Fiverr

Friday, November 15, 2024

Today news:10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच 2025 साठी 10वी आणि 12वीं बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. परीक्षांचा कालावधी 11 फेब्रुवारी ते मार्च 2025 दरम्यान असणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वरून वेळापत्रक डाउनलोड करू शकतील. वेळापत्रकात सर्व विषयांचे दिवस, तारखा व वेळा दिल्या आहेत. एसएससी, एचएससी बोर्डाचे परीक्षेचे वेळापत्रक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी वेबसाइटवर उपलब्ध होईल. यासंबंधी अधिक माहितीसाठी mahahsscboard.in ला भेट द्या.



राज्यातील शाळांना 3 दिवस सुट्ट्या



राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यामुळे 18, 19 व 20 नोव्हेंबर रोजी शिक्षक निवडणूक कर्तव्यात सहभागी असतील. यासाठी शाळा भरवणे शक्य नसल्यास शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. मतदान केंद्रे शाळांमध्ये असतात व निवडणुकीसाठी शाळा ताब्यात घेतल्या जातात. परिणामी शिक्षण विभागाच्या उपसचिव तुषार महाजन यांनी संबंधित शाळा बंद ठेवण्याबाबत मुख्याध्यापकांना आवश्यक ती परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील शैक्षणिक प्रशासन सुलभ करण्यासाठी मोठा निर्णय



राज्यातील शैक्षणिक प्रशासन सुलभ करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विविध विभागांकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांचे व्यवस्थापन शालेय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये आदिवासी आश्रमशाळांचा समावेश असून, या शाळांच्या व्यवस्थापनातील गुणवत्ता आणि नियोजनातील त्रुटी दूर होण्याची अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली असून, लवकरच अधिकृत प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.




2025 मध्ये स्मार्ट फोन्सच्या किंमती वाढणार



2025 मध्ये AI तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे स्मार्टफोनच्या किंमती वाढणार आहेत. काउंटरपॉइंट रिसर्चनुसार, स्मार्टफोन्सची जागतिक सरासरी विक्री किंमत 5 टक्क्यांनी वाढेल. जनरेटिव्ह AI, पॉवरफुल प्रोसेसर आणि प्रिमियम कॅमेऱ्यांसाठी कंपन्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे स्मार्टफोन्स अधिक महाग होतील. AI तंत्रज्ञानाचे वेगाने एकत्रीकरण होत असल्याने ग्राहकांना हे फीचर्स महागात पडणार आहेत, आणि त्यामुळे आगामी स्मार्टफोन अधिक प्रिमियम असतील.


डिजीटल मतदान कार्ड कसं डाऊनलोड करायचं? 



सर्वप्रथमhttp://voterportal.eci.gov.in/ या वेबसाईटवर जा. तिथे रजिस्ट्रेशन करा. लॉगीन करुन e-pic चा पर्याय निवडा. तुमचा मतदार क्रमांक टाका. मोबाईलवरील ओटीपी जमा करून डिजीटल मतदार कार्ड डाऊलोड करु शकता. ज्या मतदारांचे मोबाईल नंबर निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये वेगळे असतील आणि सध्या ते दुसरा क्रमांक वापरत असतील तर अशावेळी केवायसी प्रक्रिया निवडावी लागते. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही मोबाईलनंबर अपडेट करु शकता. त्यानंतर डिजीटल मतदार कार्ड डाऊलोड करु शकता.



२८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १३६ उमेदवार



राज्यातील विधानसभा निवडणुका २८८ मतदारसंघांमध्ये होणार आहेत. या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवार ही निवडणूक लढवणार आहेत. त्यामध्ये ३ हजार ७७१ पुरुष, ३६३ महिला आणि अन्य २ उमेदवार आहेत.


निवडणूक आयोगाची कामं काय असतात?



राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी आहे. यादरम्यान, निवडणुक आयोग कोणती कामं करेल? 1.मतदार याद्या तयार करणं, त्या अद्ययावत करणं, मतदार ओळखपत्रं जारी करणं.

2. निवडणुकांचं नियोजन, वेळापत्रक तयार करणं, उमेदवारी अर्जांची छाननी, मतदानाच्या दिवशीचं नियोजन, निवडणूक निकाल जाहीर करणं.

3. राजकीय पक्षांना मान्यता देणं किंवा त्यांची मान्यता रद्द करणं, राजकीय पक्षांना चिन्हवाटप करणं, 4.निवडणुकीसंदर्भातील वाद सोडवणं..


गुंतवणुकीचे 'हे' जबरदस्त पर्याय माहिती आहेत का?


भारत सरकारने मुलांच्या भविष्यासाठी "एनपीएस वात्सल्य" योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये आई-वडील 1000 रुपयांपासून बचत करू शकतात. ही योजना दीर्घकालीन मार्केट लिंक्ड गुंतवणूक असून मोठ्या रिटर्न्सचे आश्वासन देते. तसेच, मुलांसाठी गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करणारा एक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे. गोल्ड ईटीएफ कमी जोखमीचा असतो आणि सोन्याच्या भाववाढ़ीमुळे जास्त नफा मिळवता येतो. हे दोन्ही पर्याय मुलांच्या आर्थिक भविष्यविषयक सुरक्षिततेसाठी उपयुक्त आहेत.


पोस्टल मतदान करण्याचा अधिकार कोणाला?



महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आहे. पण यामध्ये मतदान केंद्रांवर मतदान न करता काही मतदारांना पोस्टल मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. RPA, 1951 च्या कलम 60 (c) अंतर्गत यात विशेष मतदार, सेवा मतदार आणि निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांसह 85 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, किमान 40% अंपगत्व, कोविड बाधित नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. परंतू, पोस्टल मतदानासाठी पात्र असणाऱ्या नागरिकांना निश्चित कालावधीत रिटर्निंग ऑफिसरकडे अर्ज सादर करणं आवश्यक आहे. 

सोलापूर: 109 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा अधिकार



तालुक्यातील ज्येष्ठ मतदारांच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली 85 वयापुढील वृद्धांसाठी निवडणूक कर्मचारी घरी जाऊन मतदानाचा हक्क बजावून घेत आहेत. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून ही यंत्रणा सुरू केली आहे. घरी जाऊन मतदान यंत्रणेच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, वैराग भागातील 109 वर्षाच्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला. सोनाबाई भगवान जाधव असं या आजीबाईचं नाव असून सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी केलंय.



बादाम खाल्ल्याने शरिर बनते मजबूत


रक्तशर्करा नियंत्रित ठेवणे: बादामामध्ये मॅग्नेशियम असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी बादामाचे सेवन लाभदायक ठरते.

केसांसाठी पोषक: बादामामध्ये असलेल्या प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे कमी होते. केस अधिक घनदाट आणि निरोगी राहतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे: बादामातील मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यास मदत करते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी नियमित बादाम सेवन फायदेशीर ठरते.


No comments:

Post a Comment

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...