Fiverr

Wednesday, November 13, 2024

Trending top 10 news

 87 मतदारसंघात लागणार 2 EVM मशीन

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात रंगात आली आहे. राज्यात प्रमुख पक्षांमधील बंडखोरी आणि अपक्षांची गर्दी आणि इतर लहान पक्षांमुळं यंदा उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळं जिथं जास्त उमेदवार आहेत, तिथं निवडणुक आयोगाला एकापेक्षा अधिक ईव्हीएमची व्यवस्था करावी लागणार आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 87 मतदारसंघात जास्त उमेदवार असल्यानं दोन ईव्हीएम मशीन लागणार आहेत.

पोस्टल बॅलट म्हणजे नक्की काय?

राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पण मतदानाची पोस्टल बॅल्ट पद्धत कशी असते माहितीये? चला जाणून घेऊ.या एका प्रकारच्या मतपत्रिका असतात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, मेलचा वापर करुन मतदानाचा अधिकार बजावता येतो. केंद्रीय दलांमध्ये असणारे सरकारी कर्मचारी, लष्करातील सैनिक, परदेशामधील दूतावासात काम करणारे सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा काही ठरावीक लोकांना अशा प्रकारे मतदान करण्याचा अधिकार देण्यात येतो.


महिलांकडे असणार 426 मतदान केंद्रांचे नियंत्रण..


यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापन करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 45 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये 33, गोंदिया 32 आणि सोलापूर 29, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली , हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.


प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे पदार्थाचे करा सेवन..


प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही खाद्यपदार्थ अत्यंत फायदेशीर ठरतात. हळद, ज्यात असलेल्या क्युरक्युमिनमुळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेले फळे, जसे की संत्रे, आंबे आणि द्राक्षे, इम्यून सिस्टीमला बूस्ट करतात. ड्रायफ्रूट्समध्ये असलेले झिंक प्रतिकारशक्तीला बळकट करतात. आवळ्याचा रस शरीरातील विषारी पदार्थ दूर करण्यास मदत करतो आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो. याव्यतिरिक्त, पालेभाज्या, विशेषतः पालक आणि मेथी, लोह आणि अँटीऑक्सिडेंट्ससाठी उत्तम स्रोत आहेत.


'लाडकी बहीण योजना' बंद होणार...का ?

मध्य प्रदेशात भाजप सरकारने लागू केलेली "लाडकी बहीण योजना" बंद करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा महंमद यांनी केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेवडीसंबंधीच्या टिपण्णीवरून सवाल केला, "काँग्रेसच्या कल्याणकारी योजनांना मोदी रेवडी म्हणतात, पण भाजप सरकार 'लाडकी बहीण' योजनेतून रेवडी का वाटत आहे?" असे तीव्र प्रश्न डॉ. शमा यांनी उपस्थित केले. काँग्रेसने ही योजना सुरू केली होती, असेही ते म्हणाले


सोलापूर: मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी द्या..

सोलापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील खाजगी कंपन्या मधील आस्थापना, सर्व दुकाने किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल इत्यादींना सूचना देण्यात येत आहे की, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी. मतदाना विषयक काही तक्रारी असल्यास 0217-2728401 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त तथा नोडल अधिकारी लेबर वॉटर्स सोलापूर यांनी केले आहे.


महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना..

महाराष्ट्र सरकारने 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना' सुरू केली आहे. या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही मिळणार आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे, तसेच 14 जिल्ह्यांतील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया, उपचार, विमा संरक्षण आणि आरोग्य शिबिरे दिली जात आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: jeevandayee.gov.in.



2 लाख 50 हजार तरुणांना मिळणार नोकऱ्या..

मुकेश अंबानी यांनी आंध्र प्रदेशमध्ये 500 कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्रे उभारण्यासाठी 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या प्रकल्पावर पुढील 5 वर्षांत काम करणार आहे. ऊर्जा क्षेत्रात अंबानींच्या या गुंतवणुकीमुळे 2 लाख 50 हजार तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. ही गुंतवणूक रिलायन्सची ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे.प्रकल्पाचा उद्देश स्वच्छ ऊर्जा निर्माण करणे आणि पर्यावरणीय संरक्षण वाढवणे आहे.




कांद्याचे भाव कडाडले..



कांद्याच्या भावाने मोठी झेप घेतली आहे. अनेक ठिकाणी कांद्याची किंमत 80 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. रिपोर्टनुसार, काही शहरांमध्ये कांद्याचे भाव काही दिवसात जवळपास ₹40/किलोने वाढले आहेत. दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये कांद्याचे भाव वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.


उमेदवारांना निवडणुक चिन्ह कसे दिले जातात?

निवडणूक चिन्ह हे मान्यताप्राप्त तसंच नोंदणीकृत पक्षांना किंवा अपक्ष उमेदवारांना देण्यात येणारं एक प्रमाणित चिन्ह असते. निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 या कायद्यांतर्गत निवडणूक आयोगाद्वारे राजकीय पक्षांना तसंच अपक्ष उमेदवारांना दिली जातात. निवडणूक चिन्हांचे राखीव चिन्हं आणि मुक्त चिन्हं असे दोन प्रकार पडतात. राखीव चिन्हे म्हणजे जी एखाद्या पक्षासाठी राखीव असतात, तर मुक्त चिन्हं म्हणजे जी नोंदणीकृत पण मान्यता न मिळालेल्या पक्षांना तसंच अपक्ष उमेदवारांना दिली जातात. जेव्हा उमेदवार अर्ज भरतो, तेव्हा त्याला निवडणूक आयोगाच्या मुक्त चिन्हांच्या यादीतून तीन चिन्हांची निवड करावी लागते. त्यानुसार निवडणूक आयोगाद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर एक चिन्ह त्या उमेदवाराला दिलं जातं.






Tuesday, November 12, 2024

Trending topics : या दिवशी असणार शाळा बंद

 या दिवशी असणार शाळा बंद....



19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळेच्या बस बंद असणार विधानसभा निवडणुकीसाठी शाळांच्या बसची गरज भासणार असल्याने शाळेमध्ये लागणाऱ्या बस बंद ठेवण्याचा निर्णय शाळा बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेत शाळांच्या बसेस वापरल्या जाणार असल्यामुळे शाळांना 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी असणार आहे का? याविषयी चर्चा होत आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी असण्याची शक्यता आहे.



पॅन-आधार लिंकिंगसाठी 31 डिसेंबर शेवटची मुदत



आधार आणि पॅन कार्ड एकमेकाला लिंक करण्यासाठी प्रशासनाने डेडलाईन दिली आहे. त्यानुसार 31 डिसेंबर 2024 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. त्यानंतर पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल, त्यामुळे विविध आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. फसवणुकीपासून मुक्तता आणि देशभरातील ओळख प्रक्रिया सुलभ करणे हा यामागचे उद्देश आहे. त्यामुळे तुमचे पॅन-आधार लिंक केले नसेल, तर लवकरात लवकर करुन घ्या.



बिट्स लिमिटेडने दिला गुंतवणूकदारांना 6874% परतावा



बिट्स लिमिटेड (Bits Ltd) या कंपनीच्या शेअरने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला आहे. केवळ 35 पैशांचा असलेला हा स्टॉक काही महिन्यांत 24.41 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल 6874% परतावा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या शेअरला सातत्याने 2% अप्पर सर्किट लागत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये हा शेअर तेजीवर आहे.



Breaking news!आता 450 रुपयांना मिळणार गॅस सिलेंडर



राजस्थान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सुरुवातील फक्त उज्जवला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिला जात होता. मात्र, आता रेशन कार्डधारकांनादेखील 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिला जाणार आहे. यासाठी नागरिकांना रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी लिंक करावा लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा आता 68 लाख कुटुंबांना होणार आहे. असा निर्णय महाराष्ट्रात कधी लागू होणार? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.



जिओ धमाका ऑफर ! 3 महिने नेटफ्लिक्स फ्री



प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या जिओने आपल्या युझर्ससाठी एक चांगला प्लॅन आणला आहे. 1299 रुपयाचा प्लॅन आहे. यात रोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल देण्यात येणार आहे. शिवाय, नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शनही देखील मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनची विशेष बाब म्हणजे यात 5 जी इंटरनेटही आहे. म्हणजेच तुम्हाला याता चांगले स्पीड आणि नेटफ्लिक्सचा आनंद घेता येणार आहे.



70 वर्षांवरील वृद्धांना मोफत उपचार, सर्वांना मिळणार घरकूल



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली आहे. '70 वर्षावरील वृद्धांच्या उपचाराची चिंता करू नका, त्यांच्या औषधाचा खर्च मोफत करणार', असं मोदींनी म्हटलंय. 'गरिबांसाठी आम्ही 4 कोटी घरे उभारली आहेत. अजूनही कुणाला घर नसेल तर कळवा, त्यांना देखील घर बांधून देऊ. आता गरिबांसाठी 3 कोटी घरे उभारण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रातील गरिब कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण होईल', असेही मोदी म्हणाले. मोदींची अकोल्यात प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली.



लसूण तूपात तळून खाल्ल्याने होतात अनेक फायदे जाणून घ्या.



लसूण आणि देसी तूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, लसूण तूपात तळल्याने अनेक रोग दूर होण्यास मदत होते. लसूण मध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. देसी तूपासोबत लसूण खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो, बीपी नियंत्रित राहतो, आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच, लसूण तूपात तळल्याने संधिवात, ल्युपस, आणि एमएससारख्या स्वयंप्रतिकार रोगांसाठी फायदेशीर ठरते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.


राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे वीजबिल माफ



महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत' योजने अंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपाचे वीजबिल माफ करण्यात आले आहे, ज्यामुळे राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खेड तालुक्यातील

19,539 शेतकऱ्यांचे सुमारे 14 कोटी 23 लाख रुपयांचे वीजबिल माफ झाले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली असून, उत्पादन खर्चात घट झाली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचे स्वागत केले असून, यामुळे ते अधिक उत्साहाने शेती करू शकतील व आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ शकतील.



20 तारखेला सुट्टी जाहीर...



महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेचे मतदान आहे. त्यामुळे या दिवशी अनेक कंपन्या, संस्था आणि कार्यालयांनी सुट्टी जाहीर केली आहे. शिवाय, कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी 2 तासाची रजाही देण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे शेअर मार्केटही या दिवशी बंद राहणार आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी न दिल्यास कंपन्या, संस्था, कार्यालये यांच्यावर कारवाईही होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.




समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती




समाज कल्याण विभागाने 219 पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा लागेल. वयाची अट 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट दिली आहे. या पदांसाठी अर्ज पुणे आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी करता येतील. उमेदवाराने अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबरआहे. लिंक- https://drive.google.com/file /d/1cT3feKkbPOcoaGfPygpes1omk9F9woQ0 /view, https://cdn.digialm.com/EForms /configuredHtml/32813/87992/Index.html




उत्तर महाराष्ट्र गारठला...



राज्यात किमान तापमान घटू लागल्याने थंडी वाढत जाण्याचे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात पारा 16 अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला आहे, तर उर्वरित राज्यात थंडीची प्रतीक्षा आहे. शनिवारी धुळ्यात राज्यातील नीचांकी 13.4 अंश तापमानाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कोकणात उन्हाचा चटका असूनही उर्वरित राज्यात तापमान कमी होत आहे. डहाणू येथे उच्चांकी 36.1 अंश तापमान नोंदले गेले.

Monday, November 11, 2024

Today topics :A history of elections in Maharashtra

 मतदान महत्वाचे का आहे?



लोकशाही समाजात मतदान हा मूलभूत अधिकार आहे, हे नागरिकांना त्यांच्या देशाचे आणि समुदायाचे भविष्य घडवून, निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यास अनुमती देते. मतदानाद्वारे, जनता निवडून आलेल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरू शकतात, धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात आणि त्यांचा आवाज ऐकला जाईल' याची खात्री करू शकतात. शिवाय, मतदान लोकशाही प्रक्रियेची वैधता आणि अखंडता टिकवून ठेवण्यास मदत करते, सत्तेचे केंद्रीकरण रोखते आणि प्रतिनिधित्व आणि समानतेला प्रोत्साहन देते. मतदानाचा हक्क बजावणे हे नागरी कर्तव्य आहे आणि मुक्त आणि न्याय्य समाजात जगण्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे.


मतदानाचा इतिहास: प्राचीन काळातील मतदान



मतदानाचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू होतो तो असा - प्राचीन ग्रीस: मतदानाची सुरुवात प्राचीन ग्रीसमध्ये झाली, विशेषतः अथेन्समध्ये. इथे नागरिकांची सभा (अगोरा) होती, ज्यामध्ये नागरिक त्यांच्या प्रतिनिधींची निवड करीत. मात्र, या प्रक्रियेतील मतदान फक्त पुरुष नागरिकांपर्यंत मर्यादित होते. रोमन साम्राज्य: रोमन साम्राज्यात, मतदानाची प्रक्रिया अधिक जटिल झाली. येथे नागरिकांना त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जात होत्या. मात्र, त्यामुळे देखील सर्व व्यक्तींना मतदानाचा हक्क नव्हता.


मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य व हक्क..



येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करून मी माझे राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहे. तुम्ही सर्वांनीही आवर्जून मतदान करा. कारण मतदान करणे हा आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि हक्क आहे. तो आपण बजावलाच पाहिजे, असे आवाहन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. निडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे.



भारतातील सर्वाधिक शिकलेला नेता आहे "एक मराठी माणूस"



महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले आणि वयाच्या २६ व्या वर्षी ते देशातील सर्वात तरुण आमदार बनलेले श्रीकांत जिचकर भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता आहेत. यांना भारतातील सर्वात शिकलेले व्यक्ती म्हणून ओळखले जाते. 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी परीक्षा दिल्या. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले. श्रीकांत जिचकर हे 25 वर्षांचे असतानाच त्यांच्याकडे 14 पोर्टफोलिओ होते. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती.



महाराष्ट्रातील 1962 ते 2024 पर्यंतचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ..







1. यशवंतराव चव्हाण ( कराड उत्तर) 1 में 1960 ते 20 नोव्हेंबर 1962 (2 वर्षे, 203 दिवस)

2. मारोतराव कन्नमवार ( साओली ) 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 (1 वर्ष, 4 दिवस)

3. बाळासाहेब सावंत (चिपळूण ) 25 नोव्हेंबर 1963 ते 5 डिसेंबर 1963 (10 दिवस)

4. वसंतराव नाईक ( पुसद ) 5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967 (11 वर्षे, 78 दिवस)

5. शंकरराव चव्हाण ( भोकर ) 21 फेब्रुवारी 1975 ते 17 में 1977 (2 वर्षे, 85 दिवस)

6. वसंतराव दादा पाटील ( सांगली ) 17 में 1977 ते 18 जुलै 1978 (1 वर्ष, 62 दिवस)

7. शरद पवार ( बारामती ) 18 जुलै 1978 तक 17 फेब्रुवारी 1980 (1 वर्ष, 214 दिवस)

8. अब्दुल रहमान अंतुले ( श्रीवर्धन ) 9 जून 1980 ते 21 जानेवारी 1982 (1 वर्ष, 226 दिवस)

9. बाबासाहेब भोसले ( नेहरूनगर ) 21 जानेवारी 1982 ते 2 फेब्रुवारी 1983 (1 वर्ष, 12 दिवस)

10. वसंतराव दादा पाटील ( सांगली ) 2 फेब्रुवारी 1983 ते 3 जून 1985 (2 वर्षे, 121 दिवस)

11. शिवाजीराव निलंगेकर ( निलंगा ) 3 जून 1985 ते 12 मार्च 1986 (0 वर्ष, 282 दिवस)

12. शंकरराव चव्हाण ( धर्माबाद ) 12 मार्च 1986 ते 26 जून 1988 (2 वर्षे, 106 दिवस)

13. शरद पवार ( बारामती ) 26 जून 1988 ते 4 मार्च 1990 (2 वर्षे, 364 दिवस)

14. सुधाकरराव नाईक ( पुसद ) 25 जून 1991 ते 6 मार्च 1993 (1 वर्ष, 254 दिवस)

15. मनोहर जोशी ( दादर ) 14 मार्च 1995 ते 30 जानेवारी 1999 (3 वर्षे, 324 दिवस)

16. नारायण राणे ( मालवण ) 1 फेब्रुवारी 1999 ते 18 ऑक्टोबर 1999 (259 दिवस)

17. विलासराव देशमुख ( लातूर शहर ) 18 ऑक्टोबर 1999 ते 17 जानेवारी 2003 (3 वर्षे, 92 दिवस)

18. सुशीलकुमार शिंदे ( सोलापूर दक्षिण ) 18 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 (1 वर्ष, 288 दिवस) 19. विलासराव देशमुख ( लातूर शहर ) 1 नोव्हेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008 (4 वर्षे, 37 दिवस)

20. अशोक चव्हाण ( भोकर) 8 डिसेंबर 2008 ते 7 नोव्हेंबर 2009 (1 वर्ष, 338 दिवस)

21. पृथ्वीराज चव्हाण ( कराड) 11 नोव्हेंबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014 (3 वर्षे, 321 दिवस)

22. देवेंद्र फडणवीस ( नैऋत्य नागपूर ) 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 (5 वर्षे, 12 दिवस)

 23. उद्धव ठाकरे ( वर्ली ) 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022 (2 वर्षे, 214 दिवस)

 24. एकनाथ शिंदे ( कोपरी-पाचपाखाडी ) 30 जून 2022 ते आजतागायत (2 वर्षे, 129 दिवस) 


टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये भरती...



टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये 775 जागांसाठी भरती सदर्न कमांडमधील देशभरातील 13 टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये दि. 4 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान भरती आयोजित केली जाणार आहे. पात्रता : सोल्जर (जनरल ड्यूटी) 10 वी सरासरी किमान 45 गुण (प्रत्येक विषयात किमान 33 गुण). वयोमर्यादा : भरतीच्या दिनांकास 18-42 वर्षे. उमेदवारांनी भरतीसाठी येताना मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या साक्षांकीत केलेल्या प्रतींचे दोन संच तसेच २० पासपोर्ट आकाराचे फोटोग्राफ घेवून हजर रहावयाचे आहे.


उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर






मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार सभा, कॉर्नर बैठका, रॅली यासह सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापर केला जात आहे. सर्व पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांकडून वेळोवेळी आपल्या सोशल मीडिया हँडलवर विविध पोस्ट करून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीत उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यावर भर देत आहेत. कारण आजघडीला बहुतांश जनता ही सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.





Sunday, November 10, 2024

News topics:मतदानाचा इतिहास:आधुनिक आणि समकालीनकाळ

 मतदानाचा इतिहास:आधुनिक आणि समकालीनकाळ



18 व्या शतकाच्या शेवटी आणि 19 व्या शतकाच्या सुरूवातीस नवे विचार आले. मूल्ये जसे स्वतंत्रता, समानता आणि मानवाधिकार याविषयी चर्चा झाली. यामुळे नागरिकांमध्ये मतदानाच्या हक्कासाठी चळवळीला चालना मिळाली. 20व्याशतकात, विविध देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. 20 व्या शतकाच्या शेवटच्या दहा वर्षांत, अनेक देशांमध्ये मतदान प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्या. तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणुकांचे आयोजन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यात आले. आज, जगभरात अनेक विविध प्रकारच्या मतदान पद्धती आहेत, जसे की इलेक्ट्रॉनिक मतदान, मेल-इन मतदान, आणि इतर तंत्रज्ञान आधारित पद्धती.


महाराष्ट्रात उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा इतिहास नाही



महाराष्ट्रातील राजकारणात उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा इतिहास नाही. अजित पवार, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील आणि आर.आर. पाटील हे सर्व उपमुख्यमंत्री झाले, पण एकही मुख्यमंत्री झाले नाही. अजित पवार सध्या उपमुख्यमंत्री असून, त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल येतील आणि त्यानंतर अजित पवार तसेच अन्य उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पुर्ण होईल का, हे स्पष्ट होईल.


पंतप्रधान इंटर्नशिप योजना! आजची शेवटची तारीख



पंतप्रधान इंटर्नशिप योजना युवाांना उद्योग आधारित प्रशिक्षण प्रदान करणार आहे. या योजनेतून 12 महिन्यांचे इंटर्नशिप मिळेल, ज्यामुळे तरुणांना भारतातील शीर्ष कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. 10 वी किंवा त्यापुढील शैक्षणिक पात्रता असलेल्या 21 ते 24 वर्षे वयोगटातील युवक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 5000 रुपयांचे मानधन दिले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर आहे. अधिक माहितीसाठी https://pminternship.mca.gov.in वर अर्ज करा किंवा 1800116090 वर संपर्क साधा.


नवा नियम! व्हॉट्सअॅपवर ग्रुपसाठी ऍडमिनला द्यावे लागणार 4 हजार



भारतात सध्या व्हॉट्सअॅप वापरणे पूर्णपणे मोफत आहे. शिवाय, कोणताही ग्रुप बनवण्यासाठी किंवा कोणत्याही ग्रुपमध्ये सामिल होण्यासाठी पैसे लागत नाहीत. पण, झिम्बाब्वे सरकारने आता नवीन नियम आणला आहे. त्यानुसार, व्हॉट्सअॅपवर ग्रुप बनवण्यासाठी नोंदणी बंधनकारक केली आहे. यासाठी टेलिकम्युनिकेशन्स रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये अर्ज करावा लागेल. ग्रुप अॅडमिनला यासाठी 50 डॉलर म्हणजेच 4000 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. व्हॉट्सअॅपचा गैरवापर होऊ नये, चुकीची माहिती जाऊ नये यासाठी हा नियम घातला आहे



नरेंद्र मोदींनी दिली नदीजोड प्रकल्पाला मंजुरी



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैनगंगा, नलगंगा आणि पैनगंगा नद्या जोडण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्राच्या अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील पाण्याच्या समस्यांचा निराकरण होईल. यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "पूर आणि दुष्काळ यांसारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी आमच्या सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. शेतकऱ्यांना कमी पाणी वापरण्याचं आवाहन करत आम्ही सिंचनासाठी प्रोत्साहन देत आहोत.


सोलापूरः उजनीतून कालव्यात सोडलेले पाणी ३ महिन्यांनंतर बंद



उजनी धरण १०० टक्के भरल्यावर पूरनियंत्रणासाठी ४ ऑगस्टपासून धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. आता पावसाळा संपला असून तीन महिन्यानंतर शुक्रवारी (ता. ८) कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. २०२४-२५ या वर्षातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरणार आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.


Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...