Fiverr

Showing posts with label Shabari Avas yYojana. Show all posts
Showing posts with label Shabari Avas yYojana. Show all posts

Monday, June 19, 2023

Gharkul yojana शबरी आदिवासी घरकुल योजना|Shabri Adivasi Garkul yojana

 

Gharkul yojana शबरी आदिवासी घरकुल योजना|Shabri Adivasi Garkul yojana

Gharkul- yojana- शबरी -आदिवासी -घरकुल- योजना-|Shabri -Adivasi -Garkul -yojana

Gharkul yojana शबरी आदिवासी घरकुल योजना|Shabri Adivasi Garkul yojana   

नमस्कार मित्रांनो नुकताच शासनाने शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी ची आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळत असते.सदर घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी एक वीस लाख रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची तरतूद केलेली आहे. तसेच मनेरेगा माध्यमातून या लाभार्थ्यास रोजगार देखील उपलब्ध होणारअसल्याचे सांगितले जात  आहे. मित्रांनो ,आदिवासी उपयोजना अंतर्गत अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीततसेच ज्या लोकांना स्वताचा निवारा नाही. आणि जे अनुसूचित जमातीचे लोक आहेत. ते लोक  मातीची घरे झोपडपट्ट्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहत असतात तर अशा पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची म्हणजेच शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनाकडून चालविली जाणारी ही योजना आहे.या योजनेचा लाभ शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जाते.त्याशिवाय रोजगार हमी योजनेकडून कामाचा मोबदला देखील मिळत असतो. आदिवासी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांनी निवड करताना ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कारवाई करून मंजुरी देण्यात येत असते. योजनेअंतर्गत 2021 22 या आर्थिक वर्षाकरिता घरकुल यांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय 16 जुलै 2021 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला होता..

  👉 आहे तरी काय ही  Shabri Gharkul Yojana?

मित्रांनो अनुसूचित जमाती मधील पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठीची शासनाने शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू केलेली आहे. या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांनाच घरकुल मंजूर केले जाते.


👉शबरी  घरकुल योजनेअंतर्गत किती रक्कम मर्यादेपर्यंत लाभ देय आहे?

ग्रामीण क्षेत्रासाठी रुपये १ लाख ३२ हजार एवढी घराची किंमत मर्यादा असेल.नक्षलग्रस्त तसेच डोंगरा क्षेत्रासाठी १ लाख ४२ हजार एवढी घराची किंमत मर्यादा असेल.महानगरपालिका क्षेत्राकरिता घराची किंमत मर्यादा रुपये २ लाख एवढी असेल.

👉Gharkul Yojane साठी कोणती कागदपत्रे लागतात?

शबरी घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे- या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला यात जातीचे प्रमाणपत्र रेशन कार्ड बँक खाते पासबुक आधार कार्ड जॉब कार्ड नमुना नंबर आठ यासह इतर काही कागदपत्रांची गरज असते.

👉Shabari Gharkul Yojna साठी कोठे अर्जकरता येईल ?

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून घरकुलांना मंजुरीची प्रक्रिया राबवली जाते त्या ठिकाणी प्रस्ताव दाखल करावा लागत असतो शिवाय पंचायत समिती ग्रामपंचायत मध्ये याबाबतची अधिक माहिती दिली जात असते.

👉Gharkul Yojana चे कसे  मिळते अनुदान?

 मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख वीस हजाराचे अनुदान मिळते तसेच शौचालय बांधकामासाठी 32000 हे मार जी एस अंतर्गत 18 हजार असे एकंदरीत दीड लाखाचे अनुदान मिळू शकते.

 शबरी आदिवासी घरकुल योजना २०२२-२३ उद्दिष्ट्य निश्चित करण्याबाबत शासन निर्णय GR –शबरी आवास योजना शासन निर्णय GR दिनांक १६ जुलै २०२१.


आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा🙏

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...