आता AI सांगणार मृत्यूची तारीख अन् वेळ
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील विंडफॉल आणि इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे इंधनाच्या किंमती कमी होणार आहेत. विंडफॉल टॅक्स रद्द केल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण होईल. या करामुळे काही परिस्थितींमध्ये पेट्रोलियम कंपन्यांना जास्त नफा मिळतो. सरकारने कच्च्या तेलाच्या उत्पादनावर आणि निर्यातीवरील टॅक्स रद्द केल्याची माहिती अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दि. 1 डिसेंबर 2024 सकाळी 8 वा. पासुन ते 15 डिसेंबर 2024 रात्री 8 वा. पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) व 37 (3) (अ ते फ) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविले आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, भाले, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे.
सर्व बँक खातेदारांना मिळणार मोठं गिफ्ट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन डिसेंबर महिन्यात बँक खात्यांमधील नॉमिनी संबंधित नियमांमध्ये मोठी दुरुस्ती प्रस्तावित करणार आहेत. नव्या विधेयकानुसार, खातेदारांना त्यांच्या बँक खात्यासाठी 4 नॉमिनी नियुक्त करण्याचा पर्याय मिळणार आहे. याशिवाय, नॉमिनींना किती हिस्सा द्यायचा हे खातेदार ठरवू शकतील. सध्या खातेदार फक्त 1 नॉमिनी करू शकतात. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर होईल. याची कल्पना आयसीआयसीआय बँकेचे प्रमोद राव यांनी दिली होती.
महायुतीचा शपथविधी दणक्यात, 22 राज्याचे मुख्यमंत्री; 40 हजार लोक
महायुती सरकराचा शपथविधी 5 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला तब्बल 40 हजार जणांची उपस्थिती असणार असल्याची माहिती समोर आलीय. शपथविधीसाठी जगभरातील प्रमुख पाहुण्यांसह जवळपास 40 हजार जणांची उपस्थिती असणार आहे. महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी होणार आहेत.
महायुती सरकारची घोषणा! 1 लाख पदांची मेगाभरती
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत राज्यातील सहा लाख प्रशिक्षणार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे विद्यावेतन अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे अनेकांनी आर्थिक अडचणींमुळे प्रशिक्षण अर्धवट सोडले आहे. राज्यात 10 लाख तरुणांना प्रशिक्षणाची संधी मिळणार असून, आतापर्यंत सर्वाधिक नोंदणी शासकीय विभागांमध्ये झाली आहे. दरम्यान, महायुती सरकारने 1 लाख पदांची मेगाभरती करण्याची घोषणा केली असून, प्रशिक्षणार्थींनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
गुगल मॅपच्या चुकीमुळे आणखी एक दुर्घटना
गुगल मॅपच्या चुकीमुळे झालेल्या अपघाताची आणखी एक घटना घडली आहे. कानपूरहून पिलीभीतला जाणाऱ्या तीन मित्रांची कार बरेलीच्या पीलीभीत रोडवरील कोरड्या कालव्यात पलटी झाली. सकाळी सहा वाजता घडलेल्या या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. कालव्याला पाणी नसल्याने तिघेही सुखरूप बचावले. गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवून अपूर्ण रस्त्यावर नेले, ज्यामुळे हा अपघात झाला. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे रामगंगा नदीत कार पडून तिघांचा मृत्यू झाला होता. टेक्नोलॉजीच्या गैरवापरामुळे अशा घटना घडत आहेत.
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या उपकंपनी, स्ट्रँड लाइफ सायन्सेसने कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेतील लक्षणे ओळखण्यासाठी रक्त-आधारित चाचणी "CancerSpot" सुरू केली आहे. या चाचणीद्वारे रक्ताच्या नमुन्याद्वारे कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची ओळख होऊ शकते. भारतात कॅन्सरच्या उपचारांवर संशोधन करण्यास अडचणी होत्या, परंतु या नव्या चाचणीमुळे त्यावर अधिक संशोधन करणं शक्य होईल. कर्करोगाची प्रारंभिक अवस्था ओळखणे उपचारासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. या चाचणीमुळे कॅन्सरवरील उपचारात सुधारणा होण्याची आशा आहे.