नवीन वर्षात मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना 26 सार्वजनिक सुट्ट्या....
2025 साली महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना 26 सार्वजनिक सुट्ट्या मिळतील. प्रमुख सुट्ट्यांमध्ये 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 19 फेब्रुवारी (शिवाजी महाराज जयंती), 31 मार्च (रमजान ईद), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) आणि 25 डिसेंबर (ख्रिसमस) यांसारख्या दिवशी सुट्टी राहील. याशिवाय, महाशिवरात्री, होळी, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, दिवाळी, बकरी ईद आणि अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
ऑनलाइन जॉब शोधण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स..
आजकाल नोकऱ्या शोधताना ऑनलाइनवरच अधिक भर दिला जातो. ऑनलाइन नोकरी शोधताना पुढील गोष्टी उपयोगी ठरतात. आपला बायोडाटा (CV) आणि कौशल्यांची माहिती अपडेट ठेवा. आपल्या अनुभवाची, शिक्षणाची आणि कामाची कौशल्यांची स्पष्ट माहिती द्या. नोकरी शोधण्यासाठी LinkedIn, Indeed, Naukri.com, सारख्या जॉब माध्यमांचा वापर करू शकता. सोशल मीडिया आणि प्रोफेशनल नेटवर्क्सवर कनेक्शन साधा. तुमच्या रिझ्युमेमध्ये आवश्यक असलेली कौशल्ये आणि अनुभव प्रमुख ठेवा.
कांद्याला सरासरी 3700 भाव..
कांद्याचे मोठे मार्केट म्हणून देशभरात ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक प्रचंड वाढली आहे. काल एका दिवसात 1700 हून अधिक वाहनांतून जवळपास 29 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला सध्या किमान 1200 ते कमाल 5100 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी 3700 रुपये भाव मिळाला आहे. राज्यभरातून कांदा तिथे दाखल होत आहे.
10 वीं- 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'एमएसबीएसएचएसई' अॅप
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी 'एमएसबीएसएचएसई' अॅप तयार केले आहे. या अॅपद्वारे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मॉडेल प्रश्नपत्रिका, टाइमटेबल, निकाल, सराव प्रश्नपत्रिका, नोटिफिकेशन्स आणि अद्ययावत माहिती मिळेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या माहितीपासून विद्यार्थ्यांना वाचवण्याचे उद्दिष्ट आहे. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे अॅप मोठ्या उपयोगाचे ठरणार आहे.
बँक ऑफ इंडियात जॉबची संधी!
बँक ऑफ इंडियात वॉचमन पदासाठी भरती जाहीर! रत्नागिरी झोनल ऑफिससाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. पात्रता: 7 वी ते 12 वी उत्तीर्ण. अनुभव आवश्यक. पगार: ₹ 12,000 प्रतिमहिना. वयोमर्यादा: 22 ते 40 वर्षे. अर्जाची अंतिम तारीख: 13 डिसेंबर 2024. निवड प्रक्रिया: मुलाखत. अर्ज शुल्क नाही. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://bankofindia.co.in. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी वाचून योग्य ती माहिती द्यावी.
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना!
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. योजनेत ट्रॅक्टर खरेदीवर 20% ते 50% अनुदान मिळते. अर्जासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, बँक तपशील आणि फोटो असणे आवश्यक आहे. अर्जदार भारतीय असावा, स्वतःची जिरायती शेती असावी, वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, आणि योजनेचा लाभ आधी घेतलेला नसावा. अर्ज जवळच्या CSC केंद्रातून करता येतो. योजना शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रोत्साहन देते.
लाडक्या बहिणींसाठी केंद्र सरकारची नवी योजना!
लाडक्या बहिणींसाठी केंद्र सरकारची नवी योजना -'विमा सखी योजना'! पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर रोजी हरियाणात या योजनेचा शुभारंभ करतील. एलआयसीच्या माध्यमातून तीन वर्षांत 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश आहे. 10वीं पास आणि 18 वर्षांवरील महिलांना या योजनेत सहभागी होता येईल. प्रशिक्षणादरम्यान पहिल्या वर्षी 7 हजार, दुसऱ्या वर्षी 6 हजार, आणि तिसऱ्या वर्षी 5 हजार स्टायपेंड मिळेल. प्रशिक्षणानंतर महिलांना एलआयसी एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी मिळेल, तसेच कमीशनही मिळेल.
मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा थंडीचा कडाका
मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग आणि उत्तर भारतातील शीतलहरींमुळे तापमानात मोठी घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान 10 अंशांखाली आले असून, नाशिकमध्ये 4 अंशांनी घट होऊन तापमान 12 अंशांवर पोहोचले आहे. कोकण आणि मुंबईतही गारवा जाणवत आहे. पुढील 24 तासांत निरभ्र आकाशामुळे थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात पुढील 10 दिवस गारठा कायम राहणार असून, देशातही दिल्लीसह अनेक ठिकाणी थंडीची तीव्रता वाढली आहे.
No comments:
Post a Comment