नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
महाराष्ट्रातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आता 15 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे, ज्यामुळे दप्तराचे वजन वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 7 ते 8 विषय होते, पण नव्या आरखड्यानुसार यामध्ये व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण, आंतरविद्याशाखा विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
पंजाब अँड सिंध बँकेत जॉबची संधी!
पंजाब अँड सिंध बँकेने अप्रेंटिस पदांसाठी 100 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 16 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत punjabandsindbank.co.in वर अर्ज करू शकतात. 30 जागा दिल्लीसाठी, तर 70 जागा पंजाबसाठी आहेत. अर्जदाराने apprenticeshipindia.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्रतेसाठी, उमेदवार पदवीधर असावा आणि वय 20 ते 28 वर्षे असावे. अर्ज शुल्क सामान्य आणि OBC साठी 200 रुपये, तर SC/ST/PWD साठी 100 रुपये आहे.
निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला मोठा दणका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली 'मुख्यमंत्री योजनादूत' योजना निवडणुकीच्या आचारसंहितामुळे स्थगित करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. या योजनेत 50 हजार तरुणांना सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी नेमले होते, ज्यात प्रत्येकाला 10 हजार रुपये मासिक वेतन देण्यात येत होते. विरोधकांनी या योजनेत भाजप व आरएसएस कार्यकर्त्यांना सामील करून भाजपचा प्रचार केला जात असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे नाना पटोले यांनी योजनेला स्थगित करण्याची मागणी केली होती.
शरद पवार गटाच्या 80 उमेदवारांची यादी जाहीर होणार
वंचित आणि रासप सोडून इतर कोणत्याही पक्षाने अद्याप एकाही उमेदाराच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या नावांकडे लक्ष लागले आहे. त्यातच शरद पवार गटाची कोअर कमिटीची उद्या बैठक होणार आहे. त्यानंतर सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. आज अनेक उमेदवारांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली आहे. दरम्यान, सोमवारी 80 उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार, अशी माहिती मिळतेय.
कोल्हापूर वैद्यकीय महाविद्यालयात 102 जागांसाठी भरती
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे 102 जागांसाठी भरती सुरू आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 असून, वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे. लिंक https://drive.google.com/file/d/1NQUU wIMbEujvotyFBDup -KUabf202j/view
खुशखबर! डिलिव्हरी बॉय, कंत्राटी कामगारांना मिळणार पेन्शन
कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या 'गिग' कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. या कामगारांना पेन्शन आणि आरोग्यसेवा यासारखे सामाजिक सुरक्षा लाभ देण्याचे धोरण तयार केले जात असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्रीमनसुख मांडविया यांनी दिली आहे. देशात गिग व्यवहार आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी संबंधित 65 लाख कामगार आहेत. या क्षेत्रात होत असलेली झपाट्याने वाढ़ लक्षात घेता ही संख्या 2 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, असं मांडविया यांनी सांगितले. त्यामुळे डिलिव्हरी बॉयलाही फायदा होण्याची शक्यता आहे.