Fiverr

Wednesday, October 30, 2024

Todays News

 

आता 10 मिनिटांत घरपोच मिळणार सोने-चांदी

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर धनत्रयोदशीसाठी सोने-चांदी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली आहे. ब्लिंकिट, स्विगी इंस्टामार्ट, झेप्टो आणि बिगबास्केटसारख्या प्लॅटफॉर्मवर मलबार, मुथूट, तनिष्क यांसारख्या ब्रँडचे 24 कॅरेट सोने आणि 999 शुद्धतेची चांदीची नाणी घरपोच मिळतात. 0.1g ते 1g सोन्याचे नाणे व 5g ते 20g चांदीचे नाणे ऑर्डर करता येतात. ग्राहकांना सोने-चांदीसाठी बाजारात जाण्याची गरज नाही, काही मिनिटांतच घरपोच सेवा मिळू शकते.






अभ्रक महागाई भत्ता व एमपीएससी अंतर्गत भरती, 01333 जागा; पगार 25,500 पासून

भरती श्रेणी: महाराष्ट्र शासन (एमपीएससी) पदाचे नाव : उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ), लिपिक-टंकलेखक.

·शैक्षणिक पात्रता : पदांनुसार वेगवेगळी, नोटीफिकेशन पहा

पगार : 25,500 ते 81,100 रूपये अर्ज पद्धती : ऑनलाईन

वयोमर्यादा : 19 ते 38 वर्ष.

पदे : 01333

अर्जाची शेवटची तारीख- 4 नोव्हेंबर 2024

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.

अधिक माहितीसाठी नोटीफिकेशन- https://

drive.google.com/file/d/1nXX0p3XptDRQ

-phn19OMv5NC7MQAd886/view?pli=1 





सोलापूर: धर्मराज काडादी यांची अपक्ष उमेदवारी दाखल..

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धर्मराज काडादी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखत दिली होती. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सोलापूर दक्षिण मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाली. त्यामुळे काडादी यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. अर्ज दाखल करताना बाळासाहेब शेळके, सिद्धाराम चाकोते आदी उपस्थित होते.





नाशिकमध्ये चक्क एका पक्षाने हेलिकॉप्टरने पाठवले AB फॉर्म

आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून, नाशिकमध्ये शिंदे गटाने हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले आहेत. देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने देवळालीत राजश्री आहिराव आणि दिंडोरीत धनराज महाले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे, जे महायुतीतील घटक पक्ष आहेत.




सोलापूर: सांगोला मतदारसंघात यंदा तिरंगी लढत

सांगोला तालुक्यात प्रथमच राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. आजपर्यंत तालुक्यातील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी कधी शेकाप पक्षाला तर कधी शेकाप विरोधी उमेदवाराला पाठिंबा दिला. या विधानसभा निवडणुकीमुळे प्रथमच माजी आमदार साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) पदाचा राजीनामा देत थेट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवून त्यांनी शेकाप व शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांना धक्का दिला.





पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार!

देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. पेट्रोल स्टेशन डीलर्सना देण्यात येणारे कमिशन वाढवत असल्याचे तेल कंपन्यांनी जाहीर केले आहे. आंतरराज्य मालवाहतूक तर्कसंगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. 1 नोव्हेंबरला पेट्रोल-डिझेलचे नवीन दर लागू होऊ शकतात.



तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2,236 जागांसाठी भरती

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) 2,236 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता: 10वीं, 12वी उत्तीर्ण. वयोमर्यादा 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत 18 ते 24 वर्षे असून, SC/ST साठी 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सूट आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहे. लिंक- https://drive.google .com/file/d/1KbnSqMxDEqipEp6d2MRNUIU -wtIxeEfr/view, https://www

.apprenticeshipindia.gov.in/





भाजपाचा मोठा डाव! थेट प्रदेशाध्यक्षच फोडला

राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, ज्यामुळे बच्चू कडू यांना धक्का बसला आहे. भाजपने गावंडे यांचे मन वळवले तर प्रत्युत्तरादाखल, अकोल्यात भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांचा प्रहारमध्ये प्रवेश झाला आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांचाही प्रहारमध्ये प्रवेश झाल्याची चर्चा आहे. तिसरी आघाडी तयार करून बच्चू कडू यांनी महायुती व महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे.





पालकांनो मुलांना सहलीसाठी पाठवण्यापूर्वी हे करा!

हिवाळ्यात शाळा-महाविद्यालयांकडून शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात, परंतु सहलीदरम्यान अपघात आणि जीवित हानी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पालकांनी सहलीसाठी मुलांना पाठवण्यापूर्वी शाळेकडून महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. पट्टीचा पोहणारा आणि टॅकर सहलीसाठी सोबत आहे का, याची पडताळणी करावी. बसचे फिटनेस प्रमाणपत्र आणि इन्शुरन्स असल्याची खात्री करावी. मुलांसोबत फराळाचे साहित्य, उबदार कपडे आणि शिक्षकांच्या संपर्क क्रमांकाची माहिती घ्यावी.





बारावीची परीक्षा 11 तर दहावीची 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी व दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रात्यक्षिक परीक्षा अनुक्रमे 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी आणि 3 ते

20 फेब्रुवारीदरम्यान होतील. लेखी परीक्षा वेळेत झाल्याने जेईई, नीटसाठी विद्यार्थ्यांना अधिक तयारीचा वेळ मिळेल, तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना लवकर प्रवेश मिळू शकेल. सध्या स्थानिक सुट्ट्या व सीबीएसईच्या तारखांची पडताळणी सुरू आहे, आणि अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.







.. तर लाडक्या बहिणींना मिळणार महिना 2 हजार रुपये

महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. यात पात्र महिलेला महिना 1500 रुपये मिळतात. त्यातच महाविकास आघाडीही लाडक्या बहिणींसाठी सरसावली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना 2 हजार रुपये महिना देण्यात येणार आहेत. मविआच्या जाहीरनामा समितीकडून याबाबत निर्णय देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मविआचे सरकार आल्यास विधिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत या योजनेबाबतचा ठराव मांडण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या 2 दिवसात मविआ आपला जाहीरनामा सादर करण्याची शक्यता आहे.





सोलापूर: रिपाइंचा महाविकास आघाडीला पाठिंबा

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश कोठे यांच्यासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभोध वाघमोडे यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रात म्हंटले आहे की, जातीवादी सरकारला रोखण्यासाठी तसेच महाराष्ट्राची आस्मिता जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी समजतील सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य करते.

No comments:

Post a Comment

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...