ऐनवेळी शिवसेनेचे 2 उमेदवार नॉट रिचेबल
विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये उमेदवारांमधील नाराजी उफाळली आहे. ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले आणि राजश्री अहिरराव नॉट रिचेबल आहेत, ज्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. देवळाली आणि दिंडोरीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना थेट लढत होणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये "तुमची लाडकी बहिण" असा मजकूर असलेले बॅनर चर्चेत आहेत. मुंबईत शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काते यांच्यावर साडीवाटपाचा आरोप ठाकरे गटाने केला असून आचारसंहिता भंगाची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रेशन कार्डधारकांसाठी नवीन नियम
केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी नवीन नियम 1 नोव्हेंबरपासून लागू केले आहेत. या नियमानुसार आता रेशन दुकानातून तांदूळ आणि गहू समसमान प्रमाणात दिले जातील. पूर्वी 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू दिले जात होते, पण आता 2.5 किलो तांदूळ आणि 2.5 किलो गहू दिले जातील. तसेच, ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी
दिवाळीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 700 रुपयांनी कमी होऊन 74,000 रुपये झाला आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 770 रुपयांनी घटून 80,710 रुपये आहे. 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 5700 रुपयांनी कमी झाले आहे. चांदीची किंमतही प्रति किलो 3,000 रुपयांनी घटून 97,000 रुपये झाली आहे. या घसरणीमुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची संधी आहे.
सोलापूर: सांगोला अजिबात सोडणार नाही
सांगोल्याची शिवसेनेची विद्यमान जागा आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार निवडून आलेले असल्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार आहे. शेतकरी कामगार पक्षाबरोबर शनिवारीही आमची चर्चा झाली आहे. शेकापबरोबर रायगड
जिल्ह्यातील अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन जागांवर चर्चा होऊ शकते. सांगोल्यावर अजिबात चर्चाच होणार नाही. आम्ही सांगोल्यातून अजिबात माघार घेणार नाही. असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
24, 22 आणि 18 कॅरेट म्हणजे नक्की काय ??
भारतीय संस्कृतीत सोन्याला विशेष महत्त्व आहे, आणि सणासुदीला सोने खरेदी करणे ही परंपरा आहे. दिवाळीत, सोने खरेदीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात गर्दी दिसते. ग्राहक 24 कॅरेट (99.99% शुद्ध), 22 कॅरेट (91.67% शुद्ध), 18 कॅरेट (75% शुद्ध) आणि 14 कॅरेट (58.3% शुद्ध) सोनं खरेदी करतात. 24 कॅरेट सोने सर्वाधिक शुद्ध असते, तर 18 कॅरेट सोन्यात इतर धातूंचा अधिक वापरामुळे ते कठोर होते. हॉलमार्किंगच्या नियमांनुसार, 1 एप्रिल 2023 पासून सर्व दागिन्यांवर 6 क्रमांकाचे हॉलमार्क असणे अनिवार्य आहे.
जप्त केलेल्या मालमत्तेचा आकडा पोहोचला 234 कोटींवर
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासन व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे राज्यभरात कारवाई सुरू आहे. यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू असा एकूण 234 कोटी 49 लाख रुपयांचा मुद्देमालआजपर्यंत जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी होत आहे. संशयास्पद वाहने जप्त करून कसून चौकशी केली जात आहे. राज्यभरात चोख पोलीस बंदोबस्त पहायला मिळत आहे.
सोलापूर: मंगळवेढ्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच मंगळवेढा दौऱ्यावर येत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे यांनी दिली. बुधवार दि. 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिलीप धोत्रे यांच्या प्रचार्थ शिवप्रेमी चौक आठवडा बाजार येथे जाहीर सभा होणार आहे. विधानसभेच्या आखाड्यामध्ये उमेदवार उतरण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली त्याचवेळी पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिल्या पाच उमेदवारात दिलीप धोत्रे यांचे नाव निश्चित केले होते.
No comments:
Post a Comment