य निर्वाह निधी नोंद रजिस्टर

आयकर विवरण व्यवसाय कर फाईल माहिती

•  माहिती अधिकारबाबत नोंद रजिस्टर आवक जावक रजिस्टर

शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त रजिस्टर

•  माता पालक संघ इतिवृत्त रजिस्टर

•  शिक्षक पालक संघ इतिवृत्त रजिस्टर

•  पदभार चार्ज देवाणघेवाण रजिस्टर चार रिस्टर

•  शाळा विकास आराखडा फाईल

•  जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली युडायस प्रपत्र

•  शासकीय आदेश परिपत्रक फाईल

अभिप्राय शेरे बुक अधिकारी-अ

•  अभिप्राय शेरेबुक पदाधिकारी-ब

•  हालचाल रजिस्टर शिक्षक मुख्याध्यापक कर्मचारी

•  वार्षिक तपासणी शाळा/तपासणी अहवाल फाईल

•  मासिकवार फाइल

•  शालेय पोषण आहारसंदर्भातील सर्व वह्या

•  शिक्षक मुख्याध्यापक संचिका

•  शिक्षक सहविचार सभा रजिस्टर

तंबाखूमुक्त शाळा रजिस्टर फाईल



आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा



Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...