दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..
रात्र वैऱ्याची! संकट घोंघावतंय, चक्रीवादळ येतंय
भारतीय किनारपट्टीवर पुन्हा एकदा चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील सर्वसामान्य नागरिकांची धाकधूक वाढली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व काळजी घेतली जात आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीपासून चक्रीवादळाचा वेग वाढणार आहे. या चक्रीवादळाचं नाव फेंगल असं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं आता चक्रीवादळात रुपांतर होत आहे. आज रात्री त्याचं रुपांतर चक्रीवादळात होईल. यावेळी वाऱ्याचा वेग 60 ते 70 किमी प्रति तास इतका असेल.
सोलापूर: विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विधानसभा निवडणुकीनंतर आज सुरू होणार होत्या. मात्र, निवडणुकीच्या ड्युटीसाठी टिचिंग, नॉनटीचिंगमधील कर्मचारी व्यस्त होते. निवडणूक संपली असली, तर अद्याप काहीजणांचे परीक्षा अर्ज भरायचे राहिले आहेत. त्यासाठी दोन डिसेंबरची मुदत महाविद्यालयाने मागितली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली.
सोलापूर: थकीत कर्ज एकरकमी भरणाऱ्या लाभार्थ्यास 50 टक्के सवलत
सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करण्याऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि. 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या सर्व योजनेतील थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहनही ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
राज्यात आणखी दोन नवे रेल्वेमार्ग..
रेल्वे विभागाकडून महाराष्ट्रासाठी एक गुडन्यूज देण्यात आली आहे. केंद्र सरकारने तीन रेल्वे मार्गासाठी मंजुरी दिली आहे. यापैकी महाराष्ट्रातल्या दोन मार्गांचा समावेश आहे. याचा फायदा थेट शेतकऱ्यांना देखील होणार आहे. या प्रकल्पामध्ये जळगाव- मनमाड चौथा रेल्वेमार्ग 160 कि.मी., भुसावळ ते खंडवा तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग 131 कि.मी. आणि प्रयागराज ते माणिकपूर असा तिसरा रेल्वे मार्ग 84 कि.मी.चा आहे.रेल्वेचे व्यवस्थापक धर्मेंद्र मीना यांनी भुसावळ येथे प्रसारमाध्यमांना नुकतीच ही माहिती दिली.
ई-केवायसी न केल्यास रेशन बंद होणार..
भारत सरकारने मोफत रेशन योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही. या निर्णयाचा उद्देश योजनेत पारदर्शकता आणणे आणि खोट्या लाभार्थ्यांवर कारवाई करणे आहे. पुढील पाच वर्षे सुरू राहणाऱ्या या योजनेचा लाभ 80 कोटी नागरिकांना होणार आहे. गहू, तांदूळ आणि इतर अन्नधान्य मोफत दिले जाणार आहे. खोट्या रेशन कार्डांचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने हा कठोर निर्णय घेतला असून, केवळ गरजू नागरिकांनाच याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
2 दिवस पाणीपुरवठा बंद..
लोअर परळ परिसरातील तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. 1450 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे लोअर परळ, दादर आणि प्रभादेवी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. या कार्यामुळे संबंधित परिसरात पाणीपुरवठा तात्पुरता थांबवला जाणार आहे. नागरिकांना पाणी बचतीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा ही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
'या' शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये, सरकारकडून नवीन यादी जाहीर
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही काही काळापूर्वी पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल, तर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत भारत सरकार 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे हस्तांतरित करते. यासाठी, शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी तपासावी आणि यादीमध्ये त्यांचे नाव आहे का ते पाहावे. हे तुम्ही मोबाईल किंवा कंप्युटरवर ऑनलाइन सहज तपासू शकता.
No comments:
Post a Comment