Fiverr

Monday, November 11, 2024

Today topics :A history of elections in Maharashtra

 मतदान महत्वाचे का आहे?



लोकशाही समाजात मतदान हा मूलभूत अधिकार आहे, हे नागरिकांना त्यांच्या देशाचे आणि समुदायाचे भविष्य घडवून, निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यास अनुमती देते. मतदानाद्वारे, जनता निवडून आलेल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरू शकतात, धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात आणि त्यांचा आवाज ऐकला जाईल' याची खात्री करू शकतात. शिवाय, मतदान लोकशाही प्रक्रियेची वैधता आणि अखंडता टिकवून ठेवण्यास मदत करते, सत्तेचे केंद्रीकरण रोखते आणि प्रतिनिधित्व आणि समानतेला प्रोत्साहन देते. मतदानाचा हक्क बजावणे हे नागरी कर्तव्य आहे आणि मुक्त आणि न्याय्य समाजात जगण्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे.


मतदानाचा इतिहास: प्राचीन काळातील मतदान



मतदानाचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू होतो तो असा - प्राचीन ग्रीस: मतदानाची सुरुवात प्राचीन ग्रीसमध्ये झाली, विशेषतः अथेन्समध्ये. इथे नागरिकांची सभा (अगोरा) होती, ज्यामध्ये नागरिक त्यांच्या प्रतिनिधींची निवड करीत. मात्र, या प्रक्रियेतील मतदान फक्त पुरुष नागरिकांपर्यंत मर्यादित होते. रोमन साम्राज्य: रोमन साम्राज्यात, मतदानाची प्रक्रिया अधिक जटिल झाली. येथे नागरिकांना त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जात होत्या. मात्र, त्यामुळे देखील सर्व व्यक्तींना मतदानाचा हक्क नव्हता.


मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य व हक्क..



येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करून मी माझे राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहे. तुम्ही सर्वांनीही आवर्जून मतदान करा. कारण मतदान करणे हा आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि हक्क आहे. तो आपण बजावलाच पाहिजे, असे आवाहन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. निडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे.



भारतातील सर्वाधिक शिकलेला नेता आहे "एक मराठी माणूस"



महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले आणि वयाच्या २६ व्या वर्षी ते देशातील सर्वात तरुण आमदार बनलेले श्रीकांत जिचकर भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता आहेत. यांना भारतातील सर्वात शिकलेले व्यक्ती म्हणून ओळखले जाते. 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी परीक्षा दिल्या. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले. श्रीकांत जिचकर हे 25 वर्षांचे असतानाच त्यांच्याकडे 14 पोर्टफोलिओ होते. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती.



महाराष्ट्रातील 1962 ते 2024 पर्यंतचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ..







1. यशवंतराव चव्हाण ( कराड उत्तर) 1 में 1960 ते 20 नोव्हेंबर 1962 (2 वर्षे, 203 दिवस)

2. मारोतराव कन्नमवार ( साओली ) 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 (1 वर्ष, 4 दिवस)

3. बाळासाहेब सावंत (चिपळूण ) 25 नोव्हेंबर 1963 ते 5 डिसेंबर 1963 (10 दिवस)

4. वसंतराव नाईक ( पुसद ) 5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967 (11 वर्षे, 78 दिवस)

5. शंकरराव चव्हाण ( भोकर ) 21 फेब्रुवारी 1975 ते 17 में 1977 (2 वर्षे, 85 दिवस)

6. वसंतराव दादा पाटील ( सांगली ) 17 में 1977 ते 18 जुलै 1978 (1 वर्ष, 62 दिवस)

7. शरद पवार ( बारामती ) 18 जुलै 1978 तक 17 फेब्रुवारी 1980 (1 वर्ष, 214 दिवस)

8. अब्दुल रहमान अंतुले ( श्रीवर्धन ) 9 जून 1980 ते 21 जानेवारी 1982 (1 वर्ष, 226 दिवस)

9. बाबासाहेब भोसले ( नेहरूनगर ) 21 जानेवारी 1982 ते 2 फेब्रुवारी 1983 (1 वर्ष, 12 दिवस)

10. वसंतराव दादा पाटील ( सांगली ) 2 फेब्रुवारी 1983 ते 3 जून 1985 (2 वर्षे, 121 दिवस)

11. शिवाजीराव निलंगेकर ( निलंगा ) 3 जून 1985 ते 12 मार्च 1986 (0 वर्ष, 282 दिवस)

12. शंकरराव चव्हाण ( धर्माबाद ) 12 मार्च 1986 ते 26 जून 1988 (2 वर्षे, 106 दिवस)

13. शरद पवार ( बारामती ) 26 जून 1988 ते 4 मार्च 1990 (2 वर्षे, 364 दिवस)

14. सुधाकरराव नाईक ( पुसद ) 25 जून 1991 ते 6 मार्च 1993 (1 वर्ष, 254 दिवस)

15. मनोहर जोशी ( दादर ) 14 मार्च 1995 ते 30 जानेवारी 1999 (3 वर्षे, 324 दिवस)

16. नारायण राणे ( मालवण ) 1 फेब्रुवारी 1999 ते 18 ऑक्टोबर 1999 (259 दिवस)

17. विलासराव देशमुख ( लातूर शहर ) 18 ऑक्टोबर 1999 ते 17 जानेवारी 2003 (3 वर्षे, 92 दिवस)

18. सुशीलकुमार शिंदे ( सोलापूर दक्षिण ) 18 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 (1 वर्ष, 288 दिवस) 19. विलासराव देशमुख ( लातूर शहर ) 1 नोव्हेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008 (4 वर्षे, 37 दिवस)

20. अशोक चव्हाण ( भोकर) 8 डिसेंबर 2008 ते 7 नोव्हेंबर 2009 (1 वर्ष, 338 दिवस)

21. पृथ्वीराज चव्हाण ( कराड) 11 नोव्हेंबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014 (3 वर्षे, 321 दिवस)

22. देवेंद्र फडणवीस ( नैऋत्य नागपूर ) 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 (5 वर्षे, 12 दिवस)

 23. उद्धव ठाकरे ( वर्ली ) 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022 (2 वर्षे, 214 दिवस)

 24. एकनाथ शिंदे ( कोपरी-पाचपाखाडी ) 30 जून 2022 ते आजतागायत (2 वर्षे, 129 दिवस) 


टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये भरती...



टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये 775 जागांसाठी भरती सदर्न कमांडमधील देशभरातील 13 टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये दि. 4 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान भरती आयोजित केली जाणार आहे. पात्रता : सोल्जर (जनरल ड्यूटी) 10 वी सरासरी किमान 45 गुण (प्रत्येक विषयात किमान 33 गुण). वयोमर्यादा : भरतीच्या दिनांकास 18-42 वर्षे. उमेदवारांनी भरतीसाठी येताना मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या साक्षांकीत केलेल्या प्रतींचे दोन संच तसेच २० पासपोर्ट आकाराचे फोटोग्राफ घेवून हजर रहावयाचे आहे.


उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर






मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार सभा, कॉर्नर बैठका, रॅली यासह सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापर केला जात आहे. सर्व पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांकडून वेळोवेळी आपल्या सोशल मीडिया हँडलवर विविध पोस्ट करून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीत उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यावर भर देत आहेत. कारण आजघडीला बहुतांश जनता ही सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.





Sunday, November 10, 2024

News topics:मतदानाचा इतिहास:आधुनिक आणि समकालीनकाळ

 मतदानाचा इतिहास:आधुनिक आणि समकालीनकाळ



18 व्या शतकाच्या शेवटी आणि 19 व्या शतकाच्या सुरूवातीस नवे विचार आले. मूल्ये जसे स्वतंत्रता, समानता आणि मानवाधिकार याविषयी चर्चा झाली. यामुळे नागरिकांमध्ये मतदानाच्या हक्कासाठी चळवळीला चालना मिळाली. 20व्याशतकात, विविध देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. 20 व्या शतकाच्या शेवटच्या दहा वर्षांत, अनेक देशांमध्ये मतदान प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्या. तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणुकांचे आयोजन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यात आले. आज, जगभरात अनेक विविध प्रकारच्या मतदान पद्धती आहेत, जसे की इलेक्ट्रॉनिक मतदान, मेल-इन मतदान, आणि इतर तंत्रज्ञान आधारित पद्धती.


महाराष्ट्रात उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा इतिहास नाही



महाराष्ट्रातील राजकारणात उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा इतिहास नाही. अजित पवार, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील आणि आर.आर. पाटील हे सर्व उपमुख्यमंत्री झाले, पण एकही मुख्यमंत्री झाले नाही. अजित पवार सध्या उपमुख्यमंत्री असून, त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल येतील आणि त्यानंतर अजित पवार तसेच अन्य उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पुर्ण होईल का, हे स्पष्ट होईल.


पंतप्रधान इंटर्नशिप योजना! आजची शेवटची तारीख



पंतप्रधान इंटर्नशिप योजना युवाांना उद्योग आधारित प्रशिक्षण प्रदान करणार आहे. या योजनेतून 12 महिन्यांचे इंटर्नशिप मिळेल, ज्यामुळे तरुणांना भारतातील शीर्ष कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. 10 वी किंवा त्यापुढील शैक्षणिक पात्रता असलेल्या 21 ते 24 वर्षे वयोगटातील युवक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 5000 रुपयांचे मानधन दिले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर आहे. अधिक माहितीसाठी https://pminternship.mca.gov.in वर अर्ज करा किंवा 1800116090 वर संपर्क साधा.


नवा नियम! व्हॉट्सअॅपवर ग्रुपसाठी ऍडमिनला द्यावे लागणार 4 हजार



भारतात सध्या व्हॉट्सअॅप वापरणे पूर्णपणे मोफत आहे. शिवाय, कोणताही ग्रुप बनवण्यासाठी किंवा कोणत्याही ग्रुपमध्ये सामिल होण्यासाठी पैसे लागत नाहीत. पण, झिम्बाब्वे सरकारने आता नवीन नियम आणला आहे. त्यानुसार, व्हॉट्सअॅपवर ग्रुप बनवण्यासाठी नोंदणी बंधनकारक केली आहे. यासाठी टेलिकम्युनिकेशन्स रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये अर्ज करावा लागेल. ग्रुप अॅडमिनला यासाठी 50 डॉलर म्हणजेच 4000 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. व्हॉट्सअॅपचा गैरवापर होऊ नये, चुकीची माहिती जाऊ नये यासाठी हा नियम घातला आहे



नरेंद्र मोदींनी दिली नदीजोड प्रकल्पाला मंजुरी



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैनगंगा, नलगंगा आणि पैनगंगा नद्या जोडण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्राच्या अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील पाण्याच्या समस्यांचा निराकरण होईल. यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "पूर आणि दुष्काळ यांसारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी आमच्या सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. शेतकऱ्यांना कमी पाणी वापरण्याचं आवाहन करत आम्ही सिंचनासाठी प्रोत्साहन देत आहोत.


सोलापूरः उजनीतून कालव्यात सोडलेले पाणी ३ महिन्यांनंतर बंद



उजनी धरण १०० टक्के भरल्यावर पूरनियंत्रणासाठी ४ ऑगस्टपासून धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. आता पावसाळा संपला असून तीन महिन्यानंतर शुक्रवारी (ता. ८) कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. २०२४-२५ या वर्षातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरणार आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.


Saturday, November 9, 2024

News Maharashtra:सोन्याच्या दरात चढउतार

 सोन्याच्या दरात चढउतार



या आठवड्यात सोन्याच्या दरात चढउतार दिसून आले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी किंमत स्थिर होती, मंगळवारी 150 रुपयांनी घट झाली, तर बुधवारी पुन्हा 150 रुपयांनी वाढ़ झाली. 7 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात 180 रुपयांची घसरण झाली होती. आज सकाळच्या सत्रातही किंमती नरम आहेत. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 72,150 रुपये आणि 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 78,710 रुपये आहे.


सोलापूर: मतदान कमी त्या गावावर लक्ष केंद्रित



माळशिरस विधानसभा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये कमी मतदान झालेले आहे, त्या गावातील मतदान केंद्रातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर राहणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाच्या कमी टक्केवारीबाबत प्रत्यक्ष गावभेट देऊन चौकशी केली असता, गावातील काही मतदार परगावी राहत असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही असे निदर्शनास आले.


हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात



विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बड्या नेत्यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींचा विदर्भ दौरा सुरू असून, धुळ्यात त्यांची सभा पार पडली. त्याच वेळी, परभणीतील हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरणार आहेत. पंजाबराव डख यांचा राजकीय एंट्री अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे आणि त्यांचा अंदाज अचूक ठरणार का, हे निवडणुकांच्या निकालावर अवलंबून असेल. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


तुम्हाला माहीत आहे की या पक्षांनी आजपर्यंत इतके मुख्यमंत्री








राजकीय पक्ष त्यांच्या मुख्यमंत्री पद धारण केलेल्या सदस्यांच्या एकूण कालावधीनुसार या प्रमाणे आहेत

1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - एकूण 13 मुख्यमंत्री, कलावादी- 17,576 दिवस

2. शिवसेना - एकूण 4 मुख्यमंत्री, कलावादी - 3,482 दिवस

3. भारतीय जनता पक्ष - एकूण

1 मुख्यमंत्री, कलावादी - 1,871 दिवस

4. भारतीय काँग्रेस (समाजवादी) - 1 मुख्यमंत्री, कलावादी - 579 दिवस

5. शिवसेना - 1 मुख्यमंत्री, कलावशादी - 860 दिवस

6. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अरसू) - 1 मुख्यमंत्री, कलावादी - 135 दिवस 


महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक




1960 साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि दोनच वर्षांमध्ये विधिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवलं आणि आजच्या महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल सुरू झाली. 1946 ते 1952 या कालावधीत मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर निवडले गेले होते. त्यानंतर मोरारजी देसाई यांनी चार वर्षांसाठी हे पद सांभाळले. 1956 ते 1960 या चार वर्षांमध्ये यशवंतराव चव्हाण मुंबईचे मुख्यमंत्री होते आणि 1960 साली नव्या आणि आज अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले.


ट्रम्प यांना मत देणाऱ्या पुरुषांशी महिला लग्न करणार नाहीत



अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प जिंकले आहेत. त्यानंतर आता तिथे वातावरण पेटलं आहे. कारण, अमेरिकन मुलींनी अजब चळवळ चालवण्याची घोषणा केलीय. अमेरिकन मुलींचे म्हणणे आहे की ज्या पुरुषांनी ट्रम्प यांना मतदान केले त्यांच्याशी त्या लग्न करणार नाहीत किंवा त्यांच्या प्रेमातही पडणार नाहीत. ट्रम्प यांना मत देणाऱ्या मुलांशी त्या डेट करणार नाहीत किंवा शारीरिक संबंध ठेवणार नाहीत. किमान पुढील 4 वर्षांसाठी ही घोषणा केलीय. दरम्यान, यापूर्वी ट्रम्प यांच्यावरही बलात्काराचे आरोप झाले आहेत.


"माझी कन्या भाग्यश्री योजना" मुलींना मिळणार पैसे



"माझी कन्या भाग्यश्री योजना" ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची सामाजिक कल्याण योजना आहे, जी मुलींच्या जन्मानंतर त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सुरू केली आहे. या योजने अंतर्गत, मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षण आणि विवाहापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा उद्देश मुलींच्या जीवनमानात सुधारणा आणणे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन देणे आहे. अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पाहा.



Friday, November 8, 2024

News update : विधानसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील इतिहास

 

महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत किती मतदारसंघ होत्या?



भारताचे सध्याचे महाराष्ट्र राज्य 1 में 1960 रोजी अस्तित्वात आले. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या पहिल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची संख्या 264 होती. 33 मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव होते आणि 14 जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव होत्या.


उत्तर महाराष्ट्रात कोण जिंकणार बाजी?




उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांनी मोठा जनाधार मिळवला आहे, तर शरद पवार आणि काँग्रेसचा एक प्रभावी गट आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि छगन भुजबळ यांचा प्रभाव आहे. शरद पवार आणि काँग्रेस समर्थकांची मोठी वटवणूक आहे. उद्धव ठाकरे शिंदे सेनेला कडवी टक्कर देऊ शकतात. मराठा आंदोलनाचा थेट परिणाम भाजपच्या मतदारसंघावर होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात काटेकी लढत होणार असून, शिंदे सेना सोडून अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली दिसत आहे.


महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा



महाराष्ट्र राज्याच्या निर्मिनंतर १९६२ मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एकूण २६४ पैकी २१५ जिंकल्या होत्या. काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाकडे केवळ १५ जागा होत्या. त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला ९, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला ६, रिपब्लिकन पार्टीला ३ आणि समाजवादी पक्षाला १ जागा मिळाली.


सोलापूर शहरउत्तर विधानसभामतदारसंघ: उमेदवार कारकीर्द




विधानसभा निवडणूक 2024 उमेदवार: महेश विष्णुपंत कोठे पक्षः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चिन्ह: तुतारी वाजवणारा माणूस यापूर्वीची राजकीय कारकीर्द गेल्या 30 वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक, सभागृह नेते, महापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समितीचे सभापती अशा विविध पदांवर काम केल्याचा अनुभव. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशा तीन पक्षांचा प्रवास.

यापूर्वी सोलापूर शहर उत्तर व सोलापूर शहर मध्य या दोन मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवली मात्र पराभव पत्करला. 



सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ: उमेदवार कारकीर्द



विधानसभा निवडणूक 2024 उमेदवार: विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख पक्षः भारतीय जनता पार्टी चिन्ह: कमळ

यापूर्वीची राजकीय कारकीर्द

2004 पासून सलग चार वेळा विधानसभेवर विजयी. माजी कामगार मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद सांभाळले. सध्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


सोलापूर दक्षिण मतदार संघ: उमेदवार कारकीर्द



विधानसभा निवडणूक 2024 उमेदवार: सुभाष सुरेशचंद्र देशमुख पक्षः भारतीय जनता पार्टी चिन्ह: कमळ

यापूर्वीची राजकीय कारकीर्द चौदाव्या लोकसभेत सदस्य म्हणून निवड. एकदा माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली, मात्र पराभव पत्करला. यापूर्वी दोन वेळा सोलापूर दक्षिणचे आमदार तसेच पाच वर्षे राज्याचे सहकार मंत्री पद सांभाळले.


भारतीय जनता पक्षाची स्थापना कशी झाली ??



भारतीय जनता पक्षाची (भाजपा) स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या विचारधारेवर आधारित होता. भाजपची स्थापना भाजपच्या पूर्ववर्ती पक्ष, जनता पक्षाच्या धाग्यातून झाली. पक्षाने हिंदू सांस्कृतिक आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यांवर जोर दिला, आणि सामाजिक न्याय, स्वदेशी विकास, आणि आधुनिकतेसाठी प्रयत्न केले. 1980 च्या दशकात भाजपने देशभरात आपला प्रभाव वाढवला, आणि 1990 च्या दशकात तो एक प्रमुख राजकीय शक्ती म्हणून उभा राहिला.




भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना कशी झाली ??



भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत झाली. प्रारंभिक काळात, काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्याची चळवळ चालवली आणि लोकशाहीच्या मूल्यांचे प्रोत्साहन केले. सुरुवातीला, पक्षाने सुधारणा आणि स्वायत्तता यावर लक्ष केंद्रित केले. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1920 च्या दशकात काँग्रेसने असहमतीचा मार्ग स्वीकारला, ज्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीला वेग आला. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, काँग्रेस देशातील प्रमुख राजकीय शक्ती बनली, परंतु वेळोवेळी पक्षात अंतर्गत संघर्ष आणि बदल झाले.



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कशी झाली?



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये शरद पवार, पी.ए. संगमा, आणि तारिक अन्वर यांनी केली. काँग्रेसच्या निर्णयांवर असंतोष आणि संप्रदायिकतेच्या मुद्द्यांवर चिंता असल्याने या नेत्यांनी स्वतंत्रपणे राजकीय पक्षाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वात, NCP ने 1999 च्या लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले. पक्षाने सामाजिक न्याय, शेतकरी हक्क, आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे तो महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा राजकीय पक्ष बनला.

Maharashtra Watch Live Assembly Vote Counting

विधानसभा 2024  मतमोजणी... Watch Live Assembly Vote Counting2024 राजनीतीNews   Solapur Live Update 👇👇👇 https://www.youtube.com/live/Knv-Pi...