Fiverr

Monday, June 19, 2023

Gharkul yojana शबरी आदिवासी घरकुल योजना|Shabri Adivasi Garkul yojana

 

Gharkul yojana शबरी आदिवासी घरकुल योजना|Shabri Adivasi Garkul yojana

Gharkul- yojana- शबरी -आदिवासी -घरकुल- योजना-|Shabri -Adivasi -Garkul -yojana

Gharkul yojana शबरी आदिवासी घरकुल योजना|Shabri Adivasi Garkul yojana   

नमस्कार मित्रांनो नुकताच शासनाने शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी ची आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळत असते.सदर घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी एक वीस लाख रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची तरतूद केलेली आहे. तसेच मनेरेगा माध्यमातून या लाभार्थ्यास रोजगार देखील उपलब्ध होणारअसल्याचे सांगितले जात  आहे. मित्रांनो ,आदिवासी उपयोजना अंतर्गत अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीततसेच ज्या लोकांना स्वताचा निवारा नाही. आणि जे अनुसूचित जमातीचे लोक आहेत. ते लोक  मातीची घरे झोपडपट्ट्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहत असतात तर अशा पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची म्हणजेच शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनाकडून चालविली जाणारी ही योजना आहे.या योजनेचा लाभ शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जाते.त्याशिवाय रोजगार हमी योजनेकडून कामाचा मोबदला देखील मिळत असतो. आदिवासी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांनी निवड करताना ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कारवाई करून मंजुरी देण्यात येत असते. योजनेअंतर्गत 2021 22 या आर्थिक वर्षाकरिता घरकुल यांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय 16 जुलै 2021 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला होता..

  👉 आहे तरी काय ही  Shabri Gharkul Yojana?

मित्रांनो अनुसूचित जमाती मधील पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठीची शासनाने शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू केलेली आहे. या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांनाच घरकुल मंजूर केले जाते.


👉शबरी  घरकुल योजनेअंतर्गत किती रक्कम मर्यादेपर्यंत लाभ देय आहे?

ग्रामीण क्षेत्रासाठी रुपये १ लाख ३२ हजार एवढी घराची किंमत मर्यादा असेल.नक्षलग्रस्त तसेच डोंगरा क्षेत्रासाठी १ लाख ४२ हजार एवढी घराची किंमत मर्यादा असेल.महानगरपालिका क्षेत्राकरिता घराची किंमत मर्यादा रुपये २ लाख एवढी असेल.

👉Gharkul Yojane साठी कोणती कागदपत्रे लागतात?

शबरी घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे- या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला यात जातीचे प्रमाणपत्र रेशन कार्ड बँक खाते पासबुक आधार कार्ड जॉब कार्ड नमुना नंबर आठ यासह इतर काही कागदपत्रांची गरज असते.

👉Shabari Gharkul Yojna साठी कोठे अर्जकरता येईल ?

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून घरकुलांना मंजुरीची प्रक्रिया राबवली जाते त्या ठिकाणी प्रस्ताव दाखल करावा लागत असतो शिवाय पंचायत समिती ग्रामपंचायत मध्ये याबाबतची अधिक माहिती दिली जात असते.

👉Gharkul Yojana चे कसे  मिळते अनुदान?

 मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख वीस हजाराचे अनुदान मिळते तसेच शौचालय बांधकामासाठी 32000 हे मार जी एस अंतर्गत 18 हजार असे एकंदरीत दीड लाखाचे अनुदान मिळू शकते.

 शबरी आदिवासी घरकुल योजना २०२२-२३ उद्दिष्ट्य निश्चित करण्याबाबत शासन निर्णय GR –शबरी आवास योजना शासन निर्णय GR दिनांक १६ जुलै २०२१.


आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा🙏

Thursday, June 15, 2023

Breaking news:शासकीय निमशासकीय नोकऱ्यांचं होणार खाजगीकरण

 Breaking news:शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांचं होणार खाजगीकरण


Breaking- news-:शासकीय -निमशासकीय- नोकऱ्यांचं- होणार -खाजगीकरण
                                              VartamanNews24

आत्ताची महत्त्वाची बातमी आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यात एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असतानाच आता राज्यातील शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांचं खाजगीकरण होणार आहे. प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय असे सांगण्यात येत आहे  यातून वाचणारा पैसा विकास कामांसाठी वापरला जाणारे राज्यात सफाई कामगार,शिपाई अशा चतुर्थ श्रेणीतील काही कर्मचाऱ्यांचा आधीच खाजगीकरण झाले हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या धोरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय त्यानुसार शासकीय निमशासकीय विभाग,स्थानिक स्वराज्य संस्था,महामंडळ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, तसंच सरकारच्या संबंधित अन्य कार्यालयातील नोकर भरती ही खाजगीकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहे ही पदभरती सरकारने नेमलेल्या मनुष्यबळ पुरवठा एजन्सी कडूनच केली जाणार आहे.यात प्रामुख्याने कोणत्या पदांचा समावेश असेल तेही सरकार येत्या काळात स्पष्ट करणारे मात्र प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी हा खाजगीकरणाचा निर्णय सरकारनेघेतल्याचे दिसून येत आहे.सरकारने नेमलेल्या एजन्सी कडूनच राज्य सरकारी नोकऱ्यांचा किंवा या पुढील होणाऱ्या भरतीमध्ये  फडणवीस शिंदे सरकार यांनी सांगितलेला आहे यात शिक्षक, अधीक्षक आणि अभियंते यांचा समावेश असणार आहे यासाठी सरकार मनुष्यबळ पुरवठा एजन्सी नेमणार आहे. याच एजन्सीच्या मार्फत सरकार भरती करण्यात येणार आहे.

माहिती शेयर करा 🙏🙏

Wednesday, June 14, 2023

Abdul Kalam Yojana for 10th & 12th Pass Studentsविद्यार्थ्यांना मिळणार 15,000 रु. अब्दुल कलाम योजना


Abdul Kalam- Yojana- for -10th- & -12th- Pass- Students

Abdul Kalam Yojana for 10th & 12th Pass Studentsविद्यार्थ्यांना मिळणार 15,000 रु. अब्दुल कलाम योजना.

नमस्कार मित्रांनो, आज आपण दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य करणाऱ्या योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.

चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कागदपत्रे, अटी, नियम  आणि कोणाला  या योजनेचा लाभ घेण्यात येईल, इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Abdul Kalam Yojana

पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना Abdul Kalam Yojana व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनांतर्गत शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज दि. २४ एप्रिल २०२३ ते ३० जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांनी dbt.punecorporation.org या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरावा. सोबत आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अपलोड करावीत.

काय आहे योजना?  किती मिळणार मदत?


दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यासाठी महानगरपालिकेच्या या दोन योजना आहेत. दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये) रुपयांची मदत देणारी भारतरत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना असून बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) रुपयांची मदत करणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना आहे.

योजनेसाठीची पात्रता


• योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.

• या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण असणे आवश्यक.

• पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला किमान ७० टक्के गुण असणे आवश्यक.

• योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थी/विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थी/विद्यार्थीनीला दहावी किंवा बारावीमध्ये किमान ६५ टक्के गुण असणे आवश्यक.

• योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनीने दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.

अधिक माहितीसाठी 18001030222 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.

अर्ज करण्याची लिंक – http://dbt.punecorporation.org/

नियम व अटी


•  रेशनिंग कार्डची पहिले व शेवटचे पान अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.

• कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावली भाडे करारनामा यांपैकी आवश्यक.

• अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक.

• वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.

• मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला आवश्यक राहील.

• बोर्ड मार्कशीट तसेच CBSE & ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळेचे टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. इयत्ता १० वी इयत्त १२ वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ८०% पेक्षा जास्त गुण, पुणे महानगरपालिकेच्या शाळेत अथवा रात्र प्रशालेत शिकत असलेले विध्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विध्यार्थी यांना ७०% पेक्षा जास्त गुण ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५% तसेच कचरा वेचक / बायोगॅस प्रकल्पावर काम करणारा/ कचऱ्याशी संबंधित काम करणारा असंघटीत कष्टकरी कामगार यांचे पाल्यास ६५% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी लाभासाठी पात्र ठरतील.

• महाविद्यालय प्रवेश शुल्क पावती जोडणे आवश्यक. महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरून स्कॅनिंग करून अर्ज सोबत अपलोड करावेत.

• दिनांक ०९/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.

• इयत्ता १० वी इयत्ता १२ वी नंतर शासनमान्य वा विद्यापीठ मान्य संस्थेत कोणत्याही एका शाखेत प्रवेश घेतला असल्यास शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येईल.

• पुणे महानगरपालिका अर्थसंकल्पातील उपलब्ध तरतुदीपेक्षा एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास अर्जदारांना समान रक्कम किंवा इयत्ता १० वी कमाल रक्कम रु. १५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल व इयत्ता १२ वी कमाल रक्कम रु.२५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल.

• मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अर्ज सोबत अपलोड करावेत.

• उपलब्ध आर्थिक तरतूद व नियम अटींचा विचार करुन अर्ज नाकारण्याचा वा स्वीकारण्याचा अधिकार मा. मुख्य समाज विकास अधिकारी, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.




Monday, June 12, 2023

Meditation to start the day│ सकारात्मक उर्जेसाठी रोज सकाळी करा ध्यान...

Meditation to start the day│ सकारात्मक उर्जेसाठी रोज सकाळी करा ध्यान


                                                                         सकारात्मक उर्जेसाठी रोज सकाळी करा ध्यान...

मित्रानो, मी माझ्या लेखात morning meditation या बद्दल माहिती सांगणार आहे . दिवसाची सुरुवात करण्यासाठी ध्यानकरणे किती महत्वाचे असतेआजच्या या तंतानावाच्या दुनियेत आपण खूप गोंधळून गेलो आहे जिथे आपले मन आणि शरीर दोन्ही कार्य करते.शारीरिक व्यायामाबरोबर मनाचेही व्यायाम होणे तितकेच गरजेचे आहे .तत्र कसे कार्रायचे तर आपण पाहूया (morning meditation how to).

 Meditation म्हणजे मन रिकामे करणे किंवा विशिष्ट परिणाम साध्य करणे नाही. त्याऐवजी, त्यात निर्णय न घेता मनातील सामग्री हळूवारपणे मान्य करणे आणि त्यांचे निरीक्षण करणे. नेहमी ध्यान केल्याने Morning meditation for positive energy साठी करणे गरजेचे आहे.हे सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीच्या लोकांद्वारे सराव केले जाऊ शकते आणि वैयक्तिक प्राधान्ये आणि गरजा पूर्ण करण्यासाठी अनुकूल केले जाऊ शकते.

Meditation to start the day│ सकारात्मक उर्जेसाठी रोज सकाळी करा ध्यान...

Morning meditation केल्याने  तुमचा दिवस शांत आणि केंद्रित मानसिकतेने सुरू करण्याचा एक चांगला मार्ग असतो . सकाळच्या ध्यानाचा सराव स्थापित करण्यात मदत करण्यासाठी खालील प्रमाणे मार्गदर्शन केले आहे .

एक शांत आणि शांत जागा शोधा: तुमच्या घरातील एक शांत कोपरा किंवा तुम्हाला वाटेल असे समर्पित क्षेत्र निवडा जेथे तुम्ही विचलित न होता ध्यान करू शकता. खात्री करा की ही एक आरामदायक आणि शांत जागा आहे जिथे तुम्ही काही मिनिटे बिनदिक्कत बसू शकता.

 

एक वेळ सेट करा: तुमच्या Morning meditation साठी विशिष्ट वेळ ठरवा. दररोज एक सुसंगत वेळ निवडणे उपयुक्त आहे, कारण ते नित्यक्रम स्थापित करणे सोपे करेल. पहाटे, उठल्यानंतर, ध्यान करण्यासाठी आणि तुमच्या दिवसासाठी टोन सेट करण्यासाठी बहुतेक वेळा शांततापूर्ण वेळ असते.

 

आरामात बसा meditation साठी आरामदायी मुद्रा शोधा. तुम्ही उशीवर पाय रोवून बसणे, जमिनीवर पाय सपाट ठेवून खुर्चीवर बसणे किंवा ते तुमच्यासाठी अधिक आरामदायक असल्यास झोपणे देखील निवडू शकता. मुख्य म्हणजे आरामशीर परंतु सावध पवित्रा असणे.

 

तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा: तुमचे डोळे बंद करा आणि तुमचे लक्ष तुमच्या श्वासाकडे आणा. स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्यासाठी काही खोल श्वास घ्या. त्यानंतर, आपला श्वास त्याच्या नैसर्गिक लयकडे परत येऊ द्या. तुमच्या श्वासोच्छवासाच्या संवेदनांचे निरीक्षण करा जेव्हा ते तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि सोडते. जर तुमचे मन भटकत असेल, तर हळूवारपणे तुमचे लक्ष तुमच्या श्वासाकडे वळवा.

 

Mindfulness meditationचा सराव करा: तुमची जागरूकता सध्याच्या क्षणाकडे वळवा. निर्णय न घेता उद्भवणारे कोणतेही विचार, भावना किंवा शारीरिक संवेदना लक्षात घ्याआणि  फक्त त्यांचे निरीक्षण करा आणि त्यांना जाऊ द्या, श्वासाकडे तुमचे लक्ष वळवा, जेव्हा तुम्ही स्वतः विचारात अडकत आहात.

Meditation to start the day│ सकारात्मक उर्जेसाठी रोज सकाळी करा ध्यान...

एक हेतू सेट करा: तुमच्या ध्यानापूर्वी किंवा दरम्यान, पुढील दिवसासाठी सकारात्मक हेतू निर्धारित  करा. ती कृतज्ञता, दयाळूपणा, संयम किंवा इतर कोणतीही गुणवत्ता असू शकते जी तुम्हाला जोपासायची आहे. हा हेतू तुमच्या मनात धरा आणि दिवसभर तुमच्या विचारांना आणि कृतींना मार्गदर्शन करू द्या.

 

हळूहळू कालावधी वाढवा: 5-10 मिनिटांसारख्या कमी ध्यानाच्या वेळेपासून सुरुवात करा आणि जसजसे तुम्ही अधिक आरामदायक व्हाल तसतसा हा कालावधी हळूहळू वाढवा. कालांतराने, तुम्हाला असे दिसून येईल की तुम्ही 20-30 मिनिटे किंवा त्याहूनही अधिक काळ ध्यान करू शकताअशा पद्धतीने तुम्हीMeditation time वाढू शकता .

 

स्वतःशी सौम्य व्हा: मित्रानो लक्षात ठेवा, ध्यान ही एक सराव आहे आणि तुमचे मन भटकणे स्वाभाविक आहे. स्वतःशी धीर धरा आणि दयाळू राहण्याचा प्रयत्न करा.. निराश होण्याऐवजी, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमचे मन भरकटत असल्याचे लक्षात येते तेव्हा हळुवारपणे तुमचे लक्ष सध्याच्या क्षणाकडे वळवा.

 

तत्य राखा: ध्यानाचा सराव स्थापित करताना सुसंगतता महत्त्वाची असते. दररोज meditation to start the day यासाठी निचित ध्येय ठेवा, जरी ते काही मिनिटांसाठी असले तरीही. जसजसे तुम्ही ही सवय कराल, तसतसे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नियमित ध्यानाचे फायदे अनुभवायला लागतील.

Meditation to start the day│ सकारात्मक उर्जेसाठी रोज सकाळी करा ध्यान...


 

लक्षात ठेवा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सकाळच्या ध्यानाकडे मोकळ्या मनाने आणि उपस्थित राहण्याची इच्छा बाळगणे. सरावाने, तुम्ही हळूहळू शांतता, स्पष्टता आणि आंतरिक समतोल निर्माण कराल आणि  morning meditation for positive energy तुमच्या उर्वरित दिवसावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते.

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...