Breaking news:शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांचं होणार खाजगीकरण
VartamanNews24
आत्ताची महत्त्वाची बातमी आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यात एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असतानाच आता राज्यातील शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांचं खाजगीकरण होणार आहे. प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय असे सांगण्यात येत आहे यातून वाचणारा पैसा विकास कामांसाठी वापरला जाणारे राज्यात सफाई कामगार,शिपाई अशा चतुर्थ श्रेणीतील काही कर्मचाऱ्यांचा आधीच खाजगीकरण झाले हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या धोरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय त्यानुसार शासकीय निमशासकीय विभाग,स्थानिक स्वराज्य संस्था,महामंडळ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, तसंच सरकारच्या संबंधित अन्य कार्यालयातील नोकर भरती ही खाजगीकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहे ही पदभरती सरकारने नेमलेल्या मनुष्यबळ पुरवठा एजन्सी कडूनच केली जाणार आहे.यात प्रामुख्याने कोणत्या पदांचा समावेश असेल तेही सरकार येत्या काळात स्पष्ट करणारे मात्र प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी हा खाजगीकरणाचा निर्णय सरकारनेघेतल्याचे दिसून येत आहे.सरकारने नेमलेल्या एजन्सी कडूनच राज्य सरकारी नोकऱ्यांचा किंवा या पुढील होणाऱ्या भरतीमध्ये फडणवीस शिंदे सरकार यांनी सांगितलेला आहे यात शिक्षक, अधीक्षक आणि अभियंते यांचा समावेश असणार आहे यासाठी सरकार मनुष्यबळ पुरवठा एजन्सी नेमणार आहे. याच एजन्सीच्या मार्फत सरकार भरती करण्यात येणार आहे.
माहिती शेयर करा 🙏🙏
No comments:
Post a Comment