मतदान कार्ड मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा व माहिती भरा...
👇👇👇👇👇
तुमचे मतदान कार्ड शोधा....
https://electoralsearch.eci.gov.in/
या ब्लॉग मध्गे दैनिक बातम्या , चालू घडामोडी ,नोकरी, ,व्यवसाय,आरोग्य ,शैक्षणिक आणि टेक्नॉलॉजी या संबंधी संपूर्ण माहिती देणार आहे .
मतदान कार्ड मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा व माहिती भरा...
👇👇👇👇👇
तुमचे मतदान कार्ड शोधा....
https://electoralsearch.eci.gov.in/
केंद्र सरकारने टोल टॅक्ससाठी नवा नियम लागू केला आहे, ज्याचा कोट्यवधी वाहनधारकांना फायदा होणार आहे. नवीन नियमांनुसार, 20 किमीपर्यंत राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गांचा वापर करणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही. मात्र, यासाठी वाहनावर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) असणे बंधनकारक आहे. सध्या GNSS प्रणाली पायलट प्रोजेक्टअंतर्गत कर्नाटक आणि हरियाणामध्ये लागू आहे. यशस्वी चाचणीनंतर देशभर ही प्रणाली राबवली जाईल. यामुळे टोलमध्ये पारदर्शकता येणार असून वाहनचालकांचा प्रवास सुकर होईल.
सोलापुरातील होटगी रस्त्यावरील विमानतळावरून येत्या सात दिवसांमध्ये मुंबई आणि गोव्याला जाण्यासाठी विमानसेवा सुरू होणार असल्याच्या माहितीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. फ्लाय 91 या विमान कंपनीकडून ही सेवा सुरू होणार आहे. फ्लाय 91 या विमान कंपनीकडून सोलापूर ते पुणे आणि सोलापूर ते मुंबई पहिल्या टप्प्यात विमान सेवा सुरू करण्याची तयारी होती. मात्र पुणेपेक्षा, मुंबई, गोवा, हैदराबाद, तिरुपती, बंगळुरू या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याची मागणी सोलापूरकरांनी केली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात 16 नोव्हेंबर रोजी थंडीच्या दिवसात तापमानात वाढ झाली आहे. आज मुंबईचे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईत उष्णता आणि आर्द्रतेचा प्रभाव दिसून येत आहे. शहरातील हवामानामुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारतीय निवडणूक व्यवहार अधिनियम -1961 च्या 49P या कलमानुसार, तुमच्याऐवजी दुसऱ्या कुणी तुमच्या नावावर मत नोंदवले असेल आणि खरे तुम्ही मतदार असाल तर तुम्ही मतदार केंद्राच्या पीठासीन अधिकाराकडे अपील करू शकता.अर्थात, तुम्हीच खरे मतदार आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान केंद्राच्या स्लिप अशी कागदपत्रे असायला हवीत.
सर्वात प्रथम राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर WWW.ECI.GOV.IN वर जा. त्यात मेन्यूमधील डाऊनलोड e-Epic निवडा. खाली स्क्रोल करुन सर्व्हिस सेक्शनमध्ये जा. त्याखाली e-Epic डाऊनलोडवर क्लिक करा. तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर, ईमेल किंवा EPIC नंबर आणि कॅप्चा कोर्ड भरल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करावं लागेल. लॉगइन करून डाऊनलोड EPIC वर क्लिक
करा.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला आता केवळ चार दिवस उरले आहेत. घरोघरी मतदानासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव सुरु आहे. पण तुमचं व्होटर आयडी हरवलं असेल तर अगदी काही मिनिटांमध्येच तुम्ही हे ओळखपत्र डाऊनलोड करु शकता. फक्त त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. या फोनमध्येच तुम्ही मतदान ओळखपत्राची डिजिटल कॉपी डाऊनलोड सेव्ह करू शकता.
दिव्यांग मतदार मतदानासाठी 'सक्षम' मोबाईल अॅपचा लाभ घेऊ शकतात. 'सक्षम' मोबाईल अॅप दिव्यांगांसाठीच सुरू करण्यात आले आहे, त्यावर लॉग इन करून ते मतदान करू शकतात. उमेदवारांसाठी 'सुविधा' नावाचे मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून, हे ऑनलाइन पोर्टल असून तेथे नामनिर्देशन आणि शपथपत्रही दाखल करता येते. मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले की, 'सुविधा' पोर्टलचा वापर उमेदवारांना सभा आणि रॅलींसाठी परवानगी घेण्यासाठी देखील करता येतोय.
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची मुदत आहे. या योजनेतून प्रत्येक तरुणाला इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी 800 पेक्षा जास्त कंपन्यांनी सरकारकडे नोंदणी केलेली आहे. या योजनेत पात्र उमेदवाराला सुरुवातीला एक रक्कमी 6 हजार रुपये दिले जाणार आहेत. तर त्यानंतर प्रत्येक महिना 5 हजार रुपये दिले जाणार आहेत. 10 वी पासून ते पदवीधरांपर्यंतचे सर्वजण यासाठी अर्ज करु शकतात. https://pminternship.mca.gov.in/login / या लिंकवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता
राज्याच्या निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. अनेक पक्ष पक्षाचे उमेदवार पूर्ण ताकतीनिशी प्रचारात उतरले आहेत. मात्र या निवडणुकीत किती पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुम्हाला माहिती आहे का? तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एक दोन नव्हे तर तब्बल 158 राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात अनेक राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांचा समावेश आहे. सत्तेच्या सारीपाठासाठी प्रत्येक पक्षाची धरपड सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत आहे. गुरुवारीही (14 नोव्हेंबर) सेन्सेक्स निफ्टीने जोरदार सुरुवात केली आणि काही वेळाने पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र केवळ शेअर बाजारच नाही तर सोन्यामध्येही सातत्याने घसरण होत आहे. 1 नोव्हेंबरपासून सोन्याचे दर 5000 रुपयांनी घसरले आहेत, म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात सोने स्वस्त झाले आहे. MCX वर सोन्याच्या भावातील बदल पाहिल्यास, गुरुवारी सोने 73,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले.
मध्यप्रदेशातील विदिशा येथे झालेल्या68व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सोलापूरच्या विद्यार्थी शालिनी चंदनशिवे हिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.प्रथम क्रमांक पटकावून तिने सुवर्णपदकाची मानकरी ठरलेली आहे.शालिनीने राष्ट्रीय पातळीवर सोलापूर जिल्ह्याचे नाव झलकवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मध्यप्रदेश येथील विदिशा येथे 68 व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा पार पडली यामध्ये सोलापूरची शालिनी चंदनशिवे हे निश्चित 24 ते 26 किलो वजनी गटातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे.
फिटनेस अकाउंट वर स्पोर्ट्स क्लब आणि ती महाराष्ट्राकडून शालिनी अण्णासाहेब चंदनशिवे हिचे स्वागत रेल्वे स्टेशनवर जोरदार करण्यात आले सोलापूर शहरातून प्रथमच राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून पदक विजेते खेळाडू म्हणून सोलापुरातील पहिलीच राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू ठरली आहे.
याच बरोबर तिने सर्व प्रथम सोलापूर महानगरपालिका कडून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आणि त्यानंतर राज्यस्तरावर सुद्धा Taykvandoस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता.
या विजयामुळे सर्वच तायक्वांदो स्पोर्ट क्लब चे पदाधिकाऱ्यांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. शालिनी हिला असिफ शेख, मनोज जाधव ,स्वप्निल फुलारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तायक्वांदो (कराटे)क्लास साठी संपर्क...
आसिफ शेख सर -9175400212
मनोज जाधव सर-8421710075
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच 2025 साठी 10वी आणि 12वीं बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. परीक्षांचा कालावधी 11 फेब्रुवारी ते मार्च 2025 दरम्यान असणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वरून वेळापत्रक डाउनलोड करू शकतील. वेळापत्रकात सर्व विषयांचे दिवस, तारखा व वेळा दिल्या आहेत. एसएससी, एचएससी बोर्डाचे परीक्षेचे वेळापत्रक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी वेबसाइटवर उपलब्ध होईल. यासंबंधी अधिक माहितीसाठी mahahsscboard.in ला भेट द्या.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यामुळे 18, 19 व 20 नोव्हेंबर रोजी शिक्षक निवडणूक कर्तव्यात सहभागी असतील. यासाठी शाळा भरवणे शक्य नसल्यास शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. मतदान केंद्रे शाळांमध्ये असतात व निवडणुकीसाठी शाळा ताब्यात घेतल्या जातात. परिणामी शिक्षण विभागाच्या उपसचिव तुषार महाजन यांनी संबंधित शाळा बंद ठेवण्याबाबत मुख्याध्यापकांना आवश्यक ती परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील शैक्षणिक प्रशासन सुलभ करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विविध विभागांकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांचे व्यवस्थापन शालेय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये आदिवासी आश्रमशाळांचा समावेश असून, या शाळांच्या व्यवस्थापनातील गुणवत्ता आणि नियोजनातील त्रुटी दूर होण्याची अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली असून, लवकरच अधिकृत प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
2025 मध्ये AI तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे स्मार्टफोनच्या किंमती वाढणार आहेत. काउंटरपॉइंट रिसर्चनुसार, स्मार्टफोन्सची जागतिक सरासरी विक्री किंमत 5 टक्क्यांनी वाढेल. जनरेटिव्ह AI, पॉवरफुल प्रोसेसर आणि प्रिमियम कॅमेऱ्यांसाठी कंपन्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे स्मार्टफोन्स अधिक महाग होतील. AI तंत्रज्ञानाचे वेगाने एकत्रीकरण होत असल्याने ग्राहकांना हे फीचर्स महागात पडणार आहेत, आणि त्यामुळे आगामी स्मार्टफोन अधिक प्रिमियम असतील.
सर्वप्रथमhttp://voterportal.eci.gov.in/ या वेबसाईटवर जा. तिथे रजिस्ट्रेशन करा. लॉगीन करुन e-pic चा पर्याय निवडा. तुमचा मतदार क्रमांक टाका. मोबाईलवरील ओटीपी जमा करून डिजीटल मतदार कार्ड डाऊलोड करु शकता. ज्या मतदारांचे मोबाईल नंबर निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये वेगळे असतील आणि सध्या ते दुसरा क्रमांक वापरत असतील तर अशावेळी केवायसी प्रक्रिया निवडावी लागते. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही मोबाईलनंबर अपडेट करु शकता. त्यानंतर डिजीटल मतदार कार्ड डाऊलोड करु शकता.
राज्यातील विधानसभा निवडणुका २८८ मतदारसंघांमध्ये होणार आहेत. या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवार ही निवडणूक लढवणार आहेत. त्यामध्ये ३ हजार ७७१ पुरुष, ३६३ महिला आणि अन्य २ उमेदवार आहेत.
राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी आहे. यादरम्यान, निवडणुक आयोग कोणती कामं करेल? 1.मतदार याद्या तयार करणं, त्या अद्ययावत करणं, मतदार ओळखपत्रं जारी करणं.
2. निवडणुकांचं नियोजन, वेळापत्रक तयार करणं, उमेदवारी अर्जांची छाननी, मतदानाच्या दिवशीचं नियोजन, निवडणूक निकाल जाहीर करणं.
3. राजकीय पक्षांना मान्यता देणं किंवा त्यांची मान्यता रद्द करणं, राजकीय पक्षांना चिन्हवाटप करणं, 4.निवडणुकीसंदर्भातील वाद सोडवणं..
भारत सरकारने मुलांच्या भविष्यासाठी "एनपीएस वात्सल्य" योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये आई-वडील 1000 रुपयांपासून बचत करू शकतात. ही योजना दीर्घकालीन मार्केट लिंक्ड गुंतवणूक असून मोठ्या रिटर्न्सचे आश्वासन देते. तसेच, मुलांसाठी गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करणारा एक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे. गोल्ड ईटीएफ कमी जोखमीचा असतो आणि सोन्याच्या भाववाढ़ीमुळे जास्त नफा मिळवता येतो. हे दोन्ही पर्याय मुलांच्या आर्थिक भविष्यविषयक सुरक्षिततेसाठी उपयुक्त आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आहे. पण यामध्ये मतदान केंद्रांवर मतदान न करता काही मतदारांना पोस्टल मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. RPA, 1951 च्या कलम 60 (c) अंतर्गत यात विशेष मतदार, सेवा मतदार आणि निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांसह 85 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, किमान 40% अंपगत्व, कोविड बाधित नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. परंतू, पोस्टल मतदानासाठी पात्र असणाऱ्या नागरिकांना निश्चित कालावधीत रिटर्निंग ऑफिसरकडे अर्ज सादर करणं आवश्यक आहे.
तालुक्यातील ज्येष्ठ मतदारांच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली 85 वयापुढील वृद्धांसाठी निवडणूक कर्मचारी घरी जाऊन मतदानाचा हक्क बजावून घेत आहेत. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून ही यंत्रणा सुरू केली आहे. घरी जाऊन मतदान यंत्रणेच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, वैराग भागातील 109 वर्षाच्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला. सोनाबाई भगवान जाधव असं या आजीबाईचं नाव असून सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी केलंय.
रक्तशर्करा नियंत्रित ठेवणे: बादामामध्ये मॅग्नेशियम असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी बादामाचे सेवन लाभदायक ठरते.
केसांसाठी पोषक: बादामामध्ये असलेल्या प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे कमी होते. केस अधिक घनदाट आणि निरोगी राहतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे: बादामातील मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यास मदत करते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी नियमित बादाम सेवन फायदेशीर ठरते.
विधानसभा 2024 मतमोजणी... Watch Live Assembly Vote Counting2024 राजनीतीNews Solapur Live Update 👇👇👇 https://www.youtube.com/live/Knv-Pi...