Royal Enfield : दिमाखात धावणार आता बुलेटची इलेक्ट्रिक 'बाईक '!
Vartaman News24: सध्या चा काळ पाहता कि सर्वत्र ठीकांनी पेट्रोल आणि डीझेल चे वाढते दे पाहून जन सामन्याची मोठी कसरत होत आहे . या होधात्या महागाई मुळे काही अशा कंपन्यांनी आता इलेक्ट्रोनिक्स गाड्याची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते . पण आता इतर कंपन्या बरोबरच बुलेट बनवणार्या कंपनीने उडी मारलेली पहावयास मिळणार आहे .म्हणजेच आता बुलेट सुधा चार्जिंग करून धावेल .काय आहे नेमके क्जाणून घेऊया .matter electric bike.
बुलेटची (Bullet) धडधड अनेकांची जीव की प्राण असते. एका खास वर्ग बुलेटवर मनापासून प्रेम करतो. बुलेटची ऐटदार सवारी अनेकांना सुखावणारी असते. तर आता ही जानदार, शानदार सवारी आणखी कात टाकणार आहे.
काळानुरुप या कंपनीने अनेक बदल केले आहेत. बदलत्या जगाचा पासवर्ड आत्मसात केल्याने कंपनीला मोठा फायदा झाला. सध्या इलेक्ट्रिक मार्केट सर्वांनाच खूणावत आहे. अनेक दुचाकी कंपन्या इलेक्ट्रिक बाजारात दमदारपणे उतरल्या आहेत. त्यात रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) पण मागे नाही. आयशर मोर्टसने इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये पाऊल ठेवण्याचा इरादा पक्का केला आहे. चाहत्यांना लवकरच इलेक्ट्रिक बुलेटवर (Electric Bullet) रपेट मारता येईल.
आमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.
रॉयल एनफिल्डचा प्लॅन काय (What is Royal Enfield's plan?)
रॉयल एनफिल्ड मोटारसायकल आयशर मोटर्स तयार करते. गुडगाव येथे कंपनीचे मुख्यालय आहे. कंपनी त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईकची तयारी करत आहे. या कंपनीचा बाजारातील हिस्सा जवळपास 90% आहे. भारतातील प्रीमियम मोटरसायकल सेगमेंटवर कंपनीचा वरचष्मा आहे. कब्जाच आहे म्हणा ना.
Recruitment of workers कामगारांची भरती
इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये अनेक कंपन्या उतरल्या आहेत. स्कूटरच नाही तर बाईक पण या सेगमेंटमध्ये दिसू लागल्या आहेत. बुलेट पण या सेगमेंटमध्ये उतरल्यास मोठा धमाका होईल. आयशर मोटर्सने जून तिमाहीत जबरदस्त निकाल दिले. त्यामुळे टू व्हिलर पोर्टफोलिओत विस्तार करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळासोबतच व्यावसायिक कामगारांची भरती करण्यात आली आहे.
दोन वर्षांत बुलेट बाजारात येण्याची शक्यता
आयशर मोटर्सचे एमडी आणि सीईओ सिद्धार्थ लाल यांनी ईटीला या प्रकल्पाविषयी माहिती दिली. रॉयल एनफिल्ड येत्या दोन वर्षात पहिली इलेक्ट्रिक बाईक उतरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2025 पर्यंत इलेक्ट्रिक बाईक बाजारात उतरविण्याची तयारी करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक बुलेटचा पोळा (A hive of electric bullets)
इलेक्ट्रिक बुलेट बाजारात उतरविण्याची तयारी जोरात आणि जोमात सुरु आहे. कंपनी 150,000 इलेक्ट्रिक बुलेट बाजारात उतरविण्यासाठी उत्पादन क्षमता वाढविण्यावर जोर देत आहे. वेगवेगळ्या टप्प्यात या बुलेट बाजारात दाखल होतील.
जून तिमाहीत असणार जोरदार कामगिरी
जून तिमाहीत कंपनीने जोरदार कामगिरी बजावली. आयशर मोटर्सने जवळपास 1.6 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. सिद्धार्थ लाल यांनी जून तिमाही निकाल आतापर्यंतची चांगली कामगिरी असल्याचे स्पष्ट केले.
आमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.
काय सांगते आकडेवारी ते पहा
आयशर मोटर्सने आर्थिक वर्ष 2023-24 पहिल्या जून तिमाहीत वार्षिक आधारावर नफा कमावला. 50.4 टक्के वृद्धीसह 918.3 कोटींचा नफा कमावला. तर कंपनीच्या महसूलात मोठी वाढ झाली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा महसूलात 17.3 टक्के वाढ झाली. महसूल 3,986.4 कोटी रुपयांवर पोहचला
No comments:
Post a Comment