⭕दुकानातील बाटलीतील पाणी पिणाऱ्यांनो सावधान!
एका अभ्यासानुसार, जगभरातील बंद बाटलीत आणि नळाच्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये विषारी 'फॉरएव्हर केमिकल्स' (पर्फ्लुरोअल्काइल पदार्थ किंवा पीएफएएस) आढळून आले आहेत. 15 देशांमधील 99% पेक्षा जास्त बाटलीबंद पाण्याच्या नमुन्यांमध्ये परफ्लुओरोक्टॅनोइक ऍसिड आणि परफ्लुरोओक्टेन सल्फोनेट आढळले आहेत. या केमिकल्समुळे शरीरात अनेक आजार होण्याचा धोका असतो.
⭕आचारसंहिताचे उल्लंघन; 31 कोटींचा दणका
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या आदर्श आचारसंहिताची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू आहे. यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू आदी मिळून एकूण 31 कोटी 16 लाख रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून ते आजपर्यंतच्या कारवाईचा यात समावेशआहे.
⭕अटल पेन्शन योजना! भविष्याची सोया आताच
करा
निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अटल पेन्शन योजना महत्त्वाची आहे. या योजनेत 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींनी गुंतवणूक करण्यास पात्रता आहे. या योजनेसाठी 18 व्या वर्षी अर्ज केल्यास, दरमहा 210 रुपये गुंतवून 60 व्या वर्षी 5000 रुपये पेन्शन मिळवता येते. खाते उघडणे सोपे आहे; जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन आवश्यक फॉर्म भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. फॉर्म जमा केल्यानंतर, बँक अधिकारी तुमचे खाते उघडतील. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून तुमच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करा.
⭕लाडकी बहीण योजनेमुळे वाढला बँकेत गोंधळ...
महाराष्ट्रातील बँक कर्मचाऱ्यांचे 16 नोव्हेंबरला आंदोलन
महाराष्ट्रातील बँक कर्मचाऱ्यांनी 16 नोव्हेंबरला एक दिवसीय आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यूनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स (UFBU) च्या मते, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांना सुरक्षितता वाटत नाही. तुळजापूरकर यांनी सांगितले की, या योजनेबाबत बँकांमध्ये गोंधळ वाढला आहे आणि सरकारकडून स्पष्ट संवादाचा अभाव आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना शिविगाळ आणि मारहाण सहन करावी लागत आहे. त्यामुळे यूनियनने आंदोलनाची हाक दिली आहे.
⭕शेअर मार्केट; 1 नोव्हेंबरला सायंकाळी मुहूर्त ट्रेडिंग
दिवाळी सणाच्या अनुषंगाने सर्वत्रच धामधूम सुरू आहे. दुसरीकडे शेअर बाजारात देखील दिवाळीत 'मुहूर्त ट्रेडिंग' वर विशेष व्यवहार केले जाणार आहेत. दिवाळीत शेअर बाजार बंद असतो, परंतु केवळ एका तासासाठी 'मुहूर्त ट्रेंडिंग' खुला असतोयात गुंतवणूकदार लहानशी गुंतवणूक करून शेअर मार्केटची परंपरा जपतात. यंदाच्या दिवाळीत 'बीएसई-एनएसई'तर्फे शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत मुहूर्त ट्रेंडिंग असणार आहे. त्याचे प्री- ओपनिंग सायंकाळी 5.45 ते 6 या वेळेत होईल.
⭕ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या आमदारांचे तिकीट कापणार?
मविआमध्ये जागावाटपावरून ताण वाढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटात खळबळ सुरू असून, बंडावेळी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या दोन आमदारांचे तिकीट कापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्फेकर मातोश्रीवर पोहोचले आहेत. शिवडीमधून सुधीर साळवी आणि चेंबूरमधून अनिल पाटणकर निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. ठाकरे यांना चांगली टक्कर देऊ शकतील असे उमेदवार निवडण्याची गरज भासते.
⭕महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी, 056 जागा; पगार 38,600 पासून
अन्न व औषध प्रशासन विभागात भरती. शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार
पगार : 38,600 ते 1,22,800/- रुपये पर्यंत राज्य सरकार अंतर्गत भरती
अर्ज पद्धती : ऑनलाईन
वयोमर्यादा : 18-38 वर्षे भरती कालावधी : पर्मनंट नोकरी
पदाचे नाव- वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन
शास्त्रज्ञ
एकूण जागा : 056 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र अर्जाची शेवटची तारीख- 22 ऑक्टोबर 2024 जाहिरीत PDF- https://drive.google.com/file /d/17HaeZhQcnh5QAQqqiO9c5xItMhqxb9KF /view?pli=1 कमी दाखवा
⭕दिवाळीत प्रवाशांसाठी 570 विशेष रेल्वे सेवा सुरू
दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूर विभागातून देशभर जाणाऱ्या प्रवाशांसाठी 570 विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवांपैकी 42 सेवा शनिवारीपर्यंत सुरू झाल्या आहेत. सर्व सेवांमध्ये 85 एक्स्प्रेस गाड्या समाविष्ट आहेत,ज्यात वातानुकूलित,शयनयान, जनरल डब्बे आणि अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे
⭕दिवाळीत आरोग्याची काळजी कशी घ्यायची?
दिवाळीच्या गोड पदार्थांबरोबर फळे, भाज्या आणि प्रथिने यांचा समावेश करा. पर्याप्त पाणी प्या, ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील. चिप्स आणि फास्ट फूडच्या ऐवजी भाजीपाला, नट्सचे सेवन करा. दिवाळीत नियमित व्यायाम करा. चालणे, योगा किंवा कोणताही खेळ खेळा. पुरेशी झोप घ्या. ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा श्वासाचे व्यायाम करा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ यांचा आहारात समावेश करताना प्रमाण लक्षात ठेवा. बाहेरच्या ताज्या आणि सुरक्षित खाद्यपदार्थांचा वापर करा.
No comments:
Post a Comment