आता 35 ऐवजी 20 मार्क पडले तरी अकरावीत प्रवेश
गणितात कच्चे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. आता दहावी बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी अकरावीमध्ये प्रवेश घेता घेणार आहे. मात्र रिझल्टवर विशिष्ट शेरा असेल. विद्यार्थ्यांपुढे 2 पर्याय असतील. एक प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे. हा पर्याय पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर करायचे नाही त्यांच्यासाठी आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात याची तरतूद करण्यात आली आहे.
आता शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होणार ??
राज्यातील शाळांच्या शैक्षणिक वर्षात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सीबीएसईच्या धर्तीवर राज्यातील शाळांचे वार्षिक वेळापत्रक आखण्याची शिफारस करण्यात आली आहे. यानुसार, शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होऊन 31 मार्चला संपेल, आणि मे महिन्यात उन्हाळी सुट्टी असेल. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीच यासंदर्भात माहिती दिली होती. हा बदल शासकीय, खासगी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांवर लागू होईल. मात्र, या शिफारशीला शिक्षक संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे, कारण दीर्घकालीन सुट्ट्या कमी केल्या जातील.
त्या 5 कोटींबाबत पोलिसांनी दिली महत्वाची बातमी
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिताच्या काळात पुण्यातील खेडशिवापुर टोल नाक्यावर सोमवारी संध्याकाळी पाच कोटी रुपयांसह एक कार राजगड पोलिसांनी पकडली. या कारमधील चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची नावे सागर सुभाष पाटील, रफीक अहमद नजीर, बाळासाहेब आण्णासाहेब आसबे, आणि शशिकांत तुकाराम कोळी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ही रक्कम सांगोल्यातील कंत्राटदार बाळासाहेब आसबे यांची आहे. निवडणूक आयोगाला याची माहिती देण्यात आली असून, सर्व रक्कम ट्रेझरीमध्ये जमा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात हळूहळू थंडीची तीव्रता
दक्षिण महाराष्ट्रात 29 ऑक्टोबरपर्यंत पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असल्याचे हवामान तज्ञांनी नमूद केले आहे. मात्र त्यानंतर राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागेल, आणि हळूहळू थंडीची तीव्रता वाढू लागेल. काल नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने पिकांना फटका बसला. विशेषतः कांदा आणि फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण!
मंगळवारी (22 ऑक्टोबर) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. निफ्टी 309 अंकांनी कमी होऊन 24,472 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 930 अंकांनी घसून 80,220 वर बंद झाला. निफ्टी बँक 705 अंकांनी घसरून 51,257 वर राहिला, तर मिडकॅप 1500 अंकांनी कमी झाला. गुंतवणूकदारांचे एकूण 8.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. ऑक्टोबरमध्ये FPIs ने 82,479 कोटी रुपये बाजारातून काढले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त एक वाढीसह बंद झाला, तर 29 शेअर्स घसरले. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 444.79 लाख कोटी रुपये राहिले.
दिवाळीत मिळणार मोफत गॅस
दिवाळी, छठ पूजा यांसारख्या मोठ्या सणांसाठी अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे गृहिणींना मोफत एलपीजी सिलिंडर दिले जाणार आहेत. केंद्र सरकारची विशेष योजना उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने लागू केली आहे. याअंतर्गत उत्तर प्रदेशातील 1.86 कोटी कुटुंबांना मोफत सिलिंडर दिले जाणार आहेत. हा मोफत गॅस प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत दिला जात आहे.
सोलापूर: अक्कलकोटची जनता मला पुन्हा आशीर्वाद देईल
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना अक्कलकोट विधानसभेसाठी दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयानंतर त्यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. कल्याणशेट्टी यांनी सांगितले की, "पाच वर्षे केलेल्या कामाच्या बळावर मी यंदाच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. " तसेच, अक्कलकोटची जनता आपल्या मतरूपी आशीर्वादाने पुन्हा संधी देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये 802 जागांसाठी भरती
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने 802 जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. उमेदवारांना पदवीधर, BBA, BBM, किंवा BBS असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे, SC/ST/ OBC साठी सवलती आहेत. अर्ज फी ₹300 (General/OBC/EWS) आणि ₹ 200 (पद क्र. 5) आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे. लिंक- https://drive.google.com/file/d/1wR ZDGAGyWZhSMY1dJIZbIex6Ayaf7-p/view?pli
=1
अजित पवार गटाच्या नेत्यासहित 200 जणांनी दिले राजीनामे
अजित पवार आणि सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यातील या घटनाक्रमामुळे एक मोठा धक्का बसला आहे. सुधाकर घारे यांनी कर्जत विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाकडे मागणी केली होती, पण स्थानिक आमदार शिंदे गटाचे असल्याने जागा त्यांच्याकडे गेली. यामुळे राष्ट्रवादीचे 200 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. सुधाकर घारे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत आणि 25 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे अजित पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे, आणि स्थानिक राजकारणात ताणतणाव वाढणार आहे.
खाद्यपदार्थ पेपरात खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक
खाद्यपदार्थ पेपरात खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. पेपरमध्ये खाद्यपदार्थ ठेवून खाल्ल्याने त्यातील शाई आणि अन्य रसायनं अन्नासोबत पोटात जातात, जे शरीरासाठी हानिकारक असतात. यामुळे कर्करोग (कॅन्सर) आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. पेपरावर वापरलेली शाई आणि रसायनं अन्नाशी संपर्कात येऊन त्यात मिसळतात, ज्यामुळे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. डॉक्टरांनी सांगितलं आहे की, पेपरचा वापर करून खाद्यपदार्थ देणे किंवा खाणे टाळावे, कारण हे आरोग्यास गंभीर धोका निर्माण करु शकते.