Fiverr

Tuesday, October 15, 2024

Trendig Topics:अजित पवार गटाचे अनेक नेते शरद पवारांच्या भेटीला

 

अजित पवार गटाचे अनेक नेते शरद पवारांच्या भेटीला






राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी अनेक नेते पुण्यात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर, त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे ते पुन्हा शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पिंपरी-चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे, आमदार अतुल बेनके यांचे भाऊ डॉ. अमोल बेनके यांनीही पवारांची भेट घेतली आहे.



आज होणार महाराष्ट्र निवडणुकीची घोषणा



महाराष्ट्र राज्य: आज दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणाहोणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली असून आयोगाच्या पत्रकार परिषदेत या घोषणे सोबतच आगामी निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे राजकीय वातावरणात बदल दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तथापि सर्व राजकीय पक्षांची जागा वाटपाची तयारी झालेली असल्याची माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर  इतर राज्यातील विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वाटत आहे.




लाडकी बहीण योजना आज शेवटची संधी



विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे, त्यामुळे "माझी लाडकी बहीण" योजनेसाठी आज (15 ऑक्टोबर) रजिस्ट्रेशन करण्याचा शेवटचा दिवस आहे. याआधी दोन वेळा तारीख वाढवण्यात आली होती, परंतु आता कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती आहे. ज्यांनी अद्याप फॉर्म भरला नसेल, त्यांच्यासाठी आजच शेवटची संधी आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी आजच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.




No comments:

Post a Comment

Government employees will get 26 public holidays in the new year.

  नवीन वर्षात मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना 26 सार्वजनिक सुट्ट्या.... 2025 साली महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना 26 सार्वजन...