सोलापूर जिल्ह्यात मतदारांची नोटाला पसंती
सोलापूर जिल्ह्यात 9896 मतदारांनी 'नोटा' ला पसंती दिली. सर्वाधिक 1106 मते सांगोल्यात, तर सर्वात कमी 557 मते शहर मध्य मतदारसंघात मिळाली. 'नोटा’पेक्षा कमी मते मिळालेल्यांमध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी, काँग्रेसचे चेतन नरोटे, माकपचे नरसय्या आडम यांच्यासह 159 उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 5 उमेदवारांना 'नोटा'पेक्षाही कमी मते मिळाली. यामुळे 159 उमेदवारांचे सुमारे 12 लाख रुपयांचे डिपॉझिट जप्त झाले. मात्र, अमर पाटील यांनी केवळ 2535 मतांनी डिपॉझिट वाचवले.
राज्यात सर्वाधिक मते कोणाला मिळाली..?
विधानसभा 2024 निकालात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले (सातारा) 1.42 लाख मताधिक्याने विजयी होत पहिल्या क्रमांकावर. धनंजय मुंडे (परळी) 1.41 लाख मतांनी दुसऱ्या स्थानी, तर दिलीप बोरसे (बागलाण) 1.29 लाख मतांनी तिसऱ्या स्थानी आहेत. अजित पवार (बारामती) यंदा 1.08 लाख मताधिक्याने नवव्या स्थानावर आहेत. इतर टॉप 10 विजेत्यांमध्ये एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, प्रताप सरनाईक, सुनील शेळके, शंकर जगताप, आणि दादा भुसे यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना खुशखबर! आता 15 हजार रुपये मिळणार..
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता वार्षिक ₹15000 दिले जाणार आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ₹6000 मिळत होते, पण आता राज्य सरकार ₹9000 अधिक देणार आहे, ज्यामुळे एकूण ₹ 15000 होईल. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा महत्त्वपूर्ण आधार मिळणार आहे. हा निर्णय राज्यातील कृषी समुदायाच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत PMJAY योजनेचा विस्तार करत 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा दिली आहे. आर्थिक स्थितीची कोणतीही अट नसल्याने सुमारे 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि वयोमानाचा पुरावा असणे अनिवार्य आहे. नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ही सेवा उपलब्ध असून, आर्थिक स्थितीकडे न पाहता सर्व ज्येष्ठ नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणार आहे.
महाराष्ट्रासह भारतातील निकालाची जगभरात चर्चा..
महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ठिकाणी काल निवडणुकांचे निकाल लागले. याची चर्चा जगभरात सुरु आहे. कारण, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटरवर लिहिले, की "भारताने 1 दिवसात 640 दशलक्ष (64 कोटी) मते मोजली. अमेरिका-कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतांची मोजणी सुरू आहे." दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारताने मतांची मोजणी कशी केली? या एका न्यूज पेपरच्या बातमीवर मस्क यांनी ही पोस्ट केली आहे.
No comments:
Post a Comment