Fiverr

Saturday, November 9, 2024

News Maharashtra:सोन्याच्या दरात चढउतार

 सोन्याच्या दरात चढउतार



या आठवड्यात सोन्याच्या दरात चढउतार दिसून आले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी किंमत स्थिर होती, मंगळवारी 150 रुपयांनी घट झाली, तर बुधवारी पुन्हा 150 रुपयांनी वाढ़ झाली. 7 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात 180 रुपयांची घसरण झाली होती. आज सकाळच्या सत्रातही किंमती नरम आहेत. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 72,150 रुपये आणि 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 78,710 रुपये आहे.


सोलापूर: मतदान कमी त्या गावावर लक्ष केंद्रित



माळशिरस विधानसभा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये कमी मतदान झालेले आहे, त्या गावातील मतदान केंद्रातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर राहणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाच्या कमी टक्केवारीबाबत प्रत्यक्ष गावभेट देऊन चौकशी केली असता, गावातील काही मतदार परगावी राहत असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही असे निदर्शनास आले.


हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात



विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बड्या नेत्यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींचा विदर्भ दौरा सुरू असून, धुळ्यात त्यांची सभा पार पडली. त्याच वेळी, परभणीतील हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरणार आहेत. पंजाबराव डख यांचा राजकीय एंट्री अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे आणि त्यांचा अंदाज अचूक ठरणार का, हे निवडणुकांच्या निकालावर अवलंबून असेल. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


तुम्हाला माहीत आहे की या पक्षांनी आजपर्यंत इतके मुख्यमंत्री








राजकीय पक्ष त्यांच्या मुख्यमंत्री पद धारण केलेल्या सदस्यांच्या एकूण कालावधीनुसार या प्रमाणे आहेत

1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - एकूण 13 मुख्यमंत्री, कलावादी- 17,576 दिवस

2. शिवसेना - एकूण 4 मुख्यमंत्री, कलावादी - 3,482 दिवस

3. भारतीय जनता पक्ष - एकूण

1 मुख्यमंत्री, कलावादी - 1,871 दिवस

4. भारतीय काँग्रेस (समाजवादी) - 1 मुख्यमंत्री, कलावादी - 579 दिवस

5. शिवसेना - 1 मुख्यमंत्री, कलावशादी - 860 दिवस

6. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अरसू) - 1 मुख्यमंत्री, कलावादी - 135 दिवस 


महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक




1960 साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि दोनच वर्षांमध्ये विधिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवलं आणि आजच्या महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल सुरू झाली. 1946 ते 1952 या कालावधीत मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर निवडले गेले होते. त्यानंतर मोरारजी देसाई यांनी चार वर्षांसाठी हे पद सांभाळले. 1956 ते 1960 या चार वर्षांमध्ये यशवंतराव चव्हाण मुंबईचे मुख्यमंत्री होते आणि 1960 साली नव्या आणि आज अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले.


ट्रम्प यांना मत देणाऱ्या पुरुषांशी महिला लग्न करणार नाहीत



अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प जिंकले आहेत. त्यानंतर आता तिथे वातावरण पेटलं आहे. कारण, अमेरिकन मुलींनी अजब चळवळ चालवण्याची घोषणा केलीय. अमेरिकन मुलींचे म्हणणे आहे की ज्या पुरुषांनी ट्रम्प यांना मतदान केले त्यांच्याशी त्या लग्न करणार नाहीत किंवा त्यांच्या प्रेमातही पडणार नाहीत. ट्रम्प यांना मत देणाऱ्या मुलांशी त्या डेट करणार नाहीत किंवा शारीरिक संबंध ठेवणार नाहीत. किमान पुढील 4 वर्षांसाठी ही घोषणा केलीय. दरम्यान, यापूर्वी ट्रम्प यांच्यावरही बलात्काराचे आरोप झाले आहेत.


"माझी कन्या भाग्यश्री योजना" मुलींना मिळणार पैसे



"माझी कन्या भाग्यश्री योजना" ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची सामाजिक कल्याण योजना आहे, जी मुलींच्या जन्मानंतर त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सुरू केली आहे. या योजने अंतर्गत, मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षण आणि विवाहापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा उद्देश मुलींच्या जीवनमानात सुधारणा आणणे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन देणे आहे. अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पाहा.



Friday, November 8, 2024

News update : विधानसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील इतिहास

 

महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत किती मतदारसंघ होत्या?



भारताचे सध्याचे महाराष्ट्र राज्य 1 में 1960 रोजी अस्तित्वात आले. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या पहिल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची संख्या 264 होती. 33 मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव होते आणि 14 जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव होत्या.


उत्तर महाराष्ट्रात कोण जिंकणार बाजी?




उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांनी मोठा जनाधार मिळवला आहे, तर शरद पवार आणि काँग्रेसचा एक प्रभावी गट आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि छगन भुजबळ यांचा प्रभाव आहे. शरद पवार आणि काँग्रेस समर्थकांची मोठी वटवणूक आहे. उद्धव ठाकरे शिंदे सेनेला कडवी टक्कर देऊ शकतात. मराठा आंदोलनाचा थेट परिणाम भाजपच्या मतदारसंघावर होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात काटेकी लढत होणार असून, शिंदे सेना सोडून अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली दिसत आहे.


महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा



महाराष्ट्र राज्याच्या निर्मिनंतर १९६२ मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एकूण २६४ पैकी २१५ जिंकल्या होत्या. काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाकडे केवळ १५ जागा होत्या. त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला ९, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला ६, रिपब्लिकन पार्टीला ३ आणि समाजवादी पक्षाला १ जागा मिळाली.


सोलापूर शहरउत्तर विधानसभामतदारसंघ: उमेदवार कारकीर्द




विधानसभा निवडणूक 2024 उमेदवार: महेश विष्णुपंत कोठे पक्षः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चिन्ह: तुतारी वाजवणारा माणूस यापूर्वीची राजकीय कारकीर्द गेल्या 30 वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक, सभागृह नेते, महापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समितीचे सभापती अशा विविध पदांवर काम केल्याचा अनुभव. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशा तीन पक्षांचा प्रवास.

यापूर्वी सोलापूर शहर उत्तर व सोलापूर शहर मध्य या दोन मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवली मात्र पराभव पत्करला. 



सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ: उमेदवार कारकीर्द



विधानसभा निवडणूक 2024 उमेदवार: विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख पक्षः भारतीय जनता पार्टी चिन्ह: कमळ

यापूर्वीची राजकीय कारकीर्द

2004 पासून सलग चार वेळा विधानसभेवर विजयी. माजी कामगार मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद सांभाळले. सध्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


सोलापूर दक्षिण मतदार संघ: उमेदवार कारकीर्द



विधानसभा निवडणूक 2024 उमेदवार: सुभाष सुरेशचंद्र देशमुख पक्षः भारतीय जनता पार्टी चिन्ह: कमळ

यापूर्वीची राजकीय कारकीर्द चौदाव्या लोकसभेत सदस्य म्हणून निवड. एकदा माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली, मात्र पराभव पत्करला. यापूर्वी दोन वेळा सोलापूर दक्षिणचे आमदार तसेच पाच वर्षे राज्याचे सहकार मंत्री पद सांभाळले.


भारतीय जनता पक्षाची स्थापना कशी झाली ??



भारतीय जनता पक्षाची (भाजपा) स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या विचारधारेवर आधारित होता. भाजपची स्थापना भाजपच्या पूर्ववर्ती पक्ष, जनता पक्षाच्या धाग्यातून झाली. पक्षाने हिंदू सांस्कृतिक आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यांवर जोर दिला, आणि सामाजिक न्याय, स्वदेशी विकास, आणि आधुनिकतेसाठी प्रयत्न केले. 1980 च्या दशकात भाजपने देशभरात आपला प्रभाव वाढवला, आणि 1990 च्या दशकात तो एक प्रमुख राजकीय शक्ती म्हणून उभा राहिला.




भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना कशी झाली ??



भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत झाली. प्रारंभिक काळात, काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्याची चळवळ चालवली आणि लोकशाहीच्या मूल्यांचे प्रोत्साहन केले. सुरुवातीला, पक्षाने सुधारणा आणि स्वायत्तता यावर लक्ष केंद्रित केले. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1920 च्या दशकात काँग्रेसने असहमतीचा मार्ग स्वीकारला, ज्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीला वेग आला. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, काँग्रेस देशातील प्रमुख राजकीय शक्ती बनली, परंतु वेळोवेळी पक्षात अंतर्गत संघर्ष आणि बदल झाले.



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कशी झाली?



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये शरद पवार, पी.ए. संगमा, आणि तारिक अन्वर यांनी केली. काँग्रेसच्या निर्णयांवर असंतोष आणि संप्रदायिकतेच्या मुद्द्यांवर चिंता असल्याने या नेत्यांनी स्वतंत्रपणे राजकीय पक्षाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वात, NCP ने 1999 च्या लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले. पक्षाने सामाजिक न्याय, शेतकरी हक्क, आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे तो महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा राजकीय पक्ष बनला.

Wednesday, November 6, 2024

Today news update

 

नोकरीची संधी ! आधार ऑपरेटर भरती 2024



भरती विभाग : CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड.

पदाचे नाव : आधार ऑपरेटर / पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण किंवा 10वी + 2 वर्ष ITI किंवा 10वी + 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा. भरती कालावधी : 1 वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी भरती

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : 30 नोव्हेंबर 2024 अर्ज - ऑनलाईन वय : 18 वर्षे पूर्ण अधिक माहितीसाठी - https://drive.google.com /file/d/1ZyH-09jShljUwS6zQvRDBQPz-QXO Ne8/view कमी दाखवा





भाजपचा बंडखोरांना दणका, 40 जणांची हकालपट्टी



महाराष्ट्रात भाजपला अनेक ठिकाणी धक्का बसला आहे. कारण, पक्षाने तिकीट न दिल्यामुळे अनेक दिग्गजांनी बंडखोरी केली आणि अपक्ष अर्ज भरले आहेत. त्यामुळे भाजपने महाराष्ट्रातील 37 विधानसभा मतदारसंघातील आपल्या 40 कार्यकर्ते आणि नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षशिस्त न पाळल्याबद्दल ठपका या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. यात सुवर्णा पाचपुते, गजानन महाले, नागेश घोपे, जगदीश गुप्ता, शंकर मडावी, शोभा बनशेट्टी, सुनील बंडगर, संजय घोगरेंसह 40 जणांची नावे आहेत.




तयार रहा, देशातील सर्वात मोठा SME IPO येतोय



Rosmerta Digital Services चा Rs 206 कोटी IPO 18 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. हा आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा SME IPO असेल. त्याची किंमत ₹ 140- 147/शेअर अशी निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी, डॅनिश पॉवर (₹197.9 कोटी), KP ग्रीन इंजिनिअरिंग (₹189.5 कोटी), आणि सहस्रा इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्स (₹186.16 कोटी) हे सर्वात मोठे SME IPO होते.




हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी दमदार ट्रीक



मोबाईल चोरी झाल्यास अनेकदा तो ट्रॅक होत नाही. त्यावर आज एक उपाय सांगणार आहोत. जर तुमचा मोबाईल चोरी झाला आणि चोराने सिम काढून फेकून दिले; तरी देखील तुमचा मोबाईल ट्रॅक होऊ शकतो. त्यासाठी 'फाइंड माय डिव्हाईस' अॅपद्वारे अँड्रॉइड स्मार्टफोन ट्रॅक करू शकता. तुमच्या स्मार्टफोनवर आधी हे अॅप साइन इन करा. 'तुमचे ऑफलाइन डिव्हाइस शोधा' आणि 'सर्व भागात नेटवर्कसह' निवडा. मोबाईल चोरी झाल्यास, दुसऱ्या फोनवरून तुमच्या गुगल खात्यासह या अॅपमध्ये साइन इन करून चोरी झालेल्या डिव्हाइसचा मागोवा घेतला जाऊ शकतो.


लाडक्या बहिणींना 2100 रुपये, महायुतीच्या मोठ्या घोषणा



महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दहा सूत्री जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्यात महिलांसाठी 2100 रुपये देण्याची घोषणा केली असून, 25,000 महिलांना पोलीस दलात समाविष्ट करण्याचे वचन दिले आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून 15,000 रुपये दरवर्षी देण्याची आश्वासनं दिली आहेत. तसेच वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन आणि 25 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपये दिले जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.


आधार अपडेटसाठी तारीख वाढवली



यूआयडीए आय (UIDAI) च्या माहितीनुसार प्रत्येकाला आधार कार्ड 10 वर्षांनी अपडेट करायचे आहे. त्यामुळे तुमच्या आधारला 10 वर्षे झाली असतील आणि ते अपडेट केलं नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. आधारच्या अधिकृत वेबसाईटवर ते मोफत आहे. बाहेर सायबर कॅफेत केल्यावर त्यासाठी 50-100 रुपये घेतले जाऊ शकतात. शिवाय, याची डेटलाईनही वाढवण्यात आली आहे. यापूर्वी आधार अपडेटची शेवटची मुदत 14 सप्टेंबर 2024 होती. आता ती 14 डिसेंबर 2024 करण्यात आली आहे. त्यानंतर तुम्हाला आधार अपडेटसाठी पैसे मोजावे लागू शकतात.




काइटेक्स गारमेंट्सचा शेअर 5% वाढून 642.15 वर पोहोचला



काइटेक्स गारमेंट्सचा शेअर आज BSE वर 5% वाढून 642.15 वर पोहोचला आहे, जो कंपनीच्या मागणी आणि दुसऱ्या तिमाहीतील नफ्यातील वाढीमुळे झाला आहे. जुलै-सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 39.94 कोटी होता, तो मागील वर्षीच्या ₹ 13.21 कोटींपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गेल्या पाच महिन्यात या शेअरने ₹ 190.60 वरून 237% वाढ केली आहे. कंपनीचा 56.66% हिस्सा असून, सार्वजनिक भागधारकांचा 43.34% हिस्सा आहे.

Tuesday, November 5, 2024

Trending topic solapur

 

बाबो ..! 3 वर्षांत 1 लाखांचे झाले 33 लाख

विस्को ट्रेड असोसिएट्सच्या समभागांनी गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 3260% परतावा दिला आहे. 21 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 3 रुपये होती आणि आजच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात ती 100.80 रुपयांवर वर बंद झाली. म्हणजेच 3 वर्षांपूर्वी कंपनीत केलेली ₹1 लाखाची गुंतवणूक आता ₹33 लाखांपेक्षा जास्त झाली आहे


लाडकी बहीण योजना- डिसेंबरचा हप्ता, तारीख जाहीर 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना गुडन्यूज दिली. 20 तारखेला निवडणूक संपताच डिसेंबरचे पैसे जमा होणार, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली. त्यांची कुर्ल्यात पहिली सभा झाली. तेथे ते बोलत होते. यावेळी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर हल्लाबोल केला. 




दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 च्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर आहे, तर विलंब शुल्कासह अर्ज 30 नोव्हेंबरपर्यंत भरण्यात येतील. विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा प्रमुखांमार्फत 'www.mahahsscboard.in' या संकेतस्थळावर भरायचे आहेत. शाळांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरून 4 डिसेंबरपर्यंत पावतीसह विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे सादर करणे आवश्यक आहे.



भारत WTC फायनलमध्ये पोहोचला नाही तर ...



जर भारत WTC 2023-25 च्या अंतिम फेरीत पोहोचला नाही, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह वरिष्ठ भारतीय खेळाडूंना टप्प्याटप्प्याने संघातून वगळले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या दारुण पराभवानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात चर्चा होऊ शकते.





सोलापूर दक्षिण मधून दिलीप माने यांची माघार



सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले माजी आमदार दिलीप माने यांनी आज निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आता या मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवारअमर पाटील व धर्मराज काडादी यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल असे चित्र आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस होता.






सोलापूर: शहर मध्य मधून 19 उमेदवारांची माघार



आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या 39 पैकी 19 उमेदवारांनी माघार घेतली. अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये शिवसेना सोडून स्वराज्य पक्षात गेलेले मनीष काळजे, काँग्रेसचे माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे आदी उमेदवारांचा समावेश आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र कोठे, फारूक शाब्दी, नरसय्या आडम यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.




निवडणूक अर्ज मागे घेण्याची वेळ संपली



निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे काही बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत, तर काहींनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थितीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांना डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारांच्या या गडबडीमुळे दोन्ही गटांना संभाव्य आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.





सोलापूरः उध्दव -राज एकाच दिवशी सोलापुरात



महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होईल. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी सर्वच पक्षांमधून बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळते. उमेदवारांचा प्रचारार्थ राजकीय नेत्यांच्या तोफाही धडाडणार आहेत. सोलापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोलापुरात एकाच दिवशी येणार असल्याची माहिती समोर येत आहे.





सोलापूर: काँग्रेसचे 50 कार्यकर्ते भाजपमध्ये



सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख हे गाव भेट दौऱ्यावर असून या दौऱ्याअंतर्गत ते पाकणी येथे गेले असता त्यांच्या उपस्थितीत 50 हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये सोनुपत येलगुंडे, सूर्यकांत येलगुंडे, विश्वनाथ येलगुंडे, संजय सुरवसकर, राजेंद्र सुरवसकर, बालाजी शिंदे, बालाजी येलगुंडे, केशव सुरवसकर, केशव पारेकर, बापू खांडेकर, विजय खांडेकर, अजित सुरवसकर, कृष्णा साठे, राहुल शिंदे, निलेश येलगुंडे, ज्ञानेश्वर सुरवसकर आदींचा समावेश आहे.




सोलापूर: 11 मतदारसंघातून 184 उमेदवार निवडणूक लढविणार



सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत 334 उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरले होते. दिनांक 4 नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत 150 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून 184 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. तरी जिल्हयातील सर्व मतदारांनी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानामध्ये आपला सहभाग नोंदविण्यायचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.




महाराष्ट्र राज्य महिला बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती



महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 विविध जागांसाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहे. पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेतील पदवीधारक. वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट). अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी

विभागाची अधिकृत वेबसाइट पाहा. https://cdn.digialm .com/EForms/configuredHtml/32726/88956 /Index.html, https://drive.google.com/file/d /18Avvqe3qQageUtiQmkCSpwT7oDh4irEV /view






Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...