महाराष्ट्रात 24 ऑक्टोबरपासून थंडीला सुरुवात
जेष्ठ हवामानतज्ञ पंजाबरावांनी सुधारित हवामान अंदाज दिला आहे. 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून, रात्री आणि सायंकाळी पाऊस पडेल. 23 तारखेपर्यंत पाऊस कायम राहणार असून, त्यानंतर पाऊस माघार घेईल. 24 ऑक्टोबरपासून थंडीला सुरुवात होईल, तर 5 नोव्हेंबरपासून कडाक्याची थंडी जाणवेल. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि पशुधनाची काळजी घ्यावी, तसेच गहू-हरभरा पिकांची पेरणी सुरू करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
सोलापूर: फडणवीसांच्या विश्वासू आमदाराचं तिकीट कटणार?
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघात आता भाजप अलर्ट मोडवर आलाय. माळशिरस मधून अतुल सरतापे यांचे नाव आघाडीवर आहे. महाविकास आघाडीकडून उत्तम जानकर यांची उमेदवारी निश्चित असताना त्यांच्यापुढे आव्हान देण्यासाठी भाजपमध्ये अद्याप उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यासह माळशिरसमधील स्थानिक तसेच अनुसूचित जातीचा चेहरा म्हणून भाजपमधील काही नेत्यांनी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस अतुल सरतापे यांच्या नावाचा आग्रह धरलाय. त्याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केलीय.
सोलापूर: सचिन कल्याणशेट्टी यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर
भारतीय जनता पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचा समावेश आहे. भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांना पुन्हा संधी देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील लोकांना पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकंदरितच भाजपने विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देत नव्याचा विचार केलेला दिसत नाही.
लाडकी बहीण- डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं काय?
लाडकी बहीण योजना सध्या आचारसंहितामुळे तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. म्हणजेच सध्या कोणत्याही महिलेला पैसे मिळणार नाहीत. दरम्यान, महिलांच्या खात्यात आतापर्यंत 7500 जमा झाले आहेत. म्हणजेच नोव्हेंबर पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात आले आहेत. आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? अशी कुजबुज सुरु आहे. मात्र, आचारसंहितामुळे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला आहे. नवीन अर्ज प्रक्रियाही बंद आहे. नवीन सरकार स्थापण झाल्यानंतर डिसेंबरचे पैसे मिळण्याचा अंदाज आहे. 23 नोव्हेंबरला निकाल आहे.
सोलापूर: सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर
पोलीस निरीक्षक कुकडे यांनी स्पष्ट केले की, आचारसंहिताचे काटेकोरपणे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या आचारसंहिताच्या उल्लंघनाबाबत कोणत्याही प्रकारचे कृत्य करणे हे कायद्याच्या दृष्टीने दंडनीय आहे. निवडणुकांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार किंवा गैरकृत्य घडू नये याची दक्षता पोलिस यंत्रणा घेत आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट, जातीय किंवा धार्मिक भावना भडकावणारे मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट न करण्याचे आवाहन केले आहे. याविरुद्धच्या कायदेशीर कारवाईचे कडक संकेत देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरी, 75 जागा
• पदाचे नाव- कनिष्ठ अधिकारी
• एकूण जागा -75
• शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार (PDF पहा)
· नोकरी ठिकाण- मुंबई
· वय- 21 ते 32 वर्षे
· अर्ज पद्धती- ऑनलाईन · अर्जाची शेवटची तारीख- 08 नोव्हेंबर 2024
• अधिकृत वेबसाईट- https://www.mschank.com/
• नोटीफिकेशन- https://mscbank.com
/Documents/Careers/RECRUITMENT%20ADV %20-%2019.10.2024.pdf
सीएनजीच्या दरात प्रति किलो 4-6 रुपयांची वाढ़ ??
सरकारने शहरी विक्रेत्यांना घरगुती नैसर्गिक वायूचा पुरवठा 20% कमी केला आहे. उत्पादन शुल्कात कपात न केल्यास सीएनजीच्या दरात प्रति किलो 4-6 रुपयांची वाढ होऊ शकते. जुन्या शेतांमधून मिळणारा गॅस कमी होत असल्याने, किरकोळ विक्रेत्यांना महाग द्रव नैसर्गिक वायू (एलएनजी) आयात करणे भाग पडले आहे. सध्या सीएनजीवर 14% उत्पादनशुल्क आहे. पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा सुरू असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीएनजीच्या दरात वाढ़ एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा बनला आहे. दिल्ली आणि मुंबईतील बाजारपेठेसाठी याचा मोठा प्रभाव आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 7 जणांची हत्या
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात काल (रविवार) संध्याकाळी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात भारताच्या 7 लोकांची गोळ्या घालून हत्या केली आहे. मृतांमध्ये 2 अधिकारी, 3 मजुर, 1 स्थानिक डॉक्टरचाहीसमावेश आहे. तर, 5 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावरउपजिल्हा रुग्णालय आणि SKIMS श्रीनगरमध्ये दाखल करण्यात आले आहे. बोगद्याचे बांधकाम सुरु असताना हा भ्याड हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांना सोडणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिला आहे.