रेशन कार्ड ई-केवायसी करण्यास 1 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण, शिधापत्रिका ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. शिधापत्रिका धारक आता 1 डिसेंबर 2024 पर्यंत ई-केवायसी करु शकणार आहेत. यापूर्वी 31 ऑक्टोबरपर्यंत रेशन कार्ड ई केवायसी करण्याचे आवाहन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत करण्यात आले होते. बोगस रेशनकार्ड धारकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने ही अट घातली आहे. मात्र आता ती मुदत वाढवण्यात आलीय. त्यामुळे तुम्ही निवांत 1 डिसेंबरपर्यंत रेशन कार्ड ई-केवायसी करून घेऊ शकता.
दिवाळी- आज प्रथमच दोन राष्ट्रवादी, दोन पवार पाडवे
दरवर्षी बारामतीत पवार कुटुंबात मोठ्या थाटामाटात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. मात्र, यंदा पवार कुटुंब एकत्र नसणार आहे. कारण राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने पवार कुटुंबही फुटले आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्यानिमित्त आज पवार कुटुंबात पहिल्यांदाच दोन वेगवेगळे पाडवे साजरे होणार आहेत. गोविंदबागेत शरद पवार कुटुंबियांसह पाडवा साजरा करतील. तर अजित पवार काटेवाडी गावात पाडवा साजरा करणार आहेत. मात्र जुन्या मुळ राष्ट्रवादी आणि संपूर्ण पवार कुटुंब प्रेमींसाठी आजचा दिवस सहजासहजी पचवता येणार नाही, असं बोललं जातंय.
महाराष्ट्रात वाढली कडाक्याची थंडी
महाराष्ट्रात हळूहळू थंडी वाढत आहे, ज्यामुळे नागरिकांची कडाक्याची थंडी अनुभवल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः नाशिक, पुणे आणि आणि औरंगाबादच्या भागात तापमान कमी झाल्याने लोकांना थंडीच्या लहरींचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत थंडीच्या वाढत्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे गरम कपड़े आणि चहा कॉफीच्या मागणीत वाढ झाली आहे. कृषी उत्पादनावरही या थंडीचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
सोलापुरातील उड्डाणपुलाचा प्रश्न जैसा थेच
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार आ. विजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोठे म्हणाले, पीडब्ल्यूडीचे खातेदेखील यांच्याकडे होते. १० वर्षे झाली अजूनही सोलापुरातील उड्डाणपुलाचा प्रश्न जैसा थेच आहे. शहराला दररोज पाणी पुरवठा करतो म्हणाले हाही प्रश्न तसाच आहे. यांनी फक्त आश्वासनच दिले. जाती-पाती मध्ये तेढ निर्माण करणे, कुटुंबा-मित्रांमध्ये फूट पाढून भांडणे लावून निवडून येण्यासाठी फक्त राजकारणच केले आहे.
भारतीय अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ??
भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 मध्ये जेम्स विल्सन यांनी सादर केला. स्वातंत्र्यानंतर, आर. के. शनमुखम चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर 1947 रोजी पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 1955 पासून अर्थसंकल्प हिंदीतही छापला जाऊ लागला. 2017 मध्ये, रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन झाला. मनमोहन सिंग यांचा 1991 चा बजेट सर्वाधिक लांब तर एच. एम. पटेल यांचा 1977 चा सर्वात छोटा. खास बजेट्समध्ये 'ब्लॅक बजेट' (1973), 'ड्रीम बजेट' (1998), आणि 'रोलबॅक बजेट' (2002) यांचा समावेश होतो.
पालकांनी या चूका केल्याने मुलांचा आत्मविश्वास होतो कमी
पालकांनी मुलांच्या आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या काही चुका टाळाव्यात, अन्यथा त्यांच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. सर्वप्रथम, मुलांच्या क्षमतांचा कमी आढावा घेणे किंवा त्यांच्यावर चुकता म्हणून टीका करणे यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. दुसरे म्हणजे, त्यांची तुलना इतरांबरोबर करणे. याशिवाय, त्यांच्यासोबत संवाद साधताना त्यांची भावना न समजून घेणे आणि त्यांच्या यशावर किंवा प्रयत्नांवर कमी महत्त्व देणे हेही टाळावे.
राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांमध्ये फी वाढली
राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांमध्ये एनडीए प्रवेशात टक्का वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने धोरणात सुधारणा केली आहे. 20 वर्षांनी शुल्क वाढवून वार्षिक 50 हजार रुपये करण्यात आले आहे. राज्यात 38 अनुदानित सैनिकी शाळा असून, कमी एनडीए निवडीमुळे सुधारित धोरण लागू केले आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण व केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम लागू होणार आहे. बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एनडीए परीक्षा बंधनकारक असेल, अन्यथा शाळांचे अनुदान बंद होईल.
भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
भारतीय रेल्वेने प्रवाशांना दोन रंगाचे कोच, निळे आणि लाल, दाखवण्यास सुरुवात केली आहे. निळे कोच जुनी आयसीएफ तंत्रज्ञानाची आहेत, तर लाल कोच नवीन एलएचबी तंत्रज्ञानाचे आहेत. भारतीय रेल्वेने निळे कोच बदलून 2026-27 पर्यंत सर्व कोच लाल रंगाचे करण्याचा निर्णय घेतला आहे. एलएचबी कोच हलके, स्टेनलेस स्टीलचे असून, डिस्क ब्रेक आणि कमी देखभाल खर्च यासह 200 किमी प्रतितास वेग सहन करतात. निळे कोच 1952 पासून बनत आहेत आणि ते स्टीलपासून बनलेले असून, अधिक देखभाल खर्च लागतो. रेल्वेने आता एलएचबी कोचची निर्मिती सुरू केली आहे.
नाशिक: पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा 8 नोव्हेंबरला
महायुतीकडून पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या महाराष्ट्रात एकूण 8 प्रचार सभा होणार आहेत. महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा होणार आहे. महायुतीकडून 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रचारसभांचा श्रीगणेशा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि धुळे येथे एक-एक सभा होणार आहे. नाशिक येथील ग्राउंडला मोदी ग्राउंड नाव दिले आहे. भाजप नेते गिरीष महाजन यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना- अजित पवारांनी सांगितला थेट आकडा
'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना केंद्रस्थानी आहे. ही योजना नंतर बंद होईल असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जर अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर मागचा अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटींचा होता. पुढचा अर्थसंकल्प सात लाख कोटींचा असेल, त्यातील 45 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी असतील', शेतकऱ्यांचं सर्व वीज बिल माफ केलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय.
या चार गोष्टी सोडा, नाहीतर तुम्ही व्हाल गरीब
आर्य चाणाक्यांनी व्यवहाराच्या अनेकविध ट्रीक्स सांगितल्या आहेत. आर्य चाणक्यांच्या मते तुम्ही चार गोष्टी त्यागल्या पाहिजेत. नाहीतर तुम्ही गरीबच राहू शकता. आळस, लोभ, अज्ञान व असुरक्षितता या त्या चार गोष्टी आहेत. आळशी लोक गरीबीत खितपत पडतात. लोभ तुम्हाला समाधानी राहू देत नाही. अज्ञान तुम्हाला निर्णय घेण्यापासून रोखते आणि असुरक्षितता तुम्हाला आत्मविश्वाने काम करण्यापासून दूर ठेवते असे चाणक्य सांगतात. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही या चार गोष्टी आवर्जुन सोडून देऊन जोमाने कामाला लागा.
सोलापूर: सैन्यात अधिकारी होण्यासाठी मोफत प्रशिक्षण
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर यांनी केले आहे. शासनातर्फे नवयुवक व युवतींसाठी 2 ते 11 डिसेंबर दरम्यान प्रशिक्षण आयोजिले आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कार्यालय सोलापूर येथे 26 नोव्हेंबर रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे.
आशा सेविकांना 6 हजार रुपये दिवाळी भेट
ठाणे महापालिकेच्या वर्ग 2 ते 4 च्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट मिळाले. त्यानंतर आता आशा सेविकांचीही दिवाळी सरकारने गोड केली आहे. आशा सेविकांनाही पालिकेने 6 हजार रुपयांची दिवाळी भेट दिली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांबरोबरच आशा सेविकांनाही दिवाळीत गिफ्ट मिळाले आहे. दरम्यान, महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 24 हजार रूपये देण्यात आले आहेत. आशा सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासही मदत केलेली आहे.