Fiverr

Monday, August 7, 2023

Sore eyes meaning2023: डोळे येणे' म्‍हणजे काय ? आणि त्‍यावरील उपाय


sore eyes meaning: डोळे येणे' म्‍हणजे काय ? आणि त्‍यावरील उपाय

Sore eyes meaning: डोळे येणे' म्‍हणजे काय

आणि त्‍यावरील उपाय

नमस्कार मित्रानो,गेल्या काही दिवसापासून  तुम्ही एकलाच असाल कि डोळे लाल(Sore eyes flu) किंवा Burning eyes flu च्या  बातम्या नक्कीच वाचला असाल हा आजार नेमका काय आहे आणि तो कसा होतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.   

सध्‍या अनेक भागांमध्‍ये डोळे eyes flu येण्‍याच्‍या साथीने डोके वर काढले आहे. त्‍याचा संसर्ग झपाट्याने होत आहे. सर्व वयोगटांतील व्‍यक्‍ती प्रामुख्‍याने मुले या आजाराने त्रस्‍त आहेत. 'डोळे येणे' म्‍हणजे नक्‍की काय ?what is sore eyes flu

Sore eyes flu

ते कशामुळे होते ? त्‍याची लक्षणे कोणती ? त्‍यासाठी कोणती उपाययोजना करता येते ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आज आपण करून घेऊया आणि आजारासंबंधी सगळे सजग होऊया.

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

१.  What is Sore eyes flu? डोळे येणे म्‍हणजे 

काय ?

डोळे येणे, हा एक डोळ्‍यांचा संसर्गजन्‍य आजार आहे. यामध्‍ये डोळ्‍यातून चिकट स्राव येऊन डोळे लाल होतात.

 

२. शास्‍त्रीय भाषेमध्‍ये या आजाराला काय म्‍हणतात ?

या आजाराला 'कन्‍जक्‍टिवायटिस' (conjunctivitis) किंवा 'रेड आईज्' (red eyes) अथवा 'सोर आईज्' (sore eyes) असे म्‍हणतात. हा आजार सामान्‍यतः 'बॅक्‍टेरियल' (जीवाणू) किंवा 'व्‍हायरल' (संसर्ग) असतो; पण सध्‍या साथीच्‍या स्‍वरूपातील हा आजार 'व्‍हायरल' स्‍वरूपाचा आहे, जो 'अ‍ॅडेनोव्‍हायरस' (Adenovirus) या विषाणूमुळे होतो.

३. Which  is sore eyes symptoms या 

आजाराची लक्षणे कोणती ?


sore eyes meaning: डोळे येणे' म्‍हणजे काय ? आणि त्‍यावरील उपाय


सर्वप्रथम डोळा लाल होऊन डोळ्‍यातून चिकट स्‍वरूपाचे पाणी येते. त्‍यानंतर पापण्‍यांना सूज येऊन पापण्‍या विशेषतः सकाळी एकमेकांना चिकटतात. एकूणच डोळ्‍यांमध्‍ये अस्‍वस्‍थता निर्माण होते. स्राव अधिक असल्‍यास क्‍वचित् प्रसंगी भुरकट

दिसू शकते.

४. Which  is sore eyes other symptoms या 

आजाराची इतर लक्षणे कोणती ?

या विषाणूमुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, क्‍वचित् प्रसंगी ताप येऊ शकतो.

५. हा आजार कशामुळे पसरतो ?

sore eyes meaning: डोळे येणे' म्‍हणजे काय ? आणि त्‍यावरील उपाय
हा आजार संसर्गजन्‍य असल्‍यामुळे पटापट एका व्‍यक्‍तीकडून दुसर्‍या व्‍यक्‍तीकडे पसरतो. डोळे आलेल्‍या व्‍यक्‍तीने स्‍वतःच्‍या डोळ्‍यांना स्‍पर्श करून, तसेच त्‍या हाताने दुसर्‍या वस्‍तूंना स्‍पर्श केला असता आणि दुसर्‍या व्‍यक्‍तीने त्‍या वस्‍तूला स्‍पर्श करून तसाच हात डोळ्‍यांना लावल्‍यास हा आजार त्‍या दुसर्‍या व्‍यक्‍तीस होतो. उदाहरणार्थ डोळे आलेल्‍या व्‍यक्‍तीचा रुमाल, पेन, टॉवेल, चमचा, गॉगल्‍स इत्‍यादी वस्‍तू वापरल्‍यास हा आजार बळावतो.

६. डोळे आलेल्‍या रुग्‍णांनी कोणती काळजी घ्‍यावी ?

1. डोळे आल्‍याचे लक्षात आल्‍यास सर्वप्रथम शक्‍य झाल्‍यास स्‍वतः वेगळे रहावे (आयसोलेट करावे).

2. डोळ्‍यांना स्‍पर्श करू नये आणि डोळे चोळू नयेत.

3. डोळे पुसण्‍यासाठी 'टिश्‍यू पेपर'चा वापर करावा.

4. वैद्यकीय सल्‍ल्‍यानेच उपचार चालू करावेत. स्‍वतः मनाने औषधांच्‍या दुकानांमधून कोणतेही 'ड्रॉप' विकत घेऊन ते घालू नयेत.उ. हलका ताजा आहार घ्‍यावा.

5. वारंवार हात धुवत रहाणे.

6. आपल्‍या वस्‍तू दुसर्‍यांना देऊ नका.

7. लहान मुलांमध्‍ये या आजाराचे प्रमाण अधिक असल्‍याने डोळे आलेल्‍या मुलांना शाळेत पाठवू नये.

8. वाटीत गरम पाणी घेऊन त्‍यात कापसाचा बोळा भिजवून त्‍याने डोळ्‍यांच्‍या पापण्‍यांना बाहेरून हलकासा शेक द्यावा.औ. प्रखर प्रकाशापासून संरक्षण होण्‍यासाठी काळा गॉगल वापरावा.

७. डोळा येऊ नये म्‍हणून निरोगी व्‍यक्‍तीने कोणती 

काळजी घ्‍यावी ?

डोळ्‍यांना उगीचच हात लावू नये किंवा डोळे चोळू नये. आजारी माणसाच्‍या संपर्कात आल्‍यास ठराविक अंतराने हात धुवावेत किंवा सॅनिटायझरचा यथायोग्‍य वापर करावा. बाधित व्‍यक्‍तीच्‍या वस्‍तू वापरू नये.

८. हा आजार कितपत गंभीर आहे ?

sore eyes meaning: डोळे येणे' म्‍हणजे काय ? आणि त्‍यावरील उपाय


हा आजार बिलकुल गंभीर नाही; परंतु योग्‍य काळजी न घेतल्‍यास किंवा दुर्लक्ष केल्‍यास, तसेच औषध उपचार न केल्‍यास या आजाराचे उपद्रव निर्माण होतात आणि मग हा आजार गंभीर स्‍वरूपात निर्माण होतो. यथायोग्‍य उपचार घेतल्‍यास हा आजार साधारणतः ३ ते ७ दिवसांमध्‍ये पूर्ण बरा होतो.

या प्रकारे योग्‍य काळजी घेतल्‍यास डोळ्‍यांच्‍या या समस्‍येवर आपण मात करू शकतो. वैद्यकीय सल्‍ल्‍याने पोटातून ठराविक आयुर्वेदाची औषधे घेतल्‍यास हा आजार बरे होण्‍यास साहाय्‍य होते.


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.


 माहिती आवडल्यास नक्की शेअर करा ➡️➡️➡️➡️➡️


Saturday, August 5, 2023

OnePlus Smartphons offers2023 :स्वस्तात करा खरेदी शेवटची संधी आहे.



OnePlus Smartphons offers :स्वस्तात करा खरेदी  शेवटची संधी आहे.


OnePlus Smartphons offers स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी ! Amazon वरून आजच खरेदी करा.

  मित्रानो , तुम्हाला  सांगणार आहे  तुम्हाला स्मार्ट फोन घ्यायचे  असेल तर Amazon वर तेत्या काही दिवसाकरिता सेल असणार आहे .आणि या सेल मध्ये तुम्हाला oneplus स्मार्ट फोन स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी चालून आलेली आहे वेळ न लावता या संधीचा लाभ घ्या .

या सेलदरम्यान, वनप्लस या प्रीमियम टेक ब्रँडचे स्मार्टफोन अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत

आणि ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत सर्वोत्तम OnePlus फोन खरेदी करण्याची संधी मिळेल. प्राइम मेंबर्ससाठी आजपासून सेल सुरू होत असताना, उद्या, 4 ऑगस्टपासून सवलत आणि ऑफर उर्वरित लोकांसाठी उघडतील. सेल दरम्यान तुम्ही हे OnePlus स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता.

OnePlus Nord CE 2 Lite 5G

OnePlus Smartphons स्वस्तात करा खरेदी  शेवटची संधी आहे.

तुम्हाला सर्वात कमी किमतीत OnePlus स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही या पॉवरफुल नॉर्ड मॉडेलचा वापर करावा. OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये 5000mAh बॅटरी आणि Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आहे. हा मोबाईल 17,999 रुपयांऐवजी 16,499 रुपयांत उपलब्ध आहे.

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

OnePlus 11 5G

OnePlus Smartphons स्वस्तात करा खरेदी  शेवटची संधी आहे.
Amazon सेल दरम्यान OnePlus फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर बँक ऑफर्ससह विशेष सूट मिळत आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो आणि ग्राहक तो 56,999 रुपयांऐवजी 54,999 रुपयांना खरेदी करू शकतात.

OnePlus Nord CE 3 5G

OnePlus Smartphons स्वस्तात करा खरेदी  शेवटची संधी आहे.

तुम्ही हा फोन शक्तिशाली 50MP कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसरसह 25,000 रुपयांच्या खाली असलेल्या सेगमेंटमध्ये सवलतीत खरेदी करू शकता. बँक ऑफरसह, हा फोन 26,999 रुपयांऐवजी 24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करण्याची संधी दिली जात आहे.

OnePlus Nord CE 3 Lite 5G

OnePlus Smartphons स्वस्तात करा खरेदी  शेवटची संधी आहे

कंपनीने नुकताच हा स्मार्टफोन 108MP कॅमेरा सह बजेट किंमतीत सादर केला आहे. 67W SuperVOOC चार्जिंगसह येणाऱ्या या फोनची किंमत 19,999 रुपयांपासून सुरू होते परंतु तो 18,999 रुपयांच्या किंमतीवर उपलब्ध आहे.

OnePlus Nord 3 5G

OnePlus Smartphons स्वस्तात करा खरेदी  शेवटची संधी आहे.

हा मोबाईल OnePlus डिव्हाइस फ्लॅगशिप-ग्रेड IMX890 कॅमेरा सेन्सर आणि MediaTek Dimensity 9000 प्रोसेसरसह येते. कंपनीने या फोनची किंमत 33,999 रुपये ठेवली आहे, परंतु ग्राहकांना Amazon सेलमध्ये 32,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

OnePlus 11R 5G

OnePlus Smartphons स्वस्तात करा खरेदी  शेवटची संधी आहे.


शक्तिशाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसरसह येणाऱ्या या फोनची रचना फ्लॅगशिप मॉडेलसारखीच आहे परंतु किमतीच्या दृष्टीने स्वस्त आहे. सेलमध्ये 39,999 रुपयांऐवजी 38,999 रुपयांच्या प्रभावी किमतीत 120Hz फ्लुइड डिस्प्ले स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे.


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.


 माहिती आवडल्यास शेअर करा ➡️➡️➡️➡️


Thursday, August 3, 2023

Secret Study Tips : मुलांना अभ्यासाची गोडी लावायचं असेल तर करा हे ६ सोपे उपाय


secret study tips


Study tips : मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे ६ सोपे उपाय


तुमची मुले यामुळे होतील हुशार, मन लावून करतील अभ्यास..

नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या या ब्लॉगमध्येvisual learner study tips  तसेच आपल्या मुलांना अभ्यासाची गोडी  कश्या पद्धतीने आपण लावू शकतो त्याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत.  यामध्ये  मी तुम्हाला  secret study tips, Study tipsसांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही आपल्या मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करू शकाल.
पालकांची आपल्या पाल्याबद्दल काही खास तक्रार नसते. फक्त एकच तक्रार असते, ती म्हणजे आमचा मुलगा/मुलगी वेळेवर अभ्यास करत नाही. ही तक्रार प्रत्येक आई - वडील करत असतात. मुलं फार चंचल मनाची असतात. काही मुलं न सांगता अभ्यासाला बसतात, तर काहींच्या मागे लगावं लागतं. मुलांचे अभ्यासात मन न लागणे यामागे अनेक कारणे असू शकतात.
सध्याची मुलं मोबाईल, गेम्स, इंटरनेट या सगळ्यात व्यस्त झाले आहेत. अशावेळी प्रत्येक आईवडिलांना एकच प्रश्न सतावत असतो, की आपल्या मुलाला अभ्यासाची गोडी कशी लावावी? यासंदर्भात, गेटवे ऑफ हीलिंग सायकोथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चांदनी तुगनाईत यांनी मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी, याबाबतीत काही टिप्स शेअर केले आहेत(6 effective ways to help your child learn faster).

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

संतुलित आहार

secret study tips
मुलांच्या आहारात काही बदल करून आपण त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करू शकतो. मानसिक विकासाच्या कमतरतेमुळे देखील मुलांचे लक्ष अभ्यासात लागू शकत नाही. त्यामुळे आहारतज्ज्ञांची मदत घेऊन मुलांना खास संतुलित आहार द्या.

मुलांचा ताण कमी करा

Secret Study Tips



मुलांच्या जीवनात अभ्यास, मित्र, किंवा खेळ इत्यादींबाबत तणाव असू शकतो. आपल्यासाठी हा ताण खूपच लहान असला तरी, त्यांच्यासाठी मोठा असू शकतो. त्यामुळे ते जर चिंतीत असतील, तर त्यांचा ताण समजू घ्या, व त्यांचे लक्ष दुसरीकडे केंद्रित करायला मदत करा.

मुलांना मारू नका


मुलाने अभ्यासात काही चूक केली असेल तर, त्याला ओरडू किंवा मारू नका. त्यांना त्यांची चूक समजावून सांगा. मुलांना सतत मारलं तर, त्यांच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो.मुलांनी जरी चूक केली असेल तंत्रात समजूत काढून योग्य ते मार्गदर्शन करा . चांगले आणि वाईट गोष्टी ची माहिती करून देणे हे पालकाचे परम कर्त्यव्य आहे 

मुलांची झोप पूर्ण होते की नाही पाहा


Secret Study Tips
अनेकदा मुलांची झोप पूर्ण होत नसल्यामुळे त्यांची चिडचिड होते. त्याचं अभ्यासात मन लागत नाही. ज्यामुळे ते अभ्यास करताना टाळाटाळ करतात.हे मुख्य कारण बनू शकतो त्यामुळे मुलांना ८ ते १० तासांची झोप मिळायला हवी. शाळा - क्लास यात मुलं गुंतून जातात, त्यामुळे शरीरालाही आराम हवाच. शिवाय झोप पूर्ण झाल्यामुळे त्यांचा अभ्यासातला रस आणखी वाढू शकतो.


मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा 


Secret Study Tips

मुलांशी संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. काही वेळेला मुलं त्यांच्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी इतरांसोबत शेअर करत नाहीत. ज्यामुळे त्यांना स्ट्रेस येतो. अशा स्थितीत त्यांच्यासोबत नियमित चर्चा करा, संवाद साधा. यामुळे ते आपल्याला नियमित सगळ्या गोष्टी न घाबरता शेअर करतील.

टाईम टेबल तयार करा



Secret Study Tips
मुलांना वेळेचं महत्व पटवून द्या, त्यांना अभ्यासात मदत करा. यासह दिनचर्य तयार करा, व हे दिनचर्य एका टाईम टेबलवर लिहून ठेवा. मुलं हे टाईम टेबल रोज फॉलो करतील याची खात्री करा. यामुळे त्यांना शिस्तही लागेल. व वेळेवर अभ्यासही पूर्ण करतील. 


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

माहिती आवडल्यास नक्की शेयर करा 🠞







Monday, July 31, 2023

Navin shaikshanik Dhoran:शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न

 

Navin shaikshanik Dhoran

Navin shaikshanik Dhoran: शैक्षणिक धोरणाचे भवितव्य शिक्षकांच्या हाती!

मित्रानो मी आजच्या ब्लॉग मध्ये मी आपणास प्रत्येक ठिकाणी कार्यदक्ष आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनी बद्दल आहे .सध्या शिक्षकांकडून गुणवत्तेची हमी आवश्यक आहे, परंतु शैक्षणिक कामात शिक्षक गुंतुन पडला आहे. सोबतच शिक्षकांना इतर २५० प्रकारची अशैक्षणिक कामे करावीच लागतात. याचा परिणाम गुणवत्ता वाढीवर दिसून येतो. 

शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न  

शिक्षकांना अशा अशैक्षणिक कामांपासून मुक्त करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. आपल्या देशातील ३३ कोटी विद्यार्थ्यांसाठी आखलेले हे नवीन शैक्षणिक धोरण आपल्या देशाला विकसित देशांच्या पंगतीमध्ये घेऊन जाऊ शकेल याची आशा करायला काय हरकत आहे. 

डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी सर्वंकष चर्चा करून हे नवीन शैक्षणिक धोरण प्रारूपात सादर केले. शिक्षण सहज मिळावे, प्रत्येक घटकाची जबाबदारी, आर्थिक भार झेपेल असे शिक्षण, समान शिक्षण, दर्जेदार शिक्षण या पाच स्तंभांवर भविष्यातील शैक्षणिक वाटचाल दिसत आहे. या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येकाला शिक्षण उपलब्ध करून देणे हेच दिसते. देश कोणताही असो उत्तम दर्जाचे मनुष्यबळ हे तिथल्या शाळांमध्ये तयार होते. याचमुळे देशाचे भवितव्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची वाटते. 

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

शिक्षक शिक्षण जगताचा आधारस्तंभ

Navin shaikshanik Dhoran
इयत्तानुरूप अभ्यासक्रमातील अपेक्षित क्षमता मुलांनी प्राप्त करता आल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांची गळती थांबली पाहिजे, पुस्तकी ज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडता आला पाहिजे, जीवनमूल्ये अवगत करता आली पाहिजेत, बौद्धिक, मानसिक क्षमता विकसित करता आल्या पाहिजेत अशी अनेक आव्हाने आजच्या शिक्षण धोरणात आहेत. आजचा शिक्षक हाच शिक्षण व्यवस्थेतील आधारस्तंभ आहे त्याच्या बळावर सकारात्मक शैक्षणिक परिवर्तन करणे हे एक आव्हान आहे. त्या दृष्टीने शिक्षकांबाबत विविध शिफारशी धोरणात करण्यात आलेल्या दिसतात. २०३० पर्यंत हे धोरण पूर्णपणे अमंलात येईल असे वाटते. 

या  नवीन शैक्षणिक धोरणाने आता देशातील शिक्षकांपुढेही अधिक सक्षमपणे स्वतःचे भवितव्य घडविण्याची संधी चालून आलेली आहे. त्यासाठी गरज आहे शिक्षकांनी उत्साहाने प्रयोगशील होऊन स्वतःला विकसित करण्याची, वर्गातील भावी पिढीशी आपले नाते जोडण्याची आणि त्यांचे शिकणे अधिक आनंददायी व अर्थपूर्ण करण्याची आवश्यकता आहे. आपल्या मुलांनी नाव चमकवले तर सर्वात जास्त आनंद त्याच्या पालकांना होतो तसाच तो शिक्षकांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. कारण मुलांना घडवण्यात शिक्षकाचा वाटा मोलाचा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याविषयी तळमळ, त्याला शिकवलेलेउपयोगात आणता यायला हवे ही जबाबदारी, तसेच त्याला सुसंस्कृत माणूस म्हणून घडवण्याची जबाबदारी शिक्षकांमध्ये आपोआपच निर्माण होते जाते.

शिक्षकांच्या हाती आहे तरुणांचे भवितव्य

Navin shaikshanik Dhoran

शिक्षकांवर अनेक पिढ्या घडविण्याची जबाबदारी पूर्वीपासून आहे. देशाच्या तरुणांचे भवितव्य तोच घडवित असतो. शिक्षकांच्या हाती देश सक्षमपणे उभा करण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे यासाठी शिक्षकाने स्वत: शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतरांना शिकवणारा सतत शिकत राहायला हवा. शिक्षकांनी आयुष्याच्या अंतापर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगायला हवे. त्यांनी आपल्यातील शिकण्याची इच्छा थांबवता कामा नये. शाळेचा दर्जा हा शिक्षकांच्या दर्जावर अवलंबून असतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. शिक्षण विषयक कोणतीही योजना असो त्याच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो ती शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत नाही म्हणून शिक्षणाशी संबंधित सर्व विषयावर त्याचे सखोल चिंतन चालू असणे महत्त्वपूर्ण आहे.

त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण करायला हवे. आपल्या दैनंदिन अध्यापनात त्याचा वापर करता आला पाहिजे. आज शिक्षक ही केवळ व्यक्ती राहिली नसून संस्काराचे एक आगार झाले आहे. विदयार्थ्यांमधील एक संवेदनशील नागरिक घडविणे व त्या नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व मनुष्य निर्माणाचे कार्य करणे हे शिक्षकाचे उत्तरदायित्त्व सृजनाचा साधक म्हणून महत्त्वाचे आहे. शिक्षकाने मनापासून अध्यापन करावे ही समाजाची कायमची अपेक्षा आहे. स्वत:च्या विषयात पारंगतता प्राप्त करून अध्यापन कला अवगत करून सदैव पुढे चालत राहावे हे महत्त्वाचे झाले आहे. 

शिक्षकाने आपले ज्ञान अद्ययावत करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शिक्षकाला विद्यार्थ्यांबद्दल सदैव आत्मियता, प्रेम असावे. शिक्षक हा नवनिर्मितीचा निर्माता आहे. न्याय, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकशाही जीवनपध्दती या समोर ठेवून शिक्षकांने स्वतःला विकसित करावे. विद्यार्थ्यांवर आपले विचार न लादता विद्यार्थ्यांच्या मताचा आदर करावा. त्याला प्रकटीकरणाची संधी द्यावी. शिक्षकाने केवळ मार्गदर्शन करावे. विज्ञान युगातीलनवनवीन आव्हानांना सामोरे जाण्याइतके सक्षम बनविणारे शिक्षण शिक्षकाने विद्यार्थ्यांना द्यावे. शिक्षकाने स्वत: क्रियाशील, उपक्रमशील असावे. विद्यार्थ्याला क्रियाशील राहण्याची प्रेरणा द्यावी. शिक्षकाने धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद याचा विचार न करता सर्वांना समान शिक्षण द्यावे. शिक्षकाने विद्यार्थ्यांतील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव शोधण्याची सवय विद्यार्थ्यांना लावून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा. 


शिक्षकांची भूमिका 

Navin shaikshanik Dhoran
नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षकाची गुरू म्हणून भूमिका नक्कीच बदलणार आहे. तसेही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकाचा सिंहाचा वाटा असतो, मी अभ्यासक्रम पूर्ण केला, माझे पेपर्स तपासून झाले, आम्ही निकाल वेळेवर लावला, असे छातीठोकपणे सांगितले की, कर्तव्य संपले! असे करून थांबता येणार नाही. आपल्या शिकवण्यातून विद्यार्थी जीवनात यशस्वी कितपात होतो हे समजून घेणे आवश्यक आहे. दहा वाजता ववर्गात गेले अन् अकरापर्यंत एक तासाची अव्याहत बडबड करून बाहेर आले, याला 'शिकवणे' म्हणता येईलच असे नाही. तसेच, तीन तासांची त्याच त्या साचेबद्ध प्रश्नांची पत्रिका, त्या प्रश्नांची तीच ती ठोकळेबाज उत्तरे अन् ८०-९० टक्केवारी देणारी गुणांची उधळण यालाही 'परीक्षा' किंवा 'मूल्यमापन' म्हणत येईल ? नव्या शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रम, तो शिकविण्याची पद्धत, विद्यार्थ्यांचे सातत्याने मूल्यमापन करण्याची पद्धत, क्रेडिट्सवर आधारित ग्रेडिंगची पद्धत, 'थिअरी' ऐवजी 'प्रॅक्टिकल्स'वर भर, कौशल्य विकासाला महत्त्व, आंतरशाखीय शिक्षणाचे स्वतंत्र असे अनेक महत्त्वपूर्ण चांगले बदल आहेत.


 Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.


विद्यार्थ्याला काय शिकायचे, किती अन् कसे शिकायचे, किती वेळात शिकायचे, याचे स्वातंत्र्य त्याला आहे. विषयनिवडीचेस्वातंत्र्य त्याला आहे. आता शिकवण्यावर कमी, तर शिकण्यावर जास्त भर आहे. उत्तम शिक्षक म्हणजे जो कमीत कमी शिकवतो तो उत्तम शिक्षक!! शिक्षकाने शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्याची भूमिका मार्गदर्शकाची, मेंटरची. रस्त्यावरून, खाचखळगे शोधत ज्याचे त्यानेच चालले पाहिजे. गुंतागुंतीची प्रमेये, संकल्पना पुस्तकातही आहेत.

त्यात नव्याने शिक्षक काय भर घालणार? महत्त्व आहे त्या प्रमेयामागची, संकल्पनेमागची भूमिका, तिचे प्रत्यक्ष व्यवहारातले महत्त्व, दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग हे समजावणे, कृतीने पटवून देणे जास्त महत्त्वाचे! विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला उद्युक्त केले पाहिजे. त्यांनी जे आहे, जसे आहे ते तसेच स्वीकारण्यापेक्षा शंका उपस्थित केल्या पाहिजेत. ठोकळेबाज उत्तरांपेक्षा आगळ्या-वेगळ्या नावीन्यपूर्ण उत्तरांचा शोध घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभासारखी मदत करणे ही शिक्षकांची, प्राध्यापकांचीबदलती भूमिका राहणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त अभ्यास, जास्त तयारी शिक्षकांना करावी लागेल. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स', 'नॅनो', 'बायो', 'इन्फो टेक' असे नवे तंत्रज्ञान येत्या दोन-तीन दशकांत नवक्रांती घडविणार आहे. या नव्या जगातील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नागरिक तयार करणे हे शिक्षक, प्राध्यापकांपुढील खरे आव्हान आहे.

सध्या शिक्षकांना उच्च आदर आणि उच्च स्थान पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्वोत्तम व्यक्ती शिक्षकी व्यवसायात प्रवेश करण्यासाठी प्रेरित होतील. विद्यार्थ्यांच्या आणि राष्ट्राच्या सर्वोत्तम भविष्यासाठी शिक्षकांना प्रेरणा आणि अधिकार प्रदान करण्याची गरज आहे.

भरती आणि नियुक्तीप्रकार  :

उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारावा यासाठी ४ वर्षीय गुणवत्तापूर्ण एकात्मिक शिक्षणशास्त्र पदवी (इ.एव.) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात गुणवत्ताधारित शिष्यवृत्ती निर्माण करण्यात येतील. ज्याद्वारे शिक्षणशास्त्र पदवी (इ.एव.) अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर स्थानिक भागात नेमणूक करण्याची तरतूद असेल. अशाप्रकारची शिष्यवृत्ती स्थानिक विद्यार्थी (विशेषत: मुली)यांच्या साठी स्थानिक नोकरीच्या संधी निर्माण करतील जेणेकरून, हे विद्यार्थी स्थानिक भागातील भाषा बोलणारे आदर्श व उच्च शिक्षित शिक्षक म्हणून काम करतील.

शिक्षकांच्या वांरवार होणार्‍या त्रासदायक बदल्यांची पद्धत बंद करण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे आदर्श शिक्षक आणि शैक्षणिक वातावरण यामध्ये सातत्य मिळेल. राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील शासनाद्वारे योग्यपणे घालून दिलेल्या संरचित पद्धतीनुसार अगदी विशेष परिस्थितीत बदल्या होतील. शिवाय, पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी बदली एका ऑनलाईन संगणकीकृत प्रणालीद्वारे करण्यात येईल. नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षकांना समाजातील अत्यंत आदरणीय आणि आवश्यक घटक म्हणून सर्व स्तरांवर पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करण्यामध्ये मदत झाली पाहिजे. शिक्षकांना सक्षम करण्याचे कार्य शक्य तितक्या प्रभावीपणे करण्यास त्यांना मदत करणे यासाठी आवश्यक सर्व बाबी धोरणात अपेक्षित आहे.


नवनवीन अभ्यासक्रमाचा समावेश :

यूजीसीनं देशातील सर्व विद्यापीठं आणि शिक्षण संस्थांना सांगितलं आहे की, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयकेएस (इंडियन नॉलेज सिस्टिम) अभ्यासक्रम घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. हा अभ्यासक्रम अनिवार्य क्रेडिटच्या किमान पाच टक्के असेल. यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांत असं नमूद केलं आहे की, जे विद्यार्थी मेडिसीनमधील यूजी प्रोग्रॅम्समध्ये नावनोंदणी करतील ते पहिल्या वर्षी भारतीय वैद्यक पद्धतीचा क्रेडिट कोर्स घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीची मूलभूत माहिती मिळेल.

भारतीय संस्कृतीतील मूलभूत साहित्याचा यामध्ये समावेश केला होऊ शकतो. या साहित्यात वैदिक कॉर्पस, रामायण, महाभारत आणि त्यांच्या महत्त्वाच्या प्रादेशिक आवृत्त्या, पुराणं, वेद यांचा अभ्यास असेल. भारतीय तत्त्वज्ञानाचे मूलभूत ग्रंथ, जैन आणि बौद्ध, भारतीय धार्मिक संप्रदायांचे मूलभूत ग्रंथ, वैदिक काळापासून वेगवेगळ्या प्रदेशातील भक्ती परंपरांपर्यंतचं सर्व साहित्य विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिलंजाणार आहे. शिक्षण, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प या सहा वेदांगांसह आयुर्वेद, स्थापत्य, नाट्यशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी सारख्या भारतीय ज्ञान प्रणालींचा इतर प्रवाहांतील विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागेल.


 Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.


कला शिक्षणाचा उपयोग :

तक्षशिला आणि नालंदासारख्या विद्यापीठांपासून आपल्याकडे बहुविद्याशाखीय अध्ययनाची भारताची प्रदीर्घ परंपरा आहे. बाणभट्टांच्या कादंबरीसारख्या प्राचीन भारतीय साहित्यिक कृतीत चांगले शिक्षण म्हणजे ६४ कलांचे ज्ञान असे वर्णन केले आहे. गणित, विज्ञान, व्यवसाय विषय, व्यावसायिक विषयआणि मृदू कौशल्यांचा समावेश असलेल्या सर्जनशील मानवी प्रयत्नांच्या शाखा ह्या 'कला' मानल्या पाहिजेत, ह्या कल्पनेचा उगमचभारतात झाला आहे. मनुष्याच्या बौद्धिक, सौंदर्यदृष्टी विषयक, सामाजिक, शारीरिक, भावनिक आणि नैतिक या सर्व क्षमतांचा एकात्मिक विकास करणे हा सर्वांगीण आणि बहुविद्याशाखीय शिक्षणाचा उद्देश आहे. 

अशा शिक्षणामुळे कला, मानव्यविद्या, भाषा, विज्ञान, सामाजिकशास्त्रे आणि व्यावसायिक, तांत्रिक आणि व्यवसाय क्षेत्रे, सामाजिक बांधिलकीचे नीतिनियम; संवाद, चर्चा आणि वादविवाद यांसारखी मृदू कौशल्ये आणि निवडलेल्या एक किंवा अनेक क्षेत्रातील विशेषज्ञता ह्या प्रकारच्या २१ व्या शतकाच्या क्षमता असणार्‍या व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यास मदत होईल. व्यापक दृष्टीने पाहता, व्यावसायिक,तांत्रिक आणि व्यवसाय विषयांमधील सर्व स्नातक शिक्षणक्रमांचा दृष्टीकोन अशा प्रकारचे सर्वांगीण शिक्षण देणे हाच असेल. 

उच्च शिक्षण संस्थांच्या यशातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तेथील अध्यापकांची गुणवत्ता आणि बांधिलकी होय. उच्च शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये अध्यापकांचे महत्व लक्षात घेऊन, गेल्या अनेक वर्षांत भरती व कारकीर्द (करिअरची) प्रगती व्यवस्थित करण्यासाठी आणि प्राध्यापक भरतीसाठी विविध गटांकडून योग्य प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी विविध उपक्रम राबविले गेले आहेत. सार्वजनिक संस्थांमध्ये कायमस्वरुपी अध्यापकांच्या वेतन व भत्त्यांच्या पातळीतही भरीव वाढ केली आहे. 

अध्यापकांना व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दिशेनेही विविध उपक्रम घेण्यात आले आहेत. तथापि, शैक्षणिक व्यवसायाच्या स्थितीत या प्रकारच्या अनेक सुधारणा करूनही, शिक्षण, संशोधन आणि उच्च शिक्षणसंस्थेतील सेवेच्या दृष्टीने अध्यापकांमधील प्रेरणा अपेक्षित स्तरापेक्षा खूपच कमी आहे. प्रत्येक अध्यापक आनंदी, उत्साही, व्यग्र आणि त्याच्या किंवा तिच्या विद्यार्थी, संस्था आणि व्यवसायाची प्रगती करण्यासाठी प्रवृत्त आहे याची खात्री करण्यासाठी प्राध्यापकांच्या कमी प्रेरणा पातळीमागे असलेल्या विविध कारणांकडे लक्ष दिले पाहिजे.



 माहिती आवडल्यास नक्की शेअर करा ➡️


Oath Ceremony at Wankhede Stadium on Monday 25th

  25 तारखेला सोमवारी वानखेडे स्टेडियमला शपथविधी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हॅट्रिक केली आहे. भाजपला पुन्हा...