Fiverr

Sunday, June 25, 2023

School Records

 

Most Important School Record

Very Important School Recordसर्व शिक्षकांना माहिती असावे शालेय रेकॉर्ड...
 

शालेय अभिलेख हे फाईल्स अँड रजिस्टर्स स्वरूपात असतात

शालेय व्यवस्थापनात मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील अभिलेख यांना महत्त्वाचे स्थान आहे.

शासकीय यंत्रणेने ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार व निर्देशानुसार अभिलेखे ठेवल्यास कार्यात एकसूत्रता व सुसंगतपणा येऊन ते कामाच्या दृष्टीने सोयीचे होते.

शालेय दप्तरांना बंदिस्त कपाटात ठेवून अनुक्रमानुसार व विद्यार्थी,पालक,शिक्षक व शासन अशा वर्गीकरणानुसार ठेवल्यास नोंदीच्या वेळी ते आपल्याला सोयीस्कर होते.

शालेय अभिलेखे अथवा नोंद पत्रके यावरून शाळेची सद्यस्थिती आपल्याला समजते शैक्षणिक कार्याची माहिती मिळते

मुख्याध्यापकांच्या कार्यालयात कोणकोणते अभिलेखे असावेत व काही रजिस्टर कायमस्वरूपी ठेवावे लागतात अशा रजिस्टर यांना प्रमाणित करणे गरजेचे असते.


                                                 प्रमाणपत्र

 

प्रमाणित करण्यात येते की सदरहू रजिस्टर मध्ये पान क्रमांक-1 ते .....इतकी पृष्ठे आहेत.

 

                                                                                        मुख्याध्यापक 

 

                                                                                   स्वाक्षरी व शिक्का

 

    

 

मुख्याध्यापक कार्यालयामध्ये कोण कोणते रजिस्टर असणे आवश्यक आहे त्यांचा आपण क्रमानुसार आढावा घेणार आहोत.


1) जनरल रजिस्टर-1 हे शाळेचे अतिशय महत्त्वाचे व मूळ रेकॉर्ड आहे. अर्थात तो आपल्या शाळेचा आत्मा आहे. यात नोंदविलेली माहिती सर्व ठिकाणी ग्राह्य धरली जाते. शाळेत प्रवेश घेतल्यापासून तों विद्यार्थी दाखला घेऊन जाईपर्यंत सर्व नोंदी असतात जनरल रजिस्टरमध्ये झालेल्या नोंदीत शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांच्या लेखी परवानगीशिवाय बदल करू नये. एखादी चूक किंवा खाडाखोड झाल्यास मुख्याध्यापकाने स्वाक्षरी करून ती दुरुस्त करून घ्यावी.

 

2)विद्यार्थी हजेरी नमुना- विद्यार्थी हजेरी पत्रकात विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती त्यामध्ये रजिस्टर नंबर विद्यार्थ्याचे नाव,आईचे नाव, जन्मतारीख, जात, प्रवेश दिनांक,लिहिलेले असते विद्यार्थी हजेरी पूर्ण झाल्यानंतर महिनाअखेरीस विद्यार्थी उपस्थितीची टक्केवारी काढावी रजिस्टरमध्ये असणार्‍या सर्व नोंदी आपण पूर्ण करायच्या आहेत.

 

3) शिक्षक हजेरी नमुना नं-3 शिक्षकाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद या पत्रकात घेतली जाते. सदर पत्रकात शिक्षकांनी उपस्थित झाल्याची नोंद नोंदवून निळ्या किंवा काळ्या पेनने स्वाक्षरी करावी दुपार सत्रात दुपारी स्वाक्षरी करावी. उपस्थिती पत्रकामध्ये रजा व सुट्याच्या नोंदीव्यतिरिक्त लाल शाईचा वापर करण्यात येऊ नये सर्व नोंदी महिनाअखेरीस पूर्ण कराव्यात

 

4) डेड स्टॉक रजिस्टर नमुना नं-यामध्ये टेबल,खुर्च्या,टीव्ही,संगणक इत्यादीची माहिती नोंद यामध्ये करावयाची आहे.

रजिस्टरमधून एखादा नग आपण कमी केला तर हुजूर हुकूम नंबर व तारीख ज्यावेळेस आपण काही साहित्य निर्लेखित करत असतो त्या वेळेस आपण ती माहिती संबंधित कार्यालयाकडे पाठवतो व ती मंजुरी मिळतेत्यावेळेस ती तारीख त्या ठिकाणी लिहायची असते.

 

5) पुस्तके नकाशे व तक्ते रजिस्टर नं-5 नमुना नंबर चारमध्ये लागू असलेल्या सूचना येथेही लागू आहेत.मासिक पुस्तकाचे सर्व हक्क मिळून एक पुस्तक समजावे यावर्षाखेरीस त्याची नोंद करायची रजिस्टरमधून केल्यास हुजूर हुकूम नंबर तारीख व शेरा

 

6) स्थावर मालमत्ता रजिस्टर-शालेय संपत्ती विषयक हे अतिशय महत्त्वाचे रजिस्टर आहे. यामध्ये शाळेची इमारत जागेचा दस्ताऐवज याची नोंद या रजिस्टरमध्ये केली जाते.शाळेची जागा नमुना नंबर-(अ) खोल्या संख्या किचन शेड शालेय शौचालय इत्यादी स्थावर मालमत्तेची नोंद यात घेण्यात यावी.

 

7)शालेय माहिती संगणकीकरण प्रपत्र-बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावी अंमलबजावणी करण्या करता जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली यूडायस प्रपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. इ 1 ली ते 8 वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमांच्या व अभ्यासक्रमांच्या शाळांची माहिती संकलित करून ती माहिती गटशिक्षण अधिकारी कार्यालयात माहितीचे संगणकीकरण करून पाठविली जाते. मुख्याध्यापकांनी U-DISE पत्रकात दिलेल्या शाळेचा तपशील विद्यार्थ्यांची संख्या,अनुदान,भौतिक सुविधांची माहिती शैक्षणिक साधने, फर्निचर इत्यादीची माहिती प्राथमिक शिक्षण नियोजनात जिल्हा परिषद पत्रकाकरिता  महत्त्वाची आहे.

 

⏹  विकास आराखडा हां एक अभिलेखाचा प्रकार आहे. यामध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक उपक्रम, विविध योजनांची माहिती इत्यादीचा समावेश यात होतो. आपली शाळा समृद्ध होण्याच्या दृष्टीने ह्या आराखड्याचा उपयोग आपल्याला करून घेता येतो शालेय व्यवस्थापन समितीच्या विशेष बैठकीतद्वारे चर्चेद्वारे सदर आराखडा तयार करावयाचा असतो.या आराखड्यावर ती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांची स्वाक्षरी असणे महत्त्वाचे आहे.

 

8) नेमणूक बदली आदेश फाईल-यामध्ये शाळेत नव्याने नियुक्त झालेले शिक्षक किंवा शाळेतून बदली घेऊन गेलेले शिक्षक यांचे सर्व आदेश त्यांचा रूजू रिपोर्ट कार्यमुक्तीचा अहवाल ह्या फाइलमध्ये आपल्याला लावायचा आहे.

 

9) आवक-जावक रजिस्टर-

आवक बारनिशी-शालेय स्तरावर आलेल्या पत्रांच्या नोंदी आवक रजिस्टरमध्ये घेतल्या जातात.

 

 जावक बारनिशी-वरिष्ठ कार्यालयात व इतरत्र पाठविल्या जाणार्‍या पत्राची नोंद यात घेतली जाते. यांची नोंद करताना त्यांना क्रमांक दिनांक दिला जावा शाळेच्या नावाने आलेल्या बंद टपाल मुख्याध्यापकां व्यतिरिक्त कोणीही उघडू नये. आवक रजिस्टरमध्ये अनुक्रम नंबर दिनांक आवकाचा अनुक्रमांक नंबर ज्यांच्याकडून पेपर आले.  त्यांचे नाव त्याचा पत्ता आलेल्या पेपर मधील नंबर व दिनांक नमूद करावा.

 

10)  हालचाल रजिस्टर -हालचाल रजिस्टर शालेय वेळेत फक्त शाळेचा महत्त्वाच्या कामांसाठी किंवा शासकीय कामासाठी शाळे बाहेर जाताना हालचाल रजिस्टरमध्ये जाणार्‍याचे नाव दिनांक वेळ ठिकाण कामाचा तपशील इत्यादी ची नोंद करूनच शाळेबाहेर जावे. शाळेत परत आल्याचीसुद्धा नोंद करावी.

 

11) किरकोळ रजा व दीर्घ रजा नोंद वही- दीर्घ रजेच्या नोंदी वेळच्या वेळी पूर्ण कराव्यात त्याचा अहवाल तात्काळ वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात याव्या शैक्षणिक सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या दीर्घ रजेचा गोषवारा वरिष्ठ कार्यालयाला सादर करावा.

 

12) शेरेबुक अभिप्राय नोंदपुस्तिका-हे खूप महत्त्वाचे आहे अधिकारी व पदाधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या भेटीच्या संदर्भात अभिप्रायाचा नोंदी यात घेतल्या जातात अधिकारी व पदाधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र भेट रजिस्टर ठेवण्यात यावे. अभिप्रायाबाबत देण्यात आलेल्या सूचनाबाबत केलेल्या कार्यवाहीची नोंद त्यांची पूर्तता अहवालामध्ये घेण्यात यावी.

 

13) मुख्याध्यापक लॉगबुक-शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करून त्यासंबंधीचे अभिप्राय तसेच वर्गाच्या कामासंबंधी महत्त्वपूर्ण सुचना व मार्गदर्शन यांच्या नोंदी यामध्ये केलेल्या असतात. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान दोन शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करावे महिनाअखेरपर्यंत दोन शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करावे.

 

14)शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर- शैक्षणिक सत्रात दरवर्षी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याबाबतच्या नोंदी या रजिस्टरमध्ये ठेवले जातात

सर्व विद्यार्थ्यांच्या तपासणीबाबत इयत्ता निहाय वैयक्तिक कार्ड शाळेमध्ये ठेवली जातात. वैद्यकीय अधिकारी त्यांच्या सूचना या रजिस्टरमध्ये नोंदवतात. याप्रमाणे मुख्याध्यापकांनी कार्यवाही करावी.

 

15) शाळा व्यवस्थापन समिती रजिस्टर- शालेय व्यवस्थापन समितीच्या दरमहा घ्यावयाच्या सभांचे सविस्तर इतिवृत्त या रजिस्टरमध्ये नोंद ठेवली जाते.इतिवृत्त संपल्यानंतर शेवटी अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य, सचिव यांनी स्वाक्षऱ्या करून ते इतिवृत्त बंद करावे.

 

16) सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर- शिष्यवृत्ती प्राप्त दिनांक, वाटप दिनांक, यासारख्या महत्त्वाच्या नोंदी सदर रजिस्टरमध्ये घेण्यात याव्यात. 

 

17)शालेय पोषण आहार योजना-यामध्ये रजिस्टर इयत्ता-1 ते 56 ते 8 मधील नोंदी अचूक कराव्यात. शालेय पोषण आहाराचे मानधन वाटप फाईल्स स्वतंत्र करावी.या संदर्भात सर्व फाईल्सवर रजिस्टर आपल्या दप्तरी असाव्यात.

 

18)गणवेश वाटप रजिस्टर- यामध्ये विद्यार्थ्याचे नाव इयत्ता, जात, गणवेशचा प्रकार उदा-शर्ट,पॅन्ट एका गणवेशाची किंमत, प्राप्त रक्कम, खर्च,गणवेश मिळाल्याबद्दल स्वाक्षरी किंवा शेरा इत्यादी नोंदी घेण्यात याव्या.

 

19)पाठ्य पुस्तक वाटप रजिस्टर-अनुक्रम नंबर विद्यार्थ्याचे नाव पाठ्यपुस्तक विषयवार त्याचे वाटप, प्राप्त दिनांक,वाटपाचा दिनांक, विद्यार्थी पालक सही शेरा इत्यादी नोंदी घ्याव्यात.

 

20) विद्यार्थी लाभाच्या योजना वाटप रजिस्टर- 

लेखन साहित्य वाटप

उपस्थिती भत्ता वाटप 

अल्पसंख्यांक प्रोत्साहन भत्ता वाटप 

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटप रेजिस्टर इ  

गुणवत्ता शिष्यवृत्ती वाटप 

अस्वच्छ काम करणारा कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती 

अपंग शिष्यवृत्ती व इतर प्राप्त शिष्यवृत्त्या 

 

याकरिता प्रत्येक योजनांचे वाटप रजिस्टर ठेवायचे आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वस्तू वाटप झाल्यानंतर शेवटी गोषवारा तयार करून मुख्याध्यापकांनी सही करायची आहे.

 

21) शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर-शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी घेतलेल्या प्रशिक्षणांची  सविस्तर नोंद या मध्ये घ्यावयाची आहे. योग्य त्या प्रशिक्षणाची नोंद सेवापुस्तकामध्ये करावयाची आहे.

 

22) पटनोंदणी सर्वेक्षण रजिस्टर-सर्व शाळास्तरांवर दाखल पात्र विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्याकरीता गावस्तरावर सर्वेक्षण रजिस्टर तयार केले जाते. त्यामध्ये संपूर्ण गावातील लोकसंख्येची गणना करून स्त्री -पुरुष, साक्षर निरक्षर, जातसंवर्ग, व प्रवेशपात्र विद्यार्थी सर्वेक्षण रजिस्टरमध्ये नोंद करावी तसेच 6 ते 14 वयोगटातील शाळेत जाणारे व शाळाबाह्य विद्यार्थी यांचा गोषवारा काढण्यात यावा साधारण हे सर्वेक्षण डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात पूर्ण करावे. पुढील शैक्षणिक वर्षातील 1 जुलै रोजीचे वय निश्चित करून प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा गोषवारा काढावा व त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा.

 

 

23|)पालकभेट रजिस्टर-शाळेचे विद्यार्थी सलग 5 दिवसांपेक्षा गैरहजर असेल अशा विद्यार्थ्यांच्या शाळेतून नाव कमी न करता त्यांच्या पालकांना शिक्षकांनी भेटून  गैरहजरबाबतचे कारण यामध्ये नोंदवावे.नोंदवून झाल्यानंतर विद्यार्थ्याला नियमित शाळेत पाठविण्याबाबत सूचना करावयाची आहे.

 

24)गोपनीय अहवालात नोंद पोच रजिस्टर- शासकीय अधिकारी व  कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे बाबत शासन निर्णय क्रमांक CFR1210/प्र.क्र 46/2010 13 मंत्रालय मुंबई 400032 दि.1 नोव्हेंबर 2011 नुसार शैक्षणिक सत्र 2011-12 पासून शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल भरून संस्करण अधिकारी यांची स्वाक्षरीनंतर प्रत्येक कर्मचारी एक प्रत झेरॉक्स देने प्रतिवेदन अधिकारी यांचे कार्यालय ते रजिस्टर ठेवण्यात यावे  (30 जून पर्यंत )

 

25)शिक्षक सहविचार सभा-शालेय मंत्रिमंडळ सभा नोंदवही यामध्ये शालेय नियोजन शाळेतील विविध उपक्रमविषयक माहिती तसेच इतर विषय आपण या रजिस्टरमध्ये नोंदवावेत त्यांच्या सविस्तर नोंदी यामध्ये घेण्यात याव्यात सभेमध्ये झालेल्या चर्चेची सविस्तर नोंद यामध्ये घेतात.

 

26) माता पालक संघ- पालक शिक्षक संघ -सभा इतिवृत्त नोंदवही यामध्ये शालेय नियोजन व उपक्रम विषयाच्या नोंदी यामध्ये घेतात सभेमध्ये चर्चा झालेल्या विषयाच्या सविस्तर नोंदी घेतल्या जातात.

 

27)तंबाखूमुक्त शाळा रजिस्टर- 1 ते 11 निकषसंदर्भातील सविस्तर माहिती व फोटो यात असावेत.


28)ग्रंथालय पुस्तक देवघेव रजिस्टर- अ.क्र नंबर,विद्यार्थ्याचे नाव, इयता, पुस्तकाचे नाव, पुस्तक दिल्याचा दिनांक, पुस्तक मिळाल्याबद्दल सही,   पुस्तक घेतल्याबद्दल शिक्षकाची सही, व दिनांक यात नमूद करावी.


29)शैक्षणिक साहित्य देव घेव रजिस्टर-दैनंदिन अध्यापन करत असताना वापरात आणलेल्या शैक्षणिक साहित्याच्या नोंदी ठेवाव्यात.


30)इतर महत्त्वाचे रजिस्टर

· शैक्षणिक साहित्य नोंद रजिस्टर

· शैक्षणिक साहित्य देव घेव रजिस्टर

· परिपाठ सहशालेय उपक्रम रजिस्टर

· परिपाठ सहशालेय उपक्रम रजिस्टर, आकाशवाणी दूरदर्शन, आधुनिक तंत्राबाबत कार्यक्रम रजिस्टर

· ग्रंथालय नोंदवही

·शाळेला मिळालेल्या पारितोषिकांचे नोंद रजिस्टर

· प्रकरणीका नोंदवही विभागीय चौकशी लोकायुक्त प्रकरण इत्यादि

· न्यायालयीन पत्रव्यवहार नोंदवही

· पगारपत्रक फाईल

· आयकर विवरणपत्र व्यवसायकर फाईल

· शासकीय आदेश/ परिपत्रक फाईल

· वार्षिक तपासणी/ शाळा तपासणी अहवाल फाईल

· शिक्षक मुख्याध्यापक संचिका

 

 

विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे

 

•  जनरल रजिस्टर

पालकांचे प्रतिज्ञापत्र लेख रजिस्टर

विद्यार्थी हजारी

•  शाळा सोडल्याचे दाखले फाईल

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

•  उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर (पहिली ते चौथी)

अल्पसंख्यांक विद्यार्थी पालकांचा प्रोत्साहन भत्ता- (पाचवी ते सातवी)

•  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही

•  विद्यार्थी प्रगतीपत्रक

संचयी नोंदपत्रक (इ.1ते8)

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फाइल (1 ते 10 वी)

आदिवासी सुवर्णजयंती शिष्यवृत्ती (1 ते 10 वी)

•  आदिवासी विद्यावेतन वाटप रजिस्टर

गुणवत्ता शिष्यवृत्ती वाटप

•  सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटप

•  स्वच्छ कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती वाटप पहिली ते 10 वी

•  मुक्त गणवेश लेखन साहित्य वाटप रजिस्टर

•  पाठ्यपुस्तक स्वाध्याय पुस्तिका वाटप रजिस्टर

•  सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना रजिस्टर

•  शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्या पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी विद्यार्थी

विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर व शोध पत्रिका

अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

•  अहिल्यादेवी होळकर बस प्रवास योजना

विद्यार्थी उपस्थिती दैनिक गोषवारा रजिस्टर

अल्पसंख्यांक विद्यार्थी पटसंख्या रजिस्टर

शालेय मंत्रिमंडळ सभा नोंदवही

विद्यार्थी प्रगतीपत्रक

•  जिजामाता मोफत सायकल वाटप रजिस्टर आठवी ते 10 वी

 

मुख्याध्यापक व शिक्षकसंदर्भातील अभिलेख

•  शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजेरी

शैक्षणिक साहित्य नोंद रजिस्टर

•  ग्रंथालय पुस्तके देवघेव रजिस्टर

•  मुख्याध्यापक लॉगबुक

•  सूचना वही

•  शैक्षणिक साहित्य देव घेव रजिस्टर

•  शिक्षक रजा फाईल

शिक्षक व वैयक्तिक माहिती फाईल

शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर

•  पालकभेट रजिस्टर

•  आकाशवाणी दूरदर्शन आधुनिक तंत्राबाबत कार्यक्रम रजिस्टर

•  ग्रंथालय नोंदवही

•  लेट मस्टर नोंद वही

सेवापुस्तिका

गोपनीय अहवाल

•  खेळाच्या साहित्याची नोंद वही

•  माझी समृद्ध शाळा नोंद रजिस्टर

शाळेला मिळालेल्या पारितोषिकांचे नोंद रजिस्टर

•  शाळेला मिळालेल्या पारितोषिकांचे नोंद रजिस्टर

•  नियत कालिक वितरण पत्रकारची नोंदवही

•  नेमणूक बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्ती रुजू अहवाल रजिस्टर

•  प्रकरणीका नोंदवही विभागीय चौकशी लोकायुक्त प्रकरण इ.

•  न्यायालयीन पत्रव्यवहार नोंदवही

•  न्यायालयीन पत्रव्यवहार नोंदवही

•  भविष्य निर्वाह निधी नोंद रजिस्टर

आयकर विवरण व्यवसाय कर फाईल माहिती

•  माहिती अधिकारबाबत नोंद रजिस्टर आवक जावक रजिस्टर

शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त रजिस्टर

•  माता पालक संघ इतिवृत्त रजिस्टर

•  शिक्षक पालक संघ इतिवृत्त रजिस्टर

•  पदभार चार्ज देवाणघेवाण रजिस्टर चार रिस्टर

•  शाळा विकास आराखडा फाईल

•  जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली युडायस प्रपत्र

•  शासकीय आदेश परिपत्रक फाईल

अभिप्राय शेरे बुक अधिकारी-अ

•  अभिप्राय शेरेबुक पदाधिकारी-ब

•  हालचाल रजिस्टर शिक्षक मुख्याध्यापक कर्मचारी

•  वार्षिक तपासणी शाळा/तपासणी अहवाल फाईल

•  मासिकवार फाइल

•  शालेय पोषण आहारसंदर्भातील सर्व वह्या

•  शिक्षक मुख्याध्यापक संचिका

•  शिक्षक सहविचार सभा रजिस्टर

तंबाखूमुक्त शाळा रजिस्टर फाईल



आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा



Now it is mandatory to pass 5th 8th annual exam

 

पाचवी, आठवी वार्षिक परीक्षा पास न झाल्यास पुढच्या वर्गात मिळणार नाही प्रवेश ! If you do not pass the fifth and eighth annual examination, you will not get admission to the next class!



Now it is mandatory to pass 5th 8th annual exam

आता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षा पास होणे बंधनकारक असणार आहे का ते जाणून घेऊया .

नमस्कार मित्रांनो माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ताची शैक्षणिक मोठी बातमी म्हणजेच  पास न झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही पुढच्या वर्गात प्रवेश.  शिक्षण हक्क कायद्यानुसार आतापर्यंत पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याची मुभा होती. परंतु नवीन शैक्षणिक कायद्यानुसार काही बदल करण्यात आलेले दिसून आले ते बदल नेमके कोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो राज्यात शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा करण्यात आली असून शालेय शिक्षणात पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आलेली आहे तसेच पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास नंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागाचे प्राधान सचिव रणजीत सिंग देवल यांनी यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध केलेले आहे शिक्षणा हक्क कायदा 2011 तील तरतुदीनुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यमापन करण्यात येते त्यात आता पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय सुद्धा या राजपत्रानुसार पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वयाने रूप वर्गात प्रवेश दिला जाईल मात्र सहावी ते आठवी वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.

 

 

Now it is mandatory to pass 5th 8th annual exam


■ नेमकी कोणती सुधारणा केलेली आहे?

शिक्षण हक्क कायद्याच्या सुधारणेनुसार विद्यार्थी पाचवी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्याला पाचवीच्या वर्गात प्रवेश दिला जाईल.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून एस सी ई आर टी पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार असल्याचे या सुधारणेमध्ये सांगितले जाते.

 

■ विद्यार्थी पास न झाल्यास पुढे काय?

एखादा विद्यार्थी जर परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्या विद्यार्थ्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात येईल दरम्यान वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यात त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल.

मात्र संबंधित विद्यार्थी पुनर्पित ही अनुत्तीर्ण झाल्यास त्यात त्याला पुन्हा पाचवी किंवा आठवीच्या वर्गात ठेवले जाईल प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही असे या नवीन शिक्षण हक्क कायद्यात सांगितले आहे.



आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा




Best Courses after Graduation


Best Courses after Graduation

Best Courses after Graduation 

ग्रॅजुएशन नंतर करण्यासाठी उत्तम असे कोर्सेस जाणून घ्या .

    नमस्कार मित्रानो ,माझ्या ब्लोग मध्ये तुमचा मनापासून स्वागत आहे.मित्रानो, आजकाल शिक्षणाचा सर्वत्र प्रसार होत असल्यामुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या दृष्टीने अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदवी (ग्रेजुएशन) प्राप्त केल्यानंतर कोणते कोर्स करावे ज्याने करून भविष्यात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

ग्रेजुएशन नंतर आपण जर व्यावसायिक कोर्स केले तर त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला जरी शासकीय किंवा खासगी क्षेत्रात नोकरी नाही लागली तरी आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो. स्वतःचा व्यवसाय करून आपण चांगली कमाई करू शकतो

 

ग्रॅजुएशन नंतर करण्यासाठी उत्तम असे कोर्सेस  Courses after Graduation


कोर्सस का वर्गीकरण – Types of Courses after Graduation

* ट्रेडिंग कोर्सस (Trending Courses)

* व्यावसायिक कोर्सस (Vocational courses)


Trending Courses.(ट्रेडिंग कोर्सस )

आजकाल जे कोर्स नोकरीची हमी देतात आणि त्यात वेतन सुद्धा चांगले मिळते अशा कोर्सला शिक्षणक्षेत्रात भरपूर मागणी असते आणि त्यांना ट्रेडिंग कोर्स असे म्हणतात. पदवी प्राप्त केल्या नंतर आपण जर हे कोर्स केले तर आपल्याला नक्कीच नौकरीच्या जास्त संधी उपलब्ध राहतील. चला तर मग अश्या काही ट्रेडिंग कोर्सची आपण माहिती करून घेऊ या.

 

 Post Graduate Diploma in Software Engineering_(पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनीरिंग )

Post Graduate Diploma in Software Engineering

* कोर्ससाठी पात्रता: कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी

* कोर्सची पातळी: पोस्ट ग्रॅजुएशन डिप्लोमा/ सर्टिफिकेट

* कोर्सचा कालावधी: १ वर्ष

संगणकाचे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी लागणारे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये तयार करणे हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. संगणकाचे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी लागणाऱ्या programming language या अभ्यासक्रमात शिकवले जातात. हा कोर्स पूर्ण केल्या नंतर तुम्हाला IT क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

 

या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपण पदवीधर असणे आवश्यक आहे.

टैली (Tally)

Tally

* कोर्सचा कालावधी: ३ महिने

लहान पातळीवर कार्यरत राहणारी कंपनी आणि खासगी कार्यालय जिथे SAP सॉफ्टवेअरची गरज पण नसते आणि त्या कंपनीत किंवा कार्यालयात SAP सारखा महागडा सॉफ्टवेअर घेण्याची आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचे आर्थिक सामर्थ्य पण नसते. अशा कार्यालयात टैली सॉफ्टवेअर मध्ये पारंगत असणाऱ्या विद्यार्थांची विशेष गरज असते.

हा कोर्स शिकण्यासाठी खूप कमी खर्च येते. या मध्ये तुम्हाला अकाउंटिंग, बिलींग, पे रोल, बँकिंग, कर इत्यादी विषय शिकवले जातात. ज्या विद्यार्थ्यानी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे त्याला हा कोर्स करणे खूप लाभ कारक आहे.


 Digital Marketing(डिजिटल मार्केटिंग)

Digital Marketing


आजकाळ प्रत्येक वस्तू इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी- विक्री केली जाते. ऑनलाईन खरेदी-विक्री केलेल्या मालाची माहिती सर्व लोकांपर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून पोहचवणे यालाच डिजिटल मार्केटिंग म्हणतात. प्रत्येक इ-कॉमर्स कंपनी आपल्या मालाचे मार्केटिंग इंटरनेटच्या माध्यमातून करते.

पदवी प्राप्त केल्या नंतर जर आपण डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला तर आपल्याला सर्च इंजिन ऑटोमायझेशन सारखे कौशल्य शिकायला मिळते आणि हा कौशल्य शिकल्यावर आपल्याला नामांकित कंपनी मध्ये डिजिटल मार्केटिंग एक्सझिकिटिव्ह या पदावर नोकरी मिळण्याची चांगली संधी उपलब्ध आहे

आपल्या समाज मध्ये आपण विविध संस्कृती, समाजी आणि पारिवारिक कार्यक्रम आपण पाहतो आणि ते हर्ष आणि उत्साहाने मानवले जातात. लग्न किंवा वाढदिवसाचे कार्यक्रमाचे आयोगाने करायचे असेल. तर विविध इव्हेंट मॅनॅजमेण्ट कंपनी या कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करण्यासाठी उपलब्ध आहेत.

जर आपण पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन ईव्हेन्ट मॅनेजमेंट अँड ऍक्टिव्हशन हा कोर्स केला तर आपल्याला या कंपनीन मध्ये सहज नौकरी मिळू शकते. या कोर्स मध्ये तुम्हाला कार्यक्रमाची सजावट कशी करावी, बसण्याची व्यवस्था आणि फुलांची सजावट हे सर्व शिकवले जाते.

 

२. Vocational Course (व्यावसायिक कोर्स )

Vocational Course


व्यावसायिक कोर्सस या हेतू ने तयार केले जातात की हे कोर्स पूर्ण केल्या नंतर विद्यार्थी एखाद्या मोठ्या व्यावसायिकी क्षेत्रात नोकरी करू शकतो किंवा स्वतःच व्यवसाय टाकू शकतो. अश्याच काही महत्वपूर्ण व्यावसायिक कोर्सची आपण खाली माहिती घेणार आहोत.


Certificate In Graphic Design And Web Designing(सर्टिफिकेट इन ग्राफिक डिजाईन अँड वेब डिजाईनिंग)

Certificate In Graphic Design And Web Designing


* कोर्स साठी पात्रता: बी. टेक (आय.टी/ सी.एस .ई)/एम . सी .ए /कोणत्या पण शाखेतून ग्रॅजुएट

* वय: किमान वय २० वर्ष असणे अनिवार्य आहे.

हा व्यवसायिक कोर्स फार महत्वाचा आहे. हे युग इंटरनेटचे युग आहे इंटरनेट आणि संकेतस्थळ हे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. इंटरनेटच्या माध्यमाने कोंतीपण माहिती आपण सहज मिळवू शकतो.

आपल्याला जर वेब डिजाईन येत असेल तर आपल्याला सहज चांगल्या वेतनाची नौकरी एखाद्या खासगी क्षेत्रात सहज मिळू शकते. आपल्याला जरी नौकरी नाही मिळाली तर आपण स्वतःची साईट तयार करू शकतो आणि त्यावर उपयुक्त माहिती अपलोड करून आपण चांगला पैस कमाऊ शकतो.

 

Certificate Course In Logistics And Supply Chain Management (सर्टिफिकेट कोर्स इन लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मैनेजमेंट)

Certificate Course In Logistics And Supply Chain Management


कोर्स साठी पात्रता: कोणत्या ही शाखेची पदवी

वय: किमान २० वर्ष

आधुनिक जगात प्रत्येक गाव प्रत्येक शहर हे रस्त्यानी एकमेकाशी जोडले गेले आहे. कच्च्या मालाचा पुरवठा गवांकडून शहराकडे आणि पक्या मालाचा पुरवठा शहराकडून गाव कडे होताना आपल्याला दिसतो. पण या परिवहनाच्या व्यवस्थापन कोण करते आणि कशे करते.

मालाच्या परिवहनाच्या व्यवस्थापन काही खासगी कंपनी करतात. परिवहनाच्या व्यवस्थापनाला लॉजिस्टिक आणि सप्लाय चैन मानजमेंट म्हणतात. आपल्याला जर या क्षेत्रात नौकरी करायची असेल तर आपण सर्टिफिकेट कोर्स इन लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मैनेजमेंट हा कोर्स केलाच पाहिजे.

 

 Mobile Apps Development(मोबाईल ऍप्स डेवलपमेंट)

Mobile Apps Development

आज काल प्रत्येक व्यक्ती जवळ स्मार्ट फोन असते आणि त्यामध्ये भरपूर APP पण असतात. जर तुम्ही मोबाइल अँप डेव्हलोपमेंटचा कोर्स केला. तर अँप डेव्हलोपमेंट कंपनी मध्ये आपल्याला चांगल्या वेतनाची नौकरी मिळू शकते. भविष्यात या क्षेत्रात असंखय नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. म्हणून हा कोर्स एक उपयुक्त व्यावसायिक कोर्स म्हणून ओळखला जातो.

 

❓ग्रॅजुएशन नंतर करण्यात येणाऱ्या कोर्स बद्दल विचारल्या जाणारे प्रश्न – Quiz Question about Courses after Graduation
 

१. ग्रेजुएशन नंतर कमी कालावधी असणारे कोणते कोर्स उलब्ध आहेत?

उत्तर: पोस्ट ग्रेज्यूएशन डिप्लोमा इन मैनेजमेंट, टैली, डिजिटल मार्केटिंग, डाटा विज्युलायजेशन इत्यादी.

 

२. आज काळ कोणता कोर्ससची लोकप्रियता जास्त आहे.?

उत्तर: सॉफ्टवेयर डेवलपमेंट, प्रोजेक्ट मैनेजमेंट, आय.टी सर्विस मैनेजमेंट, प्रोग्रामिंग, डाटा एनालिटिक्स अँड डाटा साइंस, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग इत्यादी कोर्सस.


 . ग्रेजुएशन नंतर कमी कालावधी असणारे कोणते कोर्स उलब्ध आहेत?

उत्तर: पोस्ट ग्रेज्यूएशन डिप्लोमा इन मैनेजमेंटटैलीडिजिटल मार्केटिंगडाटा विज्युलायजेशन इत्यादी.

 

*रोजगाराच्या दृष्टीने कोणते कोर्सस जास्त महत्वपूर्ण आहे?

उत्तर: प्रोडक्ट मैनेजमेंट सर्टिफिकेशन प्रोग्राम, बिजनेस एनालिटिक्स सर्टिफिकेशन प्रोग्राम,फुल स्टैक डेवलपमेंट, पोस्ट ग्रेजुएशन इन डाटा साइंस, डिजिटल मार्केटिंग, सर्टिफिकेट कोर्स इन लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मैनेजमेंट इत्यादी कोर्सस रोजगाराच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

 

 महिन्याच्या कालावधी साठी कोणते सर्टिफिकेट कोर्सस उपलब्ध आहेत.

उत्तर: मेडिकल बिलिंग अँड कोडींग स्पेशालीस्ट, वेब डिजाईनर, एच.व्ही.ए.सी टेक्नीशियन, आय.टी सपोर्ट, ट्रक ड्राईव्हर, पर्सनल ट्रेनर हे सर्व सर्टिफिकेट कोर्सस ३ महिन्याच्या कालावधी साठी उपलब्ध आहेत.




Best Courses after Graduation

आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा



Government employees will get 26 public holidays in the new year.

  नवीन वर्षात मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना 26 सार्वजनिक सुट्ट्या.... 2025 साली महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना 26 सार्वजन...