Sanch Manyata 2023 :आधार कार्ड ची अट शिथिल.
संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांची हजेरी ही धरली जाईल ग्राह्य
राज्यातील अनेक शाळांमध्ये संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड ची माहिती सरल पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेली होती. मात्र अनेक शाळांकडे विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती उपलब्ध नसल्याने शाळांमधील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरत नार होते त्यामुळे शिक्षण संचालकांनी निर्णयात बदल करून संच मान्यतेसाठी ठेवलेली आधार कार्ड सक्तीची अट शिथिल केली आहे. वर्गात नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे तसेच शिक्षण संचालकांनी स्पष्ट केलेले आहे. 15 जून पर्यंत आधार कार्ड वैद्य असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार संच मान्यतेसाठी करण्यात येणार होता.शिक्षण संचालकांच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांची नोकरी वाचली असून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता येणार असल्याचा दावा शाळांकडून करण्यात येत आहे मात्र असे असले तरीही या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचे आधार कार्ड का काढली नाहीत याची चौकशी करावी असे आदेशही शिक्षण संचालकांकडून देण्यात आलेली आहेत.
शाळेतील किमान 80% विद्यार्थ्यांचे आधार वैद्य असल्याचे विचारात घेऊन शाळांनी अंतिम संच मान्यता करण्यात आली होती मात्र विद्यार्थ्यांच्या नावातील तफावत किंवा अन्य कारणांमुळे अनेक विद्यार्थी अवैध ठरलेली आहेत.
* असे आहेत निर्देश
काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही परंतु ते नियमित शाळेला येत आहेत असेही आढळून आलेले आहे अशा विद्यार्थ्यांना संच मान्यतेत गृहीत न धरल्यामुळे त्यांचा फटका शिक्षकांच्या मंजूर पदांवर बसत होता त्यामुळे आधार कार्ड नाही परंतु शाळेत नियमित उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनाही संच मान्यतेसाठी घायल धरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.* विद्यार्थी Miss-Match संदर्भात कोणते निर्देश देण्यात आले?
आधार कार्ड वरील नाव लिंग जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांची शाळेतील नोंद आणि उपस्थिती याची खात्री करावी असे विद्यार्थी नजीकच्या अन्य शाळेतही दाखवले गेलेले नाहीत याची शहानिशा करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिलेले आहे.
माहिती आवडल्यास नक्की शेअर करा🙏
No comments:
Post a Comment