Fiverr

Saturday, November 2, 2024

Today news

 रेशन कार्ड ई-केवायसी करण्यास 1 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ



रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण, शिधापत्रिका ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. शिधापत्रिका धारक आता 1 डिसेंबर 2024 पर्यंत ई-केवायसी करु शकणार आहेत. यापूर्वी 31 ऑक्टोबरपर्यंत रेशन कार्ड ई केवायसी करण्याचे आवाहन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत करण्यात आले होते. बोगस रेशनकार्ड धारकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने ही अट घातली आहे. मात्र आता ती मुदत वाढवण्यात आलीय. त्यामुळे तुम्ही निवांत 1 डिसेंबरपर्यंत रेशन कार्ड ई-केवायसी करून घेऊ शकता.



दिवाळी- आज प्रथमच दोन राष्ट्रवादी, दोन पवार पाडवे



दरवर्षी बारामतीत पवार कुटुंबात मोठ्या थाटामाटात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. मात्र, यंदा पवार कुटुंब एकत्र नसणार आहे. कारण राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने पवार कुटुंबही फुटले आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्यानिमित्त आज पवार कुटुंबात पहिल्यांदाच दोन वेगवेगळे पाडवे साजरे होणार आहेत. गोविंदबागेत शरद पवार कुटुंबियांसह पाडवा साजरा करतील. तर अजित पवार काटेवाडी गावात पाडवा साजरा करणार आहेत. मात्र जुन्या मुळ राष्ट्रवादी आणि संपूर्ण पवार कुटुंब प्रेमींसाठी आजचा दिवस सहजासहजी पचवता येणार नाही, असं बोललं जातंय.




महाराष्ट्रात वाढली कडाक्याची थंडी



महाराष्ट्रात हळूहळू थंडी वाढत आहे, ज्यामुळे नागरिकांची कडाक्याची थंडी अनुभवल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः नाशिक, पुणे आणि आणि औरंगाबादच्या भागात तापमान कमी झाल्याने लोकांना थंडीच्या लहरींचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत थंडीच्या वाढत्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे गरम कपड़े आणि चहा कॉफीच्या मागणीत वाढ झाली आहे. कृषी उत्पादनावरही या थंडीचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.



सोलापुरातील उड्डाणपुलाचा प्रश्न जैसा थेच



सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार आ. विजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोठे म्हणाले, पीडब्ल्यूडीचे खातेदेखील यांच्याकडे होते. १० वर्षे झाली अजूनही सोलापुरातील उड्डाणपुलाचा प्रश्न जैसा थेच आहे. शहराला दररोज पाणी पुरवठा करतो म्हणाले हाही प्रश्न तसाच आहे. यांनी फक्त आश्वासनच दिले. जाती-पाती मध्ये तेढ निर्माण करणे, कुटुंबा-मित्रांमध्ये फूट पाढून भांडणे लावून निवडून येण्यासाठी फक्त राजकारणच केले आहे.




भारतीय अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ??



भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 मध्ये जेम्स विल्सन यांनी सादर केला. स्वातंत्र्यानंतर, आर. के. शनमुखम चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर 1947 रोजी पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 1955 पासून अर्थसंकल्प हिंदीतही छापला जाऊ लागला. 2017 मध्ये, रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन झाला. मनमोहन सिंग यांचा 1991 चा बजेट सर्वाधिक लांब तर एच. एम. पटेल यांचा 1977 चा सर्वात छोटा. खास बजेट्समध्ये 'ब्लॅक बजेट' (1973), 'ड्रीम बजेट' (1998), आणि 'रोलबॅक बजेट' (2002) यांचा समावेश होतो.



पालकांनी या चूका केल्याने मुलांचा आत्मविश्वास होतो कमी



पालकांनी मुलांच्या आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या काही चुका टाळाव्यात, अन्यथा त्यांच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. सर्वप्रथम, मुलांच्या क्षमतांचा कमी आढावा घेणे किंवा त्यांच्यावर चुकता म्हणून टीका करणे यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. दुसरे म्हणजे, त्यांची तुलना इतरांबरोबर करणे. याशिवाय, त्यांच्यासोबत संवाद साधताना त्यांची भावना न समजून घेणे आणि त्यांच्या यशावर किंवा प्रयत्नांवर कमी महत्त्व देणे हेही टाळावे.



राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांमध्ये फी वाढली



राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांमध्ये एनडीए प्रवेशात टक्का वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने धोरणात सुधारणा केली आहे. 20 वर्षांनी शुल्क वाढवून वार्षिक 50 हजार रुपये करण्यात आले आहे. राज्यात 38 अनुदानित सैनिकी शाळा असून, कमी एनडीए निवडीमुळे सुधारित धोरण लागू केले आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण व केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम लागू होणार आहे. बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एनडीए परीक्षा बंधनकारक असेल, अन्यथा शाळांचे अनुदान बंद होईल.




भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय





भारतीय रेल्वेने प्रवाशांना दोन रंगाचे कोच, निळे आणि लाल, दाखवण्यास सुरुवात केली आहे. निळे कोच जुनी आयसीएफ तंत्रज्ञानाची आहेत, तर लाल कोच नवीन एलएचबी तंत्रज्ञानाचे आहेत. भारतीय रेल्वेने निळे कोच बदलून 2026-27 पर्यंत सर्व कोच लाल रंगाचे करण्याचा निर्णय घेतला आहे. एलएचबी कोच हलके, स्टेनलेस स्टीलचे असून, डिस्क ब्रेक आणि कमी देखभाल खर्च यासह 200 किमी प्रतितास वेग सहन करतात. निळे कोच 1952 पासून बनत आहेत आणि ते स्टीलपासून बनलेले असून, अधिक देखभाल खर्च लागतो. रेल्वेने आता एलएचबी कोचची निर्मिती सुरू केली आहे.




नाशिक: पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा 8 नोव्हेंबरला



महायुतीकडून पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या महाराष्ट्रात एकूण 8 प्रचार सभा होणार आहेत. महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा होणार आहे. महायुतीकडून 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रचारसभांचा श्रीगणेशा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि धुळे येथे एक-एक सभा होणार आहे. नाशिक येथील ग्राउंडला मोदी ग्राउंड नाव दिले आहे. भाजप नेते गिरीष महाजन यांनी सांगितले.




लाडकी बहीण योजना- अजित पवारांनी सांगितला थेट आकडा



'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना केंद्रस्थानी आहे. ही योजना नंतर बंद होईल असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जर अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर मागचा अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटींचा होता. पुढचा अर्थसंकल्प सात लाख कोटींचा असेल, त्यातील 45 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी असतील', शेतकऱ्यांचं सर्व वीज बिल माफ केलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय.



या चार गोष्टी सोडा, नाहीतर तुम्ही व्हाल गरीब



आर्य चाणाक्यांनी व्यवहाराच्या अनेकविध ट्रीक्स सांगितल्या आहेत. आर्य चाणक्यांच्या मते तुम्ही चार गोष्टी त्यागल्या पाहिजेत. नाहीतर तुम्ही गरीबच राहू शकता. आळस, लोभ, अज्ञान व असुरक्षितता या त्या चार गोष्टी आहेत. आळशी लोक गरीबीत खितपत पडतात. लोभ तुम्हाला समाधानी राहू देत नाही. अज्ञान तुम्हाला निर्णय घेण्यापासून रोखते आणि असुरक्षितता तुम्हाला आत्मविश्वाने काम करण्यापासून दूर ठेवते असे चाणक्य सांगतात. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही या चार गोष्टी आवर्जुन सोडून देऊन जोमाने कामाला लागा.


सोलापूर: सैन्यात अधिकारी होण्यासाठी मोफत प्रशिक्षण




भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर यांनी केले आहे. शासनातर्फे नवयुवक व युवतींसाठी 2 ते 11 डिसेंबर दरम्यान प्रशिक्षण आयोजिले आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कार्यालय सोलापूर येथे 26 नोव्हेंबर रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे.



आशा सेविकांना 6 हजार रुपये दिवाळी भेट



ठाणे महापालिकेच्या वर्ग 2 ते 4 च्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट मिळाले. त्यानंतर आता आशा सेविकांचीही दिवाळी सरकारने गोड केली आहे. आशा सेविकांनाही पालिकेने 6 हजार रुपयांची दिवाळी भेट दिली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांबरोबरच आशा सेविकांनाही दिवाळीत गिफ्ट मिळाले आहे. दरम्यान, महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 24 हजार रूपये देण्यात आले आहेत. आशा सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासही मदत केलेली आहे.






Friday, November 1, 2024

Today news topic

 लाडकी बहीण योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात




महाराष्ट्र सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. या योजनेमुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी संपाचा इशारा दिला होता. अखेर सरकारने सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन दिल्याने बँक कर्मचाऱ्यांनी 16 नोव्हेंबर रोजीचा संप मागे घेतला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने दिलेल्या निवेदनात सांगितले की, जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा प्राथमिकतेने देण्याचे निर्देश दिले जातील.




महिन्याला 12500 रुपये गुंतवून मिळवा तब्बल 40,68,209 रुपये



पीपीएफ स्कीममध्ये महिन्याला 12,500 रुपये गुंतवून 15 वर्षांत 41 लाख रुपये मिळवण्याची संधी आहे. या योजनेत वार्षिक 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. 7.1% व्याज दरावर 15 वर्षांच्या कालावधीत, 22,50,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 18,18,209 रुपये व्याज मिळेल. यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी एकूण 40,68,209 रुपये मिळतील. पीपीएफ स्कीम आर्थिक स्थिरतेसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.




काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश



कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांचे पती चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यामुळे त्या नाराज होत्या. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जयश्री जाधव यांची शिवसेनेत घरवापसी झाली आहे आणि महिलांसाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे.



उद्या पुन्हा भीडणार भारत- पाकिस्तान



भारत- पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हटली की साऱ्या जगातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा त्याकडे खिळून राहतात. उद्या 1 नोव्हेंबरला भारत- पाकिस्तान क्रिकेट मॅच रंगणार आहे. हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत हा सामना होत असून, अवघ्या 5-5 ओव्हरचा हा समना असणार आहे. एका संघात फक्त सहा खेळाडू असतील. भारतीय संघात कर्णधार रॉबिन उथप्पा, केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, भरत चिपली, श्रीवत्स गोस्वामी, स्टुअर्ट बिन्नी यांचा सहभाग आहे.




ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घरसण



सर्वत्र दिवाळीचा धुमधडाका सुरू आहे. अशातच सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांकरीता दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात जवळपास 150 रुपयांची घसरण झाली आहे. सराफा बाजाराज आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 79 हजार 800 रुपये असा आहे. तर एक किलो चांदीचा दर 97 हजार 300 रुपये असा आहे.



सोलापूर: आता सोनिया गांधी यांना भेटणार



सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून माकपला जागा सोडावी म्हणून आता सोनिया गांधी यांना भेटणार

असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिली. तसेच चार तारखेपर्यंत ही जागा सोडून घेण्यास प्रयत्न करणार असून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत 31 जागा आल्या म्हणून हवेत जाऊ नये व महाराष्ट्राचा हरियाणा करू नका असे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर काँग्रेसने माकपला उमेदवारी न सोडल्यास पाच नोव्हेंबर रोजी लोकसभा निवडणुकी वेळी काय ठरले होते याचा बॉम्बस्फोट करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.





पॉवरग्रीड कार्पोरेशन; 802 जागा




पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 802 जागांसाठी ही भरती होत आहे. डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रीकल व सिव्हिल), ज्युनिअर ऑफिसर (एचआर/एफअँडए), असिस्टेंट ट्रेनी या पदांचा यात समावेश आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबर आहे. शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. www.powergrid.in




1 नोव्हेंबरपासून लागू होणारे नवे नियम



- रेल्वे प्रशासी आता प्रवासी 60 दिवस अगोदर तिकीट आरक्षित करू शकतील, जे पूर्वी 120 दिवस होते. - भारतीय रिझर्व्ह बँकेने डोमॅस्टिक मनी ट्रान्सफरच्या नियमांत बदल केला आहे. ज्यामुळे ग्राहकांचे फसवणुकीपासून संरक्षण वाढेल.

- गॅस सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. - गॅस सिलिंडरासोबतच ATF-CNG च्या दरातही दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल केला जातो. - क्रेडिट कार्ड युजर्ससाठी 50 हजारांपेक्षा कमी युटिलिटी बिलांवर कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. - म्युच्युअल फंडाच्या इन्ससाईडर ट्रेडिंगच्या नियमांत बदल होणार आहेत.




सोलापूर: मतदारांना मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत द्या




सोलापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हयातील खाजगी कंपन्या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल किंवा इतर आस्थापना इत्यादीना सुचना देण्यात येत आहे कि, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित अस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आहे.



सोलापूर: प्रणिती शिंदे काँग्रेसच्या स्टार प्रचारक



काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर स्टार प्रचारक म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. प्रणिती शिंदे या विधानसभा निवडणूक कालावधी रॅली, सभा आदींद्वारे काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार करणार आहेत.



दिवाळी खुशखबर! सरकारी नोकरीच्या 0229 जागा, पगार 25,500 पासून



भरती श्रेणी: समाज कल्याण विभाग महाराष्ट्र 

·पदाचे नाव : गृहपाल, लघुलेखक, टंकलेखक, व इतर पदे.

शैक्षणिक पात्रता : 10वीं / 12वी / पदवीधर व इतर

व्यावसायिक पात्रता

पगार : 25,500 ते 81,100 रुपये महिना अर्ज पद्धती : ऑनलाईन

वयोमर्यादा : 18- 43 वर्षे पदे : 0229

अर्जाची शेवटची तारीख- 11 नोव्हेंबर 2024 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र अधिक माहितीसाठी नोटीफिकेशन-

https://drive.google.com/file/d /1VqC8fmNtowj9]96GsEfQhzayYG3Nvtsk /view?pli=1 





Thursday, October 31, 2024

Trending news today चालू घडामोडी

 15 दिवसात 187 कोटींचा मुद्देमाल जप्त



राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत आजवर एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 15 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत ठिकठिकाणी झाली. यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू आदी मुद्देमालाचा समावेश आहे. यात राज्य पोलीस विभागाने 75 कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने 60 कोटी रूपये व राज्य उत्पादन शुल्क विभागाने 11 कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.





सोलापूर: जनता मला आशीर्वाद देऊन आमदार करेल




एका सामान्य घरातील कार्यकर्त्यांना आमदारकीची पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेते मंडळींचे आभार मानतो. आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की सामान्य कार्यकर्त्यांना असामान्य संधी देणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. मी तालुक्यात पुन्हा एकदा मताचे दान मागणार आहे आणि माझे यापूर्वी आमदार असताना केलेले काम पाहून येथील जनता मला पुन्हा मतरूपी आशिर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मागील पाच वर्षात मी या तालुक्यात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे.


महाराष्ट्र सरकारची अन्नपूर्णा योजना



गरीब आणि गरजू कुटुंबांच्या स्वयंपाकघरात एलपीजीची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना वर्षाला

तीन मोफत गॅस सिलिंडर दिले जातात, जेणेकरून त्यांच्या स्वयंपाकाच्या गरजा भागतील आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना दिलासा देणे हा या योजनेचा उद्देश आहे.



नोव्हेंबरमध्ये 13 दिवस बँका बंद



आरबीआयच्या सुचनेनुसार, नोव्हेंबर महिन्यात बँका एकूण 13 दिवस बंद राहतील. या दिवशी विविध सण, आठवड्याच्या शेवटी आणि बँकांच्या विश्रांतीच्या दिवसांचा समावेश आहे. ग्राहकांनी त्यांच्या बँकिंग कामकाजाची योजना तयार करताना

याकडे लक्ष द्यावे, असे संबंधितांनी सांगितले. बँकांची यादी पाहून ग्राहकांना आवश्यक सेवांसाठी पूर्वसूचना देण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक कामकाजात अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.



महायुतीत भाजपच्या कमळ चिन्हावर RPI चा उमेदवार



महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या कोट्यातून चार विधानसभा जागा मित्र पक्षांना देण्याची रणनीती आखली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय (ए) पक्षाला दोन जागा देण्यात आल्या आहेत. भाजपच्या कोट्यातून कलिना विधानसभेची जागा तर शिवसेनेच्या कोट्यातून धारावी विधानसभेची जागा दिली गेली आहे. भाजपच्या या रणनीतीने आगामी निवडणुकांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.



नरकचतुर्दशी: नरकासुराचा वध आणि उत्सव



नरकचतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केल्याचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. या दिवशी नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून विविध धार्मिक विधी केले जातात. संध्याकाळी समईच्या चार वाती प्रज्वलित करून पूर्वाभिमुख होऊन दान देण्याची प्रथा आजही टिकून आहे. कोकणात अंघोळीनंतर 'कारेटं' अंगठ्याने फोडण्याची परंपराही सुरू आहे, जी नरकासुराच्या वधाशी संबंधित मानली जाते. या उपक्रमांनी दिवाळीच्या आनंदात एक नवीन रंग भरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.




दिवाळी निमित्त सोन्याच्या भावात चढ-उतार



दिवाळीच्या निमित्ताने सोन्याच्या भावात चढ-उतार चालू आहे. मागील आठवड्यात सोने 1400 रुपयांनी महागले होते, पण सोमवारी 490 रुपयांनी कमी झाले. 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी सोन्याने अनुक्रमे 600 आणि 700 रुपयांची वाढ झाली. सध्या 22 कॅरेट सोने 74,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोने 81,310 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराने विकले जात आहे.


बंडखोरी रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रयत्न






राज्यातील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, आणि त्यापूर्वी बंडखोरांची समजूत काढण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत. मविआच्या नेत्यांकडून बंडखोरांना आश्वासने दिली जात आहेत की, जर राज्यात मविआची सत्ता आली, तर त्यांना विधानपरिषदेची आमदारकी किंवा महामंडळ देण्यात येईल. यामुळे बंडखोरांचे मन वळवण्यासाठी या आश्वासनांचा उपयोग होऊ शकतो, असे चित्र आहे.



ज्येष्ठ नागरिकांसाठी "आयुष्मान भारत निरामयम" योजना सुरू



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या निमित्ताने देशातील 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी "आयुष्मान भारत निरामयम" योजना सुरू केली. दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही योजना जाहीर केली. या 12,850 कोटी रुपयांच्या योजनेअंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्यविमा लाभ मिळेल.


सरकार आल्यानंतर अजून योजना आणणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सरकार आल्यानंतर आणखी मोठ्या योजनांची घोषणा करण्याची माहिती दिली आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी याबाबत बोलले. नुकतीच लाडकी बहीण योजना प्रचलित झाली असून, या योजनेच्या यशानंतर सरकारच्या आगामी योजना आणखी अधिक प्रभावी असतील, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे आणि नवीन योजनांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांमध्येही अपेक्षा निर्माण झाल्या आहेत





Wednesday, October 30, 2024

Todays News

 

आता 10 मिनिटांत घरपोच मिळणार सोने-चांदी

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर धनत्रयोदशीसाठी सोने-चांदी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली आहे. ब्लिंकिट, स्विगी इंस्टामार्ट, झेप्टो आणि बिगबास्केटसारख्या प्लॅटफॉर्मवर मलबार, मुथूट, तनिष्क यांसारख्या ब्रँडचे 24 कॅरेट सोने आणि 999 शुद्धतेची चांदीची नाणी घरपोच मिळतात. 0.1g ते 1g सोन्याचे नाणे व 5g ते 20g चांदीचे नाणे ऑर्डर करता येतात. ग्राहकांना सोने-चांदीसाठी बाजारात जाण्याची गरज नाही, काही मिनिटांतच घरपोच सेवा मिळू शकते.






अभ्रक महागाई भत्ता व एमपीएससी अंतर्गत भरती, 01333 जागा; पगार 25,500 पासून

भरती श्रेणी: महाराष्ट्र शासन (एमपीएससी) पदाचे नाव : उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ), लिपिक-टंकलेखक.

·शैक्षणिक पात्रता : पदांनुसार वेगवेगळी, नोटीफिकेशन पहा

पगार : 25,500 ते 81,100 रूपये अर्ज पद्धती : ऑनलाईन

वयोमर्यादा : 19 ते 38 वर्ष.

पदे : 01333

अर्जाची शेवटची तारीख- 4 नोव्हेंबर 2024

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.

अधिक माहितीसाठी नोटीफिकेशन- https://

drive.google.com/file/d/1nXX0p3XptDRQ

-phn19OMv5NC7MQAd886/view?pli=1 





सोलापूर: धर्मराज काडादी यांची अपक्ष उमेदवारी दाखल..

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धर्मराज काडादी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखत दिली होती. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सोलापूर दक्षिण मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाली. त्यामुळे काडादी यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. अर्ज दाखल करताना बाळासाहेब शेळके, सिद्धाराम चाकोते आदी उपस्थित होते.





नाशिकमध्ये चक्क एका पक्षाने हेलिकॉप्टरने पाठवले AB फॉर्म

आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून, नाशिकमध्ये शिंदे गटाने हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले आहेत. देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने देवळालीत राजश्री आहिराव आणि दिंडोरीत धनराज महाले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे, जे महायुतीतील घटक पक्ष आहेत.




सोलापूर: सांगोला मतदारसंघात यंदा तिरंगी लढत

सांगोला तालुक्यात प्रथमच राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. आजपर्यंत तालुक्यातील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी कधी शेकाप पक्षाला तर कधी शेकाप विरोधी उमेदवाराला पाठिंबा दिला. या विधानसभा निवडणुकीमुळे प्रथमच माजी आमदार साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) पदाचा राजीनामा देत थेट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवून त्यांनी शेकाप व शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांना धक्का दिला.





पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार!

देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. पेट्रोल स्टेशन डीलर्सना देण्यात येणारे कमिशन वाढवत असल्याचे तेल कंपन्यांनी जाहीर केले आहे. आंतरराज्य मालवाहतूक तर्कसंगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. 1 नोव्हेंबरला पेट्रोल-डिझेलचे नवीन दर लागू होऊ शकतात.



तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2,236 जागांसाठी भरती

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) 2,236 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता: 10वीं, 12वी उत्तीर्ण. वयोमर्यादा 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत 18 ते 24 वर्षे असून, SC/ST साठी 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सूट आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहे. लिंक- https://drive.google .com/file/d/1KbnSqMxDEqipEp6d2MRNUIU -wtIxeEfr/view, https://www

.apprenticeshipindia.gov.in/





भाजपाचा मोठा डाव! थेट प्रदेशाध्यक्षच फोडला

राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, ज्यामुळे बच्चू कडू यांना धक्का बसला आहे. भाजपने गावंडे यांचे मन वळवले तर प्रत्युत्तरादाखल, अकोल्यात भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांचा प्रहारमध्ये प्रवेश झाला आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांचाही प्रहारमध्ये प्रवेश झाल्याची चर्चा आहे. तिसरी आघाडी तयार करून बच्चू कडू यांनी महायुती व महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे.





पालकांनो मुलांना सहलीसाठी पाठवण्यापूर्वी हे करा!

हिवाळ्यात शाळा-महाविद्यालयांकडून शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात, परंतु सहलीदरम्यान अपघात आणि जीवित हानी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पालकांनी सहलीसाठी मुलांना पाठवण्यापूर्वी शाळेकडून महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. पट्टीचा पोहणारा आणि टॅकर सहलीसाठी सोबत आहे का, याची पडताळणी करावी. बसचे फिटनेस प्रमाणपत्र आणि इन्शुरन्स असल्याची खात्री करावी. मुलांसोबत फराळाचे साहित्य, उबदार कपडे आणि शिक्षकांच्या संपर्क क्रमांकाची माहिती घ्यावी.





बारावीची परीक्षा 11 तर दहावीची 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी व दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रात्यक्षिक परीक्षा अनुक्रमे 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी आणि 3 ते

20 फेब्रुवारीदरम्यान होतील. लेखी परीक्षा वेळेत झाल्याने जेईई, नीटसाठी विद्यार्थ्यांना अधिक तयारीचा वेळ मिळेल, तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना लवकर प्रवेश मिळू शकेल. सध्या स्थानिक सुट्ट्या व सीबीएसईच्या तारखांची पडताळणी सुरू आहे, आणि अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.







.. तर लाडक्या बहिणींना मिळणार महिना 2 हजार रुपये

महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. यात पात्र महिलेला महिना 1500 रुपये मिळतात. त्यातच महाविकास आघाडीही लाडक्या बहिणींसाठी सरसावली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना 2 हजार रुपये महिना देण्यात येणार आहेत. मविआच्या जाहीरनामा समितीकडून याबाबत निर्णय देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मविआचे सरकार आल्यास विधिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत या योजनेबाबतचा ठराव मांडण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या 2 दिवसात मविआ आपला जाहीरनामा सादर करण्याची शक्यता आहे.





सोलापूर: रिपाइंचा महाविकास आघाडीला पाठिंबा

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश कोठे यांच्यासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभोध वाघमोडे यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रात म्हंटले आहे की, जातीवादी सरकारला रोखण्यासाठी तसेच महाराष्ट्राची आस्मिता जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी समजतील सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य करते.

Maharashtra Watch Live Assembly Vote Counting

विधानसभा 2024  मतमोजणी... Watch Live Assembly Vote Counting2024 राजनीतीNews   Solapur Live Update 👇👇👇 https://www.youtube.com/live/Knv-Pi...