कोकणात एकही जागा न देता ठाकरेंची काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजली'
सोलापूर: शिवसेना संपर्कप्रमुख सावंत बंडखोरीच्या तयारीत
अजित पवारांच्या वक्तव्याने बारामतीची निवडणूक रंगणार
वाईमध्ये महायुतीचं टेन्शन वाढलं, शिंदेंचा जिल्हाध्यक्ष शरद पवारांकडे जाणार
वाई विधानसभा मतदारसंघातून युतीकडून अजित पवार गटाचा उमेदवार जाहीर झाला आहे. आमदार मकरंद पाटील यांना तिकीट मिळाले आहे. मात्र, शिंदे गटाचे सातारा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे त्यांनी थेट शरद पवार गटात जाण्याची तयारी केली आहे. जर कोणत्याही पक्षांनी उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढून निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे टेन्शन वाढले आहे.
सोलापूर: 'अक्कलकोट 'मधून सिद्धराम म्हेत्रेंना उमेदवारी
काँग्रेस पक्षाची बहुचर्चित विधानसभा उमेदवाराची पहिली यादी जाहीर झाली असून या यादीत 48 जणांना संधी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातून एकमेव अक्कलकोट मतदारसंघातून माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना पहिल्याच यादीत उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने वादात असणाऱ्या जागांची घोषणा करण्याचे टाळून वाद आणखी वाढणार नाही, याची काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या यादीही जाहीर करण्यात आली आहे.
उदयनराजे भोसले यांचा शरद पवारांना टोला
खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना "फोडाफोडीच नोबल" दिलं पाहिजे, असा मिश्किल टोला लगावला. कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या पक्षात सुरू असलेल्या इनकमिंगबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हा मजेशीर प्रतिसाद दिला. उदयनराजे यांचा हा वक्तव्य सध्याच्या राजकीय वातावरणात चर्चेचा विषय ठरला आहे.
सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेश कोठे यांना उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज गुरुवारी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर महेश कोठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता कोठे यांच्यापुढे भाजपचे विद्यमान आमदार विजय देशमुख यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार याकडे उत्तर मधील मतदारांचे लक्ष लागले आहे.
सुप्रीम कोर्टाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झटका
आगामी विधानसभा निवडणुकीआधी, सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिला आहे. अजित पवारांच्या गटाला 'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा देण्यात आली आहे, परंतु त्यांना या चिन्हासोबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना द्यावी लागणार आहे. शरद पवार गटाने 2 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी आज फेटाळण्यात आली.
विश्वजीत कदम यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर दिली प्रतिक्रिया
काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांना पलूस-कडेगाव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. याबाबत प्रतिक्रिया सांगितले, "मी सर्वप्रथम अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार मानतो. त्यांनी मला पुन्हा पलूस-कडेगावच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली."
अमित शहांना बंडखोरीची चिंता
राज्यात विधानसभेचा रणसंग्राम सुरू झाल्यामुळे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. महायुतीतील घटक पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर, काही मतदारसंघांमध्ये तिढा अजूनही सुटलेला नाही, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. दिल्लीतील बैठक महत्त्वाची ठरली आहे, त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. हे लक्षात घेतल्यास, ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांचा बंडखोरीचा धोका निर्माण होऊ शकतो. अशी शहांना चिंता आहे.
No comments:
Post a Comment