Fiverr

Wednesday, October 16, 2024

Trending topics today:पालघरमध्ये पुन्हा भूकंप

 पालघरमध्ये पुन्हा भूकंप


पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. दुपारी 4:47 वाजता भूकंपाचे हादरा जाणवले. त्यामुळे नागरिक घराबाहेर पळाले. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किमी खोल, डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ असल्याची माहिती आहे. दरम्यान 2018 पासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत.


महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 ला निकाल



- महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान - 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी - म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल - उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

- अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरपर्यंत होणार

- उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार - निवडणूक आयोगाची घोषणा




महाराष्ट्र विधानसभा- कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा?


महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. तर, 288 जागांवर मतदान होणार आहे. यातील 234 जागा सर्वसाधारण उमेदवारांसाठी, एसटी प्रवर्गासाठी 25, 29 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा काळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहेत. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार आहेत. महाराष्ट्रात 1 लाख 186 पोलिंग बूथ असतील. दरम्यान, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.



शाळांना फक्त 14 दिवसांची सुट्टी!



चालू शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू असून 27 ऑक्टोबरला शाळांना दिवाळीची सुट्टी लागेल. 14 दिवसांची सुट्टी असून, शाळा 11 नोव्हेंबरपासून सुरू होतील.

शासनाने शाळांना परीक्षा 27 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत, तर काही शाळांमध्ये या आठवड्यात सुरू होतील.


महायुतीत तणाव वाढला!





सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीत तणाव वाढला आहे. विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपा नेते राजन तेली यांनी बंडखोरी केली आहे. भाजपा आणि शिंदे गटाची युती असूनही, तेली यांनी केसरकर यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे. तेली यांनी सावंतवाडीत शक्तिप्रदर्शन करत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि पक्षात अन्याय सहन न करण्याचा निर्धार व्यक्त केला. ते भाजप सोडणार का, याबाबत गुप्तता राखण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...