केंद्र सरकारचा टोल टॅक्ससाठी नवा नियम लागू
केंद्र सरकारने टोल टॅक्ससाठी नवा नियम लागू केला आहे, ज्याचा कोट्यवधी वाहनधारकांना फायदा होणार आहे. नवीन नियमांनुसार, 20 किमीपर्यंत राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गांचा वापर करणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही. मात्र, यासाठी वाहनावर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) असणे बंधनकारक आहे. सध्या GNSS प्रणाली पायलट प्रोजेक्टअंतर्गत कर्नाटक आणि हरियाणामध्ये लागू आहे. यशस्वी चाचणीनंतर देशभर ही प्रणाली राबवली जाईल. यामुळे टोलमध्ये पारदर्शकता येणार असून वाहनचालकांचा प्रवास सुकर होईल.
सोलापुरातून मुंबई, गोव्याला जाता येणार विमानाने
सोलापुरातील होटगी रस्त्यावरील विमानतळावरून येत्या सात दिवसांमध्ये मुंबई आणि गोव्याला जाण्यासाठी विमानसेवा सुरू होणार असल्याच्या माहितीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. फ्लाय 91 या विमान कंपनीकडून ही सेवा सुरू होणार आहे. फ्लाय 91 या विमान कंपनीकडून सोलापूर ते पुणे आणि सोलापूर ते मुंबई पहिल्या टप्प्यात विमान सेवा सुरू करण्याची तयारी होती. मात्र पुणेपेक्षा, मुंबई, गोवा, हैदराबाद, तिरुपती, बंगळुरू या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याची मागणी सोलापूरकरांनी केली आहे.
ऐन थंडीत वाढतोय उकाडा!
मुंबई शहर आणि उपनगरात 16 नोव्हेंबर रोजी थंडीच्या दिवसात तापमानात वाढ झाली आहे. आज मुंबईचे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईत उष्णता आणि आर्द्रतेचा प्रभाव दिसून येत आहे. शहरातील हवामानामुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दुसऱ्याच कोणी तुमच्या नावावर मतदान केल्यास
काय कराल?
भारतीय निवडणूक व्यवहार अधिनियम -1961 च्या 49P या कलमानुसार, तुमच्याऐवजी दुसऱ्या कुणी तुमच्या नावावर मत नोंदवले असेल आणि खरे तुम्ही मतदार असाल तर तुम्ही मतदार केंद्राच्या पीठासीन अधिकाराकडे अपील करू शकता.अर्थात, तुम्हीच खरे मतदार आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान केंद्राच्या स्लिप अशी कागदपत्रे असायला हवीत.
मतदान कार्ड कसे डाऊडलोड कराल?
सर्वात प्रथम राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर WWW.ECI.GOV.IN वर जा. त्यात मेन्यूमधील डाऊनलोड e-Epic निवडा. खाली स्क्रोल करुन सर्व्हिस सेक्शनमध्ये जा. त्याखाली e-Epic डाऊनलोडवर क्लिक करा. तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर, ईमेल किंवा EPIC नंबर आणि कॅप्चा कोर्ड भरल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करावं लागेल. लॉगइन करून डाऊनलोड EPIC वर क्लिक
करा.
व्होटर आयडी हरवलंय? काय कराल?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला आता केवळ चार दिवस उरले आहेत. घरोघरी मतदानासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव सुरु आहे. पण तुमचं व्होटर आयडी हरवलं असेल तर अगदी काही मिनिटांमध्येच तुम्ही हे ओळखपत्र डाऊनलोड करु शकता. फक्त त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. या फोनमध्येच तुम्ही मतदान ओळखपत्राची डिजिटल कॉपी डाऊनलोड सेव्ह करू शकता.
दिव्यांग मतदारांना मतदानासाठी हा पर्याय
दिव्यांग मतदार मतदानासाठी 'सक्षम' मोबाईल अॅपचा लाभ घेऊ शकतात. 'सक्षम' मोबाईल अॅप दिव्यांगांसाठीच सुरू करण्यात आले आहे, त्यावर लॉग इन करून ते मतदान करू शकतात. उमेदवारांसाठी 'सुविधा' नावाचे मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून, हे ऑनलाइन पोर्टल असून तेथे नामनिर्देशन आणि शपथपत्रही दाखल करता येते. मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले की, 'सुविधा' पोर्टलचा वापर उमेदवारांना सभा आणि रॅलींसाठी परवानगी घेण्यासाठी देखील करता येतोय.
पीएम इंटर्नशिप योजना, महिना 5 हजार, शेवटची संधी
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची मुदत आहे. या योजनेतून प्रत्येक तरुणाला इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी 800 पेक्षा जास्त कंपन्यांनी सरकारकडे नोंदणी केलेली आहे. या योजनेत पात्र उमेदवाराला सुरुवातीला एक रक्कमी 6 हजार रुपये दिले जाणार आहेत. तर त्यानंतर प्रत्येक महिना 5 हजार रुपये दिले जाणार आहेत. 10 वी पासून ते पदवीधरांपर्यंतचे सर्वजण यासाठी अर्ज करु शकतात. https://pminternship.mca.gov.in/login / या लिंकवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता
राज्यात 158 पक्ष निवडणूक रिंगणात
राज्याच्या निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. अनेक पक्ष पक्षाचे उमेदवार पूर्ण ताकतीनिशी प्रचारात उतरले आहेत. मात्र या निवडणुकीत किती पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुम्हाला माहिती आहे का? तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एक दोन नव्हे तर तब्बल 158 राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात अनेक राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांचा समावेश आहे. सत्तेच्या सारीपाठासाठी प्रत्येक पक्षाची धरपड सुरू आहे.
सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत आहे. गुरुवारीही (14 नोव्हेंबर) सेन्सेक्स निफ्टीने जोरदार सुरुवात केली आणि काही वेळाने पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र केवळ शेअर बाजारच नाही तर सोन्यामध्येही सातत्याने घसरण होत आहे. 1 नोव्हेंबरपासून सोन्याचे दर 5000 रुपयांनी घसरले आहेत, म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात सोने स्वस्त झाले आहे. MCX वर सोन्याच्या भावातील बदल पाहिल्यास, गुरुवारी सोने 73,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले.
No comments:
Post a Comment