मराठी भाषेला 'मराठी' हे नाव कस पडलं?
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फक्त 1 दिवस बाकी
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी नामांकित यादीत नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी 'मतदाता सेवा पोर्टल' आणि 'वोटर हेल्पलाइन अॅप' द्वारे नमुना अर्ज क्र. 6 सादर करावा. मतदार यादीत नाव तपासण्यासाठी electoralsearch.eci.gov.in ला भेट द्यावी. आवश्यक माहिती भरल्यानंतर 'कॅप्चा' कोड टाकल्यास संबंधित यादी उघडेल. EPIC क्रमांकाद्वारे देखील नाव तपासता येईल.
लॉरेन्स बिश्नोई विधानसभा निवडणूक लढविणार ??
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष पं. सुनील शुक्ला यांनी साबरमती तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्याची घोषणा केली आहे. शुक्ला यांनी बिश्नोईला पत्राद्वारे निवडणूक लढवण्याचे आमंत्रण दिले आहे. बिश्नोई टोळीने राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती, ज्यामुळे खळबळ उडाली होती. लॉरेन्स बिश्नोई विरोधात 36 गुन्हेगारी खटले दाखल असून, त्याच्या टोळीचे नेटवर्क हरियाणा, पंजाब, दिल्ली, आणि राजस्थानमध्ये सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील वाहनचालकांसाठी आरटीओ विभागाची नवी सुविधा
राज्यातील वाहनचालकांसाठी आरटीओ विभागाने नवी सुविधा दिली आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांची नोंदणी (जसे की टुरिस्ट टॅक्सी, मालवाहू ऑटोरिक्षा, पिकअप, टेम्पो) करण्यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. आरटीओने वाहन विक्रेत्यांना थेट नोंदणीचे अधिकार दिले आहेत. मात्र, फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी दर दोन वर्षांनी आरटीओ कार्यालयात जाणे अनिवार्य असेल. या प्रक्रियेसाठी नवीन 'वाहन 4.0' संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याआधी विक्रेत्यांना फक्त खासगी कार आणि दुचाकींची नोंदणी करण्याचा अधिकार होता.
आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वाढत्या वापरामुळे चिंताजनक परिस्थिती
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या वाढत्या वापरामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. अनेक तज्ञांनी या तंत्रज्ञानामुळे रोजगार आणि गोपनीयतेवर होणाऱ्या परिणामांची शक्यता व्यक्त केली आहे. युनेस्कोच्या ताज्या अहवालानुसार, AI चा अनियंत्रित वापर शिक्षण क्षेत्रातही समस्यांचे कारण बनू शकते. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच योग्य धोरणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.