Fiverr

Tuesday, November 5, 2024

Trending topic solapur

 

बाबो ..! 3 वर्षांत 1 लाखांचे झाले 33 लाख

विस्को ट्रेड असोसिएट्सच्या समभागांनी गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 3260% परतावा दिला आहे. 21 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 3 रुपये होती आणि आजच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात ती 100.80 रुपयांवर वर बंद झाली. म्हणजेच 3 वर्षांपूर्वी कंपनीत केलेली ₹1 लाखाची गुंतवणूक आता ₹33 लाखांपेक्षा जास्त झाली आहे


लाडकी बहीण योजना- डिसेंबरचा हप्ता, तारीख जाहीर 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना गुडन्यूज दिली. 20 तारखेला निवडणूक संपताच डिसेंबरचे पैसे जमा होणार, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली. त्यांची कुर्ल्यात पहिली सभा झाली. तेथे ते बोलत होते. यावेळी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर हल्लाबोल केला. 




दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 च्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर आहे, तर विलंब शुल्कासह अर्ज 30 नोव्हेंबरपर्यंत भरण्यात येतील. विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा प्रमुखांमार्फत 'www.mahahsscboard.in' या संकेतस्थळावर भरायचे आहेत. शाळांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरून 4 डिसेंबरपर्यंत पावतीसह विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे सादर करणे आवश्यक आहे.



भारत WTC फायनलमध्ये पोहोचला नाही तर ...



जर भारत WTC 2023-25 च्या अंतिम फेरीत पोहोचला नाही, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह वरिष्ठ भारतीय खेळाडूंना टप्प्याटप्प्याने संघातून वगळले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या दारुण पराभवानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात चर्चा होऊ शकते.





सोलापूर दक्षिण मधून दिलीप माने यांची माघार



सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले माजी आमदार दिलीप माने यांनी आज निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आता या मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवारअमर पाटील व धर्मराज काडादी यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल असे चित्र आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस होता.






सोलापूर: शहर मध्य मधून 19 उमेदवारांची माघार



आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या 39 पैकी 19 उमेदवारांनी माघार घेतली. अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये शिवसेना सोडून स्वराज्य पक्षात गेलेले मनीष काळजे, काँग्रेसचे माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे आदी उमेदवारांचा समावेश आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र कोठे, फारूक शाब्दी, नरसय्या आडम यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.




निवडणूक अर्ज मागे घेण्याची वेळ संपली



निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे काही बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत, तर काहींनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थितीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांना डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारांच्या या गडबडीमुळे दोन्ही गटांना संभाव्य आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.





सोलापूरः उध्दव -राज एकाच दिवशी सोलापुरात



महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होईल. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी सर्वच पक्षांमधून बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळते. उमेदवारांचा प्रचारार्थ राजकीय नेत्यांच्या तोफाही धडाडणार आहेत. सोलापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोलापुरात एकाच दिवशी येणार असल्याची माहिती समोर येत आहे.





सोलापूर: काँग्रेसचे 50 कार्यकर्ते भाजपमध्ये



सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख हे गाव भेट दौऱ्यावर असून या दौऱ्याअंतर्गत ते पाकणी येथे गेले असता त्यांच्या उपस्थितीत 50 हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये सोनुपत येलगुंडे, सूर्यकांत येलगुंडे, विश्वनाथ येलगुंडे, संजय सुरवसकर, राजेंद्र सुरवसकर, बालाजी शिंदे, बालाजी येलगुंडे, केशव सुरवसकर, केशव पारेकर, बापू खांडेकर, विजय खांडेकर, अजित सुरवसकर, कृष्णा साठे, राहुल शिंदे, निलेश येलगुंडे, ज्ञानेश्वर सुरवसकर आदींचा समावेश आहे.




सोलापूर: 11 मतदारसंघातून 184 उमेदवार निवडणूक लढविणार



सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत 334 उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरले होते. दिनांक 4 नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत 150 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून 184 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. तरी जिल्हयातील सर्व मतदारांनी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानामध्ये आपला सहभाग नोंदविण्यायचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.




महाराष्ट्र राज्य महिला बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती



महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 विविध जागांसाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहे. पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेतील पदवीधारक. वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट). अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी

विभागाची अधिकृत वेबसाइट पाहा. https://cdn.digialm .com/EForms/configuredHtml/32726/88956 /Index.html, https://drive.google.com/file/d /18Avvqe3qQageUtiQmkCSpwT7oDh4irEV /view






Monday, November 4, 2024

Top news today


ऐनवेळी शिवसेनेचे 2 उमेदवार नॉट रिचेबल




विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये उमेदवारांमधील नाराजी उफाळली आहे. ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले आणि राजश्री अहिरराव नॉट रिचेबल आहेत, ज्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. देवळाली आणि दिंडोरीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना थेट लढत होणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये "तुमची लाडकी बहिण" असा मजकूर असलेले बॅनर चर्चेत आहेत. मुंबईत शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काते यांच्यावर साडीवाटपाचा आरोप ठाकरे गटाने केला असून आचारसंहिता भंगाची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.




रेशन कार्डधारकांसाठी नवीन नियम



केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी नवीन नियम 1 नोव्हेंबरपासून लागू केले आहेत. या नियमानुसार आता रेशन दुकानातून तांदूळ आणि गहू समसमान प्रमाणात दिले जातील. पूर्वी 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू दिले जात होते, पण आता 2.5 किलो तांदूळ आणि 2.5 किलो गहू दिले जातील. तसेच, ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.




सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी



दिवाळीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 700 रुपयांनी कमी होऊन 74,000 रुपये झाला आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 770 रुपयांनी घटून 80,710 रुपये आहे. 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 5700 रुपयांनी कमी झाले आहे. चांदीची किंमतही प्रति किलो 3,000 रुपयांनी घटून 97,000 रुपये झाली आहे. या घसरणीमुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची संधी आहे.





सोलापूर: सांगोला अजिबात सोडणार नाही 



सांगोल्याची शिवसेनेची विद्यमान जागा आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार निवडून आलेले असल्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार आहे. शेतकरी कामगार पक्षाबरोबर शनिवारीही आमची चर्चा झाली आहे. शेकापबरोबर रायगड

जिल्ह्यातील अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन जागांवर चर्चा होऊ शकते. सांगोल्यावर अजिबात चर्चाच होणार नाही. आम्ही सांगोल्यातून अजिबात माघार घेणार नाही. असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.







24, 22 आणि 18 कॅरेट म्हणजे नक्की काय ??



भारतीय संस्कृतीत सोन्याला विशेष महत्त्व आहे, आणि सणासुदीला सोने खरेदी करणे ही परंपरा आहे. दिवाळीत, सोने खरेदीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात गर्दी दिसते. ग्राहक 24 कॅरेट (99.99% शुद्ध), 22 कॅरेट (91.67% शुद्ध), 18 कॅरेट (75% शुद्ध) आणि 14 कॅरेट (58.3% शुद्ध) सोनं खरेदी करतात. 24 कॅरेट सोने सर्वाधिक शुद्ध असते, तर 18 कॅरेट सोन्यात इतर धातूंचा अधिक वापरामुळे ते कठोर होते. हॉलमार्किंगच्या नियमांनुसार, 1 एप्रिल 2023 पासून सर्व दागिन्यांवर 6 क्रमांकाचे हॉलमार्क असणे अनिवार्य आहे.




जप्त केलेल्या मालमत्तेचा आकडा पोहोचला 234 कोटींवर



विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासन व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे राज्यभरात कारवाई सुरू आहे. यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू असा एकूण 234 कोटी 49 लाख रुपयांचा मुद्देमालआजपर्यंत जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी होत आहे. संशयास्पद वाहने जप्त करून कसून चौकशी केली जात आहे. राज्यभरात चोख पोलीस बंदोबस्त पहायला मिळत आहे.







सोलापूर: मंगळवेढ्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच मंगळवेढा दौऱ्यावर येत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे यांनी दिली. बुधवार दि. 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिलीप धोत्रे यांच्या प्रचार्थ शिवप्रेमी चौक आठवडा बाजार येथे जाहीर सभा होणार आहे. विधानसभेच्या आखाड्यामध्ये उमेदवार उतरण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली त्याचवेळी पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिल्या पाच उमेदवारात दिलीप धोत्रे यांचे नाव निश्चित केले होते.


Sunday, November 3, 2024

Trending topics today

 कोल इंडिया लिमिटेडने दिले गुंतवणूकदारांना 50% रिटर्न्स



कोल इंडिया लिमिटेड (CIL), भारतीय कोळसानिर्मिती क्षेत्रातील एक महारत्न कंपनी, आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या वर्षभरात 50% रिटर्न्स देण्यात यशस्वी झाली आहे. 2.25 लाख कर्मचार्यांवर चालणारी ही कंपनी, भारतीय नागरिकांना योग्य दरात वीज पुरवठा करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या CIL ने उत्पादन क्षमतेत मोठी वाढ केली असून, राष्ट्रीयीकरणाच्या आधीच्या काळात तिच्याकडे 6.75 लाख कर्मचारी होते.





मराठीत व्यंजनांचे वर्गीकरण



मराठीत एकूण 41 व्यंजनं आहेत, ज्यांचा उच्चार करताना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, आणि ओठ यांच्याशी संपर्क साधला जातो. यातील 34 व्यंजनांचे पाच प्रकारात विभाजन केले जाते. या व्यंजनांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे: 1. स्वरव्यंजनं: जे उच्चारात स्वराला सहकार्य करतात.

2. विसर्गव्यंजनं: जे उच्चार करताना विशेष स्वरूपात वापरले जातात.

3. अयोगिक व्यंजनं: ज्यांचा उच्चार करताना आवाज वगळता होतो.

4. अंतर्व्यंजनं: जे आवाजाच्या वेगाने व्यक्त केले जातात. 5. वर्णनव्यंजनं: जे विशिष्ट गुणधर्मांमुळे ओळखले जातात.





ताज्या फळांचा रस: आरोग्यासाठी फायदेशीर



ताज्या फळांचा रस पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. यामध्ये पाण्याचे आणि फायबर्सचे प्रमाण जास्त असते, जे पचनक्रियेतील मदतीसाठी उपयुक्त आहे. आपल्या आवडत्या फळांचा रस तयार करून त्यात थोडे आलं किंवा पुदिना

टाकल्यास त्याची आरोग्यदायी प्रभावीता आणखी वाढते. या रसामध्ये आम्ल आणि गोड चवीचे संतुलन असते, जे छातीत जळजळ कमी करण्यात मदत करते. तसेच, हे रस शरीरात पोषण पुरवण्यास आणि ऊर्जा वाढवण्यासही सहाय्यक ठरतात. त्यामुळे ताज्या फळांचा रस आपल्या आरोग्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे!



सोलापूर: माझ्यावरचा विश्वास हीच खरी ताकद



जळभावी येथे गाव भेट दौरा निमित्त भेट दिली असता, गावातील गावकऱ्यांनी "तुमच्यासारखा आमच्या कामाचा माणूस या मतदारसंघात दुसरा नाही" अशी भावना आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केली. तुमचा माझ्यावरचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे, असे सांगत गावकऱ्यांना येत्या 20 तारखेला भरघोस मतांनी विजय मिळवून देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. आप्पासाहेब देशमुख, बी. वाय. राऊत साहेब, अॅड. शरद मदने, हनुमंत सूळ, रमेश पाटील, सोपान नारनवर, धर्मा माने, बाळासाहेब सरगर, विजय गोरड, सचिन पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.



मेघालयातील 'उमंगोट नदी' भारतातील सर्वात स्वच्छ




मेघालयातील मावळियानांग गावात वाहणारी 'उमंगोट नदी' भारतातील सर्वात स्वच्छ नदी म्हणून प्रसिद्ध आहे. या नदीची स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर नियम लागू केले आहेत, ज्यामध्ये प्रदूषण करणाऱ्यांवर 5000 रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जातो. उमंगोट नदीच्या पाण्याची

स्पष्टता आणि स्वच्छता पर्यटकांना आकर्षित करते, आणि 

एक अद्वितीय पारिस्थितिकी तंत्र तयार करते. स्थानिक लोकांनी नदीच्या प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत, ज्यामुळे या नदीनं जागतिक स्तरावर एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.





सोलापूर: शहर उत्तर मध्ये 3 लाख 28 हजार 572 मतदार



सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारसंघानुसार निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 38 लाख 48 हजार 869 मतदार मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली. सोलापूर शहर उत्तर मतदार संघात एकूण 3 लाख 28 हजार 572 मतदार आहेत. यात 1 लाख 62 हजार 467 पुरुष तर 1 लाख 66 हजार 59 महिला मतदार आहेत. याशिवाय 46 तृतीयपंथी मतदारही या मतदारसंघात आहेत अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.




योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळालेल्या या धमकीमध्ये "तुमचा बाबा सिद्दिकी करू" असं म्हटले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, कसून शोध सुरू केला आहे. या धमकीची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देखील दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ भाजपचे स्टार प्रचारक असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.





बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी भरती



बँक ऑफ बडोदा 592 पदांसाठी भरती करत आहे. पात्रतेमध्ये CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी, B.Tech, B.E., M.Tech, M.E. किंवा MCA समाविष्ट आहेत. वयाची अट 1 ऑक्टोबर 2024 रोजी 28 ते 50 वर्षे आहे; SC/ST ला 5 वर्षे आणि OBC ला 3 वर्षे सूट आहे. अर्ज फी सामान्य/ ओबीसी/EWS साठी ₹600 आणि SC/ST/PWD/महिला साठी ₹100 आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे. लिंक- https://drive.google .com/file/d/1||EgssUfTbQZQESIB7-|x9f|onv -blA/view?pli=1,





शरद पवारांनी केली अजित पवारांची पाठराखण



दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग येथील निवासस्थानी एकत्र आले, पण यावेळी अजित पवार हजर नव्हते. यावर शरद पवार यांनी सांगितले की, कामानिमित्त तो येऊ शकला नसावा. त्यांनी अजितला पाठिंबा दर्शवत राज्याच्या विकासावर भर दिला. ते म्हणाले की, केवळ राजकारणाने प्रश्न सुटत नाहीत; राज्यात सत्तापरिवर्तन झाले असून विकासकांच्या हाती सत्ता यावी. राज्यातील आर्थिक स्थिती गंभीर असून, सुधारण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. अजित पवारांशी मतभेद असले तरी शरद पवार त्यांना अनेकदा पाठिंबा देताना दिसले आहेत.




स्विगी आयपीओ येणार, पैसे तयार ठेवा



फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आपल्या आयपीओसाठी नोंदणी सुरू करणार आहे. हा आयपीओ 6 ते 8 नोव्हेंबरदरम्यान उपलब्ध असेल. हा आयपीओ एकूण 11,327.43 कोटी रुपयांचा असून, किंमत पट्टा 371 ते 390 रुपये प्रति शेअर आहे. प्रत्येक लॉटमध्ये 38 शेअर्स असतील, ज्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 14,820 रुपये आवश्यक असतील. स्विगीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची ही संधी अनेकांना आकर्षित करणार आहे. या आयपीओद्वारे कंपनीच्या विकासाला गती देण्याची अपेक्षा आहे.





पुस्तकाचा आकार आयाताकृतीच का असतो ?

पुस्तके प्रामुख्याने आयताकृतीच असतात, याचे कारण म्हणजे त्यांचे व्यावहारिक फायदे. आयताकृती आकार वाचण्यासाठी सोपा आणि डोळ्यांवरील ताण कमी करणारा असतो. प्रति ओळीत 10-15 शब्द येतात, जे वाचन अधिक सुलभ बनवतात. या आकारात बांधणी करणे सोपे असते, विशेषतः मोठ्या जाड पुस्तकांसाठी. आयताकृती पानांमुळे पुस्तकाची संरचना टिकाऊ राहते, तसेच एका हातात पकडणे सोपे होते. ऐतिहासिकदृष्ट्या, पॅपिरसाच्या चौरस पानांपासून सुरुवात झाली, पण चर्मपत्र वापरात येताच आयताकृती आकार अधिक प्रचलित झाला.


Saturday, November 2, 2024

Today news

 रेशन कार्ड ई-केवायसी करण्यास 1 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ



रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण, शिधापत्रिका ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. शिधापत्रिका धारक आता 1 डिसेंबर 2024 पर्यंत ई-केवायसी करु शकणार आहेत. यापूर्वी 31 ऑक्टोबरपर्यंत रेशन कार्ड ई केवायसी करण्याचे आवाहन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत करण्यात आले होते. बोगस रेशनकार्ड धारकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने ही अट घातली आहे. मात्र आता ती मुदत वाढवण्यात आलीय. त्यामुळे तुम्ही निवांत 1 डिसेंबरपर्यंत रेशन कार्ड ई-केवायसी करून घेऊ शकता.



दिवाळी- आज प्रथमच दोन राष्ट्रवादी, दोन पवार पाडवे



दरवर्षी बारामतीत पवार कुटुंबात मोठ्या थाटामाटात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. मात्र, यंदा पवार कुटुंब एकत्र नसणार आहे. कारण राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने पवार कुटुंबही फुटले आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्यानिमित्त आज पवार कुटुंबात पहिल्यांदाच दोन वेगवेगळे पाडवे साजरे होणार आहेत. गोविंदबागेत शरद पवार कुटुंबियांसह पाडवा साजरा करतील. तर अजित पवार काटेवाडी गावात पाडवा साजरा करणार आहेत. मात्र जुन्या मुळ राष्ट्रवादी आणि संपूर्ण पवार कुटुंब प्रेमींसाठी आजचा दिवस सहजासहजी पचवता येणार नाही, असं बोललं जातंय.




महाराष्ट्रात वाढली कडाक्याची थंडी



महाराष्ट्रात हळूहळू थंडी वाढत आहे, ज्यामुळे नागरिकांची कडाक्याची थंडी अनुभवल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः नाशिक, पुणे आणि आणि औरंगाबादच्या भागात तापमान कमी झाल्याने लोकांना थंडीच्या लहरींचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत थंडीच्या वाढत्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे गरम कपड़े आणि चहा कॉफीच्या मागणीत वाढ झाली आहे. कृषी उत्पादनावरही या थंडीचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.



सोलापुरातील उड्डाणपुलाचा प्रश्न जैसा थेच



सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार आ. विजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोठे म्हणाले, पीडब्ल्यूडीचे खातेदेखील यांच्याकडे होते. १० वर्षे झाली अजूनही सोलापुरातील उड्डाणपुलाचा प्रश्न जैसा थेच आहे. शहराला दररोज पाणी पुरवठा करतो म्हणाले हाही प्रश्न तसाच आहे. यांनी फक्त आश्वासनच दिले. जाती-पाती मध्ये तेढ निर्माण करणे, कुटुंबा-मित्रांमध्ये फूट पाढून भांडणे लावून निवडून येण्यासाठी फक्त राजकारणच केले आहे.




भारतीय अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ??



भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 मध्ये जेम्स विल्सन यांनी सादर केला. स्वातंत्र्यानंतर, आर. के. शनमुखम चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर 1947 रोजी पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 1955 पासून अर्थसंकल्प हिंदीतही छापला जाऊ लागला. 2017 मध्ये, रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन झाला. मनमोहन सिंग यांचा 1991 चा बजेट सर्वाधिक लांब तर एच. एम. पटेल यांचा 1977 चा सर्वात छोटा. खास बजेट्समध्ये 'ब्लॅक बजेट' (1973), 'ड्रीम बजेट' (1998), आणि 'रोलबॅक बजेट' (2002) यांचा समावेश होतो.



पालकांनी या चूका केल्याने मुलांचा आत्मविश्वास होतो कमी



पालकांनी मुलांच्या आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या काही चुका टाळाव्यात, अन्यथा त्यांच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. सर्वप्रथम, मुलांच्या क्षमतांचा कमी आढावा घेणे किंवा त्यांच्यावर चुकता म्हणून टीका करणे यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. दुसरे म्हणजे, त्यांची तुलना इतरांबरोबर करणे. याशिवाय, त्यांच्यासोबत संवाद साधताना त्यांची भावना न समजून घेणे आणि त्यांच्या यशावर किंवा प्रयत्नांवर कमी महत्त्व देणे हेही टाळावे.



राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांमध्ये फी वाढली



राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांमध्ये एनडीए प्रवेशात टक्का वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने धोरणात सुधारणा केली आहे. 20 वर्षांनी शुल्क वाढवून वार्षिक 50 हजार रुपये करण्यात आले आहे. राज्यात 38 अनुदानित सैनिकी शाळा असून, कमी एनडीए निवडीमुळे सुधारित धोरण लागू केले आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण व केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम लागू होणार आहे. बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एनडीए परीक्षा बंधनकारक असेल, अन्यथा शाळांचे अनुदान बंद होईल.




भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय





भारतीय रेल्वेने प्रवाशांना दोन रंगाचे कोच, निळे आणि लाल, दाखवण्यास सुरुवात केली आहे. निळे कोच जुनी आयसीएफ तंत्रज्ञानाची आहेत, तर लाल कोच नवीन एलएचबी तंत्रज्ञानाचे आहेत. भारतीय रेल्वेने निळे कोच बदलून 2026-27 पर्यंत सर्व कोच लाल रंगाचे करण्याचा निर्णय घेतला आहे. एलएचबी कोच हलके, स्टेनलेस स्टीलचे असून, डिस्क ब्रेक आणि कमी देखभाल खर्च यासह 200 किमी प्रतितास वेग सहन करतात. निळे कोच 1952 पासून बनत आहेत आणि ते स्टीलपासून बनलेले असून, अधिक देखभाल खर्च लागतो. रेल्वेने आता एलएचबी कोचची निर्मिती सुरू केली आहे.




नाशिक: पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा 8 नोव्हेंबरला



महायुतीकडून पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या महाराष्ट्रात एकूण 8 प्रचार सभा होणार आहेत. महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा होणार आहे. महायुतीकडून 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रचारसभांचा श्रीगणेशा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि धुळे येथे एक-एक सभा होणार आहे. नाशिक येथील ग्राउंडला मोदी ग्राउंड नाव दिले आहे. भाजप नेते गिरीष महाजन यांनी सांगितले.




लाडकी बहीण योजना- अजित पवारांनी सांगितला थेट आकडा



'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना केंद्रस्थानी आहे. ही योजना नंतर बंद होईल असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जर अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर मागचा अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटींचा होता. पुढचा अर्थसंकल्प सात लाख कोटींचा असेल, त्यातील 45 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी असतील', शेतकऱ्यांचं सर्व वीज बिल माफ केलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय.



या चार गोष्टी सोडा, नाहीतर तुम्ही व्हाल गरीब



आर्य चाणाक्यांनी व्यवहाराच्या अनेकविध ट्रीक्स सांगितल्या आहेत. आर्य चाणक्यांच्या मते तुम्ही चार गोष्टी त्यागल्या पाहिजेत. नाहीतर तुम्ही गरीबच राहू शकता. आळस, लोभ, अज्ञान व असुरक्षितता या त्या चार गोष्टी आहेत. आळशी लोक गरीबीत खितपत पडतात. लोभ तुम्हाला समाधानी राहू देत नाही. अज्ञान तुम्हाला निर्णय घेण्यापासून रोखते आणि असुरक्षितता तुम्हाला आत्मविश्वाने काम करण्यापासून दूर ठेवते असे चाणक्य सांगतात. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही या चार गोष्टी आवर्जुन सोडून देऊन जोमाने कामाला लागा.


सोलापूर: सैन्यात अधिकारी होण्यासाठी मोफत प्रशिक्षण




भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर यांनी केले आहे. शासनातर्फे नवयुवक व युवतींसाठी 2 ते 11 डिसेंबर दरम्यान प्रशिक्षण आयोजिले आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कार्यालय सोलापूर येथे 26 नोव्हेंबर रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे.



आशा सेविकांना 6 हजार रुपये दिवाळी भेट



ठाणे महापालिकेच्या वर्ग 2 ते 4 च्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट मिळाले. त्यानंतर आता आशा सेविकांचीही दिवाळी सरकारने गोड केली आहे. आशा सेविकांनाही पालिकेने 6 हजार रुपयांची दिवाळी भेट दिली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांबरोबरच आशा सेविकांनाही दिवाळीत गिफ्ट मिळाले आहे. दरम्यान, महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 24 हजार रूपये देण्यात आले आहेत. आशा सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासही मदत केलेली आहे.






Maharashtra Watch Live Assembly Vote Counting

विधानसभा 2024  मतमोजणी... Watch Live Assembly Vote Counting2024 राजनीतीNews   Solapur Live Update 👇👇👇 https://www.youtube.com/live/Knv-Pi...