सोलापुरात लवकरच हेल्मेट सक्ती
दुचाकी चालकासोबत मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावे लागणार असून याबाबतची हेल्मेट सक्ती लवकरच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लागू होणार आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वार व मागे बसणारा सह प्रवासी यांचा अपघात, मृत्यूमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ़ होत आहे. यावर आळा घालण्यासाठी आता संपूर्ण राज्यात दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करणारे परिपत्रक पोलीस प्रशासनाने काढले आहे. यामुळे सोलापूरकर मात्र चांगलेच धास्तावले आहेत. या सक्तीला सोलापुरातून तीव्र विरोध होण्याची दाट शक्यता आहे.
डिसेंबर महिन्यात शाळा, महाविद्यालये आणि बँकांना अनेक सुट्ट्या
2024 च्या डिसेंबर महिन्यात शाळा, महाविद्यालये आणि बँकांना अनेक सुट्ट्या मिळतील. शाळा आणि महाविद्यालये 6 दिवस बंद राहतील, त्यात रविवार, महापरिनिर्वाण दिन (6 डिसें.), नाताळ (25 डिसें.), आणि इतर रविवारी सुट्ट्या समाविष्ट आहेत. बँकांना 17 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे, ज्यात दूसरे व चौथे शनिवार, रविवार आणि ख्रिसमससारखी सुट्ट्यांचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात हिवाळ्याच्या सुट्ट्याही विद्यार्थ्यांसाठी मिळतील.
थंडीची लाट येणार, हवामान विभागाने दिला अलर्ट
दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळामुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाल्याने थंडीच्या लाटेचा इशारा मिळाला आहे. यंदा कडाक्याची थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत थंडीचा जोर वाढला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात हवामान बदलत असून, पुणे, नाशिक, घाटमाथा आणि अहिल्यानगरमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात रात्री 7-8 डिग्रीपर्यंत तापमान खाली जाऊ शकते, ज्यामुळे पुणेकरांना गारठा जाणवतो आहे.
मुख्यमंत्री नाही, पण शपथविधीची तारीख ठरली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काल दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसतंय. अद्याप याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, शपथविधीचा कार्यक्रमही ठरला आहे. मुंबईत हा सोहळा पार पडणार आहे. मुंबईत 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी सुत्रांनी माहिती दिली आहे. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
भारतात धावणार पहिली हायड्रोजन रेल्वे
भारतीय रेल्वे लवकरच हरियाणामध्ये भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी घेणार आहे. अहवालानुसार, या ट्रेनमध्ये 8 प्रवासी डबे असतील, ज्यामध्ये एका वेळी 2,638 लोक प्रवास करू शकतील. तर, ट्रेनचा कमाल वेग 110 किमी/ तास असेल. यात हायड्रोजन सिलिंडर, फ्युएल सेल कन्व्हर्टर, बॅटरी आणि एअर रिझर्व्हसाठी तीन कप्पे असतील.
भारतामध्ये 23 पेक्षा अधिक वेगवेगळ्या भाषा
भारतामध्ये 23 पेक्षा अधिक वेगवेगळ्या भाषा, 13 लिप्या आणि 720 हून अधिक बोलीभाषा आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या या देशात भाषा आणि संस्कृतींचे मोठे महत्त्व आहे. प्रत्येक राज्य आणि प्रांताची स्वतंत्र ओळख असली तरी, ही भाषिक विविधता भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. देशभरातील या विविध भाषांचे संगोपन आणि संवर्धन महत्त्वाचे आहे.
2024 मध्ये बँकांकडून 1700000000000 रुपयांचे कर्ज माफ!
सर्वसामान्य नागरिक ज्याप्रमाणे कर्ज घेतात, त्याप्रमाणे मोठे उद्योजकही कर्जासाठी बँकाकडे धाव घेतात. दरम्यान कर्ज फेडता न आल्यावर अनेकजण कर्जमाफीसाठी अर्ज करतात. भारतीय बँकांनी 2023-24 (FY24) आर्थिक वर्षात 1.7 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. कर्जमाफीत पंजाब नॅशनल बँक (18 हजार 317 कोटी) अग्रेसर आहे. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, ICICI बँक आणि अॅक्सिस बँकेचा नंबर लागतो.
इंग्रजांनी 158 वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलावरुन अजूनही धावतात शेकडो ट्रेन
उत्तर प्रदेशातील बांदा-झांसी-कानपूर रेल्वे मार्गावरील 158 वर्ष जुना पूल, जो इंग्रजांनी 1965 मध्ये बांधला होता, अजूनही वापरात आहे. 2015 मध्ये त्याची तपासणी करून त्याची वयोमर्यादा 50 वर्षांनी वाढवली गेली होती. केंद्रीय पथकाने पुनः तपासणी केली आणि पुलाची परिस्थिती चांगली असल्याचे सांगितले. यामुळे पुन्हा 50 वर्षांसाठी पूल वापरण्याची मंजुरी देण्यात आली. हा पूल ऐतिहासिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.
ट्रेनचं तिकीट दुसऱ्याच्या नावावर असं करा ट्रान्सफर
भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक खास सुविधा म्हणजे तिकीट ट्रान्सफर. रद्द शुल्क टाळण्यासाठी प्रवासी कुटुंबातील सदस्यांच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करू शकतात. यासाठी, ट्रेन सुटण्याच्या किमान 24 तास आधी रेल्वे काऊंटरवर अर्ज करावा लागतो. कुटुंब सदस्याची ओळखपत्र आणि फोटो कॉपी घेऊन काऊंटरवर तिकीट ट्रान्सफर फॉर्म भरावा लागतो. यासोबतच, ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटावर बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा देखील आहे.
हे 15 अॅप्स लगेच डिलेट करा! अन्यथा बसेल फटका
भारतात सर्वाधिक लोकांकडे बनावट अॅप्स आहेत. अनेकांनी Google Play Store वरून असे अॅप डाउनलोड केले आहेत, जे त्वरित कर्ज देण्याचे आश्वासन देतात. परंतु प्रत्यक्षात हे फसवे अॅप आहेत. हे अॅप्स डाउनलोड करणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. हे अॅप्स तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि बँक डिटेल्स चोरू शकतात. त्यानंतर हे लोक तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढू शकतात. काही अॅप्स स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे अद्यापही तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स असतील तर लगेच डिलेट करा. वरील फोटोत पहा अॅप्सची यादी.
No comments:
Post a Comment