Fiverr

Wednesday, June 21, 2023

Talathi Bharti 2023 last date to apply |तलाठी मेगा भरती संपूर्ण माहिती

 

 Talathi Bharti 2023  last date to apply   |तलाठी मेगा भरती संपूर्ण माहिती

Talathi- Bharti- 2023-  last- date- to -apply
                                                             HowTo Prepare For Talathi Bharti Exam 2023

   

नमस्कार  मित्रानो,आज मी  तुम्हाला तलाठी परीक्षेसाठी अभ्यास करण्याच्या काही महत्त्वाच्या(IMP Tips) टिप्स देणारआहोत. चला तर मग जाणून घेऊया.


या भरती संदर्भात पुढील महिना भरात जाहिरात निघेल असे अपेक्षित आहे. 

शैक्षणिक अर्हता 

तलाठी पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. संगणक,माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत ती प्राप्त करणे आवश्यक राहील. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/ हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे  .

वयोमर्यादा 

मित्रानो,तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 38 वर्षे अशी राहील.( याबाबत ऍड मध्ये अधिक माहिती स्पष्ट होईल ) . वयोमर्यादा किमान अमागास १८  ते ३८ वर्षे .

अनु क्र

संवर्ग

वयोमर्यादा

मागासवर्गीयासाठी

४३ वर्षे

अंशकालीन कर्मचारी

५५ वर्षे

कल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा दिव्यांग

४५ वर्षे

माजी सैनिक अमागास

३८ वर्षे

मागास

४३

दिव्यांग

४५ वर्षे.

 








या भरती संदर्भात पुढील महिना भरात जाहिरात निघेल असे अपेक्षित आहे. 

पात्रता

१) कोणत्याही संविधानिक विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

२) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. त्याच्याकडे रहिवाशी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

३) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. .

४) संगणक व माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक.

 

पदभरतीचा कार्यक्रम 

जिल्हा निवड समितीने जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून लेखी परीक्षा देण्यापर्यंतचा कालावधी 50 ते 60 दिवसांचा असतो. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होण्याची वाट न बघता विद्यार्थ्यांनी अगोदरपासूनच या परीक्षेची चांगली तयारी केल्यास लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीत प्रवेश करता येतो. तलाठी पदाकरिताही आता हजारो विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढते. शासनाच्या निर्णयानुसार या पदासाठी आता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त लेखी परीक्षेच्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तलाठी पदासाठी गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

परीक्षेचा दर्जा

 शासनाच्या तरतुदीनुसार ज्या पदाकरिता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे, अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील; परंतु, मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) दर्जाच्या समान राहील.

परीक्षेची गुण विभागणी व स्वरूप 

अभ्यासक्रम तलाठी पदाच्या परीक्षेला 1) मराठी, 2) इंग्रजी, 3) सामान्यज्ञान 4) बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण असून, एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल.

 

परीक्षेचे स्वरूप तलाठी पदासाठीची लेखी परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. त्यासाठी 100 प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे एकूण 200 गुण असतील. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असेल.

 घटक

अभ्यास घटक या परीक्षेसाठी जे चार अभ्यासघटक दिलेले आहेत, त्यावर 1) मराठी- 25 प्रश्न, 2) इंग्रजी- 25 प्रश्न, 3) सामान्यज्ञान- 25 प्रश्न, 4) बौद्धिक चाचणी- 25 प्रश्न याप्रमाणे एकूण 100 प्रश्न विचारले जातील.

 

How To Prepare For Talathi Bharti Examतलाठी भरती.. जाणुन घ्या या परिक्षेच्या तयारी संदर्भात थोडीशी माहिती .

परीक्षेची तयारी या परीक्षेची तयारी करताना सर्वात महत्वाचे पाठीमागील प्रश्न पत्रीकांचा अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरतोय. विद्यार्थ्यांना बौद्धिक चाचणी व इंग्रजी हे घटक अवघड वाटतात; परंतु या घटकातील प्रश्नांचा रोज सराव केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळविता येतात. गुणवत्ता यादीत स्थान पटकावयाचे असेल, तर चारही अभ्यास घटक महत्त्वाचे आहेत, हे लक्षात असू द्या. सामान्यज्ञान या अभ्यासघटकाची व्याप्ती देखील भरपूर आहे, याची जाणीव सतत असू द्या. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रविषयक सामान्यज्ञान, आधुनिक भारताचा इतिहास, समाजसुधारक, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, महाराष्ट्रातील जिल्हे अशा अनेक विषयांचा समावेश यात आहे. म्हणूनच या परीक्षेची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. याप्रमाणे अभ्यास कसून केल्यास आपणास नक्की यश मिळेल HowTo Prepare For Talathi Bharti Exam 2023

 

महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे १००० पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

परीक्षेची तयारी करताना महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रमाचा संदर्भ घ्या. तुम्हाला अवघड वाटणारे विषय तुम्ही पूर्ण केल्याची खात्री करा. अशा प्रकारे, तुम्ही त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देऊ शकाल आणि कोणत्याही अनावश्यक विषयांवर तुमचा वेळ वाया घालवणार नाही. परीक्षेच्या वेटेजनुसार तुमच्या अभ्यासक्रमाची विभागणी करा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करत असल्याची खात्री करा.

परीक्षा पद्धत: या परीक्षेसाठी एकूण १०० प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला गुण याप्रमाणे २०० गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी २ तास.

 

अभ्यासक्रम व संदर्भ : मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये मराठी वर्णमाला व उच्चारस्थान, सामाजिक शब्दरचना, समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दरचना शब्दाच्या जाती, विभक्ती व सामान्यरूप, वाक्य व वाक्याचे प्रकार, काळ आणि प्रयोग मराठी भाषेची शब्दसिद्धी, , एका शब्दाचे अनेक अर्थ, शब्द समूहाबद्दल एकच शब्द, अलंकारिक शब्दरचना, मराठी भाषेतील वाक्प्रचार आणि म्हणी, उताऱ्यावर प्रश्न या घटकांचा समावेश असतो. संदर्भ सुगम मराठी व्याकरण- वाळिंबे. मराठी व्याकरण मानाचा मुजरा- नि. महाले.

एकदा तुम्ही एखादा विषय किंवा विषय पूर्ण केल्यावर, तुम्ही त्याची नियमितपणे उजळणी करत असल्याची खात्री करा. नियमित पुनरावृत्ती न करता, तुम्ही अभ्यास केलेला बहुतेक मजकूर विसरला जाईल. योग्य आराखडा बनवा आणि काही दिवस फक्त उजळणीसाठी द्या. विशेषतः परीक्षेचे शेवटचे काही दिवस. परीक्षेच्या तारखेच्या एक आठवडा आधी तुम्ही तुमचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याची खात्री करा, फ्लॅशकार्ड आणि इतर साधने तयार करा जी तुम्हाला त्वरित पुनरावलोकन मिळविण्यात मदत करू शकतात.

मॉक टेस्ट देत राहा

जसजशी परीक्षा जवळ येईल, तसतसे प्रश्न सोडवण्याचा सराव करा. तुम्ही परीक्षेची मॉक टेस्ट, मागील वर्षांचे पेपर्स, टेस्ट सिरीज इत्यादी सोडवू शकता. ते तुम्हाला तुमचा वेग वाढवण्यात आणि परीक्षेच्या दिवशी दबाव कमी करण्यात मदत करतील. विविध तयारी पुस्तके तसेच वेबसाइट्स आहेत. तुमची तयारी तपासण्यात आणि परीक्षेच्या दिवसाची तयारी करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी हे विश्वसनीय संसाधनांपैकी एक आहेत.

कठीण विषयांचा अभ्यास करा

कठीण विषयांना जास्त वेळ द्या. सर्व विषयांसह आपला वेळ समान वाटून घेऊ नका. कठीण होण्यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असलेल्या विषयांना प्राधान्य द्या. तुमच्या सामर्थ्य आणि कमकुवततेनुसार तुमच्या वेळेला प्राधान्य द्या. जर तुम्हाला असे आढळले की तुम्ही परीक्षेचा तांत्रिक भाग सहजतेने हाताळू शकता परंतु तुमची सामान्य जागरूकता मजबूत करणे आवश्यक आहे, तर त्यानुसार तुमचा तयारीचा वेळ वितरित करा.

 

दररोज वर्तमानपत्र वाचा

त्यासाठी तयारी करण्यासाठी तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचत असल्याची खात्री करा. वर्तमानपत्र वाचणे तुम्हाला तुमचे आकलन आणि वाचन क्षमता सुधारण्यास मदत करते आणि दैनंदिन चालू घडामोडींचे तुमचे ज्ञान वाढवते.


अधिक माहितीसाठी संदर्भ पुस्तकांची यादी 

संदर्भ- १) perfect English grammar झांबरे २) इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह सचिन जाधवर बुद्धिमापन चाचणी संख्याकाचा क्रम, श्रेणी, संख्यामालिकेतील समसंबंध विसंगत संख्या ओळखणे, सांकेतिक वर्णमाला, सांकेतिक शब्दरचना, सांकेतिक शब्दलिपी, बसण्याचा क्रम ओळखणे, आकृत्यांचे पृथक्करण, घनाकृतीवर आधारित प्रश्न, आकृतीवरील कूट प्रश्न, दिशावर आधारित प्रश्न, नातेसंबंध, घड्याळ, वेळ व कालमापन, दिनदर्शिका. संदर्भ- बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी. बुद्धिमत्ता चाचणी किरण पाटील. आकृत्यांमधील संख्या ओळखणे, वर्गमालेची क्रमश्रेणी सोडविणे, संगत शब्दरचना, विसंगतपद ओळखणे,

अंकगणित संख्याज्ञान व स्थानिक किंमत, गणिताच्या प्राथमिक क्रिया विभागतेच्या कसोट्या, लसावि आणि मसावि, व्यवहारी व दशांश अपूर्णांक सरासरी गुणोत्तर प्रमाण, शतमान व शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढव्याजात नफा व तोटा, काम काळ आणि वेग, दशमान व कालमापन, क्षेत्रफळ व परिमिती. संदर्भ – majic of maths नितीन महाले. अंकगणित पंढरीनाथ राणे. सामान्यज्ञान भूगोल जगाचा, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल इतिहास   

भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा नागरिकशास्त्र भारतीय राज्यघटना आणि महाराष्ट्राचे ग्रामीण प्रशासन. सामान्यविज्ञान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र. प्रसिद्ध लेखक व दिनविशेष चालू घडामोडी भारतातील व जागतिक यांचा समावेश असतो. संदर्भ चालू घडामोडींसाठी अभिनव प्रकाशन, ६ वी ते १२ वी शालेय पुस्तकावर आधारित स्टेट बोर्ड पुस्तक, सामान्यज्ञान घटकासाठी गुतेकर यांचा संदर्भ, अभ्यासाची दिशा यापूर्वी झालेल्या तलाठी ऑफलाईन व ऑनलाईन झालेल्या प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करावा व जास्तीत जास्त सराव करावा.

याप्रमाणे अभ्यास कसून केल्यास आपणास नक्की यश मिळेल

  

संभाव्य तारीख सुस्पष्ट नंतर झ्झाहीरात केली जाईल .

आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा

 

No comments:

Post a Comment

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...