Benefits Of Sleeping Early2023 : रात्री उशीरापर्यंत
जागणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक, लवकर झोपल्यास मिळतात हे
फायदे
Vartaman News24: नमस्कार मित्रानो,आपले शरीर हीच आपली खरी संपत्ती असते .तिचे जतन करणे हे आपले
परम कर्त्यव्य आहे. आजच्या या आधुनिकीकरण करणात माणूस इतकाहरवून गेला आहे किस्वताच्या आरोग्याकडे लक्ष
देण्यासाठीही पुरेसा वेळ नाही. त्याचबरोबर
बदलती
जीवनशैली आणि बिझी रूटीन (busy lifestyle) यामुळे आजकाल लोकांचं
आयुष्य Life खूप फास्ट आणि व्यस्तही झालं आहे. दिवसभराच्या
धावपळीनंतर ना नीट जेवायला वेळ मिळतो आणि वेळेवर झोपणंही शक्य होत नाही पण या गोष्ठी मुले तुमचे आरोग्य नक्की सुधारेल चला तर मग जाणून
घेऊया .
तसंच काही लोक असेही असतात, ज्यांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. पण वेळेवर आणि लवकर झोपणं (Health
Benefits Of Sleeping Early) हे आपल्या आरोग्यासाठी किती गरजेचं
असतं हे तुम्हाला माहीत आहे का ?
खरंतर झोपण्याच्या चुकीच्या वेळेमुळे संपूर्ण आरोग्य
बिघडू शकतं आणि आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे झोपण्याची
योग्य वेळ कोणती (Best Time To Sleep) आणि त्याने काय
फायदे होतात, हे जाणून घेणे खूप महत्वाचे ठरते.
Benefits Of Sleeping Early:वेळेवर
झोपणे अतिशय महत्वाचे
नैसर्गिक सर्काडियन रिदमवर काम करण्यासाठी आपल्या
शरीराची रचना केली गेली आहे आणि ते सूर्योदय ते सूर्यास्त याच्याशी ताळमेळ साधन
कार्य करते. तसेच वेळेवर झोपल्याने झोपेचा हेल्दी पॅटर्न राखण्यास मदत होते. पण
चुकीच्या वेळी झोपल्याने आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. रात्री लवकर
झोपण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊया.
मानसिक आरोग्य चांगले राहते
झोपेच्या कमतरतेमुळे अनेक लोकांना चिंता आणि
डिप्रेशनचा सामना करावा लागतो. पण वेळेवर, लवकर झोपण्याची सवय
लावल्यास या समस्यांपासून सुटका होते. पुरेशी झोप घेतल्याने आपल्या मानसिक
आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो आणि स्ट्रेसही कमी होतो.
भूकेवर नियंत्रण राहते
जेव्हा आपल्याला चांगली आणि पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा आपले शरीर हे घ्रेलिन या भूकेच्या हार्मोनचे जास्त उत्पादन करते
आणि लेप्टिन हार्मोनचे उत्पादन कमी होते. त्यामुळे सतत भूक लागून जास्त खाल्ले
जाण्याचा तसेच वजन वाढण्याचाही धोका वाढतो. लवकर झोपलो आणि आणि पुरेशी झोप घेतली
तर या हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्यास आणि सकस आहार खाण्याची चांगली सवय लागण्यास
मदत होते.
आपण वेळेवर झोपलो तर शरीर रिलॅक्स होण्यास आणि पुन्हा
ताजेतवाने होण्यास पुरेसा वेळ मिळतो. यामुळे मूड चांगला राहतो, प्रोडक्टिव्हिटी वाढते तसेच शरीरही ॲक्टिव्ह राहते. तसेच पुरेशी झोप
घेतल्यामुळे मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार आणि लठ्ठपणा
यांसारख्या समस्या निर्माण होण्याचाधोका रहात नाही.
हार्मोन्स राहतात कंट्रोलमध्ये
लवकर आणि वेळेवर झोपल्यामुळे शरीरातील हार्मोन्स
कंट्रोल करण्यास मदत मिळते. विशेषत:स्ट्रेस हार्मोन्स. रात्री लवकर झोपल्याने
संपूर्ण आरोग्यावर अतिशय चांगला परिणाम होतो.
इम्यून सिस्टीम होते मजबूत
रात्री चांगली झोप घेतल्याने शरीरात जास्त प्रमाणात
पांढऱ्या रक्त पेशी निर्माण होण्यास मदत होते, जे इन्फेक्शन आणि
आजारांशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपल्या शरीराचे विविध
आजारांपासून संरक्षण होते.
(Disclaimer: The information and solutions given in this article
are based on common knowledge. We do not endorse it. Before adopting it,
consult an expert.
Smart electricity meter2023 अदानी समूहाने हाती घेतले स्मार्ट मीटर बसवण्याचे काम
नमस्कार मित्रानो,
आजच्या या ब्लोग मध्गे आपण Electricity खाजगीकीकरण य बद्दल माहिती पाहणार आहोत मित्रानो तुम्हाला महितीच आहे कि
विजेच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चालेल्या आहेत त्यातच विजेच्या येणाऱ्या अनेक
समस्या सुधा आपण पाहिलेले आहेत्या
गोष्टीला आळा बसवण्यासाठीadani electricityया सारख्या
कान्म्पान्या पुढे सरसावत आहे . काय आहे यामागचे नेमके कारण चला पाहुया
मोबाईल प्रमाणे आता Electricityसेवा सुद्धा प्रीपेड व पोस्टपेड होणार आहे त्यासाठी आता प्रत्येक
घरी जुने मीटर हटून स्मार्ट मीटर लावले जातील या प्रीपेड मीटर मध्ये पैसे संपले की
पेज पुरवठा खंडित केला जाईल रिचार्ज केल्यावर परत वीज सेवा सुरळीत होईल
महावितरणाने यासाठी 26 कोटी रुपयांच्या सहा निविदा वितरित
केल्या असून अदानी पावर adani electricityसह चार कंपन्यांना एल ओ ए लेटर ऑफ एक्सप्रेशन अर्थात
स्वीकारपत्र जारी करण्यात आली आहे आता या कंपन्यांना 69
महिन्यात राज्यभरातील 2.37 कोटी ग्राहकांचे मीटर बदलून
प्रीपेड स्मार्ट मीटर लावावे लागतील येत्या दहा वर्षापर्यंत मीटरच्या देखभाल
दुरुस्तीची जबाबदारी याच कंपन्यांची राहील.
एकूण सात निविदा जारी करण्यात आल्या होत्या
परंतु केवळ 1100 कोटी रुपयांची कोल्हापूरसाठी
जारीनिविदा वितरित होऊ शकली नाही सर्वाधिक काम आदाने समूहाला मिळालेले आहे असे
महावितरणाच्या सूत्रांनी म्हटलेले आहे
सिक्युरिटी आणि डिपॉझिट चे काय होईल?
महावितरण सिक्युरिटी डिपॉझिट च्या नावावर एक
महिन्याच्या बिलाचे पैसे आपल्याकडे ठेवते परंतु प्रीपेड मीटर आल्यानंतर कंपनीकडे
बिलाचे पैसे अगोदर येतील आता प्रश्न असा निर्माण होतो की स्मार्ट मीटर लागल्यानंतर
ग्राहकांना सिक्युरिटी डिपॉझिट परत केली जाईल की नाही
* मित्रांनो वीज वितरण यंत्रेचा आढावा
घेण्यासाठी नागपूर मध्ये आलेले महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र
यांनी सांगितले
* त्यांनी सांगितले की येत्या चार महिन्यात
मीटर बदलण्याच्या कामाला सुरुवात होईल परंतु नवीन कनेक्शन साठी पुढच्या
महिन्यापासून स्मार्ट मीटर देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत
* मोबाईल प्रमाणे हे स्मार्ट मीटर पोस्टपेड
व प्रीपेड असतील हे मीटर लागल्यानंतर थकबाकीची समस्या पूर्णपणे दूर होईल
विजेची हानी व चोरी रोखण्यासाठी महावितरण
राज्यभरात 27 हजार फीडर व चार लाख ट्रान्सफॉर्मर मध्ये
सुद्धा स्मार्ट मीटर लावण्यात येतील तसेच फिडर मध्ये अगोदरपासूनच मीटर लागलेले
आहेत परंतु चीप नसल्यामुळे त्यांचा फारसा उपयोग होणार नाही.
Ev scooter विक्रीत Ola ev scooter ने मारलेलीआहे बाजी ; जाणून घ्या सविस्तर...
Vartaman News 24 : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांसाठी
(ola ev) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.अशातच Ev scooterविक्रीत
Ola ev scooterने बाजी मारलेली दिसून येत आहे मारली
गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड
वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आलेली FAME
II सबसिडी 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली.
अलिकडच्या वर्षांत, ऑटोमोबाईल उद्योगाने टिकाऊ वाहतूक
पर्यायांकडे लक्षणीय बदल पाहिले आहे. या चळवळीतील सर्वात लक्षणीय भर म्हणजे ola ev scooter.
त्यामुळे जून महिन्यात ईव्हीच्या विक्रीत जवळपास
56 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र यावेळी ऑगस्ट महिन्यात ईव्हींनी पुन्हा
जोर पकडला असून बाजार पुन्हा चार्ज होताना दिसत आहे.
गेल्या जून महिन्यात ईव्हीच्या एकूण 45,984 युनिट्सची विक्री झाली, जी जुलै महिन्यात 11.55 टक्क्यांनी वाढून 51,299 युनिट्सवर पोहोचली.
दरम्यान, या महिन्यात दुचाकी सेगमेंटमध्ये Ola, TVS आणि Ather Energy यांच्यात टक्कर सुरू आहे. या
कालावधीत, कंपनीने 18 हजारांहून अधिक
युनिट्सची विक्री करून सेगमेंटमध्ये 40 टक्के कब्जा केला
आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एक स्कूटर iQube आहे. यासह
अथर एनर्जीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
ओला इलेक्ट्रिक आणि अथर एनर्जी या दोन्ही
कंपन्या स्वस्त
इलेक्ट्रिक स्कूटर आणण्यासाठी स्पर्धा करत आहेत.
अलीकडच्या काळात ओला ईव्हीने आपली सर्वात स्वस्त ईव्ही ओला एस एअर लाँच केली आहे. ola ev price 1,09,999 (एक्स-शोरूम) आहे. ही
किंमत 15 ऑगस्टपर्यंत लागू आहे. यानंतर, ola ev scooter price10,000
रुपयांपर्यंत वाढविली जाईल.
OlaS1 एअर
ओला S1 एअर कंपनीचा
दावा आहे की, ही स्कूटर पूर्वीपेक्षाही चांगला परफॉर्मेंस
देईल. ही स्कूटर नवीन निऑन ग्रीन कलरमध्ये सादर करण्यात आली आहे. हे 2.7kW मोटरसह सादर केले गेले होते, परंतु आता 4.5kW
युनिटसह अपग्रेड केले गेले आहे. बेल्ट-ड्राइव्हऐवजी आता मोटार
वापरण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ते एका चार्जमध्ये 125 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.
अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर, एथर एनर्जीने आपले सर्वात किफायतशीर मॉडेल सादर केले आहे. कंपनीने या
स्कूटरचा नवीन टीझर देखील जारी केला आहे, त्याची सुरुवातीची
किंमत 1,29,999 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.
नवीन Ather 450S सिंगल चार्जवर 115 किमीच्या
IDC रेंजसह आणि 90 किमी प्रतितास या वेगवान
गतीसह येईल.
Marathi Actor beat cancer : या मराठमोळ्या अभिनेत्यांनी केली कॅन्सर सारख्या भयंकर आजारावर मात
नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण सकारात्मक ऊर्जेचा वापर करून कशा पद्धतीने मृत्यूवरही विजय मिळवता येते गोष्ट आहे एका अशा मराठी अभिनेत्याची ज्यांनी बिकट परिस्थितीत ही स्वतःला सावरून न डगमगता न घाबरता कॅन्सर(cancer) सारख्या भयंकर आजारावर मात केले आणि आज आनंदाने पुढील आयुष्य मनमोकळेपणाने जगत आहे आणि त्या अभिनेत्याचे नाव शरद पोंक्षे असे आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याना आलेले अनुभव बद्दल थोडीशी माहिती.
अभिनेते शरद पोंक्षे आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या परखड विचारांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराशी सामना करून त्यावर मात केली. नुकतंच एका रियलटी शो मध्ये पोंक्षे यांनी आपल्या कॅन्सरच्या लढाईबद्दल सांगितलं. कशाप्रकारे शरद पोंक्षे यांनी या जीवघेण्या आजाराबरोबरची लढाई जिंकली वाचा.
शरद पोंक्षे म्हणाले की, “कुठलंही संकट असो, शारिरीक, मानसिक किंवा आर्थिक हे पहिलं स्वीकारायला शिका. आपण स्वीकारत नाही, स्वीकारायलाच खूप वेळ घेतो. मग त्याच्यामध्ये मार्ग सापडायला अजून पुढे वेळ जातो. मी दुसऱ्या दिवशी स्वीकारलं, मला कॅन्सर झालाय. डॉक्टरांनी सांगितलं, ५० टक्के जगणार ५० टक्के मरणार. जर काही चमत्कार झाला तरच जगणार. सामान्य माणूस आहे. त्यामुळे पायाखालची जमीन सरकली. अरे बापरे ही काय भानगड झाली? हा एक रात्र विचार केला. पण दुसऱ्या दिवशी स्वीकारलं. डॉक्टर म्हणाले चलो, लढते है अभी. आता काय-काय करायचं आहे ते सांगा. माझा आध्यात्मावर विश्वास आहे. त्यामुळे घरात गेल्यावर आध्यात्मिक काय-काय करू शकतो? आयुर्वेदात काय-काय उपचार आहेत? हे सगळं शोधायला सुरुवात केली. मैदानात उतरलो आहे, तर आता लढायचं आहे. लढण्यापूर्वी पहिले शस्त्र काय-काय आहेत? मग घोड्यावर बसून लढायला जायचं आहे? की बाईकवर बसून जायचं आहे? रणगाड्यात बसून जायचं आहे की कसं? माझ्याकडे उपलब्ध काय-काय आहे? तर माझ्याकडे एवढे-एवढे पैसे आहेत हे पाहून बॉम्बे हॉस्पिटलला गेलो. सुई, उपचार तेच असतात. उगाच ते दाखवायला असतं की, इंग्लंडला जाऊन मी उपचार घेतले. त्याची काही गरज नाहीये. कुठल्याही जगातील इतर देशात जायची गरज नाहीये. भारतामध्ये मुंबई शहरात जगातील सर्वोत्तम उपचार मिळतात. जगातील सर्वोत्तम डॉक्टर, इंजिनिअर आपल्या देशात आहेत
पुढे पोंक्षे म्हणाले की, “हे सगळं झाल्यावर पहिला वेळ कशात जातो? तर मलाच का झालं? मी कोणाच काय वाकडं केलं? हा स्वतःबद्दलचा खूप मोठा गैरसमज आहे. प्रत्येकाला असं वाटतं असतं की, मी कोणाचं काय वाकडं केलं नाही. मी कोणाशी काही वाईट वागलो नाही. खूप वाईट आणि घाणेरडे वागले असतात. अनेकाच कळत-नकळत खूप वाटोल केलेलं असतं. पण मात्र स्वतःला सांगत असतो की, मी कधी कोणाचं वाईट केलेलं नाही. मग माझ्याच वाट्याला का आलं? हे माझे भोग आहेत. कधीतरी मी कोणाशी वाईट वागलो असेल. कुणाला तरी दुखावलं असेल. त्या सगळ्याचे परिणाम आता माझे मला आलेले आहेत. म्हणून शिक्षा भोगून संपवू या, हे स्वीकारा.
“खरी लढाई माणूस मैदानात जिंकत नाही, तर स्ट्रॅटेजीमध्ये जिंकतो. लढायला उतरण्याच्या आधीची रात्र असते ना. काय करायचं आहे? कशा पद्धतीने लढायची आहे? समोरचा शत्रू कोण आहे? शिवाजी महाराजांकडे काय होतं? ५ लाख औरंजेबाच्या सैन्यासमोर ५-१० हजार सैन्य घेऊन ते लढायचे. जिंकायचे का? तर स्ट्रॅटेजी. स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या बुद्धीमत्तेवर विश्वास, स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास म्हणूनच त्याच्यातून ते बाहेर आले ना. एकदम समोरासमोर गेलो तर आपण नाही जिंकू शकणार. मग बिळातून बाहेर याचं आणि लढायचं. यातून गनिमी कावा निर्माण झाला. परिस्थितीतून मार्ग काढला. बाजीराव पेशवे का नाही एकही लढाई हरले? हरू शकले असते समोरासमोर लढले असते पण नाही. लढाई लढायच्या अगोदरची स्ट्रॅटेजी ठरवणं फार महत्त्वाचं आहे,” अशी उदाहरण देत शरद पोक्षें यांनी पुढे आपल्या कॅन्सरच्या लढाईबद्दल सांगितलं.
“आता माझी लढाई कोणाशी आहे, कॅन्सरीबरोबर आहे. तो बरा न होणारा आहे. पण त्याला मी बरा करतो. शरीरात आणि आयुष्यात बदल काय-काय होऊ शकतात. तर मग आर्थिक गणित बिघडणार आहे. पुढील वर्षभर मी एकही रुपया कमवणार नाहीये. घरात कोणी कमवणार नाहीये. आर्थिक परिस्थितीत काय-काय करावं लागेल. इकडे काय करावं लागेल तिकडे काय करावं लागेल, अशा सगळ्या लढायांचा विचार केला गेला. पाच-सहा दिवस घेतले आणि मग उभा राहिलो. बॉम्बे हॉस्पिटलच्या इथे टॅक्सीतून उतरलो अन् म्हंटलं चलो. गेलो १० मजल्यावर लाव ऑक्सिजन म्हंटलं, झालं. म्हणून मी कॅन्सरची लढाई जिंकलो. जर सेनापती उभा राहिला ना मग प्रत्येकजण त्याच्यासाठी लढायला उभा राहतो. तशी माझी बायको. मनापासून जे काही आध्यात्मिक आहे, ते माझ्यासाठी करायला लागली. माझी मुलं बापासाठी जे काही करू शकता, ते करायला तयार झाली. माझ्या आईने अथर्वशीर्ष मंत्र उपचार सुरू केले. मग तुळस आण, कडुलिंबाचा पाला आण, ते सगळं मिक्स करू रोज सकाळ-संध्याकाळ द्यायला सुरू केलं.”
पुढे शरद पोंक्षे म्हणाले की, “मग केस गेले. विचित्र केस झाले. माझे एवढे सुंदर, घनदाट आणि मस्त केस होते. पण आता ते गेले परत तर कधी येणार नाहीत. मग काय करायचं? याच्यावर मार्ग काढू या म्हंटलं. दोन-चार विग मेकर्सना विचारलं, ते पण काही व्यवस्थित सांगेना. आलेले थोडेफार काही केस आहेत, ते पण नीट होईना. मग मुलगा म्हणाला, बाबा अंधेरीला हेअर रिन्यूएशनचा चांगला स्टुडिओ आहे, तिथे जाऊन बघू या. मग तिथे गेलो. ते बांगलादेशी मुलगी चालवते. ती म्हणाली, मी करून देते. तिनं मला हा विग बनवला. हा विग आहे, हे मला सांगायला काही लाज वाटत नाही. त्यात लपवायच काय? खोटं वागायचंच नाही. काही गरजच नाही.”
अशा प्रकारच्या सकारात्मक विचाराने या अभिनेत्याने मृत्यूवरही विजय मिळवला. सांगायचा तात्पर्य एवढाच आहे की, आपल्याला अनेक अडचणी असतात, आणि प्रत्येकाच्या अडचणी या वेगवेगळ्या असतात या अडचणींवर काहींना उपाय सापडते तर काहींना यावर काहीच इलाज नसते.त्यामुळे मित्रांनो,खचून न जाता, हरवून न जाता सकारात्मक विचाराने तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील