Small Savings Scheme for citizens: लहान बचत योजना
लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुलै-सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी सरकारने लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे.
एकून ३० bps पर्यंत वाढ करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने ३० जून २०२३ रोजी याबाबत घोषणा केली आहे.
सरकारने
यामध्ये PPF सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना SSY, किसान विकास पत्र KVP, NSC राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना SCSS च्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
जाहीर केलेल्या सुधारित दरांतर्गत, १-वर्ष, २-वर्षाच्या मुदत ठेव योजनेत १० bps ची वाढ करण्यात आली आहे. तर ५ -वर्षांच्या आवर्ती ठेव योजनांमध्ये ३० bps ची वाढ करण्यात आलीये. तुमच्या १ वर्षांच्या ठेवी योजनेवरील व्याजदर ६.९ टक्के, तर २ वर्षांच्या ठेव योजनेवरील व्याजदर ७ टक्के करण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांच्या आवर्ती ठेवीवरील व्याजदर ६.५ टक्के आहे.Latest Small Savings Scheme News
नव्या
दरांनुसार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये ७.१ टक्के व्याज दर वाढला आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ७.७ टक्के आहे. तर किसान विकास पत्र ७.५ टक्के
व्याजदरावर आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत व्याज दर ८.२ टक्के आणि सुकन्या
समृद्धी या लोकप्रिय योजनांचे दर ८ टक्के करण्यात आले आहे
केव्हापासून लागू होणार नवे दर?
Small Savings Scheme for citizens
सर्व
नवे व्याजदर १ जुलैपासून लागू होणार आहेत. सरकारने दिलेल्या या योजना इतर
योजनांपेक्षा सर्वाधिक सुरक्षित आहेत. यावर व्याजदरही उत्तम मिळतो. अशात आता वित्त मंत्रालयाने पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केल्याने अनेक
नागरिकांची या बचत योजनांना पसंती दिली आहे.
No comments:
Post a Comment